The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

by Heramb
30 April 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जागतिक इतिहासातील दोन महायु*द्धांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली. यामध्ये लहान मुलं देखील वाचली नाहीत. जन्माने ज्यू असलेल्या लहान मुलांना तर अतोनात हाल सोसावे लागले. ना*झींमध्ये असलेले काही डॉक्टर्स तर वैज्ञानिक आणि विशेषतः अनुवांशिक प्रयोगांच्या नावाखाली लहान मुलांवर अनन्वित अ*त्याचार करत असत. जी मुले ना*झींच्या तावडीतून सुटली ती मित्र राष्ट्रांच्या एखाद्या संस्थेने वाचवली होती किंवा एखाद्या व्यक्तीने. मित्र राष्ट्राच्या अशाच एका व्यक्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याने ६०० पेक्षा अधिक लहान मुलांचे प्राण वाचवले होते.

अँथनी हॉपकिन्स, जॉनी फ्लिन आणि हेलेना बोनहॅम-कार्टर यांनी “वन लाईफ” या २०२३ साली रिलीज झालेल्या चित्रपटात भूमिका बजावली आहे. दुसरे महायु*द्ध सुरु होण्याआधी निकोलस विंटन नावाच्या व्यक्तीने जर्मनीने ताब्यात घेतलेल्या झेकोस्लोवाकियामधील लहान मुलांना वाचवले होते, याच सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

होलोकॉस्टची भयंकर कहाणी ही पाश्चिमात्त्य जगाला, विशेषतः युरोपला कधीही न विसरता येण्यासारखी आहे. ना*झी राजवटीद्वारे लाखो लोकांची छळ छावण्यांमध्ये ह*त्या करण्यात आली. ना*झींच्या छळामुळे मृत्युमुखी पडलेले मुख्यतः ज्यू होतेच पण त्यांच्याशिवाय अपंग, समलैंगिक, आणि राजकीय विरोधकांनाही ठार मारण्यात आले.  १९३८ आणि १९४० च्या दरम्यान ब्रिटीश सरकारने निर्वासित मदत समित्या तसेच जर्मनी आणि जर्मन-संलग्न प्रदेशातून अनाथ, अल्पवयीन मुलांना ब्रिटनमध्ये प्रवेश देण्याचे मान्य केले.

सुमारे १० हजार मुलांना वाचवून ब्रिटनमध्ये आणण्यात आले. यातील काही मुलांच्या नोंदी किंडरट्रान्सपोर्ट संग्रहामध्ये आहेत – ही सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांची संपूर्ण यादी नाही, परंतु या नोंदी ब्रिटनमध्ये येण्यापासून ते महायु*द्ध संपेपर्यंतच्या मुलांच्या अनुभवांचा एक संग्रहच आहे. निकोलसची कहाणी याच अनुभवांपैकी एक. तो आणि ‘चेकोस्लोव्हाकियातील निर्वासितांसाठीच्या ब्रिटिश समिती’ने (बीसीआरसी) ६६९ मुलांना ब्रिटनमध्ये आणण्यात यश मिळवले. होलोकॉस्टमध्ये त्यांच्या जवळजवळ संपूर्ण कुटुंबांची ह*त्या झाली होती.



निकोलस आणि इतरांचे (डोरीन वॉरीनर, ट्रेवर चॅडविक, निकोलस स्टॉपफोर्ड, बीट्रिस वेलिंग्टन, जोसेफिन पाईक आणि बिल बराझेट्टी) हे कार्य १९८८ साली प्रकाशझोतात आले, तेसुद्धा एका टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामुळे – एस्थर रॅन्झेनचा इंग्लंडमध्ये लोकप्रिय असलेला टेलिव्हिजन शो “दॅट्स लाइफ!”. या कार्यक्रमात निकोलसची मुलाखत घेतली गेली आणि त्याने वाचवलेल्या काही मुलांशी त्याचा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न झाला.पण यापूर्वी त्याचे कार्य अपरिचित होते.

कोण होता निकोलस विंटन?

