The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना जेफ बेजोस ना बिल गेट्स, आजवरचा सगळ्यात श्रीमंत माणूस आफ्रिकेतला हा राजा आहे

by द पोस्टमन टीम
19 January 2026
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पैसा, सोने-नाणे, ऐषोआराम, महागड्या चीजवस्तू, धनदौलत, जमीनजुमला, समृद्धी आणि संपत्ती याबद्दल सर्वांनाच आकर्षण असते. या जगात मुठभर लोकांच्या हातातच अमाप संपत्ती एकवटलेली दिसते. त्यातही जगात सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती कोण अशा प्रश्नात सर्वांनाच रस असतो. म्हणूनच फोर्ब्जसारखे मासिकं दरवर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करत असते.

जगभरातील अनेक श्रीमंत लोकांसोबतच भारतातील श्रीमंत लोकांचाही या यादीत समावेश असतो. परंतु आजपर्यंतच्या इतिहासात पश्चिम आफ्रिकेतील माली साम्राज्याचा सम्राट मंसा मुसा (पहिला) याच्याइतका श्रीमंत व्यक्ती कुणीच झाला नाही, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.

मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि ॲमेझॉनचे जेफ बेजोस यांची संपत्तीही त्याच्या संपत्तीसमोर अगदी नगण्य मानली जाते.

असे म्हटले जाते की मंसा मुसा जर या काळात असता तर त्याने जेफ बेजोसलाही मागे टाकले असते. त्याच्याजवळ इतकी संपत्ती होती ज्याचा आज कुणी अंदाजही लावू शकणार नाही.

मंसा मुसाचे राज्य माली हे मिठाच्या आगरांसाठी प्रसिद्ध होते. इसवी सन १३१२ ते १३३७ या काळात मंसा मुसाने इथे राज्य केले. मालीच्या सम्राट पदावर विराजमान होण्यापूर्वी त्याचे नाव मुसा कीटा पहिला असे होते. परंतु त्याने सम्राट पद स्वीकारल्यानंतर त्याचे नाव मंसा मुसा पहिला असे झाले. या लोकांच्या स्थानिक भाषेनुसार मंसा या शब्दाचा अर्थ होतो राजा (सम्राट).



मुसाने त्याच्या काळात जनतेच्या कल्याणासाठी अनेक चांगली कामे केली होती. तो स्वतःला सच्चा मुसलमान समजत असे. मुसाचे साम्राज्य त्याकाळी इतक्या दूरवर पसरले होते की त्याची अंतिम सीमा कुठे आहे याचाही अंदाज लावता यायचा नाही. त्याच्या काळात या प्रदेशात अनेक खनिजांच्या खाणी होत्या. सोन्याच्या खाणी तर मुबलक होत्या आणि त्याकाळात बाहेरच्या देशात सोन्याला प्रचंड मागणी होती.

आजचे मॉरीटानिया, सेनेगल, गांबिया, गिनिया, बुर्कीना फासो, नायजर, चाड आणि नायजेरिया हे सगळे देश मुसाच्या साम्राज्याअंतर्गत येत होते. मंसा मुसाने आपल्या कारकिर्दीत या साम्राज्या अनेक मस्जीदी, मदरसे, ग्रंथालये आणि महाल बनवले. मुसाने त्याकाळी बनवलेल्या या इमारतींपैकी एक मस्जीद आजही तिथे पाहायला मिळते. ती Djinguereber Mosque म्हणून जाते. ही मस्जिद मुसाने १३२७ साली बांधली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

युनिव्हर्सिटी ऑफ संकोर ही देखील मुसाचीच देण मानली जाते. या विद्यापीठात मुस्लीम धर्माची शिकवण दिली जाते. आजही या ठिकाणी जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. मालीयन इतिहासकार महमूद कती याने आपले पुस्तक ‘क्रॉनिकल ऑफ द सिकर’ या पुस्तकात याचा उल्लेख आढळतो.

इतिहासकारांचा असा अंदाज आहे की तेराव्या शतकात मुसाजवळ ४० करोड डॉलर्स एवढी संपत्ती होती.

त्याकाळात या प्रदेशात सोन्याच्या मुबलक खाणी होत्या. मिशिगन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रुडोल्फ वेयर यांच्या मते मुसाकडे नेमकी किती संपत्ती होती याचा अंदाज लावणे कठीण आहे.

