The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हि*टल*रच्या घराच्या जागी आता पोलीस स्टेशन उभं राहिलं आहे

by द पोस्टमन टीम
19 February 2025
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
hitler home featured

Christian Science Monitor

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इतिहासाने काही व्यक्तींची प्रतिमा आपल्या मनावर आशी कोरली असते की त्या व्यक्तीच्या कुठल्याही आठवणी आपल्याला नको वाटतात. इतिहासकार आणि अभ्यासक चांगली प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करतात, पण काही घटना आपल्याला ती प्रतिमा स्वीकारण्यास नकार देतात.

अशा काही बोटांवर मोजण्याइतक्या प्रसंगाचं व व्यक्तिमत्वाच इतिहासात स्थान आहे ज्यांना बहुतांश लोकं नकारतात. आधुनिक जगात ‘ दुसरं महायु*द्ध’ सामान्य लोकांसाठी सर्वांत क्लेशदायक घटना होती.

ही जखम अजूनही मनात कुठेतरी सलते आहे. ज्यांनी या यु*द्धाला प्रत्यक्ष अनुभवलं व त्यानंतर समस्यांना सामोरे गेले, त्यांच्यासाठी कायमच हे यु*द्ध एक दुखःदायक घटना आहे व राहील.

महायु*द्धासोबत एक नाव कायमस्वरूपी जोडलं गेलं आहे, ज्याने या भीषण यु*द्धाला सुरुवात केली तो जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हि*टल*र होय.

इतिहासाकरांनी हि*टल*रबद्दल दोन्ही बाजूंनी लिहिलं आहे. पण सामान्य लोकांसाठी ही बाजू पचवणं खूप अवघड आहे. असं म्हणतात जर्मनीत नंतर पुढे कुणीही हि*टल*र आडनाव ठेवलं नाही.



हि*टल*रचा जन्म ऑस्ट्रिया व जर्मनीच्या सीमेवरील ब्राऊनाऊ येथे झाला. तेथील त्याच्या घराचं रूपांतर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात यावं असा निर्णय सरकारने घेतला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून न्यायालयात हा वाद सुरू आहे. त्या इमारतीचे मालक गेर्लींड पॉम्मेर यांनी सरकार देत असलेल्या रकमेत वाढ करून हवी होती. पण सरकारला हे मान्य नव्हतं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अनेकदा ही इमारत विकत घेण्याचा प्रयत्न देखील सरकारने केला, पण मालक विकण्यास तयार नव्हते. शेवटी २०१७ साली ही इमारत सरकारच्या हाती आली आणि हा निर्णय घेण्यात आला. यावर अनेक चर्चा सुरू होती.

अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. आतापर्यंत ही इमारत सरकारने अनेक कारणांसाठी वापरली. सुरुवातीला दुसऱ्या महायु*द्धानंतर युध्दात अपंग व जखमी झालेले सैनिकी व अपंगांसाठी निवासस्थान म्हणून वापरले गेले.

जवळपास ३० वर्षांपर्यंत या इमारतीचा या कारणासाठी उपयोग झाला. पण २०११ साली मालकाने यासाठी नकार दिला . सरकारने घर विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव ठेवले पण घर मालकाला मान्य केले नाहीत.

पुढील वर्षांत ग्रंथालय, संग्रहालय, शाळा म्हणून देखील वापर झाला. २०१४ साली निर्वासितांसाठी ही इमारत खुली करण्यात आली, पण हा प्रयोग काही कारणास्तव फसला.

अखेर २०१७ साली सरकारने या घराचा ताबा घेतला. या इमारतीला पोलिस स्टेशन म्हणून वापरावं असा निर्णय सरकारने दिला. या इमारतीला पुन्हा एकदा वास्तूकलेच्या हिशोबाने सजवण्याचा काम सुरू झालं आहे.