‘निकोलस जॉर्ज वेर्थिम’चा जन्म १९०९ साली लंडन येथील हॅम्पस्टेड येथे रुडॉल्फ आणि बाबी यांच्या पोटी झाला. ते दोघेही ज्यू होते. ते काही वर्षांपूर्वी लंडनला गेले होते. रुडॉल्फ मॉस्कोचा होता तर बाबी जर्मनीतील बव्हेरियाची. या कुटुंबाने कालांतराने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. १९३८ साली या कुटुंबाने त्यांचे मूळ आडनाव सोडून दिले आणि विंटन हे आडनाव स्वीकारले.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

१९३८ पर्यंत निकोलस स्टॉक ब्रोकर म्हणून काम करत होता. त्याच वर्षी विंटन ब्रिटनच्या लेबर पार्टी अर्थात मजूर पक्षात सामील झाला. डिसेंबर १९३८ च्या शेवटी, झेक ज्यूंची मदत करण्याच्या उद्देशाने तो आपल्या एका सहकाऱ्याबरोबर प्रागला गेला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रागमध्ये आल्यावर विंटनची ३४ वर्षीय डोरीन वॉरीनरशी ओळख झाली. ती १३ ऑक्टोबरपासून प्रागमध्ये होती. ब्रिटीश सरकारने झेक लोकांशी विश्वासघात केल्याचे अनेकांना वाटू लागले होते. त्यामुळे तिने केवळ लज्जेच्या भावनेने तेथे काम करण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, “मला नेमके काय करावे हे अजिबात सुचत नव्हते, फक्त काहीतरी चांगलं करण्याची इच्छा होती,”.

झेक लोकांशी विश्वासघात केला म्हणजे नेमकं काय तर, वॉरीनर प्रागमध्ये येण्याच्या पंधरा दिवसांआधी, ब्रिटीश पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांनी म्युनिक करारावर स्वाक्षरी केली होती, या करारान्वये हि*टल*रला जर्मनीच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम चेकोस्लोव्हाकियाचा प्रदेश ‘सुडेटनलँड’ला जोडण्याची परवानगी दिली गेली होती. यामुळे सुडेटनलँडमधून एक लाखांहून अधिक निर्वासित चेकोस्लोव्हाकियामध्ये गेले.

म्युनिक करारामुळे नाराज असलेली वॉरीनर ही एकमेव ब्रिटन नागरिक नव्हती. ना*झींपासून आपला बचाव करू इच्छिणाऱ्या झेक लोकांना मदत करण्यासाठी ब्रिटनमधील अनेक धर्मादाय संस्था तयार झाल्या होत्या. यापैकी प्रमुख संस्था असलेल्या ‘झेकोस्लोव्हाकियामधील निर्वासितांसाठी बनवलेल्या ब्रिटीश समिती’मध्ये (बीसीआरसी) वॉरीनरने सेवा दिली. झेकोस्लोव्हाकिया सोडून ब्रिटनला जाण्यासाठी निर्वासितांना मदत करणे हे तिचे मुख्य काम होते आणि यातच आपण तिला मदत करू शकतो याची जाणीव निकोलसला झाली. 

निकोलसचे काम आणि त्यामागील प्रेरणा 

निकोलसने जानेवारी १९३९ मध्ये आपल्या आईला एक पत्र लिहिले, त्यात त्याने लिहिले, “चिल्ड्रन कमिटी स्थापन व्हावी असे मी सुचवले होते, मिस वॉरीनरने आधीच मला चेकोस्लोव्हाकियासाठी या चिल्ड्रन कमिटीचे सेक्रेटरी होण्यास सांगितले आहे, म्हणजे आता मला जास्त काम येणार आहे.”

आपल्या या जास्त कामांपैकी काही काम त्याने आईकडे सोपवले, जसे की ‘लंडनमधील होम ऑफिसला चौकशी करणे, लहान मुलांना ब्रिटनमध्ये आणण्यासाठी कोणती गॅरंटी किंवा हमी देणे आवश्यक आहे?’. याच दरम्यान, प्रागमध्ये या समितीच्या कामात अडथळा ठरणारे नोकरशाहीला मात देण्यास विंटनने सुरुवात केली. हे एक जटिल आव्हान होते परंतु विंटनचा आत्मविश्वास प्रचंड होता.

लहान मुलांना मदत करण्याचा विंटनचा निर्धार ११ जानेवारी १९३९ रोजी प्रागमध्ये त्याने पाहिलेल्या एका घटनेने बळकट झाला. त्याने रस्त्यावर उतरलेल्या झेक तरुणांचा आक्र*मक जमाव हिं*सक पद्धतीने आंदोलन करताना पाहिला. ते ज्यूंविरोधी घोषणा देत होते. विंटनने अनुभवलेली ही एकमेव भयंकर घटना नव्हती. ज्यूंना मदत करण्यासाठी आल्याने त्याला अनेकदा असे वाटत होते की त्याच्यावर सतत कोणीतरी लक्ष ठेवत आहे. त्याचा संशय खरा ठरला. प्रागमधील या समितीच्या लोकांवर लक्ष ठेवले जात होते.

