The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिका आणि चीनपेक्षाही सुरक्षित आहे भारताची डिजिटल पेमेंट सिस्टम.

by द पोस्टमन टीम
31 August 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतातील डिजिटल पेमेंट सिस्टम ही जगातील सर्वांत आधुनिक पेमेंट सिस्टम म्हणून गणली जाते. डिजिटल पेमेंट क्षेत्रातील जे पहिले २५ देश आहेत, ज्यात अमेरिका आणि चीन यांचा समावेश होतो, त्यांच्यात भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टम सर्वोत्तम समजली जाते. हो हे सत्य आहे.

अनेक प्रकारचे सर्व्हे केल्यावर हे समोर आले आहे की जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय डिजिटल पेमेंट व्यवस्था उत्तम प्रकारे कार्य करत आहे. हे सर्व्हे विविध पातळीवर करण्यात आले असून सेवेसाठी दिला जाणारा वेळ, व्यवहाराची गतिमानता या अनेक कसोटींवर भारतीय डिजिटल पेमेंट व्यवस्था ही यशस्वी ठरली असल्याचे मत अमेरिकास्थित बँकिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या एफआयएसने म्हटले आहे.

thepostman

जगभरातील पेमेंट सिस्टमच्या तुलनात्मक गुणांकनावर कार्यरत असलेल्या फ्लेवर्स ऑफ फास्ट युझड फास्टर पेमेंट इनोव्हेशनच्या ( एफपीआयआय) २०१४ साली तयार करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार जगभरातील पेमेंटच्या पद्धतीचे विविध निकषांच्या आधारावर तुलनात्मक वर्गीकरण शक्य आहे.



एफएसआय नुसार, वेगवेगळ्या पेमेंट सिस्टम साठीच्या एफपीआयआय रँकिंगसाठी १-५ या स्केलवर मूल्यमापन केले जाते. ज्यात लेव्हल १ ही फास्टर पेमेंट सिस्टमची उपलब्धता, लेव्हल ३ ही हायली डिझायरेबल फीचर्स अर्थात तंत्रज्ञानाचा आधारावर ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणारे वेगवेगळे फीचर्स, ज्यात ग्राहकांच्या समस्या निवारणासाठी २४ तास उपलब्ध राहणे या फीचरचा समावेश होतो.

सर्वांत शेवटी आहे लेव्हल ५, यामध्ये ग्राहकांना प्रदान केली जाणारी सर्व्हिस, त्यातील सुव्यवस्था याचा सर्व्हे केला जातो, पेमेंट व्यवस्थितपणे डिलिव्हर होतेय की नाही, याच्या संपूर्ण व्यवस्थेची तपासणी करण्यात येते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

ह्या १-५ लेव्हलच्या सर्व्हेनुसार, तैवान या बाबतीत लेव्हल १ वर आहे. मेक्सिको, घाणा, ब्राझील, नायजेरिया, आईसलँड, चीन, कोरिया आणि श्रीलंका हे लेव्हल २ वर आहेत. चिली, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, बहरिन, जपान हे देश लेव्हल ३ वर आहेत. स्पेन, केनिया, पोलंड, फिनलंड, युके, सिंगापूर, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि थायलंड हे देश लेव्हल ४ वर आहेत.

भारताची आयएमपीएस ही जगातील एकमेव सिस्टम आहे जी सर्वोत्तम अशा ५ व्या लेव्हलवर आहे.

अशी माहिती एफएसआयचे भारतीय उपखंड व दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख रामास्वामी वेंकटचालम यांनी दिली आहे.

२०१० साली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने इमिजीयेट पेमेंट सर्व्हिस अर्थात आयएमपीएसची स्थापना केली होती. ही तत्काळ रकमेच्या ट्रान्सफरसाठी उभारण्यात आलेली एक इन्स्टंट इंटरबँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम होती, जिच्या मदतीने पैशाची देवाण घेवाण सहज शक्य होते. ही सर्व्हिस मोबाईल फोन अप्लिकेशन आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काम करते व देशभरातील रिटेल पेमेंटसाठी वापरली जाते.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या छत्रछायेखाली भारतातील रिटेल पेमेंट संबंधित व्यवहार चालत असतात. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय या नवीन डिजिटल पेमेंट तंत्रज्ञानाचा विकास करून भारत सरकारने अजून मैलाचा दगड गाठला आहे.

हे तंत्रज्ञान भारतात लोकप्रिय असून कॅश ट्रान्सफर साठी चलनी नोटांपेक्षा या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे मत या रिपोर्टमध्ये मांडण्यात आले आहे. युपीआय पेमेंट सिस्टमची स्थापना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑगस्ट २०१६ मध्ये केली.

बँक डिटेल न घेता दोन अकाउंटमध्ये तत्काळ पैशाचा व्यवहार करण्यासाठी ही सिस्टम अत्यंत उपयोगी ठरली आहे.

युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराने नवनवीन उंची गाठायला सुरुवात केली आहे.भारतात आज युपीआय वापरकर्त्यांची संख्या ३५ कोटीच्या घरात आहे.

thepostman

भारतात या युपीआय व्यवहारात वाढ तेव्हा झाली ज्यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत इंटरफेस फॉर मनी अर्थात भीम ॲप बाजारात आणले.

तेव्हापासून हे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे व्यवहार गतिमान पद्धतीने होत असून त्यामुळे व्यापार पण सुरळीतपणे सुरू झाला आहे. हे जगात फक्त भारतात इतक्या प्रभावीपणे सुरू आहे. असे व्यंकटचालम यांनी स्पष्ट केले आहे.

या रिपोर्टमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की या पेमेंट सिस्टममध्ये फ्रॉड थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काळजी घेण्यात आली आहे. पेमेंट सिक्युरिटीवर लक्ष देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सरकार करत असून गैरव्यवहाराना आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा ही सर्वोत्तम आहे.

भारतीय पेमेंट क्षेत्रातील ही डिजिटल क्रांती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: UPI
ShareTweet
Previous Post

या कारणामुळे जगभरातील देश हायड्रोक्सीक्लोरोक्वीनसाठी भारतासमोर हात पसरवत आहेत

Next Post

चिनी क्रौर्याचा खरा चेहरा जगासमोर आणणारी ही ऐतिहासिक घटना आजही अंगावर काटा आणते

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

चिनी क्रौर्याचा खरा चेहरा जगासमोर आणणारी ही ऐतिहासिक घटना आजही अंगावर काटा आणते

नवीन रोगाला नाव कसं दिलं जातं..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.