The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

आपल्या चिमुकल्याला छोटी जीप बनवून देणाऱ्यासाठी आनंद महिंद्रांनी मदतीचा हात पुढे केलाय

by द पोस्टमन टीम
23 July 2020
in विश्लेषण, ब्लॉग
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


हसणारी, खेळणारी, चिवचिवाट करणारी, आपल्या निरागस करामतींनी हैराण करणारी लहान मुले सगळ्यांनाच आवडतात. आपल्या मुलांना आनंदात पाहायला सगळ्यांनाच आवडतं. मुलांच्या आनंदासाठी पालक कुठलाही मार्ग अवलंबायला तयार असतात. मुलांचा वाढदिवस ही तर प्रत्येक पालकासाठी अमुल्य गोष्ट असते. गरीब असो की श्रीमंत प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचा वाढदिवस संस्मरणीय पद्धतीने साजरा करावा वाटतो.

केरळातील असेच एक पालक आहेत ज्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याला छोटी जीप स्वतः तयार करून भेट दिली आहे. मोठ्या जीपप्रमाणे ही छोटी जीप देखील रस्त्यांवरून धावू शकते.

अरुणकुमार हे केरळच्या एका छोट्या जिल्ह्यात नर्सिंगचे काम करतात. त्यांचा मुलगा केरळचे अभिनेते मोहनलाल यांच्या चित्रपटांचा फॅन आहे. मोहनलाल यांच्या ल्युसिफर चित्रपटात वापरलेल्या एसयुव्हीसारखी गाडी त्याला हवी होती. तेंव्हा अरुण कुमार यांनी अशा पद्धतीची जीप बनवायला घेतली.

ही जीप म्हणजे विलीस एसयुव्हीची छोटी प्रतिकृतीच म्हणावी लागेल. अरुणकुमार यांनी ही जीप कशी बनवली आणि त्यांना याची प्रेरणा कुठून मिळाली याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडीओ युट्युबवर शेअर केला आहे.

ही जीप बनवण्यासाठी त्यांना तब्बल सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी त्यांनी अनेक पार्ट्स बाजारातून विकत घेतले किंवा इतरांकडून मागून घेतले आहेत.

या जीपचा सांगाडा म्हणजे त्याची चौकट बनवण्यासाठी त्यांनी जीए स्क्वेअर पाईप्स वेल्डिंग वापरले आहे. ही जीप बनवण्यासाठी त्यांनी रॉयल एन्फिल्ड मोटार सायकलची कन्सोल वापरली आहे. यातील स्प्रिंग सस्पेन्शनसाठी त्यांनी खऱ्याखुऱ्या जीपचे मँटल प्लेट वापरले आहेत. चेन स्प्रॉकेट सिस्टीमच्या सहाय्याने याची जोडणी केली असून या जीपमध्ये 24V डीसी मोटार बसवली आहे.

खेळण्यातील या जीपला आणखीन खरा लुक देण्यासाठी त्याला फोल्डिंग करता येणारे छत बसवले आहे. ही जीप चार्जिंगवर चालते. यासाठी स्पेशल डिझाईन केलेले कीट जीपच्या ड्रायव्हिंग सीट खाली बसवले आहे. गंमत म्हणजे या जीपला खऱ्याखुऱ्या जीपसारखे फॉरवर्ड, न्युट्रल आणि रिव्हर्स गिअर देखील आहेत.

हे देखील वाचा

या एका बँकेमुळे जगात पुन्हा आर्थिक मंदीचे सावट येऊ घातले आहे

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

त्यांनी अगदी सृजनशील पद्धतीने तयार केलेल्या या जीपचे व्हिडीओ आणि पोस्ट इंटरनेट आणि सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फक्त हीच जीप नाही तर त्यांनी असे छोटे छोटे टॉय कारचे अनेक प्रकार याआधीही बनवले आहेत. याशिवाय त्यांनी एक छोटी रिक्षा आणि ट्रॅक्टर बनवले आहेत.

मुलांना बाजारातील खेळणी विकत आणून देण्यापेक्षा माझे कौशल्य वापरून ही खेळणी बनवण्यात मला जास्त आनंद मिळतो असे अरुणकुमार म्हणतात. त्यांनी आजपर्यंत असे अनेक खेळण्यांचे खरेखुरे छोटे मॉडेल्स स्वतःहून बनवले आहेत. अरुणकुमार क्रिएटिव्हिटी नावाचे युट्युब चॅनेल आहे ज्यावर त्यांनी आजपर्यंत केलेल्या अशा इलेक्ट्रॉनिक टॉइजचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

त्यांच्या या छोट्या गाड्या फारच आकर्षक आणि मजबूत असतात. त्यांनी बनवलेले हे मॉडेल्स विकत घेण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करतात पण, अरुणकुमार यांनी या गाड्या स्वतःच्या मुलांसाठी बनवलेल्या आहेत. अशा प्रकारच्या खेळण्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करण्यासारखी साधनसामग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही.

त्यांची ही पोस्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचली तेंव्हा उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यास उत्सुक असलेल्या आनंद महिंद्रा यांनी अरुणकुमार यांच्या या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.

