The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भल्या मोठ्या लढाऊ विमानांना सहज हुलकावणी देऊन ह*ल्ला करणारे ‘नॅटस्’ आणि ‘मॉस्किटोज्’!

by Heramb
18 January 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गेल्या वर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आणि पाकिस्तानच्या शरणागतीचा सुवर्ण महोत्सवसुद्धा साजरा झाला. १९७१ च्या यु*द्धात भारतीय भूदलाने उल्लेखनीय कामगिरी केली, त्याचप्रमाणे भारतीय वायुसेनेनेसुद्धा उत्कृष्ट कामगिरी करून पाकिस्तानला अमेरिकेचा पाठिंबा असूनही विजय खेचून आणला.

मिग-२९ विमानांचाच या विजयामध्ये सर्वांत मोठा वाटा असे तुम्हाला कदाचित वाटत असेल.  मिग-२९ विमानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीच, पण मिग-२९ लढाऊ विमानांच्या जोडीला होती ‘नॅट’ ही लढाऊ विमानं. ‘नॅट’ म्हणजेच ‘चिलट’. नावाप्रमाणेच ही लढाऊ विमाने तुलनेने लहान आकाराची आणि वजनाने हलकी होती. पण पाकिस्तानी वायुदलाच्या अत्याधुनिक ‘कॅनडायर सेबर जेट्स’सुद्धा या लहानशा लढाऊ विमानांपुढे टिकू शकले नाहीत.

१९७१ सालची ‘नॅट’ विमानांद्वारे लढली गेलेली लढाई म्हणजे ‘बोयराची लढाई’. याठिकाणी तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानवर सर्वप्रथम हवाई लढाई झाली होती. या लढाईत भारतीय वायुसेनेच्या ‘नॅट’ने पाकिस्तानी वायुदलाच्या दोन अत्याधुनिक ‘कॅनडायर सेबर जेट्स’ना उ*ध्वस्त केले आणि एकाचे मोठे नुकसान केले.

लढाईदरम्यान एक ‘नॅट’ पडला असा दावा पाकिस्तानच्या हवाई दलाने केला. पण नेहमीप्रमाणे त्यांच्या पोकळ वक्तव्याला तर्काचा किंवा पुराव्याचा आधार नव्हता. त्यावेळी ‘नॅट’च्या गन्सवर लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये एकही नॅट पडताना दिसला नाही. याआधी १९६५ सालीही ‘नॅट’ विमानांनी पाकिस्तानी वायुदलाच्या सात ‘कॅनडायर सेबर जेट्स’ना उ*ध्वस्त केले होते.



आकाशातील यु*द्धक्षेत्रात हलके वजन आणि लहान आकारामुळे नॅट विमान सर्वोत्तम ठरते. लहान आकारामुळे ते रडारवर सहजासहजी दिसू शकत नव्हते आणि कमी उंचीवर विरुद्ध दिशेच्या पायलट्सनाही ते लवकर दिसू शकत नव्हते. अगदी जवळ आल्यावरच त्या नॅटचा पत्ता लागत असे, पण तोवर फार उशीर झालेला असतो.

कारण मोठे वजन असलेले आणि नॅटपेक्षा कमी वेगवान असलेले सेबर जेट त्या दिशेने हलवून पुन्हा नॅटवर ह*ल्ला करणे हे अवघड असते. त्यामुळे भारतीय वायुसेनेने या विमानाला ‘सेबर स्लेयर’ असे नाव दिले होते. म्हणजेच सेबर जेट्सचे नाश करणारे.

