The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिजिटल जगात वावरताना हॅकिंगपासून कसं वाचायचं..? जाणून घ्या..!

by द पोस्टमन टीम
30 December 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


स्मार्टफ़ोननं खिशाखिशात प्रवेश केल्यानंतर एकप्रकारची डिजिटल क्रांती घडून आली आहे. आज बँकिंगपासून मनोरंजनापर्यंत सर्वकाही या तळहाताइतक्या स्मार्टफ़ोनवर करणं शक्य आहे. मात्र याचीच दुसरी बाजू म्हणजे हॅकिंग. सर्रास कानावर येणार्‍या या फ़सवणूकीच्या बातम्या हा डिजिटल चोरी/दरोडा/घपलाच आहे.

तुम्ही तुमच्या फ़ोनला स्क्रीन लॉक लावलंय? ज्या साईटवरून खरेदी करता ते अकाऊंट पासवर्ड प्रोटेक्टेड आहेत? ज्या ईमेल अकांउंटवर खरेदीच्या सूचना, अपडेटस येतात ते पासवर्डनं सुरक्षित केलेले आहेत? ओटीपीची जास्तीची सुरक्षाही लावली आहे? इतकं सगळं असूनही जर तुमचा फ़ोन आणि त्यावरचे व्यवहार किंवा एकूणच या व्हर्च्युअल जगातला वावर सुरक्षित नाही असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

कसं होतं हे हॅकिंग? तुमच्या घरात तुमच्या हातात पासवर्डनं बंद केलेला फ़ोन जगाच्या पाठीवर एका कोपर्‍यात बसून कोणीतरी कसा काय वापरू शकतं? हॅकिंगमुळे हे अगदी सहज शक्य आहे आणि म्हणूनच चिंतेचंही!

सिनेमा, सिरियलमधे तुम्ही बघितलं असेल की हिरो किंवा व्हिलन त्याला हवी ती माहिती किंवा एखाद्या व्यक्तीचा ठावठिकाणा, एखाद्या गुन्ह्याची उकल करायची असेल तर हॅकरच्या मदतीनं हे काम करतात. हा लेखकानं केलेला कल्पना विस्तार असतो असं नाही तर वास्तव आयुष्यातही या प्रकारे हॅकर्स कार्यरत असतात.



हॅकिंग म्हणजे काय? तर तांत्रिक उणिवा शोधून, फ़टी शोधून त्याचा फ़ायदा करून घेणं. साधारणपणे हॅकर्स कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स असतात किंवा कॉम्प्युटरमधलं आणि कॉम्प्युटर सिस्टिम सिक्युरिटजमधलं अगदी सखोल ज्ञान असणारे असतात. 

हॅकिंगचे प्रकार

  1. इथिकल हॅकिंग – याला व्हाईट हॅट हॅकिंगही म्हणलं जातं. या प्रकारचं हॅकिंग कायदेशीर आहे कारण ते सुरक्षा एजन्सीजच्या पुर्वपरवानगीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच केलं जातं. हे हॅकर्स साधारणपणे एखाद्या कंपनीच्या संगणकीय सुरक्षाप्रणालीचं रक्षण करतात.
  2. ब्लॅक हॅट हॅकिंग–  हे बेकायदेशीर आहे कारण यात मालकाची परवानगी घेतली जात नाही. आपल्या व्यक्तीगत फ़ायद्यासाठी हॅकिंग केलं जातं. हे हॅकर्स सर्वात जास्त धोकादायक मानले जातात
  3. ग्रे हॅट हॅकर– व्हाईट आणि ब्लॅक यांच्या मधला गट म्हणजे ग्रे हॅकर्स. यांना परवानगी नसतेच शिवाय फ़ारसं सखोल ज्ञानही नसतं पण हे जुगाड करत साईट्स हॅक करण्याच्या प्रयत्नात असतात. ब्लॅक हॅट हॅकर्सप्रमाणे कोणाचं तरी नुकसान करण्याचा यांचा उद्देश नसतो तर उत्सुकतेपोटी ते मजेमजेत सहज हॅकिंग करत असतात.
  4. हेक्टिव्हिस्ट हॅकर्स– राजकीय, धार्मिक साईट्स हॅक करून तिथे एखादा मेसेज पसरवणारे हॅकर्स या गटात येतात. त्यांचा अजेंडा ठरलेला असतो.
  5. स्क्रिप्ट किडीज– आयत्या बिळावर नागोबा असं यांचं चपखल वर्णन होऊ शकतं. म्हणजे हॅकर्सची टूल्स हॅक करणारी ही हुशार हॅकर मंडळी असतात. यांना हॅकिंगच्या टूल्सचं ज्ञान कमी असतं मात्र टुल्स चोरून मग त्याच्या मदतीनं हॅकिंग करणं जमतं.
  6. फ़्रेकर– ही मंडळी संगणकाच्या वाटेला जात नाहीत. ही फ़ोन/मोबाईलच्या जगात धुमाकूळ घालतात.

