The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुल झाल्यानंतर काम मिळत नाही म्हणून त्यांनी आपल्यासारख्याच स्त्रियांसाठी हे प्लॅटफॉर्म सुरु केलं..!

by Heramb
28 March 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


स्त्री असो वा पुरुष, आज स्वावलंबी आणि त्यापेक्षाही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची गरज प्रत्येक व्यक्तीला आहे. अगदी शे-दोनशे वर्षांपूर्वी स्त्रियांचं जग म्हणजे त्यांचं घरदार, चूल आणि मूल हेच होतं. (तत्कालीन आर्थिक, सामाजिक परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे) शे-दोनशे वर्षांमागे का जायचं? काही निवडक अपवाद सोडता अगदी ५०-६० वर्षांपूर्वीही मुलींना एका मर्यादेपर्यंत शिक्षण देण्याची पद्धत होती. आजही ग्रामीण आणि दुर्गम भागात अशीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी तर व्यवस्थित शिक्षण झाल्यानंतरही नोकरी किंवा व्यवसायाऐवजी थेट मुलीच्या लग्नाची तयारी केली जाते. समाजात एक माणूस म्हणून जगायला ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे की नाही याचा विचार आजही केला जात नाही, हे दुर्दैव आहे.

आज जरी एका मुलीने उत्तम शिक्षण घेतलं, काही वर्षे नोकरी केली, स्वावलंबी होऊन लग्न केले आणि मातृत्वाच्या कारणाने काही वर्षं गॅप घेतला तर त्या स्त्रीला पुन्हा नोकरी मिळणे प्रचंड अवघड होऊन बसते. जीवनातील काही कर्तव्यांपैकी महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे पालकाचे आणि मातृत्वाचे. वयाच्या आणि अधिकाराच्या एका मर्यादेत आल्यानंतर प्रत्येक स्त्री-पुरुषाला हे कर्तव्य पार पाडावेच लागते, अपत्याला फक्त जन्म देऊनच नाही तर त्यावर चांगले संस्कार होईपर्यंत समर्पित भावनेने त्याचा सांभाळ करणे हे आई आणि वडील दोघांचे कर्तव्य असते.

९०च्या पिढीचे आई-वडील आठवल्यास, वडील सहसा कामाला बाहेर गेले तरी अपत्याला आईचा सहवास असायचा, त्यामुळे त्याच्यावर संस्कार देखील चांगलेच होत असत. पण सन २००० नंतर आई-वडील दोघेही बाहेर आणि अपत्य पाळणाघरात गेल्याने अनेक विपरीत बातम्या समोर येत होत्या. त्याला कारणंही तसंच होतं, घर चालवायचं तर दोघांनीही कमावणं गरजेचं, गॅप पडला तर सहजासहजी नोकरी मिळणार नाही असा विचार करून हा मार्ग अवलंबला जात असे. अशाच काहीशा परिस्थितीत अडकलेल्या पण या समस्येवर उपाय शोधलेल्या संकरी सुधर यांनी सुरु केलेल्या ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’ या प्लॅटफॉर्मबद्दल हा लेख..

‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’ कोणत्या समस्येवर उपाय आहे?

मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ग्रॅज्युएट झालेल्या आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या संकरी सुधर यांनी सुमारे ८ वर्षे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केले. पण, कोरोना-लॉकडाऊनच्या काळात त्यांना बाळ झालं आणि हा त्यांच्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा होता. बाळंतपणानंतर कंपनीचे काम आणि मातृत्व यांचा समतोल साधणे त्यांना अवघड जात होते. त्यांना प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याचा सामना देखील करावा लागला. या सर्व समस्यांमुळे सुधर यांना थकवा जाणवू लागला होता आणि आपल्या कंपनीतील किंवा घरातील दैनंदिन कामे करणेही त्यांना जड जात होते.



घर आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याचा विचार करून संकरी यांनी सुमारे आठ वर्षांनंतर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानंतर परिस्थिती आणखीनच बिघडली. काहीच काम न केल्याने त्यांना रोज अपुर्णत्वाची आणि असंतोषाची भावना होत होती, कोणत्याही अर्थपूर्ण कामात व्यस्त न राहिल्याने आपण आपली प्रतिभा आणि क्षमता वाया घालवत आहोत, असे त्यांना वाटू लागले.

संकरी यांनी फ्लेक्सिबल वर्क अवर्सच्या नोकऱ्या शोधण्यास सुरुवात केली, परंतु अनेक कंपन्या त्यांना कामावर घेण्यास या ना त्या कारणाने टाळाटाळ करत होत्या. फ्रीलान्सिंगमध्येही प्रचंड स्पर्धा होती. या रोजच्या संघर्षामुळे त्या सतत रागावलेल्या आणि दुःखी राहत असत. याचदरम्यान एकदा त्यांनी वृत्तपत्रात लेख वाचला. “भारतात जागतिक स्तरावर ‘ओव्हरक्वालिफाईड गृहिणीं’ची संख्या सर्वाधिक आहे” असा त्या लेखाचा आशय होता. यानंतर या संकटात सापडलेलो आपण एकटे नाही हे त्यांच्या लक्षात आले.

