The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन मार्टिन ल्युथर किंगने अश्वेतांसाठी मोठा लढा उभारला होता

by द पोस्टमन टीम
14 January 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मार्टिन ल्युथर किंग हे असे नाव आहे, जे माहिती नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. वर्णभेदाच्या विरोधात मार्टिन ल्यूथर किंगचा लढा आजही प्रेरणादायी आहे. अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन लोकांना समानतेचा अधिकार मिळवून देण्यात मार्टिन ल्युथर किंगने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

एक काळ होता जेव्हा अमेरिकेत सर्वत्र गोऱ्यांचे राज्य होते, ते कृष्णवर्णीय लोकांना आपला गुलाम समजत होते. अशावेळी मार्टिन ल्युथर किंग कृष्णवर्णीय समुदायाचा आवाज बनून पुढे आले. त्यांनी कृष्णवर्णीयांच्या अधिकारांसाठी शांतता आणि अहिं*सेच्या मार्गाने एक मोठा लढा दिला. अहिं*सेचा मार्ग स्वीकारल्यामुळे ते अमेरिकेतील गांधी म्हणून ओळखले जातात.

मार्टिन ल्युथर किंग यांच्या काळात कृष्णवर्णीय समाजाला मोठ्या वांशिक भेदभावाला सामोरे जावे लागत होते.

अमेरिकेत त्यावेळी गुलामगिरीची प्रथा जरी बंद करण्यात आली होती तरी अमेरिकेतील गोरे लोक कृष्णवर्णीय लोकांना समान दर्जा प्रदान करत नव्हते. कृष्णवर्णीय लोकांचे चर्चसुद्धा गोऱ्या लोकांच्या चर्चापासून लांब अंतरावर असायचे. त्यांना अस्पृश्य मानले जात होते.

मार्टिन ल्युथर किंग बालपणापासून हेच बघत आले होते. मार्टिन यांचा जन्म जरी एका चांगल्या सधन परिवारात झाला असला तरी त्यांना पदोपदी त्यांच्या रंगामुळे अपमानाचा सामना करावा लागला होता.



लहान मार्टिन शेजारच्या मुलांसोबत खेळायला जायचे. शेजारची मुले ही श्वेतवर्णीय होती. त्या मुलांनी एक दिवस मार्टिन यांना सांगितले की ते उद्यापासून त्याच्या सोबत खेळणार नाहीत. बालवयात मार्टिन यांनी त्यांना कारण विचारले त्यावेळी त्यांनी त्यांचा रंग कारण असल्याचे सांगितले. ते फक्त गोऱ्या मुलांसोबत खेळतील, असे ते म्हणाले. त्या मुलांचे बोलणे ऐकून मार्टिनला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता.

जसजसे ते मोठे झाले तसे मार्टिनसमोरील वर्णभेदाचे चित्र अधिकाधिक स्पष्ट होत गेले. आयुष्यात घडणाऱ्या छोट्याछोट्या गोष्टींचासुद्धा मार्टिनवर परिणाम व्हायला सुरुवात झाली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१४ वर्षांचे असताना मार्टिनने एका वक्तृत्व स्पर्धेत समानतेच्या अधिकारावर जोरदार भाषण केले, या भाषणासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले होते.

स्पर्धा संपल्यानंतर आनंदाने ते परत घरी येत असताना त्यांना एका अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले ज्याने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले.

ते एका बसमध्ये बसले होते. एक गोरा माणूस त्या बसमध्ये चढला. तो मार्टिनजवळ आला आणि त्याने मार्टिनला उठायला सांगितले. मार्टिनने तसे करण्यास नकार दिला, परिणामी तो माणूस जबरदस्ती करू लागला, पण मार्टिनवर याचा काही परिणाम झाला नाही. ते मागे हटले नाहीत. अखेरीस त्या गोऱ्या व्यक्तीला माघार घ्यावी लागली. या प्रसंगाने त्या बसमध्ये बसलेल्या इतर कृष्णवर्णीय व्यक्तींमध्ये देखील एक ऊर्जा संचारली होती. पण मार्टिन यांच्या मनावर मात्र यामुळे मोठा परिणाम झाला होता.

या प्रसंगानंतर, वर्णभेदाच्या विरोधात मार्टिन उभे राहिले. आता ते सर्व समुदायाचा आवाज बनले होते. त्यांनी अमेरिकेत सगळ्यांनाच समान अधिकार असावे अशी मागणी केली. मग आफ्रिकन-अमेरिकन असो की दुसऱ्या कुठल्या रंगाची व्यक्ती, सगळ्यांना समान संधी आणि समान अधिकार मिळावेत अशी त्यांची मागणी होती.