हॅकर्सचे प्रकार बघितल्यानंतर साधारण हे काय काम करत असतील याचा अंदाज आलाच असेल. मात्र हॅकर कोण आणि ते काय करतात? हे थोडक्यात सांगायचं तर तुमच्या कुलुपबंद घरात ज्याप्रमाणे चोर शिरून चोरी करू शकतात तसेच हे हॅकर्स तुमच्या पासवर्डनं सुरक्षित असणार्‍या संगणकात, मोबाईलमध्ये किंवा इंटरनेटवरील तुम्ही वापरत असणार्‍या शॉपिंगच्या वेबसाईट असोत की सोशल मिडिया असो तिथे घुसून तुमच्या माहितीवर दरोडा घालत तिचा दुरुपयोग करतात. हे कसं घडतं? तर प्रणालीमधे असणारे बग्ज अर्थात उणिवा शोधून त्यांचा कौशल्यानं वापर करुन घेतला जातो.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

आज अनेक प्रकारे हॅकिंग केलं जातं. ओटीपीपासून व्हॉटसॲप, फ़ेसबुक किंवा मोबाईलवरचे फ़ोटो फ़ाईल्स, ईमेल्स काहीही हॅक केलं जातं. डिजिटल पेमेंट ही काळाची गरज बनली आहे आणि सुलभतेमुळे सर्रास वापरातही आहे. ऑनलाईन पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही थर्डपार्टी ॲप्लिकेशनही याप्रकारची सुविधा देऊ करतात.

या लेखात आपण जिव्हाळ्याचा विषय असणार्‍या मोबाईल हॅकिंगबाबत बोलणार आहोत.

हे कसं होतं? तर मोह आणि लोभ या दोन मानवी दोषांमुळे. मासे पकडताना काय करतात? तर गळाला माशाला आवडणारा एखादा खाद्य पदार्थाचा तुकडा लटकवतात. मासा त्याला खाण्याच्या लोभानं येतो आणि अलगद गळाला लागतो. हॅकर्सही अगदी याचप्रकारे मोहात पडणार्‍या गोष्टी अर्थातच ऑफ़र्स तुमच्याकडे अलगद सरकवतो. तुम्ही हुशार असाल आणि जगात काहीही फ़्री मिळत नाही किंवा प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते, हे जाणून असला तर तुम्ही या गळाला अजिबात लागत नाही. मात्र दुर्दैवानं आपल्याकडे या गळाला अलगद लागणारेच जास्त आहेत.

मध्यंतरी ताज हॉटेलमधे तीन दिवसाच्या फ़्री वास्तव्याचा व्हायरल झालेला मेसेज आठवतोय? किंवा आदिदासचा गिव्ह-अवे सेल असल्यानं फ़्री मिळाणार्‍या शूजचा मेसेज?, अत्यंत महागड्या ब्रॅण्डची पर्स मिळणार असल्याचा मेसेज? पाच जणांना मेसेज फ़ॉरवर्ड केला तर किंवा स्पिन व्हिल फ़िरवलं तर आयफ़ोन फ़्री मिळणार असल्याचा मेसेज?, व्हाट्सॲप बंद पडणार असून दहाजणांना एक विशिष्ट मेसेज फ़ॉरवर्ड केला तर तुमचं व्हाट्सॲप टिकणार असतं. आठवतायत हे सगळे मेसेज?

हे सगळे मेसेज म्हणजे हॅकर्सनी गळाला लावलेली प्रलोभनं असतात. यात तुम्ही एकटेच गळाला लागत नसता तर असे मेसेज फ़ॉरवर्ड करून समोरच्यालाही खड्ड्यात घालत असता. याशिवाय ईमेलमधून आलेल्या ऑफ़र्स डाऊनलोड करणे, मोबाईल किंवा लॅपटॉपवर फ़्री ॲप डाऊअनलोड करताना ढीगभर परवानग्या देणे, हे इतकं सहज घडतं की या ॲपमधून तुमचा मोबाईल हॅक होतो आहे हे तुमच्या लक्षातही येत नाही.

