The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इलेक्ट्रिक कारची फॅशन शंभर वर्षे अगोदर एकदा येऊन गेलीये

by द पोस्टमन टीम
28 February 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पेट्रोल, डीझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. काही लोकांनी तर आता सायकलचा वापर सुरु केला आहे. येत्या काळात पेट्रोल, डीझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल असा अंदाज आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनेही इलेक्ट्रिक गाड्यांवरील करामध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत या कार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या, पण सरकारने जर कर कमी केले तर याच्या किंमतीही सर्वसामन्यांच्या आवाक्यात येतील अशी अपेक्षा आहे.

आज आपण याच इलेक्ट्रिक कारची कहाणी जाणून घेणार आहोत.

चाकाचा शोध लागल्यापासून मानवी समाजाच्या इतिहासाला एक वेगळेच वळण लाभले. दळणवळाचा वेग वाढला तसतसा मानवी जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येऊ लागला. आजच्या काळात तर वाहन ही एक अत्यावश्यक गरज बनली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा हा इतिहास १८२८ पासून सुरू होतो.

इलेक्ट्रिक कार बनवण्याचा खटाटोप याआधीही अनेकांनी केला होता, पण १८२८ साली अन्योस जेड्लिक यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रिक मोटार तयार करून एक छोटी कार बनवली होती.

त्यानंतर १८३४ मध्ये व्हर्मोंट ब्लॅकस्मिथ, थॉमस डेवेनपोर्ट यांनी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मोटार बनवली होती. छोट्या रस्त्यावर ही कार त्यांनी चालवून बघितली होती.



१८३३ साली डेव्हेनपोर्टने जेव्हा न्युयॉर्कमधील टाफ्ट आयर्न वर्क्सला भेट दिली होती तेव्हा त्याने पाहिले की इलेक्ट्रोमॅग्नेट कसे काम करते. त्याच धरतीवर त्याने आपली ही मोटार बनवली होती. या इलेक्ट्रोमॅग्नेटलाच चांगल्या लोखंडी सळया बसवल्या, त्याचे वायरिंग पुन्हा जोडले, असे त्यामध्ये काही नाविन्यपूर्ण बदल करून त्याने १८३४ मध्ये गती देणारी मशीन बनवली.

या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसाठी त्याने १८३७ मध्ये पेटंट मिळवले होते. या मोटारचा वेग होता-६०० आरपीएम. या बॅटरीचा वापर करून पॉवर्ड मशीन टूल्स आणि प्रिंटीग प्रेस चालवता येत होती. पण या बॅटरीसाठी सुरुवातीला झिंक रॉडची गरज भासत असे, जे खूपच महाग होते. त्यामुळे ही बॅटरी वापरणे तितकेसे किफायतशीर ठरले नाही. या प्रयोगात डेव्हेनपोर्टला खूपच नुकसान सोसावे लागले. कारण, त्याने बनवलेल्या कार विकल्याच गेल्या नाहीत.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

मग त्याने १८३४ साली पहिली अमेरिकन डीसी इलेक्ट्रिक मोटार बनवली. ही मोटार त्याने लहान कारमध्ये बसवली.

१९३७ मध्ये रॉबर्ट डेव्हिडसन याने एक इलेक्ट्रिक वाहनाचे एक मॉडेल बनवले होते. डेव्हिडसनने छोटी इलेक्ट्रिक कार बनवली होती. तर त्याच वेळी डब्ल्यू. एच. टेलर यानेही अमेरिकेत अशाच प्रकारची मोटार बनवली होती. पण, दोघांनाही एकमेकांच्या कामाविषयी काहीच माहिती नव्हती. दोघांचेही संशोधन स्वतंत्र होते. डेव्हिडसन गाल्वनी यांनी १८४२ मध्ये एक चार चाकी गाडी बनवली ज्याला त्यांनी झिंक-ऍसिड बॅटरी बसवली होती.

झिंक वापरून बनवलेल्या बॅटरीसाठी जास्त खर्च येत असल्याचे लक्षात आल्यानंतर आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी बॅटरी बनवण्यासाठी काय करता येईल याचा शोध सुरु झाला. १८६० मध्ये आर्थिकदृष्ट्या परवडेल असा डायानॅमो बनवण्यात डेव्हिडसनला यश आले. पण अजूनही रिचार्ज करता येण्याजोग्या बॅटरीजचा शोध लागला नव्हता.

