The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाघांच्या जीवनचक्रावर होतोय ‘हा’ गंभीर परिणाम

by द पोस्टमन टीम
28 October 2021
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
Tiger Safari Featured
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

‘ प्रवास ‘ ही संकल्पना केवळ मौजमस्ती करण्यासाठी नव्हे तर ऐतिहासीक, भौगोलिक, नैसर्गिक माहिती जाणून घेण्यासाठी उत्तम साधन आहे. आपल्याकडे गुणी आणि ज्ञानी माणसाचे लक्षणं सांगताना म्हणतात, ‘ केल्यानेच देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार !’

इतिहासातील अनेक मोठी नावे ट्रॅव्हलर म्हणजेच प्रवासी म्हणून लौकिक प्राप्त आहेत. अनेक राजे प्रवासाठि पैसे पुरवायचे. अशा अनेक प्रवासांच्या माध्यमातून अनेक देशांचे शोध लागले आहेत. अनेक भौगोलिक आश्चर्य सापडले आहेत.

आजही प्रवासाला अनन्यसाधारण महत्व आहे . आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती प्रवास करतो. वर्ल्ड टूर व्ह्यावी अशी सुद्धा काहि लोकांची ईच्छा असते. त्यामुळे ‘ पर्यटन ‘ हा एक वाढता व्यवसाय आहेत.



पर्यटनाची जागा निश्चित करायची असेल तर आपण प्राधान्य नैसर्गिक सुंदरतेने नटलेल्या ठिकाणाला देतो .

गेल्या काहि दशकात वाघांच्या संवर्धनासाठी व लुप्त होत चाललेल्या प्राण्यांसाठी राष्ट्रीय उद्यान व खास प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

इथे जंगल सफारीची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. जंगल सफारीच संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मानावाने या साधनेचा देखिल गैरवापर करणं सुरू केलं आहे. जंगल सफारी वर जावून उन्माद करणं, परिसर अस्वच्छ करणं, प्राण्यांत त्रास देणं हे सगळं सुरू केलेलं आहे.

मास्टरपीस फोटो घेण्यासाठी आपण त्यांच्या अतीच जवळ जातो. त्यामुळे तेथील प्राण्यांना अनेक समस्या सहन कराव्या लागत आहे .

कान्हा व बांधवगड या प्रसिद्धी राष्ट्रीय उद्यानातील काहि वैज्ञानिकांनी एक सर्वेक्षण केलं. नुकत्याच झालेल्या या प्रयोगात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की त्यांच्या वास्तव्यात व्यत्ययामुळे प्राण्यांत ताण येतो व त्यांच्या प्रजननावर सुद्धा विपरीत परिणाम होत आहेत.

वाघाच्या शरीरात विशेष प्रकारच संप्रेरके निर्माण होतं, जे ताण वाढवत. या मुळे त्यांच्या प्रजननावर व जीवनावर परिणाम होतो.

२०१५ साली वैज्ञानिकांनी सारीस्का वाघ्यप्रकल्पात केलेल्या एका सर्वेक्षणात असं लक्षात आलं की मानावी व्यत्ययामुळे वाघ प्रजनन करूच शकले नाही! दूरवरचा विचार करता याचा वाघांच्या संखेवर नक्किच परिणाम होणार आहे.

कान्हा व बांधवगड मध्यप्रदेशात स्थित वाघाची सर्वात जास्त संख्या असलेला प्रकल्प आहे. जवळपास ६०च्या वर वाघांची संख्या आहे. गर्द जंगलाने वेढलेल्या या भागात जवळपास १५  गावं व काहि छोट्या वस्त्या आहेत.

वैज्ञानिकांनी, जानेवारी ते मार्च, जेव्हा सगळ्यांत जास्त पर्यटन बघायला मिळतं व जेव्हा पर्यटन कमी असतं अश्या दोन्ही काळातले विष्ठांचे नमुने गोळा केले व विविध संप्रेरकांच प्रमाण नमूद केल्या गेले.

तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की ताण वाढवणारे संप्रेरके पर्यटन काळात वाढलेले आहेत . त्यांना अपेक्षेपेक्षाही जास्त प्रमाण त्या नमुन्यांमधे आढळून आलं. मानवात अनेक संप्रेरके शरीराच नियंत्रण करतात.

काही अंशाचा वाढ सुद्धा जीवघेणी ठरू शकते. काही संप्रेरके आपला ताण नियंत्रण करतात. त्यांचा आपल्या सुद्रुढ आयुष्यासाठी खुप महत्व असतं. त्यांच प्रमाणे प्राण्यांच्या शरीरात असे संप्रेरके तयार होत असतात.

जर त्यांच्या शरीरातील संप्रेरकांमधे अशी लक्षणीय वाढ दिसून आली आहे तर नक्किच ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ‘जीवों जीवस्य जिवनम्’ अर्थात प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहेत. या सगळ्यांचा परिणामी फ़क्त वाघांवर नाही तर

निसर्गातील अनेक प्राण्यांच्या बाबतीत देखिल बघायला मिळतील यात शंका नाही . प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानावाला सुद्धा याचे परिणाम सोसावे लागणार आहेत व त्यासाठी पुर्ण पणे माणूसच जबाबदार असेल !

यावर उपाय देखिल वैज्ञानिकांनी सुचवला. येणाऱ्या पर्यटकांच योग्य प्रमाणात नियोजन हा एकमेव उपाय त्यांनी सुचवला. राष्ट्रीय  वाघ्र संवर्धन समितीने २०१० साली काहि नियमबद्ध व्यवसाय तयार केली. त्यानुसार एका दिवसांत केवळ ४० गाड्या जंगल सफारी करु शकतील. फिरण्याची कक्षा देखिल मर्यादित ठेवण्यात आली.केवळ २०% क्षेत्रात जंगल सफारी ची परवांगी देण्यात आली होती . पण उत्तम नियोजन नसल्यामुळे ह्या आकड्यांवर नियंत्रण नाहि करता आलं. ऑक्टोबर २०१४ ते जुन २०१५ या नऊ महिन्यात बांधवगड ईथे १,०६,५३५  या संख्येने पर्यटकांची नोंद झाली व कान्हा येथें १,३७,६४४ पर्यटकांनी भेट दिली.

या साठी जवळपास ८५  गाड्या रोज जंगल सफारीसाठी सोडण्यात यायच्या. नंतर हा आकडा १०६ च्या घरात गेला. या व्यवस्थेच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाली असं वैज्ञानिकांच मत आहे.

एका दिवशी ४० च्या वर गाड्यांना परवानगी नाकारावी, नियमांच पालन व्हाव, पिण्याच्या पाण्याला पर्यटन स्थळापासून दूर ठेण्यात यावं, मानवी व्यत्यय टाळावा असे अनेक उपाय सांगितले!

पण ही जबाबदारी केवळ तिथल्या प्रशासनाची नसून तिथे भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची आहे. आपल्या घरी येवून, ठाण मांडून बसणारे, पसारा करणारे पाहुणे आपल्याला जसे नकोसे वाटतात तसंच प्राण्यांच्या बाबतीतही आहे.

वाघ किंवा ईतर कुठलाही प्राणी फ़क्त जगवायचा नाहि तर त्यांच्या स्वास्थ्याची काळजी सुद्धा आपण घ्यायला हवी. इतरही राष्ट्रीय उद्यानांमधे अशी सर्वेक्षण व्हावी व तिथल्या प्रशासनाने देखिल त्या संबंधी लवकरत लवकर पाउल उचलावीत ..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दिल्लीत राहणाऱ्या पाकिस्तानी निर्वासित हिंदू कुटुंबात जन्माला आलीये “नागरिकता”…!

Next Post

मुंजे, मुसोलिनी आणि रा.स्व.संघ…

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

मुंजे, मुसोलिनी आणि रा.स्व.संघ...

'स्त्रीत्वाचाच' त्याग करून, पुरुषाप्रमाणे राज्य करणारी 'राणी रुद्रमादेवी'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.