आपल्या समवयस्क मित्र-मैत्रिणींबरोबर बोलल्यावर आपल्यासारख्याच अनेक महिला आहेत हे त्यांच्या लक्षात आले. स्त्रियांनी उत्तम शिक्षण मिळवूनही मातृत्वासारख्या काही कारणांनी त्यांच्या प्रतिभेचा आणि क्षमतेचा योग्य वापर होत नाही हे त्यांच्या लक्षात आले.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’ची प्रेरणा

संकरी यांच्या मते, नोकरीच्या ठिकाणी योग्य फ्लेक्सिबिलिटी असल्यास अनेक पात्र (क्वालिफाईड) गृहिणी परिश्रम करून जबाबदारी घेण्यास उत्सुक आहेत. जर कंपन्या वेळ आणि लोकेशनमध्ये फ्लेक्सिबिलिटी देण्यास इच्छुक असतील तर अशा संधींचं सोनं करू पाहणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्ह्ज’ या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमागे देखील हीच प्रेरणा होती, आणि अशा ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्ह्ज’च्या ‘क्वालिफिकेशन’ (कुशलतेवर) तसेच टॅलेंटवर विश्वास होता.

‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’चे कार्यतंत्र

संकरी यांनी महिलांना नोकरीच्या अर्थपूर्ण संधी देण्याचे ठरवले होते आणि डेटा प्रोसेसिंग, रिसेलिंग किंवा इन्शुरन्स खरेदी यासारख्या नोकऱ्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊ दिलेच नाही. महिलांना कमी पगार ऑफर करणाऱ्या कंपन्या देखील त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवल्या. सुरुवातीला कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, कस्टमर सर्व्हिस आणि ॲडमिन ऑपरेशन्ससारख्या जॉब्सवर लक्ष केंद्रित करून, प्लॅटफॉर्मने आता बिजनेस डेव्हलपमेंट, टेस्टिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारख्या जॉब्सचा विचार देखील सुरु केला आहे.

ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्ह्ज प्लॅटफॉर्म स्त्रीच्या आवडीनुसार आणि तिला उपलब्ध असलेल्या वेळेनुसार फ्रिलांसींग आणि पूर्णवेळ असे दोन्ही पर्याय प्रदान करते. दररोज ८-९ तास करण्यास इच्छुक असलेल्या महिलांच्या ॲप्लिकेशन्सचा विशेष विचार केला जातो. लिंक्डइन व्यतिरिक्त, ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्ह्ज प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करून नोकरी शोधणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे याच प्लॅटफॉर्मवर पीएचडी केलेल्या स्त्रियादेखील नोकऱ्या शोधत आहेत, संकारींना याबद्दल फार वाईट वाटते.

‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’चा प्रभाव

ऑगस्ट २०२२ मध्ये लाँच झालेल्या ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्ह्ज या प्लॅटफॉर्मचा अनेक स्त्रियांना फायदा झाला आहे. सुमारे ६०० हून अधिक महिलांना उत्तम काम मिळवून देत आणि २००० हून अधिक महिलांना काम करण्याची संधी मिळवून देण्यासाठी त्यांना नव्या स्किल्सचे ट्रेनिंग देखील दिले आहे. या प्लॅटफॉर्मवर २६००० हून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे. याशिवाय ६०० हून जास्त कंपन्यांनी देखील या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर केले आहे. या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने स्टार्टअप्स आणि स्मॉल, मिडीयम एंटरप्राइजेसचा समावेश आहे.

संकरी यांच्या मते, समाजाचा स्त्रियांकडे त्या “काळजीवाहू आणि आपल्या आपल्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठीच बनलेल्या असतात” या दृष्टीकोनामुळे किंवा पूर्वग्रहामुळे त्यांची शैक्षणिक पात्रता किंवा कौशल्यपूर्ण असल्या तरी त्यांना सहजासहजी काम मिळत नाही. काही कंपन्यांना असे वाटते की स्त्रिया मुले झाल्यानंतर काम करण्यात टाळाटाळ करतात आणि म्हणूनच अशा कंपन्या स्त्रीला मूल असल्याचे समजताच त्यांना नाकारतात. समाजाचा हा दृष्टिकोन बदलणेही महत्त्वाचे आहे.

अपस्किलींग आणि प्रशिक्षण

संकरी यांच्या मते अनेकदा महिलांना हव्या त्या नोकऱ्या शोधण्यात बराच वेळ लागतो, त्याचे प्रमुख कारण म्हणजे नव्या कौशल्यांचा अभाव. आज क्षणाक्षणाला तंत्रज्ञान बदलत आहे, या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच आपली कौशल्येही विकसित व्हायला हवी, यासाठीही ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्ह्ज प्लॅटफॉर्म मदत करते. या प्लॅटफॉर्मवर महिलांना नवीन कौशल्ये शिकण्यास मदत केली जाते.

नवी कौशल्ये शिकण्याला अपस्किलींग म्हटले जाते तर जी कौशल्ये काही वर्षांपूर्वी आत्मसात केली होती, पण आता त्यांचा विसर पडला, अशा कौशल्यांवर पुन्हा काम करणे म्हणजे रीस्कीलिंग. अपस्किलींग आणि रिस्किलिंगच्या कार्यक्रमांवर भर देत अधिकाधिक महिला आणि कंपन्यांना या प्लॅटफॉर्मवर आणण्याचे संकरी यांचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची किंवा उपलब्ध करवून देण्याची देखील त्यांची योजना आहे. यामुळे अधिकाधिक महिला सक्षम होऊन आपल्यासारख्याना घेऊन पुढे जाऊ शकतील असा त्यांचा विश्वास आहे.

केवळ दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या प्लॅटफॉर्मने तुलनात्मकदृष्ट्या मोठा पल्ला गाठला आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हजनोकरीस्त्री
ShareTweet
Previous Post

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

Next Post

अनेक आव्हानांचा सामना करत वॉलमार्ट वर्ल्ड्स बेस्ट रिटेल स्टोअर बनलंय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

अनेक आव्हानांचा सामना करत वॉलमार्ट वर्ल्ड्स बेस्ट रिटेल स्टोअर बनलंय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.