The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत पाकिस्तानमधील हे ‘गुप्त यु*द्ध’ कधीही आपल्यासमोर येत नाही

by Tushar Damgude
21 September 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कालपर्यंत ज्याची खिल्ली उडवली आज तो हिरो आहे उद्या पुन्हा तो पायदळी तुडवला जाईल. भारतीय मानसिकता अशीच आहे. असो.

भारत पाकिस्तान दुश्मनीमधील ह*त्यारं आधीही आयएसआय विरुध्द रॉ/आयबी होते, आताही आहे आणि पुढेही राहील. या दोन एजन्सीजची यु*द्धभूमी भारत आणि पाकिस्तान आहेच शिवाय बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराण, चीन इत्यादी ठिकाणांहून देखील ते लढलं जातं.

भारतात प्रवेशासाठी कश्मीर, नेपाळ, बांग्लादेशचा वापर पाकिस्तान करतो तर अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेशातून भारतीय एजंट पाकिस्तानचा रस्ता पकडतात.

शत्रूची बलस्थानं आणि कमजोरी विषयी माहिती जमा करणे, असंतोषाला खतपाणी घालणे, आर्थिक, सैनिकी, शैक्षणिक बलस्थानांवर वार करणे, राजकीय अस्थिरता निर्माण करणे, प्रसारमाध्यमांचा, चित्रपटांचा वापर करून स्वराष्ट्राला पुरक भावना निर्माण करणे, द*हश*तवादी ह*ल्ले करणे इ. अनेक कामगिऱ्या हे एजंट्स करीत असतात.

गुप्तहेर कुणीही असू शकतं. पत्रकार, नेते, शिक्षक, सैनिक, पोलीस, उपयोगी पडेल असा कोणीही. कित्येकदा आपण परराष्ट्रासाठी हेरगिरी करतो आहे याची कल्पना देखील संबंधित माणसाला नसते कारण त्याचा हॅन्डलर स्थानिक माणूस असू शकतो.



भारत, पाकिस्तानला, मुख्यतः आर्थिक आणि राजकीय स्तरावर सपशेल हरलेल्या पाकिस्तानला समोरासमोरील यु*द्ध परवडणारे नसल्यामुळे याप्रकारे एकमेकांना रक्तबंबाळ केले जाते.

रॉ आणि आयएसआयची तुलना केली तर आयएसआयचे पारडे इतिहासात जड होते. ते असण्याचे कारण म्हणजे उत्पन्नाचे सोर्स आणि स्वायत्त्तता यांमधील फरक. मध्यंतरी मी एक अहवाल वाचला होता त्या अहवालानुसार पाकिस्तानी सैन्याकडे आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या स्वतःच्या मालकीच्या मोठमोठ्या उद्योग कंपन्या आहेत, त्याशिवाय पाकिस्तानी आर्मी प्रामुख्याने जमिनींचे व्यवहार करते. आर्थिक मंदीमुळे मध्यंतरी पाकिस्तानी आर्मीने ताब्यात असलेल्या जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

‘Military Inc: Inside Pakistan’s Military Economy’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक पाकिस्तानी पत्रकार आणि लेखिका आयेशा सिद्दीकी यांनी लिहिले असून त्यात त्यांनी पाकिस्तानी आर्मी आणि त्यांच्याशी निगडित ‘डीएचएकडे (डिफेन्स हौसिंग एजन्सी)’ देशातील एकूण जमिनीपैकी १२ टक्के भूभाग असल्याचे उघड केले आहे. यातील बहुतांश भूभाग हा पाकिस्तानी सैन्यातील उच्चपदस्थ लोकांकडे असून या जागा त्यांनी देशाच्या जनतेला बंदुकीचा धाक दाखवून बळकावल्या आहेत असे अनेक खुलासे आयेशा सिद्दीकींनी केले आहेत. संरक्षण आणि यु*द्ध सोडल्यास पाकिस्तानी आर्मी सर्व काही करते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जमिनी बळकावण्यात पराक्रम करणारं सैन्य मात्र अवघ्या १६ दिवसांत शरणागती पत्करतं!

