The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समुद्र सफारीवर असलेल्या कोलंबसचा जीव एका ग्रहणामुळे वाचला होता.

by द पोस्टमन टीम
4 January 2026
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


कोलंबस हे नाव म्हणजे खलाशांच्या जगतातील सगळ्यात प्रसिध्द नाव. ‘वास्को-द-गामा’ने जगाला भारताचा रस्ता दाखवला तसेच अमेरिगो व्हेस्पुसी या खलाशाने अमेरिकेचा शोध लावला. परंतु अमेरिगो व्हेस्पुसीच्या आधीही अमेरिकन धरतीवर पाय ठेवला तो कोलंबसने. कोलंबसने मिळवलेल्या नवीन नवीन प्रदेशांच्या सागरी मार्गांचा वापर आजही केला जातो. ‘कोलंबसाचे गर्वगीत‘ अशी कविताच कुसुमाग्रजांनी त्याच्या नावाला प्रदान केली, यावरच त्याच्या महतीची कल्पना येते.

नवनवीन जागा शोधताना कोलंबसला बऱ्याच काही अडचणींचा सामना करावा लागला. आधुनिक तंत्रज्ञान अवगत नसल्याने कमीत कमी साहित्य सोबतीला घेऊन त्याने आपल्या शोधमोहिमा आखल्या. अमेरिकेत “कोलंबस दिवस” साजरा केला जातो, याच्या मागे चंद्रग्रहणाची एक रंजक आणि तेवढीच भयानक गोष्ट आहे. एका मोहिमेत चक्क त्याने चंद्रग्रहणाचा वापर करुन स्वत:चे आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले, अशी एक रंजक गोष्ट आहे. आज आपण हीच कथा ऐकणार आहोत.

सतत सागरी मोहिमेवर असणारा कोलंबस मध्य अमेरिकेच्या किनाऱ्यावर एकदा वाईट परिस्थितीत अडकला. स्पेनवरुन ११ मे, १५०२ रोजी ४ जहाजे बरोबर घेऊन निघालेला कोलंबस त्याची २ जहाजे गमावून बसला. राहिलेली २ जहाजे घेऊन तो उत्तर किनाऱ्यावर (आताचा जमैका) २५ जून, १५०३ रोजी पोहोचला.

सुरुवातीला तेथील स्थानिक असलेल्या अरावक भारतीय लोकांनी त्यांचा चांगला पाहुणचार केला. त्यांना अन्न आणि निवारा पुरवण्यात आला. असेच दिवस वाढत गेल्यानंतर मात्र तणाव वाढत गेला. तेथील लोकांना कोलंबसचा आणि त्याच्या साथीदारांचा भार जास्त होत होता. काही दिवसानंतर कोलंबसच्या काही साथीदारांनी तेथील लोकांवर जबरदस्ती करुन अन्न मिळवले. काहींनी स्वत:कडे असणारी भांडी आणि महागड्या वस्तू देऊन अन्न मिळवले. परंतु हळूहळू दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळी कोलंबसने एक कल्पना बनवली.



यावेळी कोलंबसाच्या मदतीला आले ते ‘रेजिओमॉन्टेनस‘ या नावाने प्रसिध्द असलेल्या एका खगोलशास्त्रज्ञाने लिहिलेले पंचांग. हे पंचांग म्हणजे त्यावेळी प्रत्येक खलाशासाठी असलेले बाइबलच. सुर्य, चंद्र तसेच वेगवेगळ्या तारकासमूहांची माहिती असणारे हे पंचांग त्यावेळी कोलंबसकडेही होते. याच पंचांगात बघितले असता तीन दिवसांवर चंद्रग्रहण आले असल्याचे त्याला कळाले.

त्यावेळी ग्रहणाच्या बाबतीत लोकांमध्ये अतिशय भीती होती. ग्रहणाच्या दिवशी काहीतरी वाईट होईल अशीच धारणा त्यावेळी लोकांची होती. याचाच फायदा घेण्याचा निर्णय कोलंबसने घेतला.

