The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेच्या प्राणीसंग्रहालयात माणसांनाच ‘प्राणी’ म्हणून ठेवण्यात आले होते

by द पोस्टमन टीम
9 June 2020
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

१९०४ साली तब्बल २० लाख लोकांनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मेळाव्यात सहभाग नोंदवला होता. अमेरिकेतल्या सेंट लुईस याठिकाणी लोक वीजेचा आणि टेलिफोनचा नुकताच झालेला आविष्कार बघायला आले होते. पण याबरोबरच लोक तिथे आदिवसी लोकांचे प्राणिसंग्रहालय बघायला होते.

या प्राणिसंग्रहालयात आफ्रिका,आशिया आणि दक्षिण अमेरिकेच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आणलेल्या आदिवासींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात ते आदिवासी त्यांच्या मूळ रूपात आणि मूळ स्थानाप्रमाणे कृत्रिमरित्या उभारण्यात आलेल्या अधिवासात ठेवण्यात आले होते. या आदिवासींना बघायला अमेरिकन लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. हे विचित्र वाटत असलं तरी असं खरंच घडलं होतं.

१९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरवातीला अमेरिकेतील लोकांना जगभरात असलेल्या आदिम जमातींचे प्रचंड आकर्षण होते. बऱ्याच प्रवाशांच्या प्रवासवर्णनांचा परिणाम त्यांच्यावर झाला होता. पण या जागांना भेट देण्याची क्षमता अमेरिकन लोकांमध्ये तेव्हा नव्हती, प्रवासाची माध्यमं सुकर नव्हती.



त्यामुळे अमेरिकेतल्या अनेकांनी या जागतिक मेळाव्यात अशा वेगवेगळ्या भागातील जमातींचे लोकांचे ‘प्राणी संग्रहालय’ उभारले होते.

अमेरिकन जनतेत त्या काळात वर्णभेद शिगेला पोहचला होता, त्यामुळे अश्वेतांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि त्यांच्या दुय्यम स्थानाची जाणीव करुन देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात ज्या देशातील या जमाती होत्या, त्या देशांवर युरोपियन राष्ट्रांचे साम्राज्य होते. त्यांच्या साम्राज्यवादाचं एक रूप या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात येत होते. एका अमेरिकन लेखकाने आपल्या जीवनचरित्रात या भागात मानवी प्राणीसंग्रहालयात आणण्यात आलेल्या ९०० आदिम नागरिकांचा उल्लेख केला आहे.

आदिम जमातींना त्यांच्या मूळ भूप्रदेशातून काही महिन्यांसाठी या प्रदर्शनासाठी आणले जात होते. त्यांना अगदी त्यांच्या मूळ राहणीमानाला धरून राहणे भाग पाडले जात होते. फिलिपाइन्समधून आणलेल्या आदिम जमातींना तर कुत्रा मारून खाण्याची त्यांची प्रथा जशीच्या तशी सादर करायला सांगितली जात होती. हे असं करून अमेरिकन प्रेक्षकांचं मनोरंजन करून, या लोकांच्या जंगलीपणाची तोंडओळख करून देण्यात आली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

याठिकाणी या आदिम जमातींना नरकाचं आयुष्य जगावं लागत होतं. या मेळाव्यात दोन फिलिपिनो जमातीच्या आदिवासींचा पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला होता. अरिझोना येथील इंडियन या अमेरिकेतील मूलनिवासी जमातीच्या लोकांत साथीचे आजार पसरल्याने त्यांची रवानगी त्यांच्या मूलस्थानी करण्यात आली होती.

या माणसांच्या प्राणीसंग्रहालयाला गज नसायचे, त्या आदिम जमातींपैकी कोणी पळून जाणारं नव्हतं कारण जाऊन ते जाणार तरी कुठे होते? हे असंच सुरु राहिलं. या लोकांची मूळ वसाहत त्या ठिकाणी उभारण्यात आली होती. त्या वसाहतीत ते आपल्या दैनंदिन जीवनशैलीप्रमाणे जगत होते. यातून लोकांचे मनोरंजन केले जात होते.

हे अमानवीय आहे, याची कल्पनाच लोकांना तेव्हा नव्हती. पण या जमातींची मात्र पिळवणूक सुरूच होती. या ठिकाणी अनेक मिडलमन या आदिम जमातीच्या लोकांत आणि सामान्य प्रेक्षकात संवाद साधत, या जमातींची तोंड ओळख करून देत असत.

ह्या जमातीतून आलेले काही लोक जे सर्कसमध्ये काम करत अथवा गुलाम म्हणून आणले गेले होते, यात एजंट म्हणून काम करत. हे लोक बाह्य व अंतर्गत जगतात दुवा म्हणून काम करत होते. आदिम जमातींना आणून त्यांना त्याठिकाणी रहायला लावणे व त्यांचे जगभरातील लोकांच्या मनोरंजनाचे साधन बनवणे व यातून पैसे कमावणे, हे कामं हे एजंट करत होते. या जमातीची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली  जात नव्हती.