रॉयल एअरफोर्सची समस्या:

अशाच प्रकारचे विमान दुसऱ्या महायु*द्धादरम्यान रॉयल एअरफोर्सनेसुद्धा वापरले होते. त्याचे नाव होते मॉस्किटो. मॉस्किटोचे वजन कमी ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी लाकडापासून मॉस्किटोची निर्मिती केली होती. दुसरे महायु*द्ध शिगेला पोहोचले होते आणि ब्रिटनची लढाई आता युरोपच्या आकाशातही होणार होती. जर्मन वायुसेनेने ब्रिटिशांच्या हवाई हद्दीवर वर्चस्व स्थापन केल्याने ते वेळोवेळी ब्रिटनच्या प्रमुख शहरांवर आक्र*मणे करीत होते. या हवाई हल्ल्यांतून वाचण्यासाठी ब्रिटनने ‘स्टारफिश साईट्स’ नावाची भन्नाट कल्पना अंमलात आणली होती.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

हवाई हद्द असुरक्षित असल्याने दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिश हवाई दलाचे अपयश सातत्याने समोर येत होते. पण मधल्या काळात, रॉयल एअर फोर्सला जर्मन वायुसेनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जर्मनी, इटली तसेच जर्मन-व्याप्त क्षेत्रांवर ह*ल्ला करण्यासाठी तात्पुरता उपाय करणे आवश्यक होते. त्यासाठी अतिशय हलक्या विमानाची आवश्यकता होती, पण त्याचबरोबर ते स्वस्तदेखील असायला हवे होते. हे सगळे निकष पूर्ण करून अखेर ब्रिटनने ‘मॉस्किटो’ नावाचे लढाऊ विमान तयार केले.

दुसरे महायु*द्ध सुरू झाले तेव्हा ‘रॉयल एअर फोर्स’ जर्मन हवाई दलापेक्षा खूप पिछाडीवर होते. ना*झी सरकारने वायुसेनेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते. ना*झी पक्षाच्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक हर्मन गोरिंग हे जर्मन हवाई दलाचे प्रमुख होते. गोरिंगला हवाई यु*द्धाचा प्रचंड अनुभव होता. त्याने पहिल्या महायु*द्धातील अनेक मोहिमांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याने त्याला जर्मन हवाई दलाच्या प्रमुखाचे पद बहाल करण्यात आले.

पहिल्या महायु*द्धात त्याने ‘फ्लाइंग सर्कस स्क्वॉड्रन’मध्ये ‘रेड बेरोन’ या विमानाचे उड्डयण केले होते. याशिवाय लुफ्तवाफेच्या विकासावरही मोठ्या प्रमाणात भर दिला गेला. जर्मनीतील जंकर्स, टेलिफंकन इत्यादी खाजगी कंपन्यांना लुफ्तवाफेसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून प्रोत्साहन मिळाले.

इकडे यु*द्ध सुरू होईपर्यंत रॉयल एअरफोर्सकडे निधीची कमतरता होती. रॉयल एअरफोर्सला स्पिटफायर्स आणि हरिकेन्ससारख्या लढाऊ विमानांमुळे लुफ्तवाफेवर नियंत्रण मिळवण्यात अंशतः यश आले. परंतु स्पिटफायर्स आणि हरिकेन्सचे उत्पादन मंद गतीने होत होते. पुरेशी आधुनिक विमाने मिळेपर्यंत रॉयल एअरफोर्सच्या कमांडर्सनी तात्पुरता उपाय शोधून काढला.

‘मॉस्किटोचा’ जन्म

रॉयल एअरफोर्सशी निगडित काही फर्निचर मॅन्युफॅक्चरर्सनी एकत्र येऊन लाकडाचे विमान तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला. मॉस्किटोच्या रचनेत शस्त्रास्त्रांच्या माऱ्यापासून रक्षण करू शकण्याची क्षमता तुलनेने कमी होती. कारण ते लोह किंवा पोलादाने तयार झालेले नसून लाकडाचे तयार केले होते. पण कमी वजनाचे असल्याने त्यांनी ही कमतरतासुद्धा भरून काढली. शिवाय मॉस्किटो कोणत्याही जर्मन फायटरपेक्षा वेगवान आणि अधिक हालचाल करता येईल असा होता.

