The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेल्जीयमचं २०० टन सोनं दुसऱ्या महायु*द्धात सगळ्या जगाची सफर करून आलं होतं..!

by Heramb
20 January 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


यु*द्ध म्हटलं की लुटपाट, जाळपोळ, अत्या*चार या गोष्टी आल्याच. सात दशकांपूर्वी झालेल्या भीषण महायु*द्धाने तर जगामध्ये प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली. अशावेळी ना*झी आक्र*मकांच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या देशांनी आपली संपत्ती वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामध्ये बेल्जीयम आघाडीवर होतं.

गोष्ट आहे एप्रिल १९४५ ची. जर्मनीतील मर्कर्स येथील एका दुर्गम मीठाच्या खाणीत अमेरिकन सैनिकांनी ना*झी एसएस गार्ड्सच्या मदतीने एक गुहा उघडली. याठिकाणी अमेरिकन सैनिकांना ना*झी लूटीचा सर्वात मोठा संचय सापडला. त्या गुहेत “१९३२” असं कोरलेल्या सोन्याच्या विटांचा मोठा ढीग होता. म्हणजेच सोन्याच्या या विटा यु*द्ध सुरु होण्यापूर्वीच याठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या असं कोणालाही वाटेल. पण ते खरं नाही.

सोन्याच्या विटा त्या गुहेत पोहोचण्यामागे अनेक घटना आहेत. सोन्याच्या विटांनी आधी बेल्जियम ते फ्रान्स मग फ्रान्स ते पूर्व आफ्रिका असा प्रवास केला. मग दक्षिण आफ्रिकेत ५०० किलोमीटर आणि नंतर उत्तर आफ्रिकेपर्यंत. शेवटी पुन्हा त्या विटा उत्तर आफ्रिका ते फ्रान्स आणि स्वित्झर्लंड किंवा जर्मनीमध्ये स्थलांतरित करण्यात आल्या. हा लपंडाव नेमका कशासाठी, जाणून घेऊया या लेखातून..

आजही सोन्याच्या प्रचंड किमतीमुळे त्याला एक उत्तम गुंतवणूक मानलं जातं. जगभरात कुठेही सोनं विकून आपल्याला स्थानिक चलनामध्ये रोख रक्कम मिळू शकते. त्यामुळे कोणत्याही देशाकडे सोन्याचा किती साठा आहे हा त्यांच्या आर्थिक ताकदीचा मापदंड ठरतो. सोन्याप्रमाणेच परकीय चलन साठा किंवा फॉरेन एक्सचेंज रिजर्वसुद्धा देशाच्या आर्थिक ताकदीचा मापदंड आहे. पण दुसऱ्या महायु*द्धाच्या वेळी परिस्थिती वेगळी होती.



सोने हाच रोख रकमेचा आधार आहे असे काही अर्थतज्ञ आणि गुंतवणूकदार मानतात. त्यांच्यामते, देशाकडे सोन्याचा मोठा साठा असेल तरच देशाच्या वित्तीय चलनाचे मूल्य जास्त असू शकते. पहिल्या महायु*द्धापूर्वी, संपूर्ण जगात चलन म्हणून मान्यता किंवा ‘स्टँडर्डाइज्ड’ असलेलं सोनं हाच एकमेव धातू होता.

पण यादरम्यान अमेरिकेने गोल्ड स्टँडर्ड्स रद्द केल्याने जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत थोडीफार घसरली होती. दुसऱ्या महायु*द्धादरम्यान जागतिकीकरण आणि त्यातही जागतिक व्यापार ठप्प होते. पण देशाकडे असलेला सोन्याचा साठा बहुमूल्य होता. अशा परिस्थितीत कोणत्याही युरोपीय देशाने यु*द्धादरम्यान आपल्याकडील सोन्याचे साठे गमावले तर ते आर्थिकदृष्ट्या दुबळे होणार, परिणामी, त्यांना यु*द्धातदेखील सहभागी होता येणार नाही.

यु*द्धादरम्यान सोनं अत्यावश्यक असतं, कारण सरकारे शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी आणि सैनिकांना पगार देण्यासाठी सोन्याचाच वापर करतात. दुसरे महायु*द्ध सुरू झाले तेव्हा कुठूनही प्रचंड प्रमाणात सोनं मिळवणं हे मित्र आणि अक्ष या दोन्ही बाजूंचे प्रमुख ध्येय होते. महायु*द्धाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनी प्रचंड शक्तिशाली होतं.

जर्मन सैन्याने युरोपमधील एकामागून एका देशावर वर्चस्व प्रस्थापित केले. ना*झींनी ज्या देशांवर वर्चस्व मिळवले, त्या देशांना आपले सोन्याचे साठे ना*झी जर्मनीला देऊन टाकणे अनिवार्य करण्यात आले होते. सोन्याचे हे साठे बर्लिनमधील रिच बँकेत पाठवण्यात येत असत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ना*झींनी हॉलोकॉस्टमधील पीडितांचे सोने मोठ्या प्रमाणात लुटले. ना*झींच्या संपूर्ण संपत्तीत हॉलोकॉस्टमध्ये लुटलेले सोने सर्वांत जास्त आहे. घड्याळ, कटलरी यासारख्या होलोकॉस्ट पीडितांच्या वैयक्तिक वस्तूंनादेखील बर्लिनमधील दुकानात सोने किंवा रोख रकमेत रूपांतरित केले. असे ना*झी सैन्य आता युरोपमधील अन्य देशांवर आक्र*मण करीत होते.

