The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त इस्रोच नाही तर दूरदर्शनच्या उभारणीत देखील डॉ साराभाईंचं योगदान आहे

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉ. विक्रम साराभाई यांना ओळखले जाते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळात भारताच्या आण्विक कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. डॉ. विक्रम साराभाई यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला दिशा दिली. भारताचे चंद्रावरील पहिले मिशन असलेले चंद्रयान हे साराभाईंनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे. रशिया आणि अमेरिकेत शीतयु*द्ध सुरू होते त्यावेळी दोन्ही देशात आंतराळ संशोधन, उपग्रह प्रक्षेपण, रॉकेट निर्मिती इत्यादी क्षेत्रात चढाओढ सुरू होती.

स्वातंत्र्यानंतर भारताने अंतराळ कार्यक्रम आखायला सुरुवात केली. डॉ. विक्रम साराभाई यांनी फक्त भारतीय उपग्रह आणि रॉकेट यांच्या निर्मितीची व्यवस्था केली नाही, त्यांनी या उपग्रहांचा ज्या क्षेत्रांमध्ये वापर केला जाऊ शकतो, त्यांना गती देण्याचे काम केले.

डॉ. साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ मध्ये गुजरातच्या अहमदाबादमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. साराभाई बालपणापासूनच अत्यंत जिद्दी व मेहनती होते. पियर क्युरी व मेरी क्युरी या नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधक जोडप्याचे ते चाहते होते. गुजरात कॉलेजमधे इंटरमीडियट सायन्सची परीक्षा पास झाल्यावर ते १९३७ साली ब्रिटनला गेले.

दुसऱ्या महायु*द्धाला सुरुवात झाली त्यावेळी ते भारतात परतले. त्यांनी बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत डॉ. सी. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कॉसमिक किरणांवर संशोधन केले.



त्यांचा पहिला प्रबंध हा कॉसमिक किरणांच्या प्रसारणावर आधारित होता. भारतीय विज्ञान अकादमीत त्यांनी हा शोधनिबंध सादर केला होता.

विश्वयु*द्ध समाप्तीनंतर साराभाई ब्रिटनला परतले. त्यांनी भौतिकशास्त्रात संशोधन करून आपली पीएचडी मिळवली. भारतात टेलिव्हिजनला प्रसाराचे माध्यम बनवण्यात डॉ. विक्रम साराभाई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दूरदर्शनवरील कार्यक्रमांची ब्लु प्रिंट देखील साराभाई यांनी तयार केली होती. १९७५-७६ मधे नासाच्या मदतीने साराभाई यांनी सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलीविजन एक्सपेरिमेंट संचलित केला होता. त्यांच्या या प्रयोगाने भारतातील २५०० हुन अधिक गावात टीव्हीचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

डॉ. विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) पहिले अध्यक्ष होते. साराभाई यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या टेक्सटाईल अनुसंधान केंद्राची पायाभरणी केली होती. अहमदाबाद येथील भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा आणि कम्युनिटी सायन्स सेंटरची स्थापना साराभाई यांनी केली होती. 

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१९६६ साली भारताच्या आ*ण्विक कार्यक्रमाचे जनक असलेल्या डॉ. होमी भाभा यांच्या मृत्यूनंतर डॉ. साराभाई यांनी भारतीय अणु आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. साराभाई यांनी फार्मास्युटिकल्स अनुसंधान केंद्राची देखील पायाभरणी केली होती.

भारताला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गरुडझेप घेण्यासाठी सज्ज करणाऱ्या या महान वैज्ञानिकाचे ३० डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले. आज साराभाई हयात नसले तरी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची उंचावत जाणारी विजयी पताका ही निश्चितच त्यांची आपल्याला देण्यात आलेली सर्वात मोठी देणगी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपण वापरतोय त्या कागदाचा शोध कोणी लावला..? जाणून घ्या..!

Next Post

सरकारविरोधात या बौध्द भिक्खूने तोंडातून चकार शब्दही न काढता आत्मदहन केलं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

सरकारविरोधात या बौध्द भिक्खूने तोंडातून चकार शब्दही न काढता आत्मदहन केलं होतं

चुकून क्रिस्टल मेथच्या ३० गोळ्या खाल्ल्या आणि हा सैनिक न थांबता ४०० किलोमीटर धावला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.