The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिकॅनो चळवळीने मेक्सिकन अमेरिकन लोकांना त्यांचा सन्मान मिळवून दिला

by द पोस्टमन टीम
10 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात तेव्हा तिचं रूपांतर चळवळीत होतं. चळवळी या नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. त्या सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. चळवळी या केवळ सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठीच होतात असे नाही; तर शासनाच्या काही निर्णयांना व धोरणांना विरोध करण्यासाठीही त्या होताना दिसतात. धार्मिक, सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक, पर्यावरणविषयक, स्वच्छताविषयक, अनिष्ट रूढी आणि प्रथा – परंपरा इत्यादी विविध विषयांतील प्रश्न चळवळीद्वारे हाताळले जातात.

अशीच एक मुलभूत चळवळ १९६० च्या दशकात घडून आली. ही चळवळ मुख्यतः मेक्सिकन आणि अमेरिकन यांच्यात होती. त्या चळवळीचे नाव होते ‘चिकॅनो चळवळ’. या चळवळीमुळे सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. १९६० पर्यंत मेक्सिकन अमेरिकन लोकांनी अनेक दशके अन्याय आणि भेदभाव यांचा सामना केला होता. मुख्यतः अमेरिकेच्या पश्चिम आणि नैऋत्य भागातील लोक याला बळी पडले होते.

१८४८ साली अमेरिकन आणि मेक्सिकन यांच्यातल्या यु*द्धाला गोडालूप हिंडाल्को करारान्वये पूर्णविराम मिळाला. या करारानुसार ज्या मेक्सिकन लोकांनी अमेरिकेच्या ताब्यातील प्रदेशात राहण्याचे ठरवले, त्यांना नागरिकत्व प्रदान करण्याचा आणि त्यांची मालमत्ता, भाषा आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार देण्यात आला. परंतु नंतर अनेक मेक्सिकन लोकांना अमेरिकेमध्ये आपल्याला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे असे लक्षात आले. यामध्ये अमेरिकेत नंतर स्थलांतरित झालेले आणि अमेरिकेच्या सीमांलगतच्या प्रदेशात राहणारे मेक्सिकन लोकही होते.

मेक्सिकन अमेरिकन यु*द्धानंतर त्यांच्या जमिनीला जे अनुदान मिळणार होते ते अमेरिकन सरकारने काढून घेतले. त्यामुळे या प्रदेशातील लोक मोठ्या संख्येने गरीब झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनेक मेक्सीकन-अमेरिकन लोकांनी अमेरिकन लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला गोऱ्या अमेरिकन लोकांप्रमाणे नागरी हक्क मिळावे यासाठी कायदेशीर लढाही दिला, परंतु त्याला यश आले नाही. याचाच परिणाम म्हणून १९६० च्या उत्तरार्धात ‘चिकॅनो चळवळ’ आकाराला आली.

चिकॅनो हा मेक्सिकन लोकांसाठी वांशिकदृष्ट्या बट्टा म्हणता येईल असा शब्द आहे. मात्र या चळवळकर्त्यांनी तोच निवडला आणि तो अभिमानाने मिरवलाही. केवळ आपल्या स्पॅनिश किंवा युरोपियन मुळालाच मान्यता न देता या त्यांनी त्यांचं आफ्रिकन असणं आणि इतर स्थानिक प्रदेशांमध्ये राहणं हेही साजरं केलं. या चळवळीतील नेत्यांनी अमेरिकन समाजाच्या विविध भागांमध्ये कामगार कायदे, शैक्षणिक सुधारणा तसेच जमीन सुधारणा यासंबंधी बदल घडवून आणले. या चळवळीने अनेक प्रश्नांना हात घातला, पण त्यात सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न होता तो म्हणजे शेतमजुरांचा प्रश्न.



सीझर शॅवेझ आणि डोलोरेज हुएर्ता यांनी ‘नॅशनल फार्मवर्कर्स असोसिएशन’ नावाची संघटना स्थापन केली. ही संस्था नंतर युनायटेड फार्मवर्कर्स या नावाने कॅलिफोर्नियामध्ये ओळखली जाऊ लागली. सामाजिक आणि आर्थिक सुधारणांसाठी लढा देणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट होते. स्वतःच्या शॅवेझचा जन्म मेक्सिकन अमेरिकन स्थलांतरित शेतमजुरांच्या कुटुंबात झाला होता आणि त्यामुळे शेतमजुरांना मिळणाऱ्या अन्याय्य आणि अपमानजनक वागणुकीचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला होता.

