The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या चौदा वर्षाच्या मुलाने चाचा नेहरूंचे प्राण वाचवले आणि ‘बाल शौर्य पुरस्कार’ सुरु झाला

by द पोस्टमन टीम
16 August 2021
in इतिहास, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबरला बालदिनी, केंद्र सरकारकडून बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. १६ वर्षांपेक्षा कमी वयाचा २५ मुलांना त्यांनी संकटसमयी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पण हा बाल शौर्य पुरस्कार कसा सुरू करण्यात आला या मागची कथा देखील रंजक आहे.

हरीशचंद्र मेहरा हे नाव हे आज बहुतांश लोकांना परिचयाचे नसले तरी एकेकाळी या व्यक्तीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्राण वाचवले होते. हरिश्चंद्र मेहरा हे दिल्लीच्या चांदणी चौक परिसरात वास्तव्यास असून त्यांनी बालपणी दाखवलेल्या शौर्यामुळे बाल शौर्य पुरस्काराचा पाया रचला गेला होता.

१९५७ साली दिल्लीत एका रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १४ वर्षीय हरिश्चंद्र मेहरा यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विशेष अतिथींच्या व्यवस्थेची जबाबदारी हरिश्चंद्र मेहरा यांच्यावर सोपवण्यात आली होती.

नेहरू ज्या तंबूत होते, त्याला अचानक आग लागली. या तंबूतल्या लोकांचे याकडे लक्ष नव्हते सर्व रामलीला पाहण्यात मग्न होते. अशावेळी हरिश्चंद्र मेहरा यांचे लक्ष त्या आगीकडे गेले आणि त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता तंबूत जाऊन नेहरूंचा हात पकडुन त्यांना बाहेर सुरक्षित स्थळी पोहचवले. नंतर पळत परत जाऊन एका २० फूट उंचीच्या लांब तंबूच्या खांबावर चढून त्यांनी ज्या कपड्याला आग लागली होती तो बाजूला केला. हे सर्व होत असताना हरिश्चंद्र मेहरा यांच्याकडे पुरेसे स्वसंरक्षणात्मक साहित्य नव्हते, यामुळे हरिश्चंद्र यांचा हात बऱ्यापैकी भाजला गेला.



हरिश्चंद्र यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे प्रभावित झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचा व्यक्तिशः सन्मान करण्याची योजना तयार केली. यासाठी त्यांनी त्यांची मुलगी इंदिरा यांना त्यांच्या शाळेत जाऊन सन्मानित करण्यास सांगितले.

इतकेच नाहीतर त्यांना ३ फेब्रुवारी १९५८ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. त्यांच्याबरोबर अजून एका मुलाचा सन्मान करण्यात आला, तेव्हापासून दरवर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व करण्याचा मान देखील हरिशचंद्र यांना मिळाला होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

दुर्दैवाने या घटनेनंतर मात्र हरिश्चंद्र यांचं शाळेत जाणं बंद झालं आणि ५ वर्षांनी त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी नोकरी करायला सुरुवात केली. आज हरिश्चंद्र दिल्लीच्या चांदणी चौक परिसरात वास्तव्यास असून त्यांचे वय ७५ वर्षे इतके आहे. आजही त्या परिसरातले लोक त्यांना ‘नेहरू की जान बचानेवाला लडका’ म्हणून ओळखतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारताच्या ‘टिकली’ने जगभरातल्या महिलांना भुरळ घातलीये

Next Post

दूरदर्शनच्या प्रतिमा पुरी या पहिल्या भारतीय वृत्तनिवेदिका होत्या

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

दूरदर्शनच्या प्रतिमा पुरी या पहिल्या भारतीय वृत्तनिवेदिका होत्या

गुरु दत्त शेवटपर्यंत प्रेमासाठी 'प्यासा'च राहिला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.