आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पंडित नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांच्या संबंधांबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. असं मानलं जातं की दोघांमध्ये फार आत्मीयतेचे संबंध होते. पण दोघांच्या संबंधांचे स्वरूप नेमके कुठल्या प्रकारचे होते याबाबतीत इतिहासकार व चरित्रकार यांच्यात मतभेद आहेत. एडविना लॉर्ड माउंटबॅटन यांचा पत्नी होत्या. माउंटबॅटन भारतातील शेवटचे व्हाइसरॉय होते. त्यांच्यावर भारताची फाळणी करून सत्तांतर व्यवस्थितपणे पार पाडण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते.
नेहरूंची कामानिमित्त माउंटबॅटन व त्यांच्या पत्नीशी नेहमी गाठभेट होत असे. याच काळात नेहरू आणि एडविना यांच्यातील संबंध विकसित होत गेले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील दोघांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. नेहरू आणि एडविना एकमेकांना पत्र लिहायचे. ब्रिटनला गेल्यानंतर नेहरू नेहमी एडविना यांची भेट घ्यायचे. जेव्हा एडविना भारतात आल्या त्यावेळी नेहरूंच्या तीनमूर्ती भवन या निवासस्थानी एडविना यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
एडविना माउंटबॅटन यांची मुलगी पामेला हिने देखील बऱ्याचदा नेहरू आणि तिच्या आईच्या संबंधांविषयी जाहीर कबुली दिली आहे.
पामेला म्हणायच्या की ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पामेला अधोरेखित करताना म्हणतात की दोघांमध्ये कधीच शारीरिक संबंध नव्हते. त्यांच्यामध्ये फक्त उत्कट प्रेमभावना होती, जी इतरांसाठी समजून घेणे अवघड आहे.
नेहरू यांचे सचिव के एफ रुस्तमजी आपल्या डायरीत लिहितात की नेहरू आणि एडविना यांचे संबंध अभिजात होते. दोघांच्या आवडीनिवडी देखील सारख्याच होत्या. दोघांना एकमेकांविषयी आपुलकी होती. नेहरू भारतातील ब्रिटिश होते तर एडविना ब्रिटनमधील भारतीय होत्या. यातूनच त्यांचे संबंध बहरले होते.
नेहरू आणि एडविना दोघेही फार एकाकी आयुष्य जगले. नेहरु त्यांच्या पत्नी कमला यांच्या निधनानंतर एकटे पडले होते. लेडी माउंटबॅटन यांची वेगळी परिस्थिती नव्हती. त्यांचे पती एक व्यस्त अधिकारी होते, तर त्या स्वतःत व्यग्र असणाऱ्या, फार लोकांत न मिसळण्याऱ्या अशा होत्या. भारतात पंडित नेहरूंच्या रुपात त्यांना एक उत्तम असा साथीदार मिळाला होता, ज्याच्याशी त्यांची चांगली गट्टी जमली होती. दोघांमध्ये सतत संवाद घडायचा.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील ते एकमेकांना भेटत होते. वर्षातून एक -दोन वेळा ते एकमेकांना भेटायचे.
नेहरू नेहमी इंग्लंडच्या हेम्पशायरस्थित इस्टेटला भेट द्यायचे. एडविना आणि नेहरू यांच्या दरम्यान मोठा पत्रव्यवहार व्हायचा. लॉर्ड माऊंटबॅटन यांना नेहरू आणि एडविना यांच्या संबंधांबद्दल कल्पना होती. एडविना यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीने त्यांची पत्रे वाचली होती. अत्यंत जबाबदारपणे त्या पत्रांचे लेखन करण्यात आल्याचे आढळून आले.
नेहरू यांचे सचिव के एफ रुस्तमजी आपल्या डायरीत लिहितात की नेहरू आणि एडविना यांचे संबंध अभिजात होते. दोघांच्या आवडीनिवडी देखील सारख्याच होत्या. दोघांना एकमेकांविषयी आपुलकी होती. नेहरू भारतातील ब्रिटिश होते तर एडविना ब्रिटनमधील भारतीय होत्या. यामुळेच त्यांचे संबंध बहरले असावे.
नेहरू महिलांशी असलेल्या संबंधांबद्दल सर्वदूर परिचीत होते. अनेक महिला नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वावर भाळल्या होत्या. त्यांची बोलण्याची व वागण्याची शैली अभिजात स्वरूपाची होती. सरोजिनी नायडू यांची मुलगी पद्मजा नेहरूंच्या खूप जवळ होती. ती नेहरूंच्या सेन्स ऑफ ह्युमरची चाहती होती. दोन्ही खूप चांगले मित्र होते, दोघेही एकमेकांची खूप काळजी घ्यायचे.
‘इंडियन समरः द सीक्रेट हिस्ट्री ऑफ एंड ऑफ एन एम्पायर’चे लेखक अलेक्स वॉन टेजमन यांनी लिहिले आहे की,
पद्मजा यांनी एकदा नेहरूंप्रति असलेल्या लगावातून एडविना माउंटबॅटन यांचा फोटो बाहेर फेकला होता. परंतु कालांतराने दोघांमध्ये चांगली मैत्री बहरली होती.
नेहरूंना बुद्धिमान महिला आवडायच्या. रुस्तम यांच्या डायरीत प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचा उल्लेख आहे, ज्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या पत्नी होत्या. मृणालिनी आणि नेहरु हे एकमेकांच्या खूप जवळचे होते.
नेहरूंचे नंतरचे सेक्रेटरी एम ओ माथाई यांनी आपल्या रिमिनिसेन्स ऑफ नेहरु या पुस्तकात वाराणसीच्या श्रद्धा माता या महिलेचा उल्लेख केला होता. माथाई यांनी नेहरूंना प्ले बॉय म्हटले होते. माथाई यांनी आपल्या पुस्तकात नेहरूंच्या आयुष्यात आलेल्या महिलांची वर्णने लिहली होती. पण या पुस्तकाच्या प्रकाशकाने हे माथाई यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते. पुढे माथाई यांनी या पुस्तकातून हा भाग काढून टाकला होता.
खुशवंतसिंह यांनी देखील आपल्या पुस्तकात वाराणसीच्या श्रद्धा माता यांचा उल्लेख करत त्या नेहरूंच्या निकटवर्तीय असल्याचे म्हटले होते. नेहरूंनी श्रद्धा माता यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या नात्याचा खुलासा झाला होता. पुढे अनेक दिवस हे प्रकरण चर्चेत होते. नेहरूंसोबत काम केलेल्या अनेकांनी आपल्या पुस्तकात नेहरूंच्या महिला प्रेमाचा उल्लेख केला आहे. नेहरूंचा तसा स्वभावच होता. ते स्त्रियांशी जवळीक साधायचे पण त्यांचे कॅरेक्टर हे तितक्या पुरतेच मर्यादित नव्हते. काहीही असलं तरी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.