The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लुई पाश्चर – साथीच्या रोगांपासून मानवजातीला वाचवणारा महान संशोधक

by द पोस्टमन टीम
14 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


‘पाश्चरायझेशन’ – हा शब्द नेहमी आपल्या कानावर पडतो आणि सर्रासपणे तो वापरलाही जातो.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘या’ पद्धतीचा वापर करून दुधासारखे नाशवंत पदार्थ टिकवले जातात आणि सहजपणे हवा बंद पाकिटामध्ये आपल्या घरापर्यंत पोहोचवले जातात.

हे शक्य झालं ते ‘लुई पाश्चर’ नावाच्या फ़्रेंच इसमामुळे. एकोणिसाव्या शतकातील एक सूक्ष्मजीव व रसायन शास्त्रज्ञ. त्याने पाश्चरायझेशन पद्धतीने अन्न टिकवणे आणि सुरक्षित ठेवण्यासारख्या प्रश्नांवर रामबाण उपायांचं काम केलं आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी नवी दिशा दिली. 

त्याने त्याच्या प्रयोगांवरून हे सिद्ध करून दाखवलं की अन्न खराब होण्यामागे सुक्ष्मजीवांची त्यामध्ये होणारी वाढ कारणीभूत असते. हे जंतू आजूबाजूच्या हवेतून अन्नात शिरतात, जगतात, वाढतात. आपण जर या सूक्ष्मजंतूंपासून अन्न वाचवू शकलो तर आपसूकच आपण अन्नाचं आयुष्यही वाढवू शकतो. त्याच्या या सिद्धांतालाच ‘जर्म थेअरी’ अस म्हंटल गेलं.

पाश्चरायझेशन पद्धतही याच सिद्धांताला धरून आहे. या पद्धतीमध्ये पदार्थ १०० अंश सेल्सियस तापमानाच्या खाली तापवले जातात, यामुळे पदार्थातील जंतू मरतात आणि नंतर हे पदार्थ हवाबंद वेष्टनात ठेवले जातात व टिकवले जातात.



इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की ‘पाश्चरायझेशन’ पद्धत जरी सूक्ष्मजंतूंना मारत असली तरी ती ‘निर्जंतुकीकरण’ प्रक्रिया नाही. ही पद्धत तिच्या साधेपणामुळे व समजून घेण्यास सोपी असल्यामुळे लोकप्रिय झाली.

या पद्धतीची उपयुक्तता व तिचं यश या गोष्टीतच दडलं आहे की आताच्या काळात म्हणजे जवळपास शोध लागल्यापासून दीड शतकांनंतरही थोडे आधुनिक बदल वगळता ती वापरली जाते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

लुई पाश्चरचं विज्ञानातील योगदान हे सूक्ष्मजीवशास्त्राबरोबरच किण्वन प्रक्रियेत (fermentation) व लसिकरणातही (vaccination)आहे.

 

Milk pasteurization the postman

 

एकोणिसावं शतक हे औद्योगिक क्रांतीमुळे जास्त लक्षात राहीलं असलं तरी याच क्रांतीमुळे वाढलेली बकाल शहरं आणि त्यामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक गंभीर समस्यांमुळेही ते लक्षात राहतं.

नवनवीन संसर्गजन्य रोगांनी अक्षरशः थैमान घातलेलं होतं. लुई पाश्चर यांनीही स्वतःची तीन मुलं टायफॉईडच्या साथीत गमावली. या रोगांनी लोकांना जेरीस आणलं होतं आणि या रोगांमधील मृत्यदरही खूप होता.

या संसर्गजन्य रोगांवर अभ्यास व प्रयोग करुन त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी पाश्चर यांनी प्रयत्न केले. त्यांनी रेबीज आणि अंथराक्ससारख्या दुर्धर रोगांवर लस शोधून काढली.यामुळे लाखो लोकांचे जीव तर वाचलेच पण या पद्धतीचा वापर करून इतर आजार व रोगांवरही लस तयार करता आली.

लुई पाश्चर यांचे रसायनशास्त्रातील योगदानाही सर्वश्रुत आहे. जैविक संयुगांच्या रचनेबाबत त्यांनी केलेले संशोधनाने आधुनिक जैविक रसायनशास्त्राचा पाया उभारला गेला.

सुक्ष्मजीवशास्त्राच्या क्षेत्रात अभ्यास आणि संशोधनाला चालना मिळावी म्हणून त्यांनी पॅरिसमध्ये ‘पाश्चर इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली.

अशी बहुविध प्रतिभा असलेले लुई पाश्चर खाजगी आयुष्यात मात्र कमालीचे धार्मिक होते. अनेक हादरवून टाकणाऱ्या संशोधनाने भरलेलं त्यांचं आयुष्य अपेक्षेप्रमाणे वादग्रस्तही होतं. या अवलियाने सन १८९५ साली जगाचा निरोप घेतला पण जाताना जगाला संशोधनरुपी भेटवस्तूचा नजराणा दिला. त्यासाठी संपूर्ण मानवजात त्यांची शतशः आभारी राहील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: louis pasteur
ShareTweet
Previous Post

कोरोनाला रोखण्यासाठी राजस्थानातलं ‘भिलवाडा मॉडेल’ देशासाठी आदर्श ठरतंय!

Next Post

भयानक विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या परिणामांवरचे बघायलाच हवेत असे ७ थरारक चित्रपट

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post
new

भयानक विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या परिणामांवरचे बघायलाच हवेत असे ७ थरारक चित्रपट

Back to the future : टाईम मशीनची संकल्पना साक्षात समोर उभी करणारा अफलातून हॉलीवूडपट

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.