The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशाबाहेर काढण्यासाठी केलेलं हे सगळ्यात मोठं मिलिटरी ऑपरेशन होतं

by द पोस्टमन टीम
6 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धानंतर संपूर्ण जगाची दोन गटात विभागणी झाली. एका बाजूला अमेरिकेसारखा भांडवलशाही विचारसरणीचा देश जगावर सत्ता करू पाहत होता, तर दुसऱ्या बाजूला सोव्हिएत संघ आपल्या कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या सत्तास्पर्धेची झळ अनेक देशांना जाणवली. यातील दोन मुख्य देश म्हणजे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम. त्यातूनच एक विनाशकारी यु*द्ध झाले. ते म्हणजे व्हिएतनाम वॉ*र.

‘व्हिएतनाम वॉ*र’ हे व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यात झालेले यु*द्ध. दुसऱ्या महायु*द्धानंतरच्या काळात व्हिएतनाममध्ये फ्रान्सची सत्ता होती. पुढे जिनेव्हा करारानुसार व्हिएतनामची दोन भागांमध्ये फाळणी झाली. उत्तरेकडील भागाला व्हिएतनामी प्रजासत्ताक असे नाव मिळाले. या भागामध्ये चीनचा प्रभाव असल्यामुळे तेथे कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार होईल असे अमेरिकेला वाटले. त्यामुळे अमेरिकेने हस्तक्षेप करत दक्षिण व्हिएतनाममध्ये सत्तापालट घडवून आणला आणि आपल्या पसंतीच्या नेत्याची निवड केली.

यावेळी व्हिएतकॉंग नावाची देशभक्त संघटना अमेरिकेच्या विरोधात उभी राहिली. दक्षिण व्हिएतनामचे समर्थन करण्यासाठी अमेरिकेने तेथे १९५५ साली शिरकाव केला. व्हिएतकॉंग या क्रांतिकारकांच्या संघटनेचा निःपात करण्यासाठी दक्षिण व्हिएतनामच्या राजसत्तेने हरप्रकारे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे अमेरिकेने ही जबाबदारी स्वीकारली. त्यातूनच यु*द्धाला तोंड फुटले. अमेरिका आणि व्हिएतनाममध्ये तब्बल वीस वर्षे हे र*क्तरंजित यु*द्ध सुरू होते.

या यु*द्धात व्हिएतनामचे तब्बल २० लाख सैनिक आणि सामान्य नागरिक मृ*त्युमुखी पडले. या यु*द्धात अमेरिकेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आणि व्हिएतनामने प्रचंड नुकसान होऊनही चिवटपणे लढा दिला. यात अमेरिकेनेही जवळपास ५८ हजार सैनिक गमावले. या यु*द्धादरम्यान १९७५ साली व्हिएतनामचे नेते हो चि मिन्ह यांनी उत्तर व दक्षिण व्हिएतनाम या दोघांना एकत्रित आणून यु*द्ध संपवले.

या यु*द्धातील एक ठळक घटना म्हणजे ऑपरेशन फ्रिक्वेंट विंड. काय होते हे ऑपरेशन? तर ही होती व्हिएतनाममधील जवळपास ७ हजार अमेरिकन निर्वासितांना बाहेर काढण्यासाठी केलेली कारवाई.



हे ऑपरेशन यु*द्ध संपताना अगदी शेवटी दिनांक २९ आणि ३० एप्रिल १९७५ रोजी राबवले गेले. यावेळी तब्बल सात हजार लोकांना सायगाव म्हणजेच आजच्या ‘हो चि मिन्ह’ या शहरातून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्याआधी उत्तर व्हिएतनामच्या फौजा दक्षिण व्हिएतनामचा सामना करत आणि व्हिएतनाममधून अमेरिकन फौजांना बाहेर काढत सायगाव या राजधानीच्या शहरामध्ये घुसल्या होत्या. त्यामुळे अशाप्रकारे अमेरिकन नागरिकांना आणि निर्वासितांना शहराबाहेर काढणे हे अनेकांसाठी यु*द्ध संपत आल्याचे चिन्ह होते.

अमेरिकन दूतावासांसाठी अशाप्रकारे एखाद्या देशात अडकलेल्या लोकांना देशाबाहेर काढण्यासाठी नेहमीची प्रमाणित प्रक्रिया म्हणून निर्वासन योजना आधीपासूनच अस्तित्वात आहे. मार्चच्या सुरुवातीला, फिक्स-विंग विमानांनी ‘तान सोन न्हाट’ विमानतळावरून शेजारील देशांमधील नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. एप्रिलच्या मध्यापर्यंत, संभाव्य हेलिकॉप्टरच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सायगाव पडणार हे स्पष्ट होताच, अमेरिकन नौदलाने हेलिकॉप्टरमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि आवश्यक असल्यास हवाई साहाय्य देण्यासाठी वांग तुऊ जवळच्या किनाऱ्यावर टास्क फोर्स ७६ची तरतूद करून ठेवली.

