The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘माल्टीज संस्कृती’ कमी काळ टिकली पण येणाऱ्या पिढ्यांसाठी फार काही सोडून गेली

by Heramb
9 January 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगातील प्राचीन संस्कृतींपैकी अनेक संस्कृती पूर्णतः नष्ट झाल्या असून काहींचे फक्त अवशेषच पाहायला मिळतात. कोरियाच्या सीला राजवटीची संस्कृती, भारतातील हडप्पा संस्कृती, चीनमधील सॅन्कझिंगडुई संस्कृती, इराणमधील मेसोपोटेमिया संस्कृती या जगातील काही अति-प्राचीन मानवी संस्कृती आहेत.

युरोपमध्ये मिनोअन्स, मायसेनिअन, हेलाडिक आणि ग्रीक संस्कृती या काही अति-प्राचीन आणि प्रमुख मानवी संस्कृती असून. युरोपच्याच प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणजे माल्टा संस्कृती. या संस्कृतीचा उल्लेख युरोपियन इतिहासात अतिशय संक्षिप्ततेने आढळतो. त्याला कारणही तसेच आहे. माल्टा संस्कृती इतर प्राचीन संस्कृतींच्या तुलनेत अतिशय कमी काळ टिकली. 

माल्टाचा ज्ञात इतिहास सुरु होतो ख्रिस्तपूर्व ५ हजार वर्षांपासून. सुमारे ६ हजार वर्षांपूर्वी, माल्टाच्या द्वीपसमूहात काही हजार माल्टीज लोक राहत होते. पण फक्त १५०० वर्षांच्या आतच ते काही कारणांमुळे नाहीसे झाले. पुरातत्वशास्त्रज्ञांनी त्यांचा नाश होण्याबद्दल अनेक कारणांचा विचार केला आहे. या कारणांमध्ये बेटांवरील प्रतिकूल हवामान, प्रतिकूल परिसंस्था, इत्यादींचा समावेश आहे.

माल्टाच्या लोकांचे राहणीमान:

बेटावरील हवामानाची परिस्थिती उत्तम असूनही तेथील स्थानिकांना लागवडीसाठी मातीच्या व्यवस्थापनाचे मूल्य समजले. ३१६ किलोमीटर अंतरावरच्या बेटावर आगमन झाल्यानंतर काही शतकांच्या आतच, राहण्यायोग्य परिस्थितीच्या आभावाने आणि मातीची तीव्र धूप झाल्याने अनेक झाडे कोसळली. सर्वांत विचित्र बाब म्हणजे प्राचीन माल्टीज लोकांनी कधीही मासे खाल्ले नाहीत. पण ते मांसावर आपले जीवन व्यतीत करीत असत. याशिवाय त्यांनी दूध देणारे प्राणी पाळले आणि ते फक्त मांसावरच नव्हे तर इतर खाद्यपदार्थांवर देखील अवलंबून होते.

शास्त्रज्ञांनी याठिकाणी अनेक रुळ शोधून काढले आहेत. हे रुळ प्राण्यांच्या मदतीने ओढल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी असावे असा अंदाज आहे. माल्टीज लोकांनी पशु-खताचा वापर करून माती समृद्ध केली तसेच बऱ्याच पडीक जमिनी सुपीक करण्यासाठी या लोकांनी वाहून गेलेली माती पुन्हा गोळा केली आणि पडीक जमीन पुनरुज्जीवित केली. अनेकदा ही कामे दमवणारी, पुन्हा पुन्हा करायला लागणारी होती, त्यामुळे या प्रक्रियेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. रुळांच्या कडेलाच खोलवर पुरलेले सांगाड्यांच्या तुकड्यांनी हे सिद्ध झाले आहे.

प्राचीन माल्टीज मंदिरे:

आजही उभ्या असलेल्या मंदिरांचे अवशेष माल्टाच्या लोकांमधील आपापसांतील सहकार्य आणि सुसंवाद सिद्ध करतात. आव्हानात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी माल्टीज लोकांना एका उत्तम प्रेरणेची गरज होती. त्यासाठी लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उच्च अस्तित्वावर विश्वास ठेवत होते. संभाव्य हिं*सक मृत्यू, स्पर्धा किंवा तटबंदी यांसारख्या गोष्टी दर्शवणारे कोणताही पुरावा सापडला नाही.



डॉ. कॅरोलिन ॲन टुके आणि त्यांच्या टीमने माल्टीज भूमीवर केलेल्या सविस्तर संशोधनानुसार, संपूर्ण मंदिर संस्कृतीऐवजी क्लबहाऊस संस्कृतीचे त्या भागात वर्चस्व होते. लोक आपली कापणी आणि पशुधन मंदिरासमोर प्रदर्शित करू शकत होते, त्या साहित्याचा वापर करून मेजवानी देऊ शकत होते आणि आपल्याकडील संपूर्ण अन्न देवतांना अर्पण करण्याऐवजी स्वतःकडे ठेऊ शकत होते. 

माल्टा संस्कृतीचा विनाश:

प्राचीन माल्टीज लोक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत असूनही ते फार काळ टिकू शकले नाहीत. माती आणि हवामानाची परिस्थिती बिघडल्याने ख्रिस्तपूर्व २६०० ते २४०० दरम्यान बहुतांशी मृत्यू झाले. यामध्ये बहुतांश प्रमाणात लहान मुलांचा समावेश होता. प्राचीन माल्टीज लोकांना या काळात कमी किंवा नित्कृष्ट आहार मिळत होता असे अनेक मानवी हाडांच्या अभ्यासातून समोर आले आहे. युरेशियन स्टेप्स आणि उप-सहारा आफ्रिकन भूमीतून स्थलांतर केलेले लोक याठिकाणी आल्याने लोकसंख्या आणि रोगराई वाढली असे मानवी हाडांच्या अभ्यासावरून समजते.

ख्रिस्तपूर्व २३५० साली एका अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमध्ये ही संस्कृती नष्ट झाली. ही नैसर्गिक आपत्ती होती ज्वालामुखीय उद्रेकाची. या उद्रेकात धुळीचे आणि धुराचे प्रचंड लोट उडाले. यामुळे संपूर्ण संस्कृती काही वेळातच नष्ट झाली. ही आपत्ती ख्रिस्तपूर्व २३५० साली घडली असल्याची शक्यता आहे. याच वर्षी माल्टाच्या आसपासच्या प्रदेशात विनाशकारी हवामान निर्माण झाले. अति-प्राचीन युरोपमधील शांतताप्रिय आणि कष्टकरी लोकांची पंधराशे वर्षांची संस्कृती संपवणारा हा अंतिम धक्का असण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अंटार्क्टिका नाही तर पृथ्वीवरच्या या ठिकाणी जीवन अशक्य आहे..!

Next Post

सोव्हिएतनं गॅस विहीरीतील आग विझवण्यासाठी चक्क अ*णुबॉ*म्बचा वापर केला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

सोव्हिएतनं गॅस विहीरीतील आग विझवण्यासाठी चक्क अ*णुबॉ*म्बचा वापर केला होता

भल्या मोठ्या लढाऊ विमानांना सहज हुलकावणी देऊन ह*ल्ला करणारे 'नॅटस्' आणि 'मॉस्किटोज्'!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.