जानेवारी १९६८ मध्ये शॅवेझने द्राक्षांच्या बागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या संपाला पाठिंबा दिला. हा संप फिलीपिन्सची कामगार संघटना असलेल्या अग्रिकल्चरल वर्कर्स ऑर्गनायझेशन कमिटीने घडवून आणला होता. शॅवेझ, हुएर्ता आणि फिलीपिनो अमेरिकन ऑर्गनायझर लँरी इटलीओंग यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून या संघटनेने आपल्या अनेक मागण्या मान्य करून घेतल्या.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

शॅवेझने आपल्या लेटर फ्रॉम देलानो मध्ये लिहिले आहे, “आम्ही पुरुषांनी आणि स्त्रियांनी आजवर आमच्या गरिबीमुळे आणि आम्हाला सतत गरीब ठेवलं गेल्यामुळे खूप काही सहन केले आहे. आमच्या त्वचेचा रंग, आमची भाषा, सांस्कृतिक मूळ, शिक्षणाचा अभाव आणि लोकशाही प्रक्रियेतून आम्हाला वगळल्यामुळे आमच्या पिढ्यानपिढ्यांवर जे ओझे लादले गेले आहे, त्यामुळे आमचे मनोधैर्य सतत खच्ची झाले आहे. आम्ही भाड्याचे गुलाम नाही, तर माणसे आहोत.”

लेबर व्यतिरिक्त त्यांच्यासाठी जमीन हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. नागरी हक्क कार्यकर्ता रेईस टिजेरीना याने १८४८ च्या कराराचे उल्लंघन करून ब्रिटिश वसाहतकारांनी ताब्यात घेतलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी चळवळ सुरू केली. टिजेरीना स्वतः टेक्सास मध्ये लहानाचा मोठा झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो शेतात काम करत होता.

१९५३ साली त्याने ‘ला अलीयांझा फेडरल डी मर्सिडीज’ ही संघटना स्थापन केली आणि त्यानंतर तो चिकॅनो चळवळीचा माल्कम एक्स आणि किंग टायगर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या संघटनेने अनेक बंडे पुकारली. त्याचप्रमाणे न्यू मेक्सिको येथील एका छोट्या शहरात चिकॅनो वर्गासाठी मालमत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी सशस्त्र हल्ला चढवला. जमिनीचा ताबा परत मिळवण्याचे प्रयत्न शेवटी कोर्टकचेऱ्यांमध्ये अडकल्यामुळे स्थगित झाले.

त्याचदरम्यान एक समांतर चळवळ उभी राहिली. ही चळवळ मेक्सिकन अमेरिकन विद्यार्थ्यांची चळवळ होती आणि गोंडालेझ नावाचा कवी तिचा प्रणेता होता. मार्च १९६९ साली झालेल्या एका मेळाव्यात जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या मेळाव्या दरम्यान जमलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वजांचा म्हणजे अझटेक साम्राज्याच्या स्थानिक नेत्यांचा आधार वाटत होता.

त्यांनी अझ्टलँड नावाचा प्रदेश निश्चित केला. अझटेक लोककथेमध्ये अझ्टलँड हा उत्तर मेक्सिको आणि त्याच्याही बऱ्याच उत्तरेकडे असलेल्या अमेरिकेच्या नैऋत्य भागापर्यंत पसरलेला आहे असा विश्वास आहे. या विद्यार्थ्यांनी अझ्टलँड ही संकल्पना त्यांची अध्यात्मिक मातृभूमी म्हणून स्वीकारली. त्यासाठी त्यांनी एक करारनामाही तयार केला होता. चळवळीची संघटित ताकद वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू केले.

अखेरीस चिकॅनो चळवळ यशस्वी झाली. तिच्यामुळे अनेक सुधारणा घडून आल्या. यामध्ये प्रामुख्याने नैऋत्येला द्विभाषिक आणि दोन विभिन्न संस्कृती समाविष्ट करून घेईल असा कार्यक्रम निर्माण झाला. स्थलांतरित कामगारांची परिस्थिती सुधारली. चिकॅनो जमातीच्या शिक्षकांना शिक्षक म्हणून नोकऱ्या मिळाल्या. याशिवाय निवडून आलेले अधिकारी म्हणून काम करण्याचा अधिकार अनेक मेक्सिकन अमेरिकन लोकांना मिळाला. हे यश केवळ चळवळीचे नाही, त्यानिमित्ताने दिसून आलेल्या आत्मनिर्धाराचे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मंगोल राजकुमारी ‘खुटुलुन’ त्याकाळातली सर्वात शक्तिशाली महिला होती..!

Next Post

एका चित्रपटात भूमिका केल्यामुळे ‘ब्रॅड पीट’ला चीनमध्ये यायची बंदी घातली होती

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

एका चित्रपटात भूमिका केल्यामुळे 'ब्रॅड पीट'ला चीनमध्ये यायची बंदी घातली होती

केबीसीत ५ करोड जिंकूनही सुशील कुमार दिवाळखोर बनला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.