The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेच्या CIAने एक सिक्रेट ‘हार्ट अटॅक ग*न’ बनवली होती…!

by द पोस्टमन टीम
6 January 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘राझी’ या चित्रपटामध्ये एक सीन आहे. आपल्या नवऱ्याच्या भावाला जेव्हा आपण हेर असल्याचा संशय येतो, तेव्हा ‘सेहमत’ची भूमिका साकारणारी आलिया भट त्याला अतिशय हुशारीनं आपल्या रस्त्यातून कायमचं बाजूला करते. आपल्या शत्रूचा काटा काढण्यासाठी आलिया एका छत्रीचा वापर करते. या छत्रीत लपवलेल्या विषाच्या मदतीनं सेहमत आपल्या शत्रूला अगदी बिनबोभाटपणे मारते आणि तिच्यावरती कुणाला संशयदेखील येत नाही. हा सीन अजिबात अतिशयोक्ती नाही. चित्रपटात आलियानं वापरलेली छत्री ‘बल्गेरियन अम्ब्रेला’ या नावानं प्रसिद्ध आहे.

शीतयु*द्धाच्या काळात अशी अनेक छुपी श*स्त्रास्त्रे तयार करण्यात आली होती, जी अतिशय शांतपणे एखाद्याचा जीवही घेऊ शकत होती. शीतयु*द्धाचा विषय निघाला आणि त्यात सीआयएचं नाव आलं नाही, असं होणार नाही. सीआयएनं आपल्या मार्गात येणाऱ्या लोकांना मात देण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या शोधून काढल्या होत्या.

त्यातीलच एक गोष्ट म्हणजे, ‘हार्ट ॲटॅक ग*न’. ही ग*न वापरून मारलेल्या व्यक्तीच्या अटॉप्सी रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण हार्ट ॲटॅक डिटेक्ट होत असे. याचाच अर्थ नियोजितपणे केलेला खून एक नैसर्गिक मृत्यू म्हणून समोर येत असे. ही ‘हार्ट ॲटॅक ग*न’ नेमका काय प्रकार होता? तिची निर्मिती कशी झाली? या प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख..

दुसऱ्या महायु*द्धात रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या सहकार्यानं लढले. महायु*द्ध संपल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात मोठी दरी पडली अन् प्रदीर्घ काळ चाललेल्या शीतयुद्धाला सुरुवात झाली. शीतयु*द्धामध्ये मुत्सद्दीपणाचा वापर झाल्याचं वरकरणी दिसत असलं तरी वस्तुस्थिती मात्र भयानक होती. शीतयु*द्धाच्या काळामध्ये अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआयए आणि रशियन गुप्तहेर संघटना केजीबी हे दोन मेजर प्लेयर्स होते.

या दोन्ही संस्थांनी शीतयु*द्धाच्या ‘बॅकस्टेज’ला अनेक अकल्पनीय इव्हेंटला मूर्तरूप दिलं होतं. सीआयनं तयार केलेली हार्ट ॲटॅक ग*न यापैकीचं एक गोष्ट होती. वरकरणी एखाद्या खेळण्यासारखी दिसणारी ही ग*न एखाद्याला भयानक मृत्यू देऊ शकते याची कुणी कल्पनाही केली नव्हती.



१९७०च्या दशकात, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन सीआयएच्या माध्यमातून आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचं अनेक सिनेटर्सला वाटत होतं. सीआयएमुळं अमेरिकन काँग्रेसला काळजी वाटू लागली होती. १९७४ च्या वॉटरगेट घोटाळ्यामुळं ही चिंता आणखी वाढली. महाभियोगाला सामोरं जाण्याऐवजी निक्सननं राजीनामा दिला.

त्यानंतर १९७५ मध्ये सीआयएचीदेखील चौकशी झाली. त्या चौकशीतील अनेक गोष्टी आज इतक्या वर्षांनंतरही उघड झालेल्या नाहीत. मात्र, सीआयएच्या माजी कर्मचारी असलेल्या मेरी एम्बरी हिने एक स्टेटमेंट दिलं होतं. तिला असं विष तयार करण्यास सांगितलं हो ट्रेस करता येणार नाही आणि हे विष दिल्यानंतर त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटेल. या ग*नच्या मदतीनं सीआयए आपल्या टारगेट्सला लक्ष करणार होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सीआयएला एका अशा शस्त्राची गरज होती जीचा वापर करून बिनबोभाट आपल्या ब्लॅकलिस्ट टारगेट्सला उडवता येईल. कारण, सीआयएनं एखादं मोठं पाऊल उचललं असते तर मीडियानं तिला नक्कीच टारगेट केलं असतं आणि जागतिक पातळीवर अमेरिकेची नाचक्की झाली असती.

