The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॉंगकाँगमधील या ‘कॉफिन होम्स’मध्ये माणसं अगदी किड्यामुंगीसारखं जगतायत

by द पोस्टमन टीम
15 July 2024
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मुंबईच्या धारावीतील झोपडपट्टी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं म्हणतात. त्याठिकाणी १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या राहते. धारावीला अनेक समस्यांचं मूळ मानलं जातं होतं. मात्र, धारावीकर आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळं धारावीनं कात टाकली आहे. याठिकाणी अनेक गृहउद्योग सुरू आहेत. १० लाख युसएस डॉलर्स इतका एकट्या धारावीचा वर्षभराचा टर्नओव्हर आहे. एवढंच काय पण, कोरोनाच्या महाभयंकर महामारीवर धारावीकरांनी सर्वात अगोदर नियंत्रण मिळवलं. या सर्व सकारात्म गोष्टींकडे आपण सहज दुर्लक्ष करतो आणि झोपडपट्टी, तेथील रहिवासी आणि प्रशासनावर टीका करतो.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागलेला धारावी हा शाप आहे, असं अनेकजण म्हणतात. मात्र, आपल्या आशिया खंडात असं आणखी एक शहर आहे, ज्याला संपूर्ण जगाच्या आर्थिक उलढालीतील एक महत्त्वाचं केंद्र समजलं जातं. त्याठिकाणी हजारो लोक अक्षरश: किड्या-मुंग्यांप्रमाणं राहत आहेत, हे आपल्याला माहित आहे का?

हॉंगकॉंग!

हाँगकाँग म्हटलं की, लक्झरी ब्रँडनी, उंची दागिन्यांनी आणि निऑन रंगांमध्ये चकाकणारे शॉपिंग स्ट्रीट्स आपल्या डोळ्यांसमोर येतात. गगनचुंबी इमारतींमध्ये सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे व्यवसाय, दिवसागणिक डेव्हलप होणारं तंत्रज्ञान या गोष्टी हाँगकाँगच्या अविभाज्य घटक आहेत. या सर्व गोष्टींमुळं हाँगकाँग शहर हे जगातील सर्वांत मोठं आर्थिक केंद्र बनलं आहे. मात्र, या ग्लॅमरस दर्शनी भागाच्या मागे काही अतिशय विदारक गोष्टी लपलेल्या आहेत.



या शहरात जवळपास २ लाख लोक एका खुराड्याच्या आकाराच्या जागांमध्ये राहतात. २ लाखांमध्ये ४० हजार लहान मुलांचाही समावेश आहे. हे लोक ज्या घरांमध्ये राहतात त्या घरांना ‘कॉफिन होम’, म्हटलं जातं.

७५ लाख लोकसंख्या असलेल्या हाँगकाँगमध्ये जमिनीचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळं हाँगकाँगमधील गृहनिर्मिती व्यवसाय प्रचंड महाग झाला आहे. इंटरनॅशनली विचार केला असता, याठिकाणी घर घेण्यासाठी सर्वांत जास्त रक्कम मोजावी लागते. घर भाडे थकल्याने मालकांना घराबाहेर काढलेल्या हजारो लोकांना रिकामे पडलेले क्वाटर्स आणि झोपड्यांमध्ये रहावे लागत आहे. स्वयंपाकघर आणि शौचालय एकत्रच असलेल्या या कॉफिन होम्समध्ये राहण्याशिवाय दुसरा पर्याय या लोकांकडे नाही.

हे ‘कॉफिन होम’ एखाद्या क्युबिकलप्रमाणं असतात. त्यात फक्त एक बेड आरामात बसेल इतकीचं जागा असते. अनेक कॉफिन होम्सला गजांच्या भिंती असतात त्यामुळं त्यांना ‘केज होम’ असंही म्हटले जाते. अशा प्रकारच्या निवासस्थानांचा उगम हाँगकाँगमध्येच झाला आहे. साधारण १९५० आणि ६०च्या दशकादरम्यान ‘कॉफिन होम’ ही संकल्पना उदयाला आली.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

चिनी गृहयु*द्धात चीनच्या मुख्य भूमीवरील लोक मोठ्या संख्येने हाँगकाँगमध्ये गेले. यामुळं तेथील अर्थव्यवस्था आणि जन्मदर दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. घरांच्या वाढत्या मागणीला सामोरं जाण्याच्या प्रयत्नात, हाँगकाँग सरकारनं अनेक सार्वजनिक गृहनिर्माण वसाहती बांधल्या. मात्र, तरीही चिनी स्थलांतरित कामगारांचा अतिरिक्त भार सरकार हाताळू शकलं नाही, त्यावेळी तिथं घरं किंवा कामगार संरक्षणविषयक धोरणं आणि कायदे नव्हते. परिणामी भाडे शुल्क कमी असलेल्या कॉफिन होम्सच्या संख्येमध्ये वाढ झाली.

प्रामुख्यानं शाम शुई पो, माँग कोक, तो क्वा वॅन आणि ताई कोक त्सुई या जुन्या जिल्ह्यांमध्ये अशा वसाहती अस्तित्त्वात आहेत. अतिशय कमी उत्पन्न असणारे, वयस्कर, ड्रग ॲडिक्ट आणि कमी कुशल मजुर प्रामुख्यानं या घरांमध्ये राहतात.