ते कधीच तो बसमधील अपघात विसरू शकले नव्हते. त्यांची मनोमन इच्छा होती की वर्णभेद संपुष्टात यावा, यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारण्यास सुरुवात केली. त्यांच्याप्रमाणेच एका महिलेने एका गोऱ्या माणसाला सीट न दिल्यामुळे न्यायालयाने तिला तुरुंगात टाकले होते, हे कारण घेऊन मार्टिन ल्युथर किंग यांनी आपला लढा देण्यास सुरुवात केली. तब्बल वर्षभर त्यांचे आंदोलन सुरु होते. अंततः हे आंदोलन यशस्वी झाले आणि सरकारपर्यंत मार्टिन यांची मागणी पोहचली. यानंतर मार्टिन आफ्रिकन अमेरिकन लोकांसाठी सर्वस्व बनले होते.

मार्टिन यांनी कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी असंख्य आंदोलने केली आणि त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवला. सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. या आंदोलनानंतर ते आफ्रिकन-अमेरिकन लोकांसाठी देवता बनले होते.

रंगभेद मानणाऱ्या लोकांसाठी मात्र ते शत्रू होते. मार्टिन यांना हटवण्याचा त्यांचा विरोधकांनी अनेकवेळा प्रयत्न केला पण ते नेहमी असफल ठरले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आफ्रिकन-अमेरिकन लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते.

मार्टिन यांनी कधीच हिं*सक मार्गाचा अवलंब केला नाही. ते महात्मा गांधींच्या अहिं*सेच्या शिकवणीतून प्रेरणा घेत होते. शारीरिक नव्हे, तर मानसिक शक्तीच्या बळावर हक्क मिळवता यावा, हा गांधीवादी विचार त्यांना फार आवडला होता. त्यांनी याच मार्गाचा अवलंब केला होता. त्यांनी महात्मा गांधींच्या मार्गानेच आंदोलन केले होते.

मार्टिन ल्युथर किंग कधीच गांधींची भेट घेऊ शकले नव्हते, पण त्यांना समजून घेण्यासाठी ते भारतात आले होते. यानंतर त्यांनी गांधींच्या अनेक शिकवणींचा अवलंब केला होता. भारतात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर भारतीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

मार्टिन यांनी त्यांच्या आंदोलनाचे स्वरूप विस्तारले होते, असंख्य लोक त्यांच्या आंदोलनात सामील होऊ लागले होते. व्हिएतनाम यु*द्धातील अवाजवी खर्च, कृष्णवर्णीय लोकांना वेतन देताना करण्यात येणारा दुजाभाव अशा अनेक गोष्टींच्या विरोधात त्यांनी आपला आवाज बुलंद केला होता. ते अमेरिकेला एकत्र आणू इच्छित होते. पण हे करताना त्यांनी अनेक शत्रू देखील बनवले.

त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या पण ते आपल्या मार्गावरून कधीच हटले नाहीत.

पण, १९६८चा दिवस अमेरिकेत काळी रात्र बनून आला होता. मार्टिन एका हॉटेलमध्ये मुक्कामी राहिले होते. ते त्या ठिकाणी कामगारांच्या उपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गेले होते. ते हॉटेलच्या बाल्कनीत उभे होते. अचानक त्यांच्यावर एक गोळी चालवण्यात आली आणि काही क्षणांतच मार्टिन यांनी प्राण सोडले. यानंतर संपूर्ण अमेरिकेत एक दुःखाची लाट पसरली. मार्टिनला त्यांच्या कामासाठी गोळी खावी लागली होती. तो अमेरिकन इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो.

देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवत, अनेकांना त्यांचे हक्क मिळवून देणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना देखील महात्मा गांधींप्रमाणे संपवण्यात आले होते. आजही लोकांच्या मनात मार्टिन ल्युथर किंग यांच्या आठवणी जिवंत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

तब्बल वीस वर्षं ती एका निर्जन बेटावर अडकली होती

Next Post

स्वातंत्र्यलढ्यातील दुसरं जालियनवाला बाग ह*त्याकांड म्हणून ओळखला जाणारा किस्सा ख्वानी बाजार

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

स्वातंत्र्यलढ्यातील दुसरं जालियनवाला बाग ह*त्याकांड म्हणून ओळखला जाणारा किस्सा ख्वानी बाजार

मान सिंह - असा डाकू ज्याने गरिबांच्या कल्याणासाठी गुन्हेगारीचा मार्ग पत्करला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.