१९५९ ते १९७६ या कालावधीत क्युबाचे पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो हे सीआयएचं प्रमुख टारगेट होते. स्नायपर्सच्या मदतीनं टारगेट्सला उडवणं सोपा पर्याय होता मात्र, त्यामुळं एजंट्च्या जीवाला धोका निर्माण झाला असता. कारण, बंदुकीतून निघालेल्या प्रत्येक गोळीचा माग काढता येतो.

सीआयएची गरज लक्षात घेता मेरी एम्बरे आणि टीमनं एक अशी ग*न तयार केली ज्यामुळं मृत्यूचं कारण फक्त हार्ट ॲटॅक असल्याचं डिटेक्ट होईल. हार्ट ॲटॅक ग*नमध्ये एका विशिष्ट प्रकारचं विष लहान डार्टमध्ये गोठवलं गेलं होतं. ही डार्ट सामान्य बंदुकीतूनही सहज उडवली जाऊ शकत होती. एकदा का ही गोळी माणसाला लागली की ती त्यांच्या शरीरात विरघळून जात असे. त्यानंतर काही क्षणातचं त्या व्यक्तीचा हार्टॲटॅक आल्यासारख्या वेदना होऊन मृत्यू होत असे. या ग*ननं मृत्यू झालेल्या व्यक्तीची कितीही वेळा अटॉप्सी केली तरीही शरीरातील विष ट्रेस करता येत नसे.

जेव्हा १९७५ मध्ये सीआयएची सलग नऊ महिने चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यात हार्ट ॲटॅक ग*नबाबतची काही माहिती तपास करणाऱ्या चर्च कमिशनच्या हाती लागली. चर्च कमिशनच्या हाती सर्वात धक्कादायक माहिती लागली होती. असं म्हटलं जातं की, सीआयएनं अनेक परदेशी नेत्यांना मारण्याच्या योजना तयार केल्या होत्या. सीआयएच्या हिटलिस्टमध्ये फिडेल कॅस्ट्रो हे एकमेव नाव नव्हतं तर काँगोचे पॅट्रिस लुमुंबा, डोमिनिकन रिपब्लिकचे राफेल ट्रुजिलो, व्हिएतनामचे एनगो डिन्ह डायम आणि चिलीचे जनरल रेने श्नाइडर हे देखील या लिस्टमध्ये होते.

चौकशीनंतर काही वर्षे उलटल्यानंतर एक व्हिडिओ फुटेज समोर आलं. त्यामध्ये असं दिसत आहे की, सीआयएचे तत्कालीन संचालक विल्यम कोल्बी डार्टचा वापर करणारी एक बंदूक दाखवत आहेत. हे एक विशेष डार्ट आहे. त्यानं जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला तर शवविच्छेदनात विष दिसून येणार नाही असंही ते सांगत आहेत. याचा अर्थ सीआयएकडं खरोखरचं हार्ट ॲटॅक ग*न होती. तिचा वापर कुठे आणि कसा झाला, याबाबत माहिती उघड झालेली नाही. पण, सीआयएच्या कामाची पद्धत पाहता, त्यांनी या ग*नचा वापर केला असणार हे नक्की.

सीआयएप्रमाणेच सोव्हिएत युनियनची केजीबी ही गुप्तहेर संघटनादेखील घातक योजना आखण्यात आघाडीवर होती. १९५७च्या सुरुवातीला केजीबी आपल्या एजंट्सला स्प्रे ग*न वापरण्याचं प्रशिक्षण देत होती. या स्प्रे ग*नमध्ये विषारी सायनाइड गॅस होता. असं सांगितलं जातं की, टारगेटवर या ग*नमधून गॅस फवारला की त्याचा मृत्यू होत असे. अटॉप्सीमध्ये मात्र, मृत्यूचं कारण हार्ट ॲटॅक दिसत असे.

या गनच्या मदतीनं दोन युक्रेनियन नेत्यांचा खू*नदेखील करण्यात होता, असं म्हटलं जातं. मात्र, केजीबीची प्रतिस्पर्धी असलेल्या सीआयएनं ही गोष्ट खोटी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी सीआयए स्वत: अशीच एक हार्ट ॲटॅक ग*न वापरत असल्याचं समोर आलं. १९७५ मधील सीआयच्या चौकशीनंतर पुढे या गनचं काय झालं हा संशोधनाचा विषय आहे. जर ती गन अजूनही अस्तित्वात असेल तर सीआयएचा तिचा कुठे आणि कसा वापर करत आहे? हे प्रश्न नक्कीच मनात येतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जगभरात वाढणारी बालगुन्हेगारांची संख्या आपल्या चिंतेचा विषय बनलीय..!

Next Post

कोरोना झाला, डेल्टा झाला, ओमायक्रॉन झाला आता आलाय आयएचयु!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

कोरोना झाला, डेल्टा झाला, ओमायक्रॉन झाला आता आलाय आयएचयु!

'मी मुघलांची सून, लाल किल्ला आणि ताजमहाल माझ्या नावावर करा' म्हणून ही बाई कोर्टात गेलीये

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.