The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनरल हिंडेनबर्ग – हि*टल*रला सत्तेवर आणणारा माणूस

by द पोस्टमन टीम
30 December 2024
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जर्मनी आज ओळखला जातो ते त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या महायु*द्धाच्या खाईत जगाला लोटणारा देश म्हणून. जर्मनी ओळखला जातो तो त्याच्या वंशशुद्ध्त्वाच्या कट्टर कल्पनांसाठी, जर्मनी ओळखला जातो तो १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात जगावर राज्य करण्याची महत्वाकांक्षा असणारा देश म्हणून. जर्मनी ओळखला जातो तो जगाला हि*टल*रसारख्या क्रू*र राक्षसकर्मी हुकुमशहाची भेट देणारा देश म्हणून.

भले आज परिस्थिती बदलली असेल, आज युरोपमध्ये सगळेच देश पुढारलेले आहेत आणि जर्मनीसुद्धा त्यामध्ये मागे नाही. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मेडिकल सुविधा असतील, शिक्षण असेल अशा अनेक विषयात या देशाने प्रगती केली आहे. मात्र तरीही लोक दुसरे महायु*द्ध आणि हि*टल*रला विसरायला आजही तयार नसतात. हि*टल*र या नावाभोवतीचं वलय दिवस जाईल तसं वाढत चाललेलं आहे.

हि*टल*रच्या पूर्वीही इतिहासात चंगीझ खान, अल्लाउद्दीन खिलजी असे अनेक क्रू*र हुकुमशहा होवून गेले, हि*टल*रनंतरसुद्धा जनरल गदाफी, सद्दाम हुसेन, किम जोंग उन अशी या हुकुमशहाची साखळी आहे. पण तरीही क्रू*र हुकुमशहा म्हटलं की लोकांना हि*टल*रच आठवतो.

जर्मनी या देशाची प्रतिमा या हि*टल*रमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी त्या देशाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

आज जर्मनी जगात अमेरिका आणि जपाननंतर एक मजबूत अर्थव्यवस्था म्हणून जरी उदयाला आलेली असली तरी भूतकाळाच्या खुणा तिला पुसून टाकता येत नाहीत.



अनेक वेळा हि*टल*रचा उदय होण्यासाठी कोण कारणीभूत होते किंवा हि*टल*रला प्रकाशझोतात कुणी आणले, कुणाच्या मदतीने हि*टल*रने पहिल्यांदा राजकरणात प्रवेश केला, जेव्हा तो कुणीच नव्हता तेंव्हा त्याच्यामागे कुणी आर्थिक आणि राजकीय ताकद उभी केली यावर देश विदेशात, तसेच अनेक प्रकारच्या चर्चा सत्रात चर्चा होत राहतात. त्यामध्ये एक नाव ठळकपणे समोर येत. ते म्हणजे हिंडेनबर्ग.

thepostman

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

तुम्ही म्हणाल कोण आहे हा हिंडेनबर्ग? हा जनरल हिंडेनबर्ग म्हणून पण ओळखला जातो. हा पहिल्या महायु*द्धात जर्मनीचा सरसेनापती होता. पहिल्या महायु*द्धात जर्मनीचा दारुण पराभव झाला. त्या देशाचे मनोधैर्य खच्ची झाले तेंव्हा याचं जनरल पॉल व्हॉन हिंडेनबर्गने जर्मन सैन्याचे नव्याने संघटन बनवले, खच्ची झालेल्या सैनिकांच्या मनाला उभारी दिली.

जर्मनीमध्ये हि*टल*रची सत्ता येण्यापूर्वी कुप्रसिद्ध असे वायमार प्रजासत्ताक होते. हे सरकार भ्रष्ट होते. या सरकारच्या काळातच जर्मनीमध्ये चलन फुगवटा भयानक वाढला.

हा चलन फुगवटा इतका भयानक होता की जर्मनीचे मार्क्स नावाचे जे आंतरराष्ट्रीय चलन आहे ते तर नोव्हेंबर १९२३ मध्ये ४.२ ट्रिलीयन मार्क्सला एक अमेरिकन डॉलर येत होता!

या सरकारच्या काळात देशात १७ ते १८ पार्टी होत्या आणि त्यांची एकमेकात प्रचंड भांडणे होती. देशाला पुढे नेण्याचा अजेंडा कुणाकडेच नव्हता.

हिंडेनबर्गने पहिल्या महायु*द्धात जर्मनीचे नेतृत्व केले. मुळचा प्रशिया देशात जन्माला आलेला हा माणूस वयाच्या १८ व्या वर्षी जर्मन सैन्यात भरती झाला. खरे पाहता पहिले महायु*द्ध सुरु होण्याच्या अगोदर हिंडेनबर्ग रिटायर झाला होता, पण पहिले महायु*द्ध सुरु झाल्यावर देशाला आपली गरज आहे हे उमजून तो परत सैन्यात भरती झाला.

thepostman

त्याच्या अधिपत्याखाली जर्मन सैन्याने १९१४ साली ताहीनबर्गची लढाई जिंकली. ही लढाई रशिया आणि जर्मनी या दोन देशात झाली होती.१७ ऑगस्ट १९१४ ते २ सप्टेंबर  १९१४ च्या दरम्यान जर्मन आणि रशियन सेना एकमेकांना अलेनस्टेन नावाच्या ठिकाणी सीमाप्रदेशात भिडल्या.

