The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डायनॉसॉर्सचे सापळे, हाडे वगैरे तर आपण पाहतोच पण आता त्यांचे भ्रूणावशेषसुद्धा सापडलेत..!

by Heramb
1 November 2023
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पृथ्वीवर काही लाख वर्षांपूर्वी डायनॉसॉर्स नावाच्या महाकाय प्राण्यांचे अस्तित्व होते. सुमारे २० करोड वर्षांपूर्वी या जीवांचे संपूर्ण पृथ्वीवर राज्य होते. या कालखंडाला “ज्युरासिक कालखंड किंवा एज ऑफ रेप्टाइल्स” म्हणतात. या कालखंडाची समाप्ती सुमारे ६ करोड वर्षांपूर्वी एका पृथ्वीवर आदळलेल्या एका लघुग्रह किंवा धूमकेतूमुळे झाली. या धूमकेतूचा व्यास (डायमीटर) सुमारे १० ते १५ किलोमीटर होता, आणि तो आदळला तो भाग होता सध्याच्या मेक्सिकोचा.  पण यातून निर्माण झालेली ऊर्जा एवढी प्रचंड होती की पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आणि ज्युरासिक कालखंड संपुष्टात आला. 

जरी ज्युरासिक कालखंड संपुष्टात आला असला तरी त्याचे अवशेष आजही जगभरात शिल्लक आहेत. जगभरातील विशेषतः अमेरिका आणि युरोपमधील संग्रहालये अशा अवशेषांनी भरली असून त्यात डायनॉसॉर्सचे सापळे, हाडांचे अवशेषही सापडतात. आजतागायत युरोपच्या अनेक भागांमध्ये असे अवशेष सापडत आले आहेत. पण पोर्तुगालमध्ये चक्क डायनॉसॉर्सची अंडी सापडली, इतकंच नाही तर काही अंड्यांमध्ये एम्ब्रॉयज म्हणजेच त्यांचे भ्रूणही सापडले आहेत. करोडो वर्षं  जुनी अंडी आणि त्यातही सापडलेले भ्रूणांचे अवशेष हे संशोधकांसाठी फार विशेष असून असं कदाचित पहिल्यांदाच झालं आहे. या अनोख्या संशोधनाबद्दल प्रस्तुत लेख..

एक अनोखं संशोधन

१९९१ साली पोर्तुगालच्या लॉरिन्हा शहरातील पैमोगॊ येथे डायनॉसॉरच्या एका विशाल, महाकाय घरट्यात सुमारे १०० अंडी सापडली. हे घरटं मांसाहारी अन्न खाणाऱ्या एका लॉरिन्हासोर्स नावाच्या डायनॉसॉर्सच्या प्रजातीचं होतं, लॉरिन्हासोर्स प्रजाती केवळ पोर्तुगालमध्येच आढळून येते. १९९१ साली या घरट्यालाच मागच्या १५ करोड वर्षांमधील डायनॉसॉर्सचे सर्वांत जुने घरटे समजले जाते. या घरट्याचा कालखंड पाहता हे घरटे इतके एकमेवाद्वितीय का आहे याची प्रचिती आपल्याला येऊ शकते. 

ही घरटीच नाहीत तर यात सापडलेली अंडी देखील संशोधकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. याचं कारण म्हणजे त्या अंड्यांच्या आतमध्ये सापडलेले भ्रूणांचे अवशेष. मानवाला आतापर्यंत सुमारे डायनॉसॉर्सच्या सुमारे १५०० प्रजाती सापडल्या असून त्यामध्येही फक्त २० भ्रूणांचे अवशेष सापडले आहेत. त्या २० पैकी काही पोर्तुगालच्या लॉरिन्हा शहरातील समुद्रकिनारी भागात सापडले आहेत. ही त्या शहरासाठी फार विशेष बाब आहे. या संशोधनामुळे विशेषतः पॅलेओन्टोलॉजीस्टससाठी हे शहर महत्त्वाचे ठरले आहे.

लॉरिन्हा – अगणित डायनॉसॉर्सचे घर

सुमारे १५ करोड वर्षांपूर्वी लॉरिन्हा शहरात सध्या असलेले उंच कडे प्रचंड मोठी, विस्तारित सपाट मैदाने होती. या मैदानांवरून अनेक नद्या वाहत असत. डायनॉसॉर्समध्येही २ विभाग केले जातात, एक म्हणजे शाकाहारी डायनॉसॉर्स आणि दुसरा म्हणजे मांसाहारी डायनॉसॉर्स. या दोन्ही प्रकारच्या डायनॉसॉर्सना या प्रदेशात अनुकूल वातावरण होते.


या प्रदेशात सापडलेल्या अंड्यांचे फॉसिल

मोठ्या प्रमाणात जैवविविधता असल्याने अनेक डायनॉसॉर्स या प्रदेशात आले, पुढे ते नष्ट झाल्याने आजही त्यांचे फॉसिल्स (जीवाश्म) आपल्याला सापडतात. जगातील कोणत्याही भागाच्या तुलनेत याठिकाणी प्रत्येक स्क्वेअर मीटरवर सापडणारे अवशेष जास्त आहेत. यामुळेच याठिकाणी संशोधनाला वाव मिळत असून या शहरात जगभरातील संशोधकांना आणि डायनॉसॉर्सविषयी जिज्ञासा बाळगणाऱ्यांना येऊन संशोधन करायचे आहे. त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि लॅब्स देखील स्थानिक सरकारद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात.