या ॲपना स्पायवेअर ॲप म्हणलं जातं. एकदा का तुम्ही हे ॲप किंवा एखादी लिंक तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केली की पुढे हॅकरचं काम खूपच सोपं होऊन जातं. इंटरनेटच्या मदतीनं हॅकर घरबसल्या तुमच्या फ़ोनवर नियंत्रण मिळवू शकतो. हॅकिंग टूलच्या मदतीनं तुमच्या नावानं कोणाला तरी फ़ोन करणं, मेसेज करणं, आर्थिक व्यवहार करणं, तुमचे फ़ोन कॉल्स ऐकणं हे तो सहज करू शकतो. इतकंच काय पण तुमच्या मोबाईलच्या कॅमेर्‍यावरही तो नियंत्रण मिळवू शकतो.

प्ले स्टोअरमधे असणारी सगळी ॲप सुरक्षित आहेत असं वाटत असेल तर सर्वात आधी इथे काळजी घ्या, कारण इथे शेकड्यानं अशी ॲप आहेत जी स्पायवेअर आहेत. म्हणूनच कोणतंही फ़्री ॲप डाऊनलोड करताना, गेम डाऊनलोड करताना दहादा विचार करा.

हॅकिंगपासून वाचायचं कसं?

याचं उत्तर वरच्या हॅकिंग कसं होतं? यातंच दडलं आहे. हॅकिंगसाठी हॅकर जे जे वापरतो त्या कशाच्याच वाटेला आपण जायचं नाही. थर्ड पार्टी ॲप शक्यतो डाऊनलोड करू नका. कोणतंही ॲप घेता तेव्हा परमिशन मागितल्या जातात त्यात मिडिया, कॅमेरा, मेसेज, कॉल, लोकेशन, कॉण्टॅक्टस यांचा समावेश असतो. तुम्ही सहजपणे या परमिशन देता आणि अक्षरश: तुमचा फ़ोन हॅकरच्या हातात अगदी अलगद नेऊन ठेवता.

मग हे कसं ओळखायचं?

तर तुम्ही जे ॲप ज्या कारणासाठी डाऊनलोड करत आहात ते त्याच्या कामाशिवाय इतर परवानग्या मागत असेल धोका समजा. सोपं उदाहरण म्हणजे एखादं व्हिडिओ एडिटींग ॲप, जे अलीकडे आपण सगळे सर्रास वापरतो, ते जर का तुमच्या कॉण्टॅक्टची लिस्ट किंवा कॉल करण्याची परवानगी मागत असेल तर इथे धोका आहे समजून जा.

याशिवाय जर एखादी लिंक आली आणि ती सांगत असेल की या संधीचा लाभ घेण्यासाठी अमूक साइटवर जा किंवा अमूक ॲप डाऊनलोड करा तर अशा ऑफ़र्सकडे अजिबात बघू नका. हा मोह टाळा. एखादा फ़ोन आला आणि तुम्हाला लकी विनर घोषित केलेलं आहे म्हणून काही ऑफ़र देऊ लागला, तुमचे बॅन्क डिटेल्स मागू लागला किंवा नुकताच आलेला ओटीपी मागितला तर यातलं काहीही देऊ नका. ट्रायल म्हणून पाच दहा रूपयांची जीपे किंवा पेटीएम करायला सांगतात, ते करू नका. क्युआर कोड स्कॅन करायला सांगून तुमचं बॅन्क अकाऊंट लुटण्याच काम ते चुटकीसरशी करू शकतात.

थोडक्यात काय, तर हातातला फ़ोन डोकं लावून वापरा. तो स्मार्ट बनला आहे तर तुम्ही सुपरस्मार्ट बना आणि हॅकिंगच्या धोक्यापासून सावध रहा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी याने ७० हजार रोमन सैनिकांना यमसदनी धाडलं होतं

Next Post

वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची द*हश*त मोडून काढत वेंगसरकरांनी सहा शतकं ठोकली होती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची द*हश*त मोडून काढत वेंगसरकरांनी सहा शतकं ठोकली होती

मोहेंजोदडोच्या शोधामध्ये मोलाचा वाटा असणारी मराठी व्यक्ती - राव बहादुर काशीनाथ नारायण दीक्षित

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.