ह्या अमानुष प्रकाराची सुरुवात १८७१ साली झाली. यामागे लंडनच्या मॉडर्न सर्कसचा मोठा हात होता, असं मानलं जातं. १८३० ते १८४० या काळात ही संकल्पना उदयास आली, या काळातच मोठ्या प्रमाणावर जमातीतले लोक सर्कशीच्या कामासाठी वापरले  जाऊ लागले. त्यावेळी सर्कस चालू करणाऱ्या लोकांना ह्या जमातीच्या मूळ अवस्थेबद्दल लोकांना अवगत करून द्यायला आवडायचं. त्याकाळी अमेरिकेत जगभरात हिंडणाऱ्या प्रवाशांची प्रवासवर्णनं गाजत, त्यामुळे लोकांच्याही मनात या आदिम जमातींविषयक कुतूहल असायचे.

लोकांच्या मनातील हे कुतूहल हेरून अनेक भांडवलशहांच्या मनात पैसे कमवण्याची नवीन क्लुप्ती आकार घेऊ लागली अशातूनच मग या मानवी प्राणिसंग्रहालयांचे प्रदर्शन जागोजागी भरवले जाऊ लागले. सिंहाची शिकार करणारे, वन्य प्राण्यांना मारून खाणाऱ्या या आदिम लोकांबद्दल आधीच असलेल्या उत्सुकतेमुळे या प्राणी संग्रहालयांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद सामान्य अमेरिकनांचा लाभत होता. १८७१ मध्ये जेव्हा पहिल्यांदा याचे प्रदर्शन भरवण्यात आले तेव्हा मोठ्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिला.

आधी फक्त श्रीमंतांसाठी मर्यादित असलेले प्राणिसंग्रहालय सामान्य अमेरिकनांसाठी खुले करण्यात आले. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दर आकारले जाऊ लागले.

हे प्राणी संग्रहालय जरी अनेकांसाठी मनोरंजनाचं माध्यम असलं तरी त्या आदिम जमातीच्या लोकांसाठी नरक यातना होत्या, अमेरिकेचं भौगोलिक स्थान हे उत्तर गोलार्धात आहे, त्याठिकाणी प्रचंड थंड हवामान होतं. या हवामानाची कुठलीच सवय या आदिम जमातीला नव्हती. यात त्यांना त्यांच्या मूळवेशात रहावं लागायचं हे त्याहून भयानक होतं. बहुतांश जमाती ह्या विषुववृत्तीय प्रदेशातील होत्या, या जमातींना तिथल्या उष्ण वातावरणाची सवय होती. अमेरिकेला बोचऱ्या थंडीत त्यांना त्यांच्या मूळवेशात उघडं नागडं उभं करून सुटाबुटातील साहेबांचं मनोरंजन करणे याहून अमानवीय कृत्य दुसरे काय असणार?

यात त्या लोकांना खाण्यापिण्याचे वांधे होते. त्यांना मुबलक अन्न पुरवठा नसायचा, त्यांना स्वच्छता प्रदान केली जात नव्हती, त्यांच्यात साथीच्या रोगांचे प्रमाण मोठे होते. यात असंख्य आदिम जमातीचे लोक दगावले होते. हा प्रकार पहिल्या महायुद्धाच्या शेवटपर्यंत सुरु होता. युरोप व अमेरिकेत अशा असंख्य प्रदर्शनांचे आयोजन होत राहिले. मानवतावादी व वांशिकता विरोधी चळवळ जशी जोर घेऊ  लागली, तसतशी या अमानुषतेची जाणीव लोकांना होऊ लागली. अखेरीस १९२०च्या आसपास कायद्याने यावर बंदी घालण्यात आली.

आजही जेव्हा या मानवी प्राणी संग्रहालयांचे छायाचित्र बघतो, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ज्या लोकांनी हे नरक अनुभवलं होतं, त्या लोकांविषयी फक्त करुणेचा भाव दाटतो. साम्राज्यवादाची ही उत्पत्ती तिच्या अमानुषतेची कल्पना देते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

स्वामी श्रध्दानंदांचा मारेकरी ‘अब्दूल’ला माफ करण्यासाठी गांधीजींनी पत्र लिहिलं होतं

Next Post

न्यू यॉर्कच्या रस्त्यावर विमान उतरवतो म्हणून दारू पिऊन पैज लावली आणि पूर्णही केली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

न्यू यॉर्कच्या रस्त्यावर विमान उतरवतो म्हणून दारू पिऊन पैज लावली आणि पूर्णही केली

तो मासेविक्री करून चालवतोय गरीब मुलांसाठी शाळा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.