विशेष म्हणजे मॉस्किटो फायटर हा बॉ*म्बसुद्धा वाहून नेऊ शकत होता. त्यामुळे मॉस्किटोची ताकद वाढली आणि लढाऊ विमानाबरोबरच तो एक बॉ*म्बर म्हणूनही ओळखला जाऊ लागला. ‘मॉस्किटो’च्या उत्पादनाची प्रक्रिया सोपी असल्याने मॉस्किटोचे मोठ्या प्रमाणात आणि वेगवान उत्पादन करणे शक्य होते. नॅटप्रमाणेच आकाराने लहान आणि हलके असल्याने जर्मन हवाई क्षेत्रात कमी उंचीवर आणि जर्मन रडारांना हुलकावणी देऊन उड्डाण करण्यासाठी मॉस्किटो सक्षम होते.

मॉस्किटोजचा वापर करून ब्रिटिश एअरफोर्स रात्रीच्या वेळी जर्मन एअरफिल्ड्सवर ह*ल्ला करीत असत. ते वेगवान आणि कमी उंचीवर उड्डाण करणारे असल्याने त्यांनी जर्मन हवाई दलाच्या मनात जबरदस्त द*हश*त निर्माण केली. रॉयल एअरफोर्सच्या सर्वांत वाईट वेळी मॉस्किटोसारखे लहानसे लढाऊ विमान रॉयल एअरफोर्ससाठी धावून आले. 

बर्लिन रेडिओ स्टेशनवर ह*ल्ला

ना*झी प्रचार मंत्रालयाने ३० जानेवारी, १९४३ रोजी बर्लिन रेडिओ स्टेशनवरून ‘हर्मन गोरिंग’चे भाषण संपूर्ण जर्मनीमध्ये प्रसारित केले. यामध्ये व्यत्यय आणण्यासाठी आणि गोरिंगचा अपमान व्हावा यासाठी रॉयल एअरफोर्सच्या कमांडर्सनी रेडिओ स्टेशनवर ह*ल्ला करण्याची योजना आखली.

कार्यक्रम प्रसारित होत असतानाच, रॉयल एअरफोर्सच्या मॉस्किटोजने रेडिओ स्टेशनच्या परिसरात बॉ*म्बिंग केले. प्रसारणादरम्यान बॉ*म्बचा स्फो*ट झाल्याचे प्रेक्षकांनी स्पष्टपणे ऐकले. त्यामुळे ना*झी प्रचारकांनी हर्मन गोरिंगचे भाषण रद्द केले.

मॉस्किटोज लढाऊ विमानांनी केलेला ह*ल्ला ना*झी पक्षासाठी एक मोठा पेच बनला. कारण त्यात हजार वर्षाच्या रीचचे कॅपिटल शत्रूच्या हवाई ह*ल्ल्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले. बर्लिनवर बॉ*म्बिंग करून, युरोपचे हवाई क्षेत्र अक्ष राष्ट्रांच्या नव्हे तर मित्र राष्ट्रांच्या ताब्यात आहे हे रॉयल एअरफोर्सने सिद्ध केले. 

एमियन्स तुरुंगावर ह*ल्ला:

गेस्टापोने (जर्मनीचे गुप्त पोलीस खाते) काही फ्रेंच कैद्यांना फ्रान्समधील एमियन्स तुरुंगात ठेवले होते. १८ फेब्रुवारी १९४४ ही तारीख म्हणून काही त्या सैनिकांना फाशी देण्यासाठी निर्धारित करण्यात आली होती. रॉयल एअरफोर्सच्या कमांडर्सनी कैद्यांना मुक्त करण्यासाठी आणि गेस्टापोचा अपमान करण्यासाठी तुरुंगावर बॉ*म्बिंग करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी तब्बल १२ मॉस्किटो विमानांनी लंडनहून उड्डाण केले आणि अपेक्षेप्रमाणे हे मिशनसुद्धा यशस्वी झाले. अनेक फ्रेंच सैनिक तुरुंगातून पळून गेले. जून १९४४ मध्ये डी-डे लँडिंग दरम्यान जर्मन सैन्याला फसवण्यातही यातील काही फ्रेंच सैनिकांनी मदत केली.