२८ एप्रिल रोजी तान सोन न्हाट विमानतळाच्या शेजारी असलेल्या एअर बेसवर व्हिएतनामी पीपल्स एअर फोर्सच्या विमानांनी ह*ल्ला केला आणि “ऑपरेशन फ्रिक्वेन्ट विंड”ला सुरुवात झाली. याआधी फिक्स-विंग विमानांनी ५०,४९३ लोकांना तान सोन न्हाटमधून बाहेर काढले होते. २९ एप्रिलला दुपारी २च्या सुमारास या ऑपरेशनला सुरुवात झाली आणि त्याच रात्री ते संपलेही! यात हेलिकॉप्टरची किरकोळ नुकसानी झाली.

लष्करीदृष्ट्या विचार करता हे ऑपरेशन यशस्वी ठरले. परंतु तरीही त्यात कुठेतरी काहीतरी उणीव राहिली, असे या कारवाईत प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या वैमानिकांना वाटत राहिले. सीआयएच्या ‘एअर अमेरिका’ असे टोपणनाव असलेल्या आणि मुख्यतः कव्हर्ट ऑपरेशनसाठी (गुप्तचर ऑपरेशन्ससाठी) वापरल्या जाणाऱ्या वाहतूक विमानाचा वैमानिक बॉब केरन म्हणतो, “आम्ही शक्य होईल तेवढ्या लोकांची सुटका केली. पण जसजसे लोकांना या ऑपरेशनविषयी समजले आणि त्यांनी हेलिकॉप्टरचे लँडिंग आणि टेक ऑफ बघितले तसतसे अनेक लोक आमच्याबरोबर यायला उत्सुक झाले. आज मागे वळून पाहता माझ्यासाठी ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे, की त्यावेळी आम्ही प्रत्येकाची सुटका करू शकलो नाही…”

आजही ऑपरेशन फ्रिक्वेन्ट विंड ही आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशाबाहेर काढण्यासाठी अमेरिकन लष्कराने राबवलेली सर्वांत मोठी मोहीम मानली जाते. एप्रिल १९७५ च्या शेवटच्या आठवड्यात अंदाजे ७०००० दक्षिण व्हिएतनामी लोकांना बहुतांश बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. एका दिवसात, ८१ हेलिकॉप्टर्सनी १००० पेक्षा जास्त अमेरिकन आणि जवळजवळ ६००० व्हिएतनामी नागरिकांना अमेरिकन जहाजांपर्यंत नेले.

अमेरिकेच्या जहाजांवर पोहचलेल्या अनेक निर्वासितांना त्यांना घेऊन जाणाऱ्या नाविकांची आठवण येते. या क्रू मेंबर्सनी त्या निष्ठुर यु*द्धाच्या आगीत होरपळून घरातून पळून जाणाऱ्या निर्वासितांप्रति जी दयाळू वृत्ती आणि समंजसता दाखवली, त्याचे मोल शब्दांत होण्यासारखे नाही.

व्हिएतनाम यु*द्धात साधनसामग्री, तंत्रज्ञान व शस्त्रास्त्रे या सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ असणाऱ्या अमेरिकेचा व्हिएतनामी सैन्याने पराभव केला. या यु*द्धात अमेरिकेने लढाऊ विमानदलं, हेलिकॉप्टर्स, ने*पाम बॉ*म्ब्स यांचा वापर केला. यु*द्धशास्त्रातील अनेक नवी तंत्रेही वापरली. पण यश मिळाले नाही. हे गनिमी काव्यामुळे शक्य झाले.

अमेरिकी सैनिकांसाठी व्हिएतनामचा भूभाग अनोळखी होता, शिवाय व्हिएतनामची जनताही अमेरिकेच्या विरोधात होती. या यु*द्धामुळे जागतिक तसेच देशांतर्गत लोकमत अमेरिकेच्या विरोधात गेले. दक्षिण व्हिएतनामी फौजांचे मनोधैर्य खचल्याने अमेरिकेला पराभव पत्करावा लागला. या यु*द्धात अमेरिकेने अनेक चुका केल्या.

हो-चि-मिन्ह यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व व व्हिएतनाममधील राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्रामाचे स्वरूप त्यांनी लक्षात घेतले नाही. दक्षिण व्हिएतनाममधील लोकद्रोही व जुलमी लष्करशहांना अमेरिकेने पाठिंबा देऊन तेथील जनतेची सहानुभूती गमावली. एखाद्या देशाप्रती असलेले धोरण चुकीच्या गृहीतकावर आधारलेले असले, की किती मोठ्या प्रमाणात नुकसानी होते याचे हे यु*द्ध म्हणजे उत्तम उदाहरण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सिग्मंड फ्रॉईडच्या उल्लेखाशिवाय मानसशास्त्र हा विषयच अधुरा आहे..!

Next Post

मेलेला राजा साधू बनून परत आला, प्रकरण लंडनच्या प्रिव्ही कौन्सिलपर्यंत गेलं..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

मेलेला राजा साधू बनून परत आला, प्रकरण लंडनच्या प्रिव्ही कौन्सिलपर्यंत गेलं..!

फोन केल्यावर किंवा उचलल्यावर आपण 'हॅलो'च का म्हणतो?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.