या यु*द्धात रशियन सैन्याचा पूर्ण पराभव झाला आणि हिंडेनबर्गचे नाव जर्मनीभर गाजले पण हा आनंद अल्पकाळ टिकला कारण त्यानंतर जर्मनीचा युद्धात दारुण पराभव झाला. हिंडेनबर्ग यु*द्ध संपल्यानंतर रिटायर झाला. मात्र १९२५ साली तो जर्मनीचा चान्सलर म्हणून पुन्हा निवडला गेला.

thepostman

खरे पाहता हिंडेनबर्ग जेंव्हा जर्मनीचा चान्सलर होता त्यावेळी देशात वायमार प्रजासत्ताक होते आणि सरकारचा कारभार अत्यंत भोंगळ चाललेला होता. देशात त्यावेळी नेमका ना*झी पार्टीचा उदय सुरु झाला होता. हि*टल*रने हे वायमार प्रजासत्ताक संपवण्याची शपथ घेतलेली होती.

जेंव्हा हिंडेनबर्ग आणि हि*टल*रची पहिली भेट झाली तेंव्हा त्याला हि*टल*र अजिबात आवडला नव्हता. १९३२ साली जेव्हा पुन्हा एकदा चान्सलर निवडण्याची वेळ आली तेंव्हा हिंडेनबर्गचे वय ८४ वर्षे इतके होते पण त्याला पुन्हा निवडणुकीला उभा राहण्यासाठी आग्रह करण्यात आला कारण यावेळी निवडणुकीला हि*टल*र उभा होता. हि*टल*रला हरवण्यासाठी हिंडेनबर्गने देशव्यापी प्रचारसुद्धा केला. हिंडेनबर्गला ना*झी पार्टीचे वाढते अस्तित्व मान्य नव्हते.

हिंडेनबर्ग निवडून आला खरा पण त्यानंतर सरकार अस्थिरच राहिले. १९३२ च्या निवडणुकीत ना*झी पार्टी बहुमताने निवडून आलेली होती. हिंडेनबर्गचे वय ८५ झाले होते त्यामुळे त्याच्यानंतर कुणाला तरी चान्सलर पदाची शपथ द्यावीच लागणार होती. याचा अंदाज हि*टल*रला आलेला होता. अगदी शेवटापर्यंत हिंडेनबर्ग हि*टल*रला चान्सलर बनवायला नाखूष होता, पण त्याचा निर्णय फार काळ टिकला नाही.

१९३३ साली ना*झी पार्टीने बहुमताने आधीच्या चान्सलरला काढून टाकण्याचा ठराव सभागृहामध्ये मांडण्याचे ठरवले होते. त्यामुळे अशक्त आणि आजारी हिंडेनबर्गने हि*टल*रला ३० जानेवारी १९३० रोजी जर्मनीच्या चान्सलर पदाची शपथ दिली.

त्या दिवशी हिंडेनबर्गवर दबाव आणण्यासाठी ना*झी पार्टीचे समर्थक मोठ्या प्रमाणावर संसदेच्या गेटवर जमले होते. हि*टल*रचा प्रचारप्रमुख गोबेल्स स्वत: समर्थकांच्या समुदायात हजर होता.

thepostman

संध्याकाळपर्यंत  २० हजार लोकांचा समुदाय त्या ठिकाणी हि*टल*रला चान्सलर बनवण्यात यावे या मागणीसाठी जमा झाला. त्याच्या काही तास अगोदर वृद्ध हिंडेनबर्गने हि*टल*रला चान्सलर पदाची शपथ देऊन टाकली होती. हि*टल*रने त्यानंतर बाहेर येऊन स्वत:ची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले आणि लोकांमध्ये जल्लोष सुरु झाला.

त्या रात्री हि*टल*रची भव्य मिरवणूकसुद्धा निघाली. याला गोबेल्सने अत्यंत मोठ्या चमत्काराची रात्र असे नाव दिले. हुकुमशहा असलेल्या हि*टल*रची नियुक्ती मात्र संविधान संमत असलेल्या तरतुदीनुसार केली गेली होती हा इतिहासातील एक काळा विनोद आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Hitlernazi
ShareTweet
Previous Post

वूडलॅन्ड फुटविअर : जिद्दीच्या बळावर उभ्या राहिलेल्या १८०० कोटींच्या साम्राज्याची कहाणी

Next Post

या भारतीय वीराला पाकिस्तानचा लष्करप्रमुख होण्यासाठी जिनांनी इस्लामची शपथ दिली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

या भारतीय वीराला पाकिस्तानचा लष्करप्रमुख होण्यासाठी जिनांनी इस्लामची शपथ दिली होती

विकी कौशल - सुपरस्टार इन मेकिंग

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.