आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखक – अंजली झरकर
जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या साथीला आवर घालण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. साधारणपणे २२ मार्च २०२० पासून सुरु झालेला लॉकडाऊन १५ एप्रिल नंतर आणखी ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
या काळात सगळं काही बंद असल्यामुळे लोकांची पंचायत झाली आहे. जी लोकं धडधाकट आहेत त्यांना कदाचित याचा जास्त ताण पडला नसेलही परंतु आजारी माणसे, दिव्यांग, खाटेवर पडून असणारी माणसे, बेड रीडन पेशंट्स, लहान मुले, गर्भवती बायका यांचे मात्र हाल चाललेले आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या पातळीवर लोकांना रिलीफ देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दूध भाजीपाला, औषधे आणि किराणा दुकाने या काळात सुरु ठेवण्यात आलेली आहेतच. तरीसुद्धा संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्यामुळे काही खास गोष्टींचा तुटवडा जाणवू शकतो.
अनेकदा याबाबत ट्विटर वर युझर आपली गरज बोलावून दाखवतात त्याची दखल ही घेतली जाते. ट्विटरवर आणीबाणीच्या परिस्थितीत tweet केल्यानंतर त्याला मिनिस्ट्री अथवा आपल्या प्रशासनाकडून प्रतिसाद मिळतो ही बाब अनेकदा समोर आलेली आहे. अशीच एक कौतुकास्पद घटना या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील घडलेली आहे.
याची सुरुवात झाली ट्विटर वरील एका ट्विटने. मुंबईच्या एका महिलेने नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक ट्विट केले होते. या महिलेचे नाव नेहा कुमारी असे आहे. तिने पंतप्रधान मोदी यांना ४ एप्रिल २०२० रोजी एक ट्विट केलेले ज्याच्यात तिने म्हटले होते की,
“सर, माझा मुलगा साडे तीन वर्षांचा आहे. त्याला सिव्हीयर ऑटिझम चा प्रोब्लेम आहे (ऑटिझम असणाऱ्या मुलांची वाढ इतर नॉर्मल मुलांच्या तुलनेत अत्यंत हळू असते बऱ्याचदा अशी मुले स्वतःच्या तंद्रीत जीवन जगतात, नॉर्मल मुलांप्रमाणे आयुष्य जगताना त्यांना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो.)
तिने पुढे लिहिले होते मझ्या मुलाला बऱ्याच अन्न पदार्थांची allergy आहे. तो गाय, म्हैस यांचे दुध तर अजिबात पीत नाही. फक्त उंटाचे दूध आणि काही डाळी यावर त्याचे जीवन चालू आहे. मुंबईमध्ये उंटाच्या दुधाची पावडर काही ठिकाणी मिळत होती मात्र लॉकडाऊन मुळे याचा सप्लाय बंद असल्यामुळे मला आता मुंबईत ही पावडर मिळत नाही. मला राजस्थानच्या सदरी भागातून हे उंटाचे दुध किंवा त्या दुधाची पावडर मिळवून देण्यासाठी मदत करा.
@narendramodi Sir I have a 3.5 yrs old child suffering from autism and severe food allergies . He survives on Camel Milk and limited qty of pulses. When lockdown started I didn’t have enough camel milk to last this long. Help me get Camel Milk or its powder from Sadri(Rajasthan).
— neha kumari (@nehakum79798495) April 4, 2020
या महिलेने हे ट्विट केल्यानंतर त्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आणि त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश IPS officer श्री अरुण बोथरा सर यांना देण्यात आले.
अरुण बोथरा सर ट्विटर वर सक्रीय असणाऱ्या पोलीस ऑफिसर्सपैकी एक आहेत. त्यांना जवळपास ६० हजारांचा फोलोवरवर्ग लाभलेला आहे. अरुण बोथरा सरांनी त्या महिलेच्या ट्विटची दखल घेत तिला तिचे डीटेल्स स्वत:ला मेसेज करायला सांगितले आणि यावर पुढची कार्यवाही होईल असे आश्वासन देखील आपल्या ट्विट मधून दिले.
Pl send me contact details by DM. Will do anything and everything possible for your child.
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) April 6, 2020
त्याच्यानंतर राजस्थान मधील उंटाचे दुध वितरण तसेच उंटाच्या दुधाची पावडर बनवणारी अद्वैक फुड्स कंपनी यांनी देखील त्या महिलेच्या ट्विटची दखल घेतली आणि आपण दुध पाठवण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले.
You are good people. Thanks so much for helping even in a situation of personal grief.
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) April 7, 2020
आता दुध मिळवणे हा प्रश्न नव्हता पण हे दुध राजस्थान वरून मुंबईला पोहोचते करायचे कसे हा मात्र मोठा प्रश्न होता.
यासंदर्भात अरुण बोथरा यांनी भारताच्या ईशान्य रेल्वे विभागाला याबाबत संपर्क साधला. जेंव्हा ईशान्य रेल्वे प्रमुख तरुण जैन यांना हे ट्विट दिसले तेंव्हा त्यांनी यावर विचार करण्यासाठी आपल्या हाताखाली असलेल्या अजमेर च्या DCM महेश चंद जवालीया यांच्याशी संपर्क केला.