१८५९ मध्ये गॅस्टन प्लांटे याने पहिल्यांदा लीड-ऍसिड सेल बनवला. ही पहिली रीचार्जेबल बॅटरी होती. आज आपण ज्या ई-कार वापरतो त्या बॅटरी प्लांटेच्या या बॅटरीवरच आधारलेला आहे. अर्थात प्लांटेच्या बॅटरीमध्ये आणि आज वापरत असलेल्या बॅटरीमध्ये खूप फरक नाही. मात्र, बॅटरी आकाराने लहान झाली आणि ती आणखी सुरक्षितरित्या कशी वापरता येईल याबाबतीत संशोधन करण्यात आले.

फ्रांस आणि ब्रिटनमध्ये पहिल्यांदा बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांना प्रोत्साहन देण्यात आले. स्वित्झर्लंडने देखील आपल्या देशातील रेल्वे ट्रॅकचे इलेक्ट्रिफिकेशन करून घेतले. ज्यामुळे त्यांचे इंधनासाठी इतर देशांवरचे अवलंबित्व कमी झाले.

१८८१ मध्ये कॅमिली आल्फोन्सेने लीड प्लेट्सला लीड ऑक्साईड पेस्टचे कोटिंग देण्याची पद्धत शोधली, ज्यामुळे प्लांटेच्या बॅटरीपेक्षाही ही बॅटरी जास्त परिणामकारक ठरली. यामुळे बॅटरीची क्षमता वाढली. लीड-ऍसिड बॅटरीचे उत्पादन करणेही सोपे झाले. ज्यामुळे आज आपण ज्या इलेक्ट्रिक कार्स वापरतो त्याची निर्मिती करण्याची प्रक्रियाही सोपी आणि जलद झाली.

१८८४ मध्ये फोर्डने मॉडेल-टी बाजारात आणली. १८८८ मध्ये जर्मनीत फ्लोकेन इलेक्ट्रोवॅगेननी इलेक्ट्रिक कार तयार केली होती. पण, तेव्हा रस्त्यांचा दर्जा चांगला नव्हता त्यामुळे ही गाडी प्रत्यक्षात रस्त्यावर धावू शकली नाही. १९१० पासून विजेचा वापर वाढल्याने सामाँन्य लोकांनाही ई-कारबद्दल आकर्षण वाटू लागले.

उद्योजकांना या कारच्या निर्मितीमध्ये रस वाटेना तेव्हापासून या गाड्या रस्त्यावरून गायब झाल्या. १९७० साली इंधन तुटवडा जाणवल्याने तेव्हापासून पुन्हा एकदा ई-कारची चर्चा सुरू आहे. जनरल मोटर्सने १९९०च्या दशकात ई.व्ही.१ या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू केले. यानंतर आजतागायत यामध्ये अनेक बदल आणि प्रयोग होत आहेत.

आजच्या काळात टेस्लाने ई-कारचे एक नवे मॉडेल बाजारात आणले आहे.

डीझेल-पेट्रोलचे वाढते भाव, इंधनाची टंचाई आणि वाढते प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा विचार करता संपूर्ण जगभर आणि भारतातही २०३० पर्यंत पेट्रोल डीझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती आणि त्यांचा मेंटेनन्स जर सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात आल्या तर लवकरच आपल्याकडेही या गाड्या रस्त्यावर धावताना दिसतील. भारत सरकारने तर या गाड्यांवरील कर देखील कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या काळात या गाड्या सर्रासपणे वापरल्या जातील आणि त्या वापरण्यास अधिक सुलभता यावी असे प्रयत्नही केले जातील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सगळीकडे चेटकिणी झाडूवर बसून उडताना का दाखवल्या जातात..?

Next Post

‘Keep calm..’चे पोस्टर्स मुळात एक सरकारी जाहिरात होती..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

'Keep calm..'चे पोस्टर्स मुळात एक सरकारी जाहिरात होती..!

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या नेतृत्वात 'सौदी' नव्या जगाची नीतिमूल्ये आत्मसात करतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.