The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातील सर्वांत गरीब राष्ट्राध्यक्ष: ना पगार, ना स्वतःवर खर्च केला, ना कधी आलिशान घरात राहिले

by द पोस्टमन टीम
3 December 2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


बघायला गेलं तर दक्षिण अमेरिकेच्या नकाशावर एखाद्या ठिपक्याप्रमाणे उरुग्वे देश दिसतो. हा दक्षिण अमेरिका खंडातील दुसरा सगळ्यात लहान देश. याची लोकसंख्या आहे फक्त साडे तीन करोड. या देशाची काही वैशिष्ट्ये सांगायची झाली तर ती खालीलप्रमाणे सांगता येतील.

उरुग्वेचे राष्ट्रगीत जगातील सगळ्यांत मोठे राष्ट्रगीत मानले जाते, जे म्हणण्यासाठी जवळपास ६ मिनिटांचा कालावधी लागतो. आपल्या शाळेतील मुलांना laptop फ्री देणारे उरुग्वे हे पहिले राष्ट्र आहे.

उरुग्वे देशाचे हे अध्यक्ष जगात आजपर्यंत होऊन गेलेल्या अध्यक्षांपैकी सर्वांत नम्र आणि साधी राहणी असणारे अध्यक्ष म्हणून ओळखले जातात.

साधारणपणे इतर कुठल्या कारणापेक्षाही उरुग्वे २०११ ते २०१५ मध्ये प्रेसिडेंट ऑफिस सांभाळणारे अध्यक्ष होसे मुईका यांच्या कारकिर्दीत जास्त प्रसिद्ध झाला. यांना जगातील अत्यंत गरीब अध्यक्ष असेही म्हटले जाते. त्यांना असे का म्हणतात हे मुईका यांच्या जीवनपटाकडे नजर टाकली तर तर समजते.

मुईका ५ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यामुळे साहजिकच लहानपण संघर्षामध्ये निघून गेले. उरुग्वेला दुसऱ्या महायु*द्धापर्यंत दक्षिण अमेरिकेचे स्वीत्झर्लंड मानले जायचे. इथल्या शेतमालाला बाहेरच्या बाजारपेठांमध्ये प्रचंड मागणी असायची. मात्र दुसऱ्या महायु*द्धानंतर या देशाची पत ढासळली.



१९५० नंतर उरुग्वेच्या शेतमालाचे दर कोसळले, त्यांची निर्यात कमी झाली, त्यामुळे शेतकरी आणि मजूर वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आणि डावा साम्यवाद तिथे हळूहळू आपले पाय रोवू लागला.

१९६० नंतर उरुग्वेमधे “टूपामारोस” नावाच्या एका सशत्र दलाचा उदय झाला. आपले मुजीक या दलाचे सदस्य होते. त्यांनी स्वत:च्या “ब्रॉड फ्रंट” नावाच्या पार्टीची घोषणा देखील केली होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

हा ग्रुप बँक लुटणे, श्रीमंत लोकांची घरे लुटणे, सरकारच्या विरोधात कारवाया करणे या गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. यामध्ये बहुतांशी गरीब, मजूर आणि शेती दिवाळखोरीत निघालेल्या शेतकऱ्यांची मुले सामील असायची.

१९६८ साली उरुग्वेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज पॅचेकॉ यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. १९७२ साली तेथील जनतेचे सर्व मुलभूत हक्क देखील सस्पेंड करण्यात आले. ही परिस्थिती १९८५ पर्यंत कायम राहिली. या दरम्यान ३००हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.

१९८५ साली देशात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि लोकशाहीची पुनर्स्थापना झाली. होसे मुईका यांना आणीबाणीच्या काळात सुमारे १५ वर्षे कारावास भोगला होता.

त्यांची ८०च्या दशकात सुटका झाल्यानंतर देखील त्यांनी त्यांचे राजकीय कार्य चालू ठेवले, मात्र त्यानंतर “टूपामारोस” या सशस्त्र दलाच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. हा संपूर्ण ग्रुपच नंतर त्यांच्या “ब्रॉड फ्रंट” पार्टीमध्ये विलीन झाला आणि ऑफिशियली हा पक्ष डावा पक्ष म्हणून देशामध्ये ओळखला जाऊ लागला. 

त्यानंतर १९९५ ते २००० अशी ५ वर्षे मुईका हे देशाच्या संसदेमध्ये सदस्य म्हणून निवडून गेले. २००४ साली मुईकायांनी सिनेट लीडर म्हणून शपथ ग्रहण केली. २००५ ते २००८ ते उरुग्वे देशाच्या कृषी खात्याचे मंत्री देखील राहिले. 