त्यावेळी त्यांनी असे ठरवले की एक मालवाहतूक गाडी जी पंजाबच्या लुधियाना स्टेशन वरून मुंबईच्या बांद्रा स्टेशन वर रोज येजा करते ती गाडी राजस्थानच्या फलाना स्टेशन वर थांबवता येईल आणि तेथून उंटाच्या दुधाचे पार्सल घेवून ती गाडी पुढे मुंबईला जाईल.
भारतात सध्या रेल्वे वाहतूक बंद आहेत मात्र दुध, फळे, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी रेल्वे सुरु आहे. खरे पाहता राजस्थानचा फलाना स्टेशनचा स्टॉप या गाडीच्या येण्या जाण्याच्या मार्गावर आहे मात्र तेथे गाडी कधी थांबत नाही मात्र दुधाचे पार्सल घेण्यासाठी ही गाडी या स्टेशन वर थांबवण्यात यावी असा निर्णय ईशान्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेतला. तशा पद्धतीच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना आणि दुध कंपनीला पाठवण्यात आल्या.
हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर मालगाडी क्र. ००९०२ जी लुधियाना वरून मुंबई कडे यायला निघाली होती ती ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी राजस्थानच्या फलाना स्टेशन वर थांबली तेथे २० लिटर उंटाच्या दुधाच्या कंटेनरचे पार्सल घेवून थांबलेल्या दुध कंपनीच्या लोकांकडून हे पार्सल कंटेनर घेवून ही गाडी निघाली आणि बांद्रा स्थानकावर पोहोचून त्या महिलेच्या पत्त्यावर हे दुध पोहोचते करण्यात आले.
जेंव्हा ही बातमी माध्यमात पसरली आणि त्यांनी तरुण जैन यांना संपर्क साधला तेंव्हा यावर बोलताना ईशान्य रेल्वेचे व्यवस्थापक तरुण जैन यांनी टिप्पणी केली की सध्याचा काळ हा काही फायदा बघण्याचा किंवा कमावण्याचा नाही. आमची ईशान्य रेल्वे भारतभर १८ प्रमुख जिल्ह्यात जाते जिथे आम्हाला शक्य होईल तिथे आम्ही आमच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करू.
अशा रीतीने मुंबईला नेहा कुमारी यांच्या घरी राजस्थान वरून आलेले उंटाचे दुध पोहोचले. जवळपास २० लिटर दुध या कुटुंबाला देण्यात आले. या कुटुंबाने हे दुध बाकीच्या लोकांना ज्यांना याची गरज होती त्यांच्या बरोबर शेअर देखील केले.
याबाबत फायनल अपडेट अरुण बोथरा सरांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊन्ट वरून दिली. ट्विटर वर ही बातमी कौतुकाचा विषय देखील ठरली. अनेक लोकांनी बोथरा तसेच ईशान्य रेल्वेचे कौतुक केले मात्र त्यातही काही विघ्नसंतोषी लोकांनी हा राष्ट्रीय संपत्तीच्या संसाधनांचा फालतू खर्च असे शेरे देखील मारले परंतु अरुण बोथरा सर यांनी हा अपसमज खोडून काढला.
Final update
20 lts. camel milk reached Mumbai by train last night. The family has kindly shared part of it with another needy person in the city.
Thanking Sh.Tarun Jain, CPTM, North-West Railways who ensured an unscheduled halt to pick the container.@RailwaySeva@RailMinIndia https://t.co/fCxI6EJTrX
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) April 11, 2020
फक्त दुधासाठी रेल्वे चालवली गेली नाही. रोजची मालावाहातुक्क करणारी रेल्वे फक्त त्या दिवशी दुधाचे पार्सल घेण्यासाठी फलाना स्टेशन वर थांबली यातून रेल्वेला फ्रेट चार्जेस देखील मिळाले आहेत त्यामुळे तुम्ही याचा ताण घेवू नका अशा शब्दात श्री बोथरा यांनी आक्षेप घेणाऱ्या लोकांना सुनावले.
त्यानंतर नेहा कुमारी यांनी केलेल्या मदतीबद्दल रेल्वे आणि प्रशासनाचे आयुष्यभर ऋणी राहू अशा प्रकारे आभार मानले आहेत.
पंजाब में बोलते है कि बेटियां सबकी सांझी होती हैं…बात दरअसल ये है कि बच्चे सबके साझे होते हैं.
Your child belongs to all of us here. All of us belong to your child 😊🙏 https://t.co/9Glcgxgl1P
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) April 7, 2020
हे सर्व पार पडल्यानंतर अरुण बोथरा यांनी एक मजेशीर ट्विट केलं आहे ज्यात ते म्हणतात कि, कालपासून उंटाच्या दुधाच्या एवढ्या रिक्वेस्ट मला आलेल्या आहेत की मी निवृत्तीनंतर राजस्थान मध्ये उंटाच्या दुधाचा व्यवसाय सुरु करायची इच्छा होतेय.
Thinking of opening a camel farm at my native place in Rajasthan after retirement.
Getting so many supply requests from all over India 😅
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) April 12, 2020
लॉकडाऊनच्या काळात अशा घटना लोकांचे मनोबल वाढवणाऱ्या ठरत असल्यामुळे या घटनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.