The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपलं रुपया हे चलन या राजाने सुरु केलं होतं

by द पोस्टमन टीम
1 August 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आपण ज्या देशात राहतो तो एक अतिप्राचीन देश आहे. आजवर या देशावर अनेक राजांनी राज्य केलं. त्यातल्या काहींची राजवट चांगली होती तर काहींची वाईट. परंतु या देशाच्या जडणघडणीत त्या प्रत्येकाचं वेगळं असं काहीतरी योगदान आहेच. 

तर आज आपण या लेखातून अशाच एका खूप चांगले नियम बनवून प्रजेच्या मनात घर करणाऱ्या राज्यकर्त्याबद्दल माहिती घेऊया. या राज्यकर्त्यांचं नाव होत शेरशाह सुरी.

हा कुठला राजा होता? याने राज्य कसं मिळवलं? आणि अजून पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.

एक उत्तम राज्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेरशाह सूरीचा जन्म १४७२ साली झाला. त्याचं नाव फरीद होतं. या शेरशाह सुरीचे वडील म्हणजे जौनपूर या गावचे जहागिरदार. दक्षिण बिहारचे सुभेदार बहार खान लोहानी याने शेरशाह सूरीला शेर खान ही पदवी दिली. ही पदवी देण्यामागे शेरशाह ने मारलेला सिंह हे कारण होतं आणि याच कार्यामुळे बहार खान याने शेरशाहला आपल्या मुलाचा अंगरक्षक म्हणूनसुद्धा नियुक्त केलं. नंतर बहार खानचा मृत्यू झाला व शेरशाहने त्याच्या विधवा बायकोसोबत आपला विवाह केला.



शेरशाह सूरी याने १५२९ साली बंगालचा राज्यकर्ता नुसरत शहा याला यु*द्धात हरवून स्वतः हजरत अली हे नाव धारण केलं, व १५३० साली चुनारच्या किल्ल्यावर आपला झेंडा फडकवला. या किल्ल्यात त्याला बरेच धन मिळाले होते.

हुमायूनचा पराभव करून शेरशाह सूरी चौसामध्ये झालेलं यु*द्ध जिंकला.

२६ जून १५३९ रोजी चौसा इथे लढाई झाली होती. ही लढाई मुघल राजा हुमायून आणि शेर शहा सूरी यांच्यात झाली. ही लढाई शेरशहा जिंकला. पुन्हा १५४० साली शेरशहाने कन्नौज येथे हुमायूनचा पराभव केला. शेरशहाने बंगाल, बिहार आणि पंजाब या ३ राज्यांतून हुमायूनला कायमचं हाकलून लावलं होतं. याचसोबत त्याने वायव्य भारताचा भाग असलेल्या बलूचांचा देखील पराभव केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

या राज्यकर्त्याने १५४२ साली मालवावर ह*ल्ला करून तो जिंकून घेतला. १५४३ मध्ये रायसीनवर आक्र*मण करून विश्वासघाताने तिथल्या रजपूत राज्यकर्त्यांचा खू*न केला. या ह*ल्ल्याने रजपूत स्त्रियांना आपली ताकद दाखवण्यास भाग पाडले. ही घटना आजही शेरशाह सूरीच्या आयुष्यावर कलंक म्हणून राहिली आहे.

यानंतर शेरशाह सुरीने १५४४ साली मारवाडवर आक्र*मण केले. तेव्हा तिथले राज्यकर्ते राजा मालदेव हे होते. या यु*द्धात राजपूत सेनेने शेरशाह आणि अफगाणी सैन्यावर मोठा ह*ल्ला केला आणि त्यांना धुळीस मिळवलं. या घटनेने शेरशाह खूप प्रभावित झाला.

