The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटकंती – प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ‘हवा महल’

by द पोस्टमन टीम
2 August 2025
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


भारतात राजे महाराजांनी बांधलेले अनेक महाल आहेत जे हिंदुस्थानी स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण समजले जातात. यांची रचना अभ्यासण्यासाठी जगभरातून अभ्यासक येत असतात. मग तो आग्र्याचा ताजमहाल असो की जलमहाल. जगभरात ख्याती असणारा असाच एक महाल म्हणजे हवामहल.

भारताची पिंकसिटी जयपूरमधील हवामहल एक अशी इमारत आहे जिच्या रचनेपासूनच आश्चर्यांची जंत्री चालू होते. या महालात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आजही संशोधन चालू आहे. महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी बांधलेल्या या इमारतीची रचना अशी आहे की याठिकाणी थंडगार हवा सतत खेळत रहाते. महाराज सवाई प्रतापसिंह हे श्रीकृष्णाचे भक्त होते. त्याच्या मुकुटाला डोळ्यासमोर ठेवून या महालाचं डिझाईन बनविलं गेलं आहे. भारतीय स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या महालाकडे बघितलं जातं.

राजस्थानमधील प्राचीन वास्तूंपैकी ही इमारत असून या महालाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे की तो इतर इमारतींसारखा जमिनीत खोलवर असणार्‍या पायावर बांधलेला नसून त्याला पायाच नाही. हवा महल जगातील सर्वात उंच मात्र बिन पायाची इमारत म्हणून ओळखली जाते.

एवढेच नाही तर, जयपूरमध्ये उन्हाची तलखी काय असते हे नव्यानं सांगण्याची गरजच नाही मात्र तुम्ही जेंव्हा हवामहलमधे पाऊल ठेवता तेंव्हा बाहेरच्या उन्हाचा कडाका आत जाणवतही नाही उलट थंडगार हवेची झुळूक तुम्हाला सतत जाणवत रहाते.

आज आपण याच महालाबद्दलच्या अजबगजब गोष्टी जाणून घेऊयात.



पाच मजल्याचा हा महाल बाहेरून बघितला तर लक्षात येईल की तो मुकुटाप्रमाणे दिसतो. १७९९ साली महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी याची उभारणी केली. हवा महालामध्ये एकूण पाच मजले आणि ९५३ छोट्या छोट्या खिडक्या आहेत. ज्याला झरोके म्हटलं जातं तशी या खिडक्यांची रचना असून यातून महालात हवा खेळती रहाण्याची सोय केलेली आहे. या झरोख्यांची रचना करण्याच्या मागचा आणखीन एक उद्देश म्हणजे राजपूत राजघराण्यातील पडदाशिन स्त्रियांना रस्त्यावरून जाणार्‍या मिरवणूका बघता याव्यात तसेच शहरात साजरे होणारे उत्सव त्यांना इथून बघता यावेत.

खानदानी राजपूत स्त्रिच्या पायाचं नखही परपुरुषाला दिसता कामा नये असा दंडक होता त्यामुळे या स्त्रियांसाठी ही खास सोय करण्यात आलेली होती. या झरोख्यांमधून राजघराण्यातल्या स्त्रिया अगदी विनासंकोच बाहेर बघू शकत मात्र बाहेरून आतलं काहीही दिसत नसे. 

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

हवामहलची अशी ही कुशल रचना केली आहे वास्तुकार लालचंद उस्ताद यांनी. सवाई प्रतापसिंह यांच्या कालखंडातील निष्णात वास्तुकार म्हणून लालचंद यांची ख्याती होती.

हा महाल बांधताना लालचंद यांनी एक गंमत करुन ठेवलेली आहे. ती म्हणजे, या महालाच्या सर्वात वरच्या मजल्यावर ज्याला हवा मंदिर म्हणून ओळखलं जातं, त्याला जाण्यासाठी जिनाच नाही.