आनंद महिंद्रा हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या महिंद्रा उद्योगसमूहाचे चेअरमन आहेत. एखाद्या कल्पक व्यक्तीला मदत करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. सामाजिक कार्यात आणि छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आनंद महिंद्रा नेहमीच एक पाउल पुढे असतात.

देशातील या छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी महिंद्रा ग्रुपच्या वतीने १ कोटी रुपयांची रक्कम बाजूला काढून ठेवली आहे. जेंव्हा त्यांच्यापर्यंत अशा छोट्या आणि कल्पक लोकांचे उद्योगाच्या बातम्या पोहोचतात तेंव्हा ते स्वतःहून त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त करतात.

तमिळनाडूतील कमलथल या एक रुपयात इडली विकणाऱ्या इडली अम्माच्या व्यवसायातही त्यांनी गुंतवणूक करून तिच्या कामाची दखल घेतली होती. ८० वर्षांच्या इडली अम्मा आजही चुलीवर आणि पाट्यावर इडलीची तयारी करून इडली बनवतात आणि अत्यंत गरजू लोकांना पोटभर इडली खाता यावी म्हणून फक्त एक रुपया दराने त्या या इडली विकतात.

ही गोष्ट जेंव्हा त्यांना समजली तेंव्हा त्यांनी आपल्या तामिळनाडू टीमला याबाबत सूचना देऊन कमलथल आज्जीला गॅस शेगडी आणि मिक्सर भेट दिला होता.

गुजरातमधील एका विकलांग व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्सपासून गाड्या बनवण्याचा व्यवसाय सुरु केल्याचे समजले, तेंव्हा त्यांच्याही व्यवसायात त्यांनी गुंतवणूक करण्याची इच्छा दाखवली.

या विकलांग व्यक्तीच्या कार्याने तर ते अक्षरश: भारावून गेले. त्याचवेळी त्यांनी देशातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून स्वतःच्या वतीने एक कोटी रुपये एवढी मोठी रक्कम बाजूला काढून ठेवली.

देशातील कल्पकतेला आणि सृजनशील कार्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे व्यवसाय सुरु करणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. यासाठी त्यांनी ही रक्कम बाजूला काढून ठेवली असल्याचे ट्विट त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते.

याशिवाय देशातील मुलींचा शिक्षणासाठी त्यांनी ‘नन्ही कली’ नावाने एक एनजीओ सुरु केली आहे. या एनजीओच्या वतीने मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला जातो. या एनजीओच्या देशभरात हजारो शाखा असून मुलींना त्याच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. मुलींच्या शाळांना ही एनजीओ आर्थिक मदत देते. आजवर लाखो मुलींना त्यांच्या या उपक्रमाचा फायदा झाला आहे.

गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. नुसतेच शिक्षण नाही तर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या अर्थार्जनासाठीही ही एनजीओ मदत करते. नन्ही कली नावाची ही एनजीओ महिंद्रा फाउंडेशनतर्फे चालवली जाते.

कोरोनाच्या काळात देश मोठ्या संकटांशी झुंजत असताना आनंद महिंद्रा यांच्यातील ही उदार आणि संवेदनशील भावना पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्यांनी आपला १००% पगार कोरोनासाठी देण्याची घोषणा केली.

ADVERTISEMENT

देश आणि समाजातील उद्योगी घटकांना सावरायला आनंद महिंद्रा नेहमीच एक पाउल पुढे असतात. अरुणकुमारच्या प्रयत्न सफल झाले तर देशातील मुलांसाठी देशी बनावटीच्या या टॉय कार्स स्वस्तात उपलब्ध होतील असा त्यांचा अंदाज आहे. देशातील मुलांना अशा टॉय कार्सचा आनंद घेता येईल.

त्यांनीही महिंद्रा ग्रुपतर्फे मागे अशाच पद्धतीचा छोटा ट्रॅक्टर लॉंच केला होता. छोट्या म्हणजे वयाने लहान असणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे शेतीमध्ये रस निर्माण होईल आणि येणाऱ्या पिढीचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असे त्यांचे मत होते.

आनंद महिंद्रांसारखे उद्योजक जर छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी असेच पुढाकार घेत राहिले तर, नक्कीच हा देश आत्मनिर्भर बनेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी : भाग १ – चहा

Next Post

एचएमटी तांदळाच्या वाणाचा शोध लावणाऱ्या या शेतकऱ्याच्या नावावर एकही पेटंट नाही

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

विश्लेषण

या एका बँकेमुळे जगात पुन्हा आर्थिक मंदीचे सावट येऊ घातले आहे

8 October 2022
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
विश्लेषण

रशिया दुसऱ्या महायुद्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

18 May 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

20 April 2022
Next Post

एचएमटी तांदळाच्या वाणाचा शोध लावणाऱ्या या शेतकऱ्याच्या नावावर एकही पेटंट नाही

सर्वोत्कृष्ठ छायाचित्रासाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आणि दोन आठवड्यात त्याने आयुष्य संपवलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)