भारतीय लष्कर आणि रॉ आर्थिक बाबतीत सरकारवर अवलंबून आहे. आयएसआय पाकिस्तानी लोकनियुक्त सरकारला उत्तरदायी नाही तर इकडे ते रॉ बाबत म्हणता येत नाही. आयएसआयने बरीच वर्षे सिआयएबरोबर काम केल्यामुळे तंत्रज्ञान आणि रणनीती याबाबत ते बरीच वर्षे वरचढ होते.

शिवाय द*हश*तवादी कारवायांसाठी लागणाऱ्या धार्मिक माथेफिरूंच्या कच्च्या मालाची कमतरताही तेथे जाणवत नाही. धर्मांधता प्रचंड असल्याने भारतात देखील त्यांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत नाही.

गेल्या काही वर्षात भारताने/रॉ ने आपल्या रणनितीमध्ये बदल केलेला दिसतो कारण पूर्वी भारतात अमुक ठिकाणी तमुक ठिकाणी द*हश*तवादी कारवाया होत आणि आयएसआयचे नाव सर्वतोमुखी असायचे पण आता पाकिस्तान भारतीय ‘रॉ’वर आरोप करतो त्याचे कारण पाकिस्तानात वाढलेले द*हश*तवादी ह*ल्ले होय.

आचार्य चाणक्य म्हणतात, तुमच्या राष्ट्रामधे शांती नांदावी असे तुम्हाला वाटत असेल तर शत्रू राष्ट्रामधे कलह माजवा. आयएसआय अंतर्गत समस्यांमध्ये अडकून पडल्यामुळे भारतात होणाऱ्या द*हश*तवादी कारवायांमध्ये किती फरक पडला आहे हे आपल्याला दिसतेच.

हजारो किलोमीटरच्या सीमा आणि सव्वाशे कोटी माणसं यांची सुरक्षितता किती अशक्य काम आहे याची कल्पना सरकारी हॉट सीटवर बसल्याशिवाय येणार नाही. तरीही मुंबई ह*ल्ल्यानंतर आजवर इतक्या वर्षांत मोठ्या प्रमाणावर भारताच्या अंतर्गत भागात अथवा प्रमुख शहरांत द*हश*तवादी ह*ल्ला झाला नाही. हे काय जादुटोण्यांमुळे घडलं का?

हे सगळं गुप्तहेर यंत्रणेचं यश आहे, परंतु या आठ-नऊ वर्षांत होऊ शकणाऱ्या कित्येक द*हश*तवादी कारवाया रात्रीच्या अंधारात मुळापासुन उखडुन टाकल्या गेल्या तरीही त्याच श्रेय त्यांना मिळू शकत नाही. रोखलेल्या शेकडो कारवायांचे श्रेय तर दूरच पण झालेल्या एखाद दुसऱ्या चुकीबाबत त्यांना टिकेचा धनी मात्र व्हावे लागते.

रात्रीच्या अंधारात कुठल्या तरी गटारात शत्रूला झोपवणाऱ्या किंवा दुर्दैवाने त्याच गटारात प्रेत होऊन पडणाऱ्या भारत मातेच्या त्या बेनामी वीरपुत्रांना मानाचा मुजरा.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: India Vs PakistanSpy NetworkTerrorism
ShareTweet
Previous Post

निठारीच्या भयानक हत्याकांडात गुन्हेगाराला तब्बल ११ जन्मठेपेंची शिक्षा झाली होती

Next Post

सम्राट अकबराला या राजपूत राणीकडून ५१ वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

सम्राट अकबराला या राजपूत राणीकडून ५१ वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता

गोऱ्या त्वचेचे गोडवे गाणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी अखेर कायदा आलाय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.