या काळात अनेक वाद उठले. वेगवेगळे मतप्रवाह आपले मतं देत होते. एक मतप्रवाह या दिशेने खुणावत होता की या इमारतीला जमीनदोस्त करावं आणि त्यावर नवी इमारत बांधावी. नाझी व हिटलर ही विचारसरणी कायमची संपली असा सांकेतिक इशारा यातून देण्यात यावा. काहींच्या मते हि*टल*रच्या घरी न्याय व कायद्याचे प्रतिक असलेले पोलिस स्टेशन उभारून आपण न्याय देवतेचा अपमान करत आहोत.

यामुळे वाईट संदेश लोकांपर्यंत जाईल. पण सरकारमधील मंत्री मात्र वेगळा विचार करत आहेत. त्यांच्या मते तिथे पोलिस स्टेशन उभारल्याने ना*झी किंवा हि*टल*रचं शेवटचं स्मारक संपुष्टात येईल व त्यांची विचारसरणी आता संपली असा संदेश जाईल.

या मुद्द्याला अनेक कंगोरे दिले गेले. अनेक वाद विवादानंतर, युक्तिवादानंतर हा निर्णय घेण्यात आला.

हि*टल*रने सुरुवातीचा थोडा काळ या घरात घालवला. पुढे त्यांचं कुटुंबीय त्याच शहरात दुसऱ्या घरात राहायला गेले. हि*टल*रने तर वयाच्या तिसऱ्या वर्षी शहर सोडलं. १९३८ साली पुन्हा एकदा हि*टल*रने या शहरात पाऊल ठेवलं.

यावेळी तो एक शक्तिशाली नेता म्हणुन ओळखायला लागले होते. याच वेळी त्याने ऑस्ट्रिया आणि जर्मनीला जोडलं. व्हिएन्नाला जाताना वाटेत थांबून त्याने या गावाला भेट दिली.

कुठल्याही ऐतिहासिक व्यक्तीचं जन्मस्थळ व जन्मगावाला फार महत्व असतं. त्यांचे वैचारिक विरोधक व त्यांचे समर्थक दोघांच्याही दृष्टीने ती जागा महत्वाची असते.

हि*टल*रच्या समर्थकांनी इथे एकत्रीत येऊन, हि*टल*रचे वाढदिवस साजरे करणं, सभा घेणं सुरू केलं होतं. त्यांच्यासाठी ती पावन भूमी होती व तिचं रूपांतर स्मारकात व्हावं आशी त्यांची इच्छा होती. सरकारचे यावर लक्ष होतेच.

ही विचारसरणी पुन्हा वर येण्याअगोदरच या विचारसरणीची थोड्या प्रमाणात का होईना पण साक्ष असलेल्या या इमारती बाबत ठोस निर्णय घेणं आवश्यक होतं. इमारत जमीनदोस्त केली किंवा पुतळे पाडले की विचारसरणी संपते का? हा चर्चेचा मुद्दा नक्कीच आहे.

पण जिथे हि*टल*रचा जन्म झाला तिथेच गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येईल, यापेक्षा त्या इमारतीच्या प्रश्नावर आणखी चांगला उपाय नसू शकतो.

युरोपमधील प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ व अनेक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही वास्तू पून्हा नव्या रूपात बांधली जाईल. पोलिस स्टेशनसाठी लागणारी सर्व व्यवस्था लक्षात घेऊन ही इमारत बांधली जाईल अशी माहिती इंटेरियर मिनिस्टर वोल्फगँग पीस्चोर यांनी सांगितली .

ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे जन्मगाव, जन्मस्थळ या सगळ्या गोष्टींना अभ्यासकांच्या दृष्टीने फ़ार महत्व असतं. व्यक्तिमत्व जेव्हा वादातीत असेल तर महत्त्व द्विगुणित होतं!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: GermanyHitlerHomenazi
ShareTweet
Previous Post

भारत श्रीलंका सागरी सीमेदरम्यानचा नवा सीमासंघर्ष

Next Post

आई झाल्यावरसुद्धा हॉकी स्टिक हातात घेतली आणि देशाला मेडल मिळवून दिलं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आई झाल्यावरसुद्धा हॉकी स्टिक हातात घेतली आणि देशाला मेडल मिळवून दिलं

mukul rohotagi featured

भाजपच्या मर्जीतला म्हणून हिणवला गेलेला एटर्नी जनरल !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.