हाँगकाँग विधानपरिषदेच्या अहवालांनुसार, जे लोक अनुदानित भाडे आणि वीज माफी यांसारख्या समाजकल्याण योजनांसाठी आपली पात्रता सिद्ध करू शकत नाहीत, असेच लोक कॉफिन होम्समध्ये राहतात.

येथील बहुतांशी रहिवासी हे पुरुष आहेत. या घरांची सुरक्षा व्यवस्था अतिशय कमकुवत असते. ‘कॉफिन होम्स’ नावानं कुप्रसिद्ध असलेल्या या घरांना हाँगकाँग सरकारनं मात्र, ‘बेड स्पेस अपार्टमेंट्स’ म्हणून मान्यता दिलेली आहे. ‘बेड स्पेस अपार्टमेंट’ अध्यादेशानुसार एका घरामध्ये १२ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती भाडेतत्वार बेड घेऊ शकतात. कॉफिन होम्स चालवणं त्याठिकाणी कायदेशीर ठरवण्यात आलं असून घरमालकाला त्याअगोदर विशेष परवाना काढवा लागतो.

आपल्याकडे ग्रामीण भागात कोंबड्या किंवा शेळ्यांची नवजात पिल्लं सुरक्षित ठेवण्यासाठी खुराड्यांचा वापर केला जातो. या कॉफिन होमची या खुराड्यांशी एकदम अचूक तुलना होऊ शकते. अपार्टमेंटमधील एका फ्लॅटची अनेक भागांमध्ये विभागणी केली जाते. एका भागामध्ये दोन किंवा तीन बेड्स असतात. त्यांची देखील लोखंडाच्या किंवा स्टीलच्या गजांनी विभागणी केलेली असते. म्हणजे एक बेड बसेल इतकी आणि त्याच्या बाजूची थोडीशी जागा हेच तुमचं घर असतं. त्याला दरवाजे नसतात.

एक प्रौढ व्यक्ती मोठ्या मुश्किलीनं त्याठिकाणी आपल्या गरजेच्या वस्तूंसह झोपू शकतो. या इतक्याशा जागेसाठीसुद्धा महिन्याकाठी जवळपास २ हजार ४०० हाँगकाँग डॉलर्स द्यावे लागतात.

नैसर्गिक प्रकाशाचा अभाव असलेली आणि कोंदट वातावरण असलेल्या या घरांचं तापमान देखील खूप जास्त असतं. साधारण ३४ अंश सेल्सियस तापमानात लोकांना रहाव लागतं. अनेकांचं तर किचन आणि टॉयलेट हे एकचं असतं. माशा, झुरळं, पाली, उंदीर आणि ढेकणांचं तर या ठिकाणी साम्राज्यच पहायला मिळतं.

‘कॉफिन होम्स’मध्ये राहणारे अनेकजण एकाकीपणाचे बळी ठरतात. कोंदट आणि अस्वच्छ घरांमध्ये राहिल्यानं अनेकजण मानसिक आजार आजारांना बळी पडतात. काही वृद्ध तर फक्त पिंजऱ्यात राहून आपल्या मृत्यूची वाट पाहत असतात.

हे सर्व दृश्य पाहून मी त्या दिवशी घरी आल्यानंतर धायमोकलून रडलो, अशी प्रतिक्रिया बेन लॅम या फोटग्राफरनं दिली. बेन यांनी चार वर्षांच्या काळात १००पेक्षा जास्त अपार्टमेंट्सला भेटी दिल्या आहेत. जेकब चेउंग दिग्दर्शित ‘केजमॅन'(१९९२) या चित्रपटात या घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची असाह्य परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार आणि सामाजिक व सांस्कृतिक हक्कांच्या आंतरराष्ट्रीय कराराच्या सार्वत्रिक घोषणापत्रानुसार कॉफिन होम्समुळं व्यक्तीच्या वास्तव्याच्या हक्कांचं उल्लंघन होतं. हाँगकाँगमधील अनेक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी गरीब आणि निराधार लोकांसाठी आणखी सरकारी घरे बांधण्याची विनंती केलेली आहे. सीएनएननं या कॉफिन होम्सच्या वातावरणाविषयी वार्तांकन केलेले आहे. त्यांनी या घरांना एका बुटाच्या खोक्याची उपमा दिली आहे.

बाहेरून सुंदर दिसणाऱ्या आणि जगातील सर्वांत श्रीमंत शहराच्या झगमगाटामागे इतका घट्ट काळोख दडलेला असेल याची कुणी सहसा कल्पनाही करवत नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गुडइयरचा हिशोब चुकला, नाहीतर आपल्या गाड्यांना अंधारात चमकणारे टायर्स दिसले असते

Next Post

‘टोयोटा वॉर’ या युद्धात सैन्याने चक्क टोयोटा लँड क्रूझर आणि पीकप वापरले होते

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

'टोयोटा वॉर' या युद्धात सैन्याने चक्क टोयोटा लँड क्रूझर आणि पीकप वापरले होते

या स्त्रीने आपण राजघराण्याचे वारस असल्याचे खोटे सांगून सरकारकडून महाल बळकावला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.