१४ जानेवारी रोजी, विंटनने ब्रिटीश खासदार, एलेनॉर रॅथबोन यांना चेकोस्लोव्हाकियामधील निर्वासितांच्या शिबिरांपैकी एका शिबिरात नेले, तेथे अंदाजे २ लाख ५० हजार निर्वासित होते. भयावह परिस्थितीत राहणाऱ्या अनेक मुलांचे ते दृश्य अस्वस्थ करणारे ठरले. त्यारात्री देखील विंटनने आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिले. जर तो लंडनमध्ये असता तर त्याला अधिक प्रभावीपणे काम करता येईल असा त्याचा दृढ विश्वास होता. त्यामुळे त्याने लंडनला जायचा निर्णय घेतला. याशिवाय विंटनच्या लंडनला परतण्याच्या निर्णयातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ब्रिटिश सरकारने सुडेटन निर्वासितांना मदत करण्यासाठी ४ मिलियन युरोजचा निधी मान्य केला होता.

प्रागमधून ब्रिटनमध्ये येत असलेल्या मुलांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने विंटनचे लंडनमध्ये असणे महत्त्वाचे होते. वॉरिनरने ब्रिटिश कमिटी फॉर रेफ्युजीज इन झेकोस्लोवाकियाला (बीसीआरसी) पत्राद्वारे कळवले, “विंटन या कामासाठी योग्य आहे, त्याच्याकडे प्रचंड ऊर्जा असून त्याला व्यवसायाच्या काही स्टॅंडर्ड पद्धती देखील माहिती आहेत, शिवाय त्याला येथील परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे.”

फेब्रुवारीमध्ये, विंटनने प्रत्येक लहान मुलाला प्रागमधून ब्रिटनमध्ये आणण्यासाठी होम ऑफिससोबत काम केले. त्याने होम ऑफिससोबत मिळून काही नियम तयार केले. या नियमांमध्ये सुमारे ५० युरोजची हमी (ज्यांची सध्याची किंमत सुमारे ४ हजार युरोज आहे), वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकाचे नाव इत्यादी गोष्टी निश्चित करणे समाविष्ट होते.

अखेर ब्रिटिश कमिटी फॉर रेफ्युजीज इन झेकोस्लोवाकिया (बीसीआरसी) आणि विशेषतः विंटनच्या प्रयत्नांना यश आले. लहान मुलांची पहिली ट्रेन – ‘किंडरट्रान्सपोर्ट’ ही १४ मार्च रोजी २० लहान मुलांना घेऊन प्रागहून निघाली. दुसऱ्या दिवशी ना*झी सैन्याने चेकोस्लोव्हाकियावर आक्र*मण केले आणि अधिक मुलांना बाहेर काढण्याची अत्यावश्यकता निर्माण झाली. सुदैवाने, प्रागमधील विंटनचे काम ट्रेव्हर चॅडविकने हाती घेऊन समर्थपणे पार पाडले.

सुरुवातीला या सर्वांना जर्मन गुप्तहेरांपासून धोका होता, पण आता आक्र*मणानंतर तर चॅडविक आणि वॉरीनर यांना जर्मन गुप्तहेरांऐवजी सैन्य अधिकाऱ्यांचा सामना करावा लागणार होता. पण यावेळी भ्रष्टाचाराचा फायदा झाला. तेथील ना*झी विभाग प्रमुख, कार्ल बोमेलबर्गला चॅडविकने खुश केले आणि त्याने एकूण ६६९ मुलांना घेऊन आठ गाड्या सोडण्यास मान्यता दिली. जुलैमध्ये बीसीआरसीची जागा ‘झेक रिफ्युजी ट्रस्ट फंड’ने घेतली आणि वॉल्टर क्रेइटन नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने चॅडविकचे काम स्वतःकडे घेतले, या संस्थेला सरकारी पाठिंबा मिळाल्याने ती अधिक सुरक्षित आणि हमी देणारी बनली होती.

अज्ञात हिरोज्

विंटन, चॅडविक आणि वॉरीनर यांनी शेकडो मुलांचे प्राण वाचवले, परंतु अनेक दशकांपासून त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. १९७० च्या दशकात जेव्हा चॅडविक आणि वॉरीनर यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या निधनाबद्दल फारसा उल्लेख देखील केला गेला नाही, हे दुर्दैव.

२००३ साली विंटनला “नाईटशिप” हा ब्रिटिश राष्ट्रीय सन्मान मिळाला. पण मीडियाने या कामाचा एकमेव नायक म्हणून त्याला मान्यता दिली आणि त्याच्या साथीदारांना हवा तितका सन्मान मिळाला नाही म्हणून तो अस्वस्थ असत. विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्याने चॅडविक आणि वॉरीनरच्या भूमिकेवर सातत्याने प्रकाश टाकला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

Next Post

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.