The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नासाने बंद चालू करून हबल टेलिस्कोप दुरुस्त केला होता..!

by द पोस्टमन टीम
5 April 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्याकडे कुठलंही उपकरण मग तो फोन असो टीव्ही असो किंवा अजून काही, ते बंद पडलं की एकच उपाय असतो, “एकदा बंद करून चालू कर, सगळं नीट होईल.”

पण, एकदा नासाने देखील असंच काही केलं होतं.

झालं असं होतं की, नासाच्या हबल नावाच्या दुर्बिणीत बिघाड झाला. हबल दुर्बिणीचा गायरोस्कोप खराब झाल्याने हबलला सेफ मोडवर ठेवण्याची गरज निर्माण झाली होती. गायरोस्कोपच्या मदतीने दुर्बिणीची दिशा बदलणे व नवीन ठिकाणी लक्ष केंद्रित करणे ही कामे होतात.

हबलचा गायरोस्कोप बंद झाल्याबर त्यांनी दुर्बिणीत असलेला अजून एक गायरोस्कोप सुरु केला पण सुरू झाल्यावर त्यातही बिघाड झाला. हा गायरोस्कोप जवळपास ७.५ वर्षे बंद स्थितीत होता.



त्यामुळे हबलच्या ऑपरेशन टीमने त्याला सुरु केला तेव्हा त्याचा रोटेशन रेट प्रचंड होता. या समस्येमुळे हबलच्या माध्यमातून चालणारे वेगवेगळे अभ्यास प्रयोग बंद झाले होते. त्यावेळी नासातील तंत्रज्ञांनी ठरवले की ते गायरोस्कोप एका सेकंदासाठी बंद करतील आणि त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्याआधी पुन्हा सुरु करतील. थोडक्यात, गायरोस्कोप बंद करून पुन्हा सुरु करायचा.

अर्थात ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी निश्चितच नव्हती. यानंतर दिलेल्या पत्रकात नासाने ही प्रक्रिया खालीलप्रमाणे दिली होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

“दि. १६ ऑक्टोबरला हबलच्या ऑपरेशन टीमने गायरोस्कोपचा प्रचंड वाढलेला रोटेशन रेट कमी करण्यासाठी एका सेकंदासाठी बंद करून पुन्हा त्याचे चक्र खाली येण्याच्या आत सुरु करण्याचा निर्णय घेतला.

दि. १८ ऑक्टोबरपासून हबलच्या ऑपरेशन टीमने ही समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे उपाय सुरु केले. गायरोस्कोपला हाय मोडवरून लो मोडला आणले गेले ज्यामुळे फ्लोटच्या सभोवताली जमा झालेले अडथळे दूर होऊन तो पूर्ववत काम करू लागेल.”

आणि गंमत म्हणजे अशाप्रकारे गाय्रोस्कोप युनिट बंद करून सुरु केल्यावर तो खरंच व्यवस्थित काम करू लागला आणि त्याचा अत्यंत हाय रोटेशन रेट कमी होऊन त्याचे काम सुरु झाले. हबल दुर्बिण ही नासा आणि उर्वरित जगातील अंतराळ संशोधन संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. १९९० ला ही दुर्बिण अंतराळात पाठवली गेली.

गॅलिलिओच्या दुर्बिणीनंतर सर्वात महत्वाचा घटक असे नासाने हबलचे वर्णन केले आहे. आकाशगंगेतील प्रचंड मोठा भाग अजूनही मानवी कक्षेच्या बाहेर आहे.

आकाशगंगेतील अशा सर्वात दूरस्थ भागातील छायाचित्रे पृथ्वीवर पाठविण्याचे अत्यंत महत्वाचे काम हबलद्वारे केले जाते. ही छायाचित्रे घेण्यासाठी हबल अत्यंत शक्तिशाली डिजिटल कॅमेरा वापरतो. मिळालेली छायाचित्रे रेडीओ लहरींद्वारे पाठवली जातात.

हबलने पाठवलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करूनच शास्त्रज्ञांना विश्वाचे वय १४ अब्ज वर्षे असल्याचा महत्त्वपूर्ण शोध लावता आला. शिवाय प्रसिद्ध बिग बँग थेअरीसाठी हबलचा खूप उपयोग झाला.

हबल दुर्बिण एवढी महत्वाची असल्यामुळेच त्याच्या गायरोस्कोपमध्ये बिघाड झाल्यावर त्याची जबाबदारी असणारे नासाचे कर्मचारी प्रचंड तणावात होते. सुदैवाने ही समस्या सुटली.

या प्रकारानंतर नासाने पुन्हा असा प्रकार घडून तणावपूर्ण स्थिती येऊ नये यासाठी हबलच्या अजून काही चाचण्या घेण्याचे ठरवले.

संशोधक जेसी ख्रिस्टीन्सन एका मुलाखतीत याबद्दल सांगतात, “हबलमध्ये अशाप्रकारचा बिघाड उद्भवल्यामुळे सुर्यमालेबाहेरील ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करण्याच्या आमच्या प्रयत्नांना खीळ बसली असती. पण ही समस्या दूर झाल्यामुळे आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.”

यावरून हेच सिद्ध होतं की “आपले जुगाड” बऱ्याच समस्या सोडवू शकतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: NASASpace Research
ShareTweet
Previous Post

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांची राष्ट्रपतीपदी निवडीमागची कथा

Next Post

इलेक्ट्रिक कार्सच्या कमी मायलेजचा प्रश्न आपल्या IIT च्या पोरांनी सोडवलाय

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

इलेक्ट्रिक कार्सच्या कमी मायलेजचा प्रश्न आपल्या IIT च्या पोरांनी सोडवलाय

ख्रिसमसच्या दिवशीच तमिळनाडूत ४४ दलितांना जिवंत जाळलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.