मंसा मुसाच्या मक्का यात्रेची कथा खूपच प्रसिद्ध आहे. ही गोष्ट आहे, १३२४ सालची. मंसा मुसाने साडे सहा हजार किमीचे अंतर पार करून ही यात्रा यशस्वी केली होती. या संपूर्ण प्रवासात त्या त्या प्रदेशातील अनेक लोक मुसाला पाहण्यासाठी गर्दी करत असत. मुसाला पहिल्यानंतर या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसत असे.

मंसा मुसाच्या या मक्का यात्रेत त्याच्यासोबत ६० हजार लोक सामील होते. यात मुसाचे खाजगी सेवकच बारा हजार होते. मुसाच्या घोड्यापुढे ५०० लोकांची रांग होती आणि या प्रत्येक सैनिकाच्या हातात एकेक सोन्याची छडी होती. हे ५०० लोक म्हणजे मुसाचे संदेशवाहक होते. या ५०० सेवकांनी तलम रेशमी कपड्यांचा पेहराव परिधान केला होता.

यात ८० उंटांचा तांडा देखील होता. ज्यावर १३६ किलो वजनाचे सोने लादण्यात आले होते. असे म्हणतात की मंसाने आपल्या संपूर्ण प्रवासात हे सोने दान देऊन टाकले. अक्षरश: अबीरबुक्क्याप्रमाणे या राजाने हे सोने उधळून दिले होते. इजिप्तची राजधानी काहिरामध्ये आल्यावर तर त्याने इतकी संपत्ती दान केली की या राज्यातील अर्थव्यवस्थाच कोलमडून गेली.

गरिबांना दान करण्यात आलेल्या या संपत्तीने या प्रदेशात प्रचंड महागाई वाढली. मुसा सोने वाटतो ही बातमी सर्वत्र पसरल्यावर युरोपियन लोकांचे तांडेही त्याला पाहण्यासाठी येऊ लागले. मुसाची प्रसिद्धी इतकी वाढली की त्याकाळी मेडीव्हल वर्ल्ड मॅप, कॅटलान ऍटलासमध्ये त्याच्या साम्राज्याचा नकाशा सामाविष्ट करण्यात आला. त्याला अनेक पदव्या आणि उपाध्यांनी गौरवण्यात आले.

त्याला ‘लॉर्ड ऑफ द माइन्स ऑफ वेंगरा’ आणि ‘एमिर ऑफ मेले ’ यासारख्या उपाध्या देण्यात आल्या.

मुसाचा मृत्यू नेमका कधी झाला याबाबत अनेक विवाद आहेत. परंतु १३३७च्या आसपास केव्हातरी त्याचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र मंसा मेगन याने आपल्या वडिलांचा वारसा सांभाळला. पण, मंसा मुसाच्या काळात मालीची जी समृद्धता होती तशी समृद्धी नंतर या प्रदेशाने पुन्हा कधीही अनुभवली नाही.

आज माली हा आफ्रिकेतील ७ व्या क्रमांकाचा मोठा देश आहे. परंतु आज हा देश सर्वात गरीब देश म्हणून ओळखला जातो. या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या ही आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेच्या खाली येते. म्हणजेच या देशाची अर्धी लोकसंख्या प्रतिदिन १.२५ डॉलरपेक्षाही कमी मिळकतीवर आपला उदरनिर्वाह करत आहे.

मंसा मुसासारखी समृद्धता मात्र आजवर कुणीही अनुभवली नाही. त्याने जितके दान दिले तितकीच त्याच्या समृद्धीत भर पडत गेली. म्हणूनच त्याला पृथ्वीवरील सर्वात भाग्यशाली राजा म्हणून ओळखले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या ग्रंथालयातील रामायणाची सुरुवात ‘ओम्’ने न होता ‘बिस्मिल्ला-अर्रहमान’ने होते

Next Post

हिंदूंचा होळीचा सण मुघल शासकही तितक्याच हौसेने साजरा करायचे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

हिंदूंचा होळीचा सण मुघल शासकही तितक्याच हौसेने साजरा करायचे

कोका कोलाला भारताबाहेर काढून जनता सरकारने "सरकारी कोला" बाजारात आणला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.