आपल्या राज्याचा विस्तार करत शेरशहाने कालांतराने ग्वाल्हेर आणि माळवा इथेसुद्धा आपला झेंडा फडकवला. हीच घोडदौड कायम ठेवत त्याने कालिंजरवरसुद्धा ह*ल्ला केला. तेव्हा हा किल्ला राजा किरात सिंग यांच्या ताब्यात होता. आणि ते या ह*ल्ल्याच्या वेळी उक्का नावाची तोफ चालवत होते. त्यांनी डागलेल्या तोफेचा गोळा शेरशाहच्या जवळच असलेल्या दारूगोळ्यावर पडला आणि त्याचा स्फो*ट होऊन त्यात शेरशाहचा मृत्यु झाला.

या शेरशाहला बिहारमधील सासारम इथे गाडलं गेलं. त्याच जागेवर त्याचे स्मारकसुध्दा बांधण्यात आले. हे स्मारक आजही तिथे आहे व ते मध्यकालीन स्थापत्यकलेचा एक नमुना आहे.

शेरशाहच्या मृत्यूनंतर १५५५ पर्यंत दिल्लीवर सूर वंशाच्या राज्यकर्त्यांचं राज्य होतं. यानंतर हुमायूनने सिकंदरशहा सूरी याला पराभूत करत पुन्हा एकदा दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. पण यानंतर हुमायून जास्त जगला नाही. त्याच्यानंतर अकबराने मुघल राज्याची धुरा हाती घेतली.

शेरशाह सुर वंशातील होता. त्याने सैन्याधिकाऱ्यापासून ते शासकापर्यंतचा प्रवास केला. हुमायूनचा पराभव करून जेव्हा त्याने सिंहासनाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा तो भारतातील एक अत्यंत अतुलनीय मुस्लिम राज्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले. प्रशासन आणि कराच्या क्षेत्रात त्याने अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या.

शेरशाह सुरीने शुद्ध चांदीचे नाणे काढले होते ज्याला रुपया असं म्हटलं जातं. 

या राज्यकर्त्याने दळणवळणाच्या उद्देशाने भरपूर रस्ते बांधले. त्या रस्त्यातील चार रस्ते आजही प्रसिद्ध आहेत.

ते रस्ते पुढीलप्रमाणे –

● ग्रँड ट्रंक रोड – हा रस्ता कलकत्ता ते पेशावर असा होता.

● सडक ए आजम – हा रस्ता आग्रा ते चितोड असा होता.

● तिसरा रस्ता हा आग्रा ते बुऱ्हाणपूरपर्यंत होता

● तर चौथा मुलतानपासून लाहोर पर्यंत होता.

तसेच या राजाने आपल्या उत्तरेकडील सीमा सुरक्षित करण्यासाठी रोहतासगड नावाचा एक किल्ला बांधला होता.

शेरशाह सूरी याच्या काळात राजा आणि प्रजा यांच्यात पहिल्यांदाच चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचारात लक्षणीय घट झाली होती. लौकी क्षेत्रात त्यांनी केलेल्या सुधारणेही उल्लेखनीय आहेत. त्यांनी डाॅग आणि फेस नावाची प्रणाली आणली. या व्यवस्थेप्रमाणे त्यांना प्रत्येक मनसबदारांना विशिष्ट चिन्हाने आपल्या घोड्यांवर निशाण कराव लागायचं. आणि याच्या मागचं कारण होत की दुसरा कुठला मनसबदार तोच घोडा राजाला दाखवू नये.

या नंतर शेरशहाने आपल्या साम्राज्यात जकात कर रद्द केला. पुढे त्याने व्यापाऱ्यांच्या मुक्कामासाठी ठिकठिकाणी जागेचे बांधकाम केले आणि प्रजेसाठी विहीरी खोदल्या. तसेच जनतेच्या भल्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मानगड न*रसं*हार – राजस्थानमधील जालियानवाला बाग

Next Post

करीम लालाने दाऊदला मुंबईच्या रस्त्यावर पळवून पळवून मारले होते

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

करीम लालाने दाऊदला मुंबईच्या रस्त्यावर पळवून पळवून मारले होते

कायम सत्तेत कसं राहायचं हे फक्त राम विलास पासवानांना जमलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.