The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंगोल : पाणी दूषित होईल म्हणून स्नान न करणारे ‘विश्वविजेते’ शूर साम्राज्य

by द पोस्टमन टीम
5 May 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“आम्ही होस्टेल मधले लोक कधीतरी अंघोळ करत असतो बाबा, रोजरोज अंघोळ. कंटाळा येतो राव.”

“अरेरे, वास येईल तुझ्या अंगाला”

अशी असंख्य वाक्यं आपण होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांकडून अनेकदा ऐकत असतो. स्वच्छता आणि सवयीचा भाग म्हणून दररोज अंघोळ करून टापटीप राहणं प्रत्येकाला आवडतं. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या जगाच्या इतिहासात असं एक साम्राज्य होतं जिथल्या लोकांनी कधीच अंघोळ केली नाही आणि स्वतःचे कपडेसुद्धा धुतले नाहीत?

आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय.



तुम्ही चंगेझ खानचं नाव जगाचा इतिहास अभ्यासताना ऐकलं असेल. या चंगेझ खानाच्या साम्राज्याचं नाव होतं ‘मंगोल साम्राज्य’. चीन देशाच्या उत्तरेला हे साम्राज्य तेराव्या आणि चौदाव्या शतकात अस्तित्वात होतं. मंगोल साम्राज्य अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. यापैकी काही गोष्टी चांगल्या आहेत तर काही अगदी घृणास्पद आहेत.

चांगल्या गोष्टी म्हणजे पत्र व्यवहार, बुद्धिमत्ता, अहवाल आणि अगदी प्रवाश्यांसाठी असलेली त्याची रिले सिस्टीम. त्यांची वाईट वैशिष्ट्ये म्हणजे ही की त्यांनी कधीही अंघोळ केली नाही आणि कपडेसुद्धा धुतले नाहीत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आपल्याला माहिती आहे की भारतात अगदी हडप्पा संस्कृतीपासून सार्वजनिक स्नानगृहाची संकल्पना अस्तित्वात होती. पण इतिहासातील मंगोल साम्राज्य जरा वेगळे होते बरं का! त्यांच्यामध्ये स्वच्छतेचा अभाव होता तो त्यांच्या अंधश्रद्धेमुळे.

या लोकांचा असा विश्वास होता की, जलचक्र हे ड्रॅगनद्वारे नियंत्रित केले जाते. जर आपण स्नान केले तर पाणी दुषित होईल आणि त्यामुळे प्रदूषण होईल. जर पाण्याचे प्रदूषण झाले तर ड्रॅगनला राग येईल आणि तो चिडेल अशी अंधश्रद्धा मनात अगदी ठासून भरल्यामुळे त्यांनी कधीच अंघोळ केली नाही असे म्हटले जाते.

MONGOLS the postman
MONGOLS

आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की ,एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात कधीच अंघोळ केली नाही म्हणजे दुर्गंधी तर येणार? तर हो. तेही अगदीच खरंय.

पण मंगोल साम्राज्य आणि तिथले लोक जरा खासच होते. त्यांनी या येणाऱ्या वासाला काहीतरी खास आणि वैयक्तिक मानले.

जर कोणी एखाद्या व्यक्तीला भेटले आणि दुर्गंधी येते म्हणून नाक बंद केले तर त्यांना ते आदरयुक्त वाटत असे. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जोडले जात असे.

दुसरी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांनी कधीच कपडेसुद्धा धुतले नाहीत. स्वतःचे कपडेसुद्धा ते वारंवार बदलत नसत. अगदीच फाटत आले तर आणि तरच ते बदलले जाई. फक्त याला अपवाद होता तो सण समारंभाचा. तेव्हा प्रत्येक जण विशेष कपड्यात असे.

महान राजा चंगेज खान जर एखाद्या व्यक्तीला त्याचे जुने, फाटके आणि दुर्गंधीयुक्त कपडे देत असेल तर त्या व्यक्तीला तो स्वतःचा सन्मान वाटत असे. मंगोल साम्राज्याच्या नेत्याच्या कपड्यावर स्वतःची मालकी झाली ही भावना कपडे घेणाऱ्या व्यक्तीमध्ये असे आणि यात तो आनंद मनात असे.

the postman
चंगेझ खान

मंगोल साम्राज्यातील लोक प्रामुख्याने लांब गाऊन परिधान करत असत त्याला कॅफटन म्हणून ओळखले जात असे. समाजातील एखाद्या व्यक्तीच्या स्थानानुसार त्याची कॅफटनची स्थिती अवलंबून असे. मंगोल लोकांनी वापरलेल्या साहित्यात रेशीम फर, सुती कपडे, चामडे, लोकर आणि ब्रोकेडचा समावेश होता.

त्या गाऊनसोबतच गाय आणि पट्ट्यापासून बनवलेले बूट घालत असत आणि त्यांचे बूट जवळजवळ नेहमीच शेणाने माखलेले असत.

तर अशा चंगेज खानने विस्तार केलेल्या साम्राज्याची आहेत की नाहीत ही आगळीवेगळी वैशिष्ट्यं ???


Source : http://ipfactly.com/the-mongols-never-ever-took-a-bath/


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: mongols
ShareTweet
Previous Post

हिऱ्यांच्या ‘व्हाईट कॉलर’ धंद्यामागे आफ्रिकेतल्या एका देशाची भयानक दैन्यावस्था लपलेली आहे

Next Post

रेल्वे रुळावर होणारे हत्तींचे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘ही’ भन्नाट आयडिया केली आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

रेल्वे रुळावर होणारे हत्तींचे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने 'ही' भन्नाट आयडिया केली आहे

लॉकडाऊनमध्ये मुंबईतील चिमुकल्यासाठी भारतीय रेल्वेने राजस्थानहून उंटाचे दुध पोचवलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.