The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाहजहानने पोरीच्या शॉपिंगसाठी चांदणी चौक वसवलाय

by द पोस्टमन टीम
20 August 2025
in भटकंती, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


स्त्रियांचा सगळ्यात आवडता छंद कुठला असे जर एखाद्याला विचारलं तर तो काय सांगेल? मला तरी असं वाटतं की खरेदी हेच नाव सर्वानुमते येईल.

पुण्यात तुळशीबाग आहे, मुंबईत फॅशन स्ट्रीट आहे, सुरतला तर मोठा कापडबाजार आहे. कुठलाही बाजार महिलांना भुरळ पडल्यावाचून रहात नाही. बाजारपेठांची संस्कृती फार जुनी आहे. यांची सुरुवात कशी झाली हे कोणालाच माहिती नाही.

असाच एक बाजार म्हणजे दिल्लीत असणारा चांदणी चौकातला बाजार. पण हा बाजार शहाजहानने केवळ त्याच्या मुलीला खरेदी करता यावी म्हणून तयार केला होता हे आपल्याला माहिती आहे का?

thepostman



त्या काळात वसवलेला हा बाजार आजही एवढा का प्रसिद्ध आहे? हा बाजार कसा चालू झाला? इथे काय काय मिळतं? याची आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती घेऊया.

चांदणी चौक हा बाजार मुघल काळापासून दिल्लीत आहे. हा चौक तेव्हापासून आहे जेव्हा दिल्लीत शहाजहानचे राज्य होते. आपल्या काळात शहाजहानने दिल्लीच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. बऱ्याच नवीन वास्तूंची निर्मिती केली त्यातीलच एक हा चांदणी चौकाचा बाजार.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

शहाजहानचा आपली मुलगी जहांआरावर खूप जीव होता. तिच्या आनंदासाठी शाहजहान कुठल्याही थराला जायला तयार असायचा. जहांआराला खरेदीची प्रचंड आवड होती. ती जिथे पण जायची तिथून नवीन गोष्टी खरेदी करून आणायचीच. शहाजहानला एक दिवस आपल्या मुलीची ही आवड कळली. तेव्हा शहाजहानने दिल्लीतच असा बाजार तयार करण्याचा निर्णय घेतला की जिथे जहांआराला सगळं काही एकाच जागेवर उपलब्ध होईल.

ज्या ठिकाणी जहांआराला सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळतील असा बाजार तयार करा असा शहाजहानने हुकूम सोडला त्यासाठी त्याने जगभरातून मोठमोठ्या व्यापाऱ्यांना दिल्लीला पाचारण केले. १६५० साली हा बाजार तयार करण्याचे काम चालू झाले. या बाजाराची रचना अत्यंत वेगळी करण्याचं ठरवण्यात आलं जेणेकरून या बाजाराचं नाव सर्वत्र पोहचेल.

मूळ चांदणी चौक सध्याच्या दिल्ली म्युनिसिपल टाऊनहॉलसमोर होता. बाजाराच्या मधोमध एक नाला होता, हा नाला यमुनेतून बाहेर काढण्यात आला होता, जो सध्या चांदणी चौक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरळ रस्त्याच्या मधोमध होता, नाला अतिशय अस्वच्छ झाल्याने ब्रिटिशांनी १८४० – १८६० च्या दरम्यान त्यात भराव टाकून तो बुजवला. नाल्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आणि रस्ता होता.   चौकोनी आकारात वसवलेल्या या बाजाराच्या मधोमध एक लहानसं तळं होतं, चांदणं पडलं की त्याचं प्रतिबिंब या तळ्यात पडायचं, हे दृश्य अतिशय मनमोहक असे, यावरूनच चौकाला चांदणी चौक हे नाव पडलं.

लाल किल्ल्याच्या लाहौरी दरवाज्यावरून दिसणारे चांदणी चौकाचे दृश्य

बाजार चालू झाला तसे इथे व्यापारी येऊ लागले. हा बाजार प्रचंड आकर्षक होता. सुरवातीला इथे फक्त लहान लहान व्यापारी होते पण हळूहळू मोठे व्यापारीसुद्धा या बाजारात आपले दुकान लावू लागले. सुरवातीच्या काळात इथे १५६० दुकाने होती. बाजार १२० फूट रुंद आणि सुमारे १ किलोमीटर लांबीचा होता.

पुढे चांदणी चौक हा दिल्लीतला नव्हे तर भारतातला एक प्रसिद्ध बाजार झाला. इथे लोकांची गर्दी वाढत गेली. जहांआरासाठी वसवलेल्या या बाजारात आता सामान्य लोकसुद्धा खरेदीसाठी यायला लागले होती. बरेच लोकं चांदणी चौकाच्या बाजाराकडे आकर्षित व्हायला लागले.

thepostman

असं म्हणतात की, इथे सुरवातीला चांदीचा व्यापार खुप जोरात चालत असे. पूर्ण देशभरातून चांदीचे व्यापारी या चौकात चांदी विक्री करण्यासाठी यायचे.

कित्येक लोकांना असंसुद्धा वाटायचं की इथे चांदीचा व्यापार केला जातो म्हणून या बाजाराला चांदणी चौकाचा बाजार असे म्हटले जात असावे.