लाल दगडात सुंदर कोरीवकाम केलेला हा महाल आपल्या रुपासाठी प्रसिध्द आहे. रॉयल सिटी पॅलेसचा विस्तार करण्यासाठी या महालाची बांधणी केली होती. राजस्थानमधील झुनझुनू शहरातील महाराजा भूपालसिंग यांच्या खेतरी महालाला महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी एकदा भेट दिली आणि या महालाच्या रचनेनं त्यांना इतकं प्रभावित केलं की अशाच प्रकारचा एखादा महाल आपणही बांधावा असं त्यांच्या मनानं घेतलं. या विचारातूनच हवा महालाची कल्पना पुढे आली.

मुघल आणि राजपूत शैलीतील हे बांधकाम या दोन्ही स्थापत्यशास्त्रांचा एक सुंदर मिलाफ़ आहे. महालाच्या पहिल्या मजल्यावरील शरद मंदिरात राजघराण्यातील विविध सणवार आणि उत्सव साजरे केले जात. दुसर्‍या मजल्यावर रतनमंदिर असून हे मंदिर काचकामाचा उत्तम नमुना आहे. उरलेल्या तीन मजल्यांवर प्रकाश मंदिर, विचित्र मंदिर आणि हवा मंदिर यांची उभारणी केलेली आहे.

या महाल आणि मंदिरात गुलाबी शहर जयपूरचे विविध रंग पहायला मिळतात. गंमतीची बाब म्हणजे या महालात जाण्यासाठी समोरच्या बाजूनं प्रवेशद्वारच बनविलेलं नाही. सिटी पॅलेसच्या बाजूनं याचं शाही प्रवेश द्वार बनविण्यात आलेलं आहे. थोडक्यात हवामहलची जी चिरपरिचित छायाचित्रं आहेत ती वास्तवात महालाच्या मागील बाजुची आहेत.

सिटी पॅलेसच्या तीन दोन मजली इमारतींच्या बाजूला हा हवामहल आहे. सिटी पॅलेसमधून हवामहलमध्ये जातानाही राजस्त्रियांचं दर्शन बाहेरच्या कोणाला होणार नाही पुरेपुर खबरदारी घेतलेली आहे. 

हवामहलाच्या पहिल्या दोन मजल्यांवर विस्तृत प्रांगण आहे, तर इतर मजल्यांवर खोल्या असून सर्वात वरच्या दोन मजल्यांवर जाण्यासाठी इतर महालात असतात तसे जिने नाहीत तर रॅम्पची सोय करण्यात आलेली आहे. हे या महालाचं एक खास वैशिष्ट्य आहे.

आज जगभारत औत्सुक्याचा विषय असणारी ही वास्तू ज्या लालचंद उस्तानी बांधली त्यांच्याविषयी मात्र दुर्दैवानं फ़ारशी माहिती उपलब्ध नाही. 

हिंदुस्थानातील असे अनेक उत्तमोत्तम आणि वास्तुशास्त्राचे उत्तम नमूने असणारे महाल आहेत, ज्यांची उभारणी कोणत्या महाराजांनी केली हे इतिहासाच्या पानांवर नोंदवलं आहे मात्र ते उभारण्यामागे ज्यांची कल्पना आणि कष्ट आहेत त्यांची नावं काळाच्या पोटात गुडूप झालेली आहेत. इतर वास्तुकारांप्रमाणेच हवामहल ज्यांच्या कल्पनेतून साकारला ते लालचंद उस्ता जगाला केवळ नावानी माहित आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा विजयस्तंभ शेकडो वर्षांच्या पावसाने गंजला नाही की नादीरशहाच्या तोफांनी भंगला नाही

Next Post

फक्त हिंदू असल्यामुळे पाकिस्तानने दानिश कनेरियाचं करियर संपवलं?

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

फक्त हिंदू असल्यामुळे पाकिस्तानने दानिश कनेरियाचं करियर संपवलं?

३०० महिलांनी रात्रीतून एअरफोर्स बेसचा रनवे दुरुस्त केला आणि आपण पाकिस्तानचा ह*ल्ला परतवला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.