डचांना मदत:

गेस्टापोने काही डच सैनिकांच्या नोंदी आरहस येथील कार्यालयात ठेवल्या होत्या. रॉयल एअरफोर्सची कामगिरी पाहून डच चळवळीने आरहस येथील एका सरकारी इमारतीवर बॉ*म्बिंग करण्याची विनंती रॉयल एअरफोर्सला केली. त्याप्रमाणे मॉस्किटो विमानांच्या तुकडीने  ३१ ऑक्टोबर १९४४ रोजी ब्रिटनहून उड्डाण केले, पण त्यांनी चुकून जवळच्या शाळेवर बॉ*म्बिंग केले.

मॉस्किटो विमानांच्या दुसऱ्या वेव्हने मात्र प्रिसिशन बॉ*म्बिंग करून डच सैनिकांच्या नोंदी असलेली इमारत उ*ध्वस्त केली. हे मिशनसुद्धा यशस्वी झाले. डच शाळेवर झालेल्या अपघाती बॉ*म्बस्फो*टामुळे मात्र रॉयल एअरफोर्सच्या आतापर्यंतच्या विजयी कारकिर्दीवर काळिमा फासली.

मार्गदर्शक विमाने:

अद्याप जीपीएसचे संशोधन झाले नव्हते. त्यामुळे एखाद्या शहरावर ह*ल्ला करायचा असल्यास आधी एक विमानांची तुकडी पुढे पाठवली जात असत आणि ती तुकडी जिथे ह*ल्ला करायचा आहे अशा ठिकाणी काही मार्कर्स सोडत असे, जेणेकरून मागून येणाऱ्या विमानांना कुठे बॉ*म्बिंग करायचं हे कळेल. मॉस्किटोजचा सर्वांत लक्षणीय वापर म्हणजे पाथफाईंडर्स किंवा मार्गदर्शक विमाने. जेव्हा आरएएफ कमांडर्स बॉ*म्बिंग करण्यासाठी एखाद्या जर्मन शहराची निवड करीत असत तेव्हा मॉस्किटोजना त्या शहराच्या मार्गावर मार्कर्स सोडण्यासाठी पाठवले जात असत. 

मग विमानांच्या दुसऱ्या लाटेत असणारी रॉयल एअरफोर्स, रॉयल कॅनेडियन एअर फोर्स आणि यूएस आर्मी एअर फोर्स बॉ*म्बर्स त्या मार्कर्सचे अनुसरण करून शहरावर प्रिसिशन बॉ*म्बिंग करत असत. या रणनीतीमुळे मित्र राष्ट्रांच्या बॉ*म्बह*ल्ल्यांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली. ब्रिटनच्या लढाईत मॉस्किटोजनी जर्मन हवाई दलाविरूद्ध मोठ्या प्रमाणात ब्रिटिश हवाई हद्दीचे संरक्षण केले.

मॉस्किटोजना निरोप:

मॉस्किटोजनी रॉयल एअरफोर्सला मोठ्या प्रमाणात मदत केली असली तरी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत बनणे महत्वाचे होते आणि यामुळे मॉस्किटोज विमाने लवकरच रॉयल एअरफोर्समधून रिटायर होणार होती. स्पिटफायरसारख्या प्रगत लढाऊ विमानांनी आणि नंतर जेट-शक्तीवर चालणाऱ्या विमानांमुळे मॉस्किटॉज लढाऊ विमाने कालबाह्य बनली. 

१९४६ साली शेवटचे मॉस्किटो लढाऊ विमान तयार केले गेले. मॉस्किटॉज आणि नॅटची रचना सर्वात सोपी आणि हलकी असली तरी या लढाऊ विमानांनी इतिहास बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सोव्हिएतनं गॅस विहीरीतील आग विझवण्यासाठी चक्क अ*णुबॉ*म्बचा वापर केला होता

Next Post

बेल्जीयमचं २०० टन सोनं दुसऱ्या महायु*द्धात सगळ्या जगाची सफर करून आलं होतं..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

बेल्जीयमचं २०० टन सोनं दुसऱ्या महायु*द्धात सगळ्या जगाची सफर करून आलं होतं..!

आणि त्यादिवशी जपानने अमेरिकन आणि फिलिपिन्सच्या सैनिकांच्या मृतदेहांचा खच पाडला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.