स्थानिक लोकांच्या मुख्य व्यक्तीकडे तो गेला आणि तुम्ही नाकारत असलेल्या अन्न आणि निवाऱ्यामुळे तुमचा देव तुमच्यावर रागावला आहे. तो रागाने लाल झालेला असून ३ दिवसानंतर म्हणजेच २९ फेब्रुवारी, १५०४ रोजी चंद्राच्या रुपात तो आपला राग व्यक्त करेल असे त्याने सांगितले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

कोलंबसने सांगितल्याप्रमाणे चंद्रग्रहणास सुरुवात झाली. आधीच घाबरलेले स्थानिक लोक ग्रहण बघून जास्तच घाबरले. संध्याकाळी चंद्र अगदी लाल दिसू लागला तेव्हा स्थानिक लोकांना कोलंबसची गोष्ट खरी वाटली. त्यानंतर घाबरलेले लोक कोलंबसकडे धावले. कोलंबसला देवाचा दूत मानू लागले. देवाला शांत करण्यासाठी काही करता येईल का अशी विनवणी करु लागले.

कोलंबस आत गेला आणि त्याने पुन्हा पंचांग बघितले. चंद्रग्रहण संपण्यास थोडाच कालावधी बाकी होता. काही वेळाने चंद्रग्रहण संपले तेव्हा कोलंबस बाहेर आला आणि देवाने तुम्हाला माफ केले आहे असे म्हटला. लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर लोकांनी कोलंबस आणि त्याच्या सहकाऱ्यांना काहीच कमी पडू दिलं नाही. नंतर २९ जून १५०४ रोजी कोलंबससाठी आलेल्या बचाव जहाजाने तो ७ नोव्हेंबर १५०४ रोजी परत स्पेनला पोहचला.

जगात आजही अनेक लोक ग्रहणाला घाबरतात. धोक्याची घंटा म्हणून ग्रहणाकडे आजही बघितलं जातं. हिंदु साहित्यात याला अमृतमंथन, काही वेळा राहु-केतु अशा गोष्टींशी जोडले गेले आहे. वैज्ञानिक कारण माहित असूनही आज सुध्दा त्याबद्दल अंधश्रद्धा बाळगल्या जातात.

पश्चिमी आशियाच्या काही लोकांच्या मते ड्रैगन सुर्याला खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ग्रहण लागते. त्यावेळी ड्रैगनला पळवून लावण्यासाठी तिथे ढोलताशे वाजवले जातात. तर स्वर्गातील कुत्रा हा सुर्य आणि चंद्राला खायला येतो तेव्हा ग्रहण होते असा समज आहे. वायकिंग संस्कृतीनुसार ढगातील लांडगे सूर्यावर ह*ल्ला करतात तेव्हा ग्रहण होते.

टोगो, बेनिन या प्रदेशातील लोक सूर्य आणि चंद्राच्या भांडणामुळे ग्रहण होते असे मानतात. या दोघांना शांत करण्यासाठी आपापसात असणारी भांडणे मिटवली जातात. दक्षिण प्रशांत भागात सूर्य आणि चंद्र प्रेमात असून प्रेमलीलेसाठी ते पृथ्वीपासून लपतात असा समज आहे.

बाइबलमध्ये लिहिल्याप्रमाणे पृथ्वीचा शेवट असेल तेव्हा सूर्य पूर्णतः काळा आणि चंद्र पुर्ण लाल झालेला असेल. ग्रहणाच्या वेळी असेच होत असल्यामुळे आजही लोक ग्रहणाला घाबरत असावेत.

ग्रहणाच्या बाबतीत असलेल्या अंधश्रद्धा कमी झाल्या असल्या तरी अनेक भागात आजही त्या तशाच आहेत. याच अंधश्रद्धेला हाताशी धरून आपली सुटका करुन घेणारा कोलंबस या अंधश्रद्धेच्या विरोधात नक्कीच नसेल. पण तरीही ग्रहण ही पुर्णपणे नैसर्गिक घटना असून त्यात वाईट काही नाही हे आज लोकांना समजावून सांगणे तेवढेच गरजेचे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: columbus
ShareTweet
Previous Post

या नेत्याने चालून आलेलं पंतप्रधानपद नाकारून दुसऱ्यांना संधी दिली होती

Next Post

१९६७ला इंदिरा गांधींनी शिकवलेला धडा चीन आजही विसरला नसेल..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

१९६७ला इंदिरा गांधींनी शिकवलेला धडा चीन आजही विसरला नसेल..!

आईन्स्टाइनपेक्षा हुशार असलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी करिअरचा त्याग केलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.