मुईका यांचा जन्म शेतकरी कुटुंबातीलच होता. लहानपणी आपल्या वडिलांचा शेतमालाला विक्री नसल्यामुळे उपासमारीने कसा मृत्यु झाला याचा जीवनपट त्यांच्या डोळ्यासमोर होता. 

त्यामुळे शेतमाल शेतातून बाजारात विक्रीला आणेपर्यंत जी दलालांची साखळी तयार होते ती तोडून टाकण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना थेट आपला माल स्वत: बाजारात कसा विकता येईल यासाठी कायदे करण्यात आले.

२००९ साल मुईकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. ज्या माणसाने हुकुमशाहीच्या काळात १५ वर्षे तुरुंगवास भोगला होता तो माणूस २००९ साली देशाचा अध्यक्ष झाला. त्यांचा “ब्रॉड फ्रंट” हा पक्ष बहुमताने निवडून आला.

१ मार्च २०१०पासून मुईका उरुग्वे देशाचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहू लागले. त्यांच्या या यशामुळे मुईका यांना दक्षिण अमेरीकेचे नेल्सन मंडेला म्हटले जाते.

मुईका यांच्या नेतृत्वाखाली उरुग्वे देशाने प्रगतीची कास धरली. मुईकानी आपल्या कारकिर्दीतील पहिला महत्वाचा निर्णय घेतला, मारिजुआनाचे उत्पादन कायदेशीर करण्याचा. याच्यामुळे ड्र*ग डीलरचे जे काळे मार्केट तयार झाले होते ते कोसळले. खुल्या बाजारात मारिजुआनाची विक्री होऊ लागल्यामुळे कायदेशीर रेव्हेन्यु सरकारजमा होऊ लागला.

त्यानंतर मुईका सरकारचा दुसरा निर्णय आला, देशामध्ये गर्भपात कायदेशीर करण्याचा. उरुग्वे दक्षिण अमेरिकेत गर्भपात प्रक्रिया कायदेशीर करणारा दुसरा देश ठरला. १२ आठवड्यापर्यंतच्या गर्भाला पाडण्याची परवानगी देणारे बिल उरुग्वेच्या संसदेमध्ये पास झाले. 

यानंतर मुईका सरकारने समलिंगी विवाह कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला. असे विवाह कायदेशीर करणारा उरुग्वे हा दक्षिण अमेरिकेत कॅनडानंतर दुसरा देश ठरला आहे.

होसे मुईका यांना “World’s humblest head of the state” असे म्हटले जाते. उरुग्वे देशाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला मिळणाऱ्या पगार, भत्ते आणि इतर सोयी सवलतीपैकी ९०% पैसे मुईका यांनी आपल्या देशातील गरीब जनतेवर खर्च केलेला आहे. 

राजकारणी जीवन कसे असावे याचा आधुनिक जीवनातील मुईका हे उत्तम उदाहरण आहेत. २०१० ते २०१५ या स्वत:च्या ५ वर्षांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत देशाला भरभराटीला आणणारे अनेक निर्णय मुईका यांनी घेतले मात्र हे करत असताना स्वत: मात्र अत्यंत साधी किंबहुना गरीब जीवनशैली त्यांनी अंगिकारली.

मुईका यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये अलिशान राष्ट्रपती भवनामध्ये निवास केला नाही स्वत:च्या २ रूम असलेल्या साध्या घरात राहून त्यांनी शेवटपर्यंत आपला कारभार पाहिला. 

सुरक्षेसाठी २ पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कुठलीही सुरक्षा घेतली नाही. जगभरातील प्रचंड भ्रष्ट्राचार करणाऱ्या राजकारण्यांच्या काळ्या गर्दीत मुईका यांचे व्यक्तिमत्त्व निश्चितच त्यांच्या या असामान्य वागण्यामुळे आणि कर्तृत्वामुळे वेगळे ठरते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भूल ना जाना इसीइ बल्ब ही लाना…!

Next Post

या शूर राजपूत राजावरून पाकिस्तानातल्या रावळपिंडीचं नाव पडलंय

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

या शूर राजपूत राजावरून पाकिस्तानातल्या रावळपिंडीचं नाव पडलंय

जाणून घ्या कसा आहे नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला "क्लास ऑफ '83"

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.