दिवसेंदिवस इथे आता देशातीलच नाही तर विदेशातूनसुद्धा व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी येत होते. तुर्की, चीन, हॉलंड या देशातून कितीतरी व्यापारी इथे आले होते. त्या काळात दरीबा कला रस्ता हा खूप प्रसिद्ध होता. या बाजारात अत्तर, मोती, सोनं, चांदी अशा महागड्या वस्तू विकल्या जायच्या. खरेदीसाठी लोकं कित्येक मैलांवरून येत असत.

त्या काळात चांदणी चौकाच्या बाजाराला कुठलाही ग्राहक स्वर्ग समजायचा. या एकाच जागेवर ग्राहकाला त्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. हेच कारण आहे की चांदणी चौक जगप्रसिद्ध होता.

सुरुवातीला एकत्र असलेला हा बाजार नंतर उर्दू बाजार, जोहरी बाजार,अशरफी बाजार व फतेहपुरी बाजार अशा ४ बाजारात विभाजित करण्यात आला. हे चारही बाजार वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होते. सुमारे दीड किलोमीटर पसरलेल्या या बाजारात पंधरा हजारांपेक्षा जास्त दुकाने होती.

चांदणी चौकाचा बाजार हा तयार तर एका मुघल राजाने केला होता पण नंतर हा सर्वधर्मीयांसाठी आवडता बाजार बनला व इथे आज आपल्याला प्रत्येक धर्माची ओळख दिसते.

इथे असणारं दिगंबरलाल मंदिर असेल किंवा गौरी शंकर मंदिर असेल, आर्य समाजाच दिवाण सभागृह असेल किंवा मग सेंट्रल बाप्टीस्ट चर्च असेल, इथला शीश गंज साहिब गुरुद्वारा असेल किंवा फतेहपुरी मशीद असेल हे सगळे आपल्यासमोर सर्वधर्म समभावाचे उदाहरण आहेत. फक्त इतकंच नाही तर इथे सर्व धर्माचे व्यापारी सुद्धा राहत असायचे. इथे आपल्याला विविधतेत एकात्मता दिसेल.

आज चांदणी चौकतला बाजार बराच बदलला आहे. आधी केवळ चांदीसाठी ओळखणारा बाजार आता सगळ्याच गोष्टींचा होलसेल मार्केट बनला आहे. जुन्या बाजाराची जागा आता नव्या बाजाराने घेतली आहे. इथला चांदणी चौक चोर बाजार सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. अस म्हणतात की इथे चोरीचं बरच सामान विकलं जातं.

१७ व्या शतकापासून आज सुद्धा चांदणी चौकाचा बाजार हा महिलांचा सगळ्यात आवडता बाजार म्हणून टिकून आहे. त्याच कारण म्हणजे इथे महिलांच्या खरेदीसाठी असणारी दुकाने पाहून आपण चक्रावून जाताल.

thepostman

आपला देश हा जगभरात मसाल्यांकरिता प्रसिद्ध देश म्हणून ओळखला जातो. त्याच प्रमाणे खारी बावली हे सुद्धा प्रसिद्ध मसाल्याचं मार्केट म्हणून ओळखलं जात. इथे एवढ्या प्रकारचे मसाले मिळतात की तुम्ही फक्त नाव घ्या, मसाला हजर असेल. हेच कारण आहे की सतराव्या शतकानंतर आजसुद्धा हे मसाल्याचं प्रसिद्ध मार्केट म्हणून ओळखलं जातं.

या सगळ्या बाजारांसोबत इथे किनारी बाजार, मोती बाजार आणि मीना बाजार सारख्या सुद्धा काही जागा आहेत ज्या सुद्धा बऱ्याच प्रसिद्ध आहेत. या बाजारांत असणाऱ्या वातावरणामुळेच आपल्याला असा बाजार दुसरीकडे कुठे पहायला मिळत नाही.

तर आपल्या सुरवातीपासूनच प्रसिद्ध असलेला हा चांदणी चौकाचा बाजार आजही तितकाच प्रसिद्ध आहे आज सुद्धा या बाजारात एवढी गर्दी असते की पाय ठेवायला सुद्धा जागा मिळत नाही. भारतात खूप बाजार आहेत पण चांदणी चौकाच्या बाजाराची गोष्टच काही वेगळी आहे. दिल्लीत गेल्यावर केवळ देशातीलच नाही तर परदेशातील नागरिक सुद्धा चांदणी चौकाच्या बाजाराला भेट देतात. जर तुम्ही कधी दिल्लीला गेलात तर या बाजाराला नक्की भेट द्या व खरेदीचा आनंद घ्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: chandni chowk delhi
ShareTweet
Previous Post

या मंदिराचा महंत आज उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री आहे..!

Next Post

हि*टल*रने पाहिलेल्या स्वप्नामुळे फॉक्सवॅगेनची निर्मिती झाली होती.

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

हि*टल*रने पाहिलेल्या स्वप्नामुळे फॉक्सवॅगेनची निर्मिती झाली होती.

मोरारजींनी आठ राज्यातील कॉंग्रेस सरकारं एका रात्रीतून बरखास्त केली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.