संशोधन

या सगळ्याची सुरुवात झाली २०१८ पासून. १९९१ पासून जरी या भागात डायनॉसॉर्सची घरटी आढळत असली तरी २०१८ पासून त्यातील अंडी आणि भ्रूण सापडण्यास सुरुवात झाली आहे. मायकेल मार्टिनो नावाच्या तरुण स्काऊटरने या भागात २०१८ साली सगळ्यात अलीकडील डायनॉसॉर्सच्या अंड्याचे संशोधन करण्यास मदत केली होती.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

संशोधकांच्या टीमने फॉसिल्सचा (जीवाश्म) शोध घेण्यासाठी कॅनिकल समुद्रकिनाऱ्यावर जायचे ठरवले. त्याठिकाणी समुद्राजवळच एका चढावर २ अंड्यांचे कवच सापडले. ते कवच नेमके कुठून आले हे जाणून घेण्यासाठी त्यांनी या चढावर उत्खनन करण्यास सुरुवात केली आणि त्यांना याच प्रकारचे आणखी कवच सापडले.

म्हणजेच डायनॉसॉर्सची घरटी जवळच कुठेतरी आहेत असा होतो. पण ही घरटी शोधण्याचे काम अत्यंत अवघड होते. संशोधकांनी काम करायला सोपे व्हावे यासाठी त्या चढावर लहान लहान रस्ते तयार केले. त्याठिकाणी उत्खननाचे काम करणे अत्यंत अवघड होते. तेथे संशोधक दोरीच्या साहाय्याने काम करत होते. बऱ्याच वेळाच्या उत्खननानंतर त्यांना त्याठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण, भला-मोठा ब्लॉक सापडला. तो ब्लॉक काही टन्स म्हणजेच हजार किलोपेक्षाही जड असल्याने त्यांनी हायड्रॉलिक लिफ्टर आणले.

डायनॉसॉर्सचे महाकाय घरटे काढताना

अथक प्रयत्नांनंतर संशोधकांनी त्या ब्लॉकला लॅबमध्ये शिफ्ट केले. ब्लॉक म्हणजेच डायनॉसॉर्सचे ते भले मोठे घरटे सर्वांत आधी साफ करून त्यावर सखोल संशोधन करण्यात येणार होते. ही अंडी मांसाहारी (कार्निव्होर) डायनॉसॉर्सची आहेत हे संशोधकांना समजले होते. पुढे त्यावर आणखी संशोधन होण्यासाठी पॅलेन्टीओलॉजिस्टसकडे पाठवण्यात येणार होते. हा ब्लॉक अतिशय नाजूक असल्याने त्यावरील कामाची गती कासवाएवढी होती. तसेच संशोधकांना या घरट्यातील अंड्यांमध्ये भ्रूणावशेष सापडण्याची देखील आशा होती.

या घरट्यामध्ये मिळालेल्या एका अंड्यात टोरवोसॉर्सची अंडी देखील सापडली आहेत, त्यामुळे या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. टोरवोसॉर्स म्हणजेच टी-रेक्स नावाच्या डायनॉसॉर्सची प्रजाती युरोपात आढळून येणारी आकाराने सर्वांत मोठी, कार्निव्होर (मांसाहारी) डायनॉसॉर्सची प्रजाती आहे. टी-रेक्सची लांबी १० मीटर असून तत्कालीन इकोसिसिस्टममधील तो सर्वांत वरच्या थराचा कार्निव्होर डायनॉसॉर होता.

संशोधनाचे वैशिष्ट्य

डायनॉसॉर्सची अंडी नीट तयार व्हायला साधारण १०० दिवस लागत असत, पण भ्रूणाच्या विकसनाच्या शेवटच्या टप्प्यात त्याची हाडे तयार होत असत. त्यामुळे भ्रूणांचे फॉसिल्स (जीवाश्मामध्ये) रूपांतर होणे अवघड असते, त्यामुळे असे दुर्मिळ फॉसिल्स सहजासहजी सापडत नाहीत. आणि नेमकं हेच लॉरिन्हामध्ये दोन वेळा घडलंय. दोन प्रकारच्या डायनॉसॉर्सची अंडी, एक टोरवोसॉर्स आणि एक लॉरिन्हासोर्स.

डायनोसॉरचा भ्रूणावशेष

कोणत्याही पक्ष्याचे अंडी जगात सर्वांत जास्त गतीने वाढणारी बायोमटेरिअल्स आहेत. या संशोधनाचा वापर जगात मेडिकल अप्लिकेशन म्हणूनही केला जाऊ शकतो, असे मत अनेक संशोधकांनी व्यक्त केले आहे. कारण, आपण कॅल्शियम कार्बोनेट इतक्या वेगाने कसे तयार करू शकतो हे समजून घेणे आणि इतर नवीन मेडिकलशी संबंधित पदार्थ  तयार करण्यासाठी याचे ऍप्लिकेशन्स आहेत का याची चाचपणी होणे देखील महत्त्वाचे आहे.

लॉरिन्हाच्या खडकांमध्ये अशी बरीच माहिती लपलेली आहे आणि पुढील वर्षांमध्ये अजून संशोधन होऊन आणखी नवीन गोष्टी शोधल्या गेल्या पाहिजेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

Next Post

आपल्याला नकोशा वाटणाऱ्या पण गर्दी नियंत्रित ठेवणाऱ्या ट्रॅफिक सिग्नललासुद्धा इतिहास आहे..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

आपल्याला नकोशा वाटणाऱ्या पण गर्दी नियंत्रित ठेवणाऱ्या ट्रॅफिक सिग्नललासुद्धा इतिहास आहे..!

सरकारच्या एका निर्णयामुळे भारतामध्ये एफ-१ रेसिंग सुरु होतंय ना होतंय, तोवर लगेच संपलंही..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.