The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या आहेत जगातील काही ‘शे’ वर्षे जुन्या कंपन्या ज्या आजही चालू आहेत…!

by Heramb
30 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जेव्हा आपण एक लहान मूल होतो तेव्हा दिवाळीच्या नंतरचे, विशेषतः हिवाळ्याचे महिने आपल्यासाठी नेहमीच आनंदाचे असायचे. पश्चिमेतही हिवाळ्यातील महिने अनेकांसाठी आनंदाचे असतात. फक्त स्नोबोर्डिंग किंवा स्लेडिंगसाठीच नाही तर अनेकांना ख्रिसमसचे वातावरण प्रचंड आवडते. कारण या दिवसांमध्ये शाळांना सुट्टी असते, बाहेरचे थंडगार वातावरण आणि बर्फाच्छादनातून परत आल्यानंतर घरातील ‘हेराथ’समोर बसण्याचे सुख वेगळेच असते आणि यापेक्षाही सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भेटवस्तू!!

एकोणिसाव्या शतकात कॅनडामध्ये ‘ईटन’ नावाचे एक डिपार्टमेंटल स्टोअर सुरू झाले होते. १९३० साली, ईटनने ख्रिसमस ट्री आणि गिफ्ट्स विकण्यास सुरुवात केली. ख्रिसमस ट्रीबरोबरच ग्राहकांचे बजेट, लिंग आणि वय इत्यादींवर आधारित भेटवस्तू त्यांनी विक्रीसाठी निवडल्या. इटन्स कॅटलॉग हे १८८४ ते १९७६ या काळात ईटनने प्रकाशित केलेले कॅटलॉग होते.

कॅनेडियन रिटेल स्टोअरद्वारे वितरीत केले जाणारे हे पहिले कॅटलॉग होते. काही मुलांना फक्त शाळेत किंवा सामुदायिक समारंभात भेटवस्तू मिळत असत. अनेकदा, शिक्षकच ईटनच्या कॅटलॉगद्वारे भेटवस्तू खरेदी करीत असत आणि त्या ख्रिसमस ट्रीवर लावण्यात येत असत. या भेटवस्तू प्रामुख्याने सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असत.

ख्रिसमसच्या काळात मिळणाऱ्या भेटवस्तू आबालवृद्धांना आवडतात. यासाठीच ईटनने ‘टोरोंटो’ येथील वार्षिक ‘सांताक्लॉज परेड’चे आयोजन केले होते. पहिली सांताक्लॉज परेड २ डिसेंबर १९०५ रोजी झाली. अनेक वर्षे विनिपेग आणि मॉन्ट्रियल येथे ईटनच्या सांताक्लॉज परेडचे आयोजन करण्यात आले होते. मग अचानक एक दिवस ही सगळी परंपरा बंद झाली.

प्रत्येक मुलाला वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ‘सांता’ हे एक काल्पनिक पात्र आहे हे समजते. त्यामुळे ख्रिसमसच्या गिफ्ट्सची मजा त्या दिवसापासूनच प्रत्येक मुलाच्या आयुष्यातून कमी होत जाते. पण ईटन स्टोअरची परंपरा ‘कायमची’ बंद व्हायला वेगळंच कारण होतं, ते म्हणजे ईटन स्टोअरने बऱ्याच जणांचे कर्जाचे पैसे बुडवले होते.

ईटन स्टोअर कॅनडामधील व्यवसायांचा बालेकिल्ला होता. ते दिवाळखोर बनणे नक्कीच अनेकांसाठी धक्कादायक होते. कदाचित हा शतकांपासून चालत आलेल्या घराणेशाहीचा परिणाम होता. इटन डिपार्टमेंटल स्टोअर हे कॅनडामधील सर्वांत जुन्या व्यवसायांपैकी एक होते.