ना*झी जर्मनीने पोलंडवर आक्र*मण केल्यामुळे, बेल्जियम आणि हॉलंडमधील बँकर्सनी पुढील धोका ओळखला आणि बेल्जीयम सरकारला याबद्दल कल्पना दिली. बेल्जियम सरकारने आपले एक तृतीयांश सोने ब्रिटनमध्ये पाठवले. तसेच एक तृतीयांश फ्रान्सला आणि उर्वरित सोने आपल्याच देशात ठेवले. ४९४४ पेटाऱ्यांमधील १९८ टन सोने फ्रान्सला हलवण्यात आले. जर्मनीने फ्रान्सवर आक्र*मण केले तेव्हा बेल्जियमने ते सोने अमेरिकेला पाठवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे, ‘ए-४’ नावाचे सोन्याच्या विटांनी भरलेले जहाज १८ जून १९४० रोजी  अमेरिकेला रवाना झाले.

दुर्दैवाने, अतिशय वाईट हवामानामुळे हे जहाज पूर्व आफ्रिकेतील डकार शहराकडे वळाले. डकार शहर ही एक फ्रेंच कॉलनी होती. त्यानंतर फ्रेंचांनी हे सोने डाकारपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘थीस’ येथे हलवले. बेल्जियम सरकारने या गोष्टीचा निषेध नोंदवला. पुढे फ्रान्सच्या पराभवानंतर, बेल्जियमचे हे सोने ‘विची फ्रान्स’ या जर्मनीला सहकार्य करणाऱ्या देशाकडे आले. जर्मनीने विची फ्रान्सला बेल्जियमचे सोने ब्रिटीशांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे सोने ५०० किलोमीटर अंतरावर कायेस शहरात हलवण्यात आले. यु*द्ध जसजसे वाढत गेले तसतसे जर्मनीने फ्रान्सला बेल्जियमचे सगळे सोने देण्यास भाग पाडले.

याशिवाय फ्रान्सच्या पंतप्रधानांनीसुद्धा सैन्याधिकाऱ्यांवर बेल्जीयममधून आलेले सोने देऊन टाकण्यासाठी दबाव आणला. विची फ्रान्सने उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्याद्वारे लहान लहान सेगमेंट्समध्ये सोन्याच्या वाहतूकीची व्यवस्था केली. हे सोने रेल्वेद्वारे समुद्रकिनारी असलेल्या शहरांत पाठवले जाणार होते. समुद्रकिनाऱ्यावरील शहरांमधून हे सोने पुढे विमान आणि जहाजांद्वारे मार्सेलीस येथे पाठवले जात होते. सोन्याची एक शिपमेंट फ्रान्सला पोहोचण्यासाठी सुमारे ३० दिवस लागत होते.

फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर बेल्जियमचे सोने हि*टल*रचा सेकंड इन-कमांड हर्मन गोरिंगपर्यंत पोहोचवले जात असत. तो प्रशिया राज्याच्या मिंट (टांकसाळीचा) प्रभारी अध्यक्ष होता. या टांकसाळीमध्ये सोने वितळवले गेले, त्या सोन्याच्या नवीन विटा तयार केल्या गेल्या आणि “१९३२” हे त्यावर नव्याने कोरले गेले, त्यामुळे हे सोने महायु*ध्दापूर्वीच्या काळातले दिसणार होते. मात्र हर्मन गोरिंगने या सोन्याच्या बदल्यात ‘रिचमार्क्स’मध्ये परतावा देण्याचे मान्य केले, पण बेल्जीयम सरकारने ते नाकारले. ‘रिचमार्क्स’ हे ना*झी चलन आहे.

स्विस बँकांनी ना*झी जर्मनीला सोन्याचे स्विस फ्रँक्समध्ये रूपांतर करण्यास मदत केली. यु*द्धामध्ये मदत मिळवण्यासाठी, आणि विशेषतः टंगस्टनसाठी जर्मनीने स्पेन आणि पोर्तुगालसारख्या तटस्थ देशांना ‘स्विस फ्रँक्स’मध्ये पैसे दिले. असे असले तरी स्विस बॅंक्स ना*झी जर्मनीशी असलेला त्यांचा संबंध नाकारतात आणि ते सोनं कुठून आलं हे माहिती नसल्याचा दावा करतात.

यु*द्ध संपल्यानंतर, ना*झींनी लुटलेल्या सोन्याचा शोध सुरू झाला. त्यांनी लुटलेले बरेच सोने अमेरिकेने परत मिळवले. चोरीला गेलेले सोने त्या त्या देशांना देण्यासाठी, एक त्रिपक्षीय आयोग स्थापन झाला. बेल्जियमने फ्रान्सच्या नॅशनल बँकेकडे सोने परत मिळावे यासाठी दाद मागितली. बेल्जियमने फ्रान्सला दिलेल्या १९८ टन सोन्यांपैकी त्यांना १३० टन सोने मिळाले.

एका देशाचे सोने दुसऱ्या देशात जमा करणे असे आजही केले जाते. जर्मनी आणि व्हेनेझुएलासारखे देश बहुतेक सोन्याचा साठा इतर देशांमध्ये ठेवतात. एका देशाची संपत्ती दुसऱ्या देशात ठेवण्याच्या ‘आंतरराष्ट्रीय’ विश्वासाचा आदर केला पाहिजे आणि आजमितीस ती संपत्ती सुरक्षित आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भल्या मोठ्या लढाऊ विमानांना सहज हुलकावणी देऊन ह*ल्ला करणारे ‘नॅटस्’ आणि ‘मॉस्किटोज्’!

Next Post

आणि त्यादिवशी जपानने अमेरिकन आणि फिलिपिन्सच्या सैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आणि त्यादिवशी जपानने अमेरिकन आणि फिलिपिन्सच्या सैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडला

ना कुठे नोंदणी ना कुठे मुख्यालय, तरीही बायनान्स जगातील सर्वांत मोठं क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज बनलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.