कित्येक शतकांपासून किंवा शतकांच्याही पूर्वीपासून व्यवसाय कसे टिकून राहतात याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह असते. २००८ मधील एका अहवालानुसार, जगातील सुमारे ५५८६ कंपन्या दोनशे वर्षांपेक्षा जुन्या आहेत आणि या लेखामध्ये अशाच  काही जुन्या कंपन्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

जगातील काही जुन्या कंपन्या:

सर्वांत जुन्या कंपन्यांपैकी ५६% कंपन्या जपानमध्ये आहेत, तर २२% कंपन्या युरोपमध्ये आहेत. यापैकी सुमारे ८९% कंपन्या लहान व्यवसाय आहेत, अशा लहान व्यवसायांमध्ये प्रत्येकी ३०० पेक्षा कमी लोक असतात. वेश्याव्यवसाय हा जगातील सर्वांत जुना व्यवसाय आहे हे तुम्ही अनेकदा ऐकले आणि वाचले असेल, पण वस्तुस्थिती तशी नाही. जपानमधील ‘काँगो गुमी कंपनी लिमिटेड’ काही शतकांपूर्वी सुरू झाली. ही इमारतींचे बांधकाम करणारी कंपनी इसवी सन ५७८ साली सुरू करण्यात आली होती.

त्यावेळी, ‘प्रिन्स शोतोकू’ नावाच्या एका प्रतिष्ठित शाही जपानी माणसाने तीन कोरियन वास्तुविशारदांना शक्य तितकी नवीन बौद्ध मंदिरे बांधण्यासाठी आमंत्रित केले. या कोरियन वास्तुविशारद लोकांना सुंदर मंदिरे कशी बांधावी याचे ज्ञान होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

विशेष म्हणजे, ही कंपनी दीर्घकाळ टिकून राहिली कारण हा पिढीजात व्यवसाय होता. हा व्यवसाय स्थानिक पातळीवर ‘शायनिज’ किंवा जुने दुकान म्हणून ओळखला जातो. या व्यवसायाच्या सुरुवातीपासून ४० पेक्षा जास्त पिढ्यांनी हा व्यवसाय चालवला आहे. एखाद्या पिढीमध्ये हा वारसा पुढे चालवण्यासाठी मुलाचा जन्म न होता मुलीचा जन्म झाल्यास, या कुळाशी सम्बन्ध प्रस्थापित व्हावा या हेतूने मुलीचा पती मुलीच्या सासरचे नाव धारण करीत असे.

जपानेतर जुन्या कंपन्या

२००८ च्याच अहवालानुसार, जगात सुमारे ५९ कंपन्या ७०० वर्षांपेक्षाही जास्त जुन्या आहेत! यापैकी जपानमधील सुमारे ४० टक्के कंपन्यांचा समावेश होतो, तर जुन्या कंपन्या अस्तित्वात असलेल्या इतर देशांमध्ये जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, इटली आणि युरोपमधीलच आणखी काही देशांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, प्राचीन जर्मन ‘बेव्हरेज’ कंपन्यांची स्थापना सरकारी आदेशांद्वारे धार्मिक मठांमध्ये करण्यात आली होती. यामध्ये फ्रांस आणि इटलीचा समावेश असला तरी जर्मनीचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागते, कारण जर्मनीमध्ये दोन प्राचीन ‘वाईनरीज’ आहेत. जुन्या व्यवसायांमध्ये हॉटेल व्यवसायाचाही समावेश होतो. जगभरामध्ये १५ सर्वांत जुनी हॉटेल्स आहेत. यापैकी बहुतेक हॉटेल्स जपानमध्ये असून तीन जुनी हॉटेल्स ब्रिटनमध्ये आहेत. योगायोगाने जपानमधील दोन जुन्या हॉटेल्सना ‘द ओल्ड(ई) बेल’ असे नाव देण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये आणखी दोन जुन्या कंपन्या आहेत. या कंपन्या संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या ‘पब’साठी तयार करण्यात आल्या होत्या. त्यांची नावे अनुक्रमे ‘ऍडम’ आणि ‘हव्वा’ अशी आहेत. ही नावे धार्मिक असल्याचं कारणही तसंच आहे. या पबजवळच्या कॅथेड्रलच्या उभारणीचे काम करणाऱ्या काही कामगारांसाठी येथे ‘येल’ प्रकारची बिअर तयार होत असे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ही आहे जगाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात विश्वासघातकी माणसांची यादी

Next Post

इंग्रजांनी नेपोलियनला मद्रासमधील ‘सेंट जॉर्ज फोर्ट’मध्ये बंदिवासात ठेवायचं ठरवलं होतं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

इंग्रजांनी नेपोलियनला मद्रासमधील 'सेंट जॉर्ज फोर्ट'मध्ये बंदिवासात ठेवायचं ठरवलं होतं

या कार्यकर्त्याने चंद्रावर स्वतःचा हक्क सांगून तिथले प्लॉट्स विकायला काढले होते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.