आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज कोणी आपल्याला सांगितलं कि एक बदली चोरी झाली यावरून दोन देशांमध्ये फार मोठ्ठं यु*द्ध झालं होतं, तर आपण त्याला वेड्यात काढू. पण हे घडलंय, इटलीमधील मोडेना आणि बलोना या दोन राज्यांमध्ये. साधारण बाराव्या ते चौदाव्या शतकात जेव्हा युरोपमध्ये रेनेसन्सचा काळ होता तेव्हा बऱ्याच छोट्या मोठ्या लढाया होत होत्या.
हे सुरु झालं, जेव्हा रोमन सम्राट फ्रेडरिक बार्बारोसा हा इटलीवर कब्जा करण्याच्या इराद्याने चाल करून गेला. पोप जॉन १२वा याने पहिल्या रोमन सम्राटाचा राज्याभिषेक केला होता आणि त्यामुळेच सगळे पोप ह्यांनाच देव आणि माणसांमधला दुवा व ख्रिस्ती धर्माचे नायक मानायचे.
फ्रेडरिकला हे मान्य नव्हतं. देवाने त्याला आपला पृथ्वीवरील प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे अशी त्याची मान्यता होती, परंतु इटलीला हे मान्य नव्हतं.
त्याने इटलीवर ह*ल्ला करून इटलीतील मिलान, टॉर्टना आणि पाव्हिया याचबरोबर बॉलोग्ना आणि टस्कनी हि राज्यंदेखील काबीज केली. पोपशी झालेल्या निष्फळ मध्यस्थीचा परिणाम त्याने अधिकाधिक शहर काबीज करायला सुरुवात केली. शेवटी २९ मे ११७६ साली लेग्नानोच्या यु*द्धात त्याचा पराभव होऊन त्याला जर्मानीला पळ काढावा लागला. पण त्यांनी चालू केलेला वाद पुढे कितीतरी शतकं इटलीमध्ये चालू होता. या लढाया दोन गटांमध्ये होत. एक पोप आणि बिशपला समर्थन करणारा गट, गुएल्फ्स आणि दुसरा जो रोमन सम्राटाच्या बाजूने होतं, घिबेलिन्स.
मोडेना आणि बॉलोग्ना हे दोन तसं बघितलं तर शेजारी देश पण मोडेनीस सम्राटाच्या बाजूने होते तर बोलग्नीसचे समर्थन पोपला होते. साधारण एकोणिसाव्या शतकापर्यंत इटली एकसंध नव्हता.
त्यात रेनेसान्सच्या काळात देश राजकीय, सैन्याच्या आणि आर्थिक नियंत्रणासाठी अनेक यु*द्धं लढली गेली. मोडेना आणि बॉलोग्ना देखील कायम तणावाखाली होते.
१२९६ मध्ये बॉलोग्ना ने मोडेनावर हमला करून बाझ्झानो आणि सेव्हिग्नोवर कब्जा मिळवला. १३०९ साली मांटुआ, मोडेना, परमाँ आणि रग्गीओ हे रिनाल्डो “पासेरिनो” बोनकॉसीच्याअधिपत्याखाली आले. त्याच्या राजवटीखाली बॉलोग्नावर अधिकाधिक ह*ल्ले होऊ लागले परिणामी पोप २३वा जॉन याने बोनकॉसी याला चर्चचा शत्रू म्हणून घोषित केले.
१३२५ च्या दरम्यान दोन्ही देशांमधील चकमकी वाढत गेल्या. बॉलोग्नाच्या लोकांनी मोडेनावर सतत ह*ल्ले करून तिथल्या लोकांचे जीवन विस्कळीत करून टाकले.
शेतीची लुटमार करणे, माणसांची ह*त्या करणे, हे काय थोडे म्हणून परतीच्या वाटेत येतील तेवढी शेतं जाळून टाकत. काहींनी त्यांच्या कामगिरीचं प्रतिक म्हणून त्यांनी केलेली लूट परतीच्या वाटेवर सजवून ठेवली.
याचा बदला बोनकॉसीने मोन्तेव्हेग्लिओचा किल्ला काबीज करून घेतला. तेवढ्यात काही मोडेनाच्या सैन्याने बॉलोग्नामध्ये घुसण्यात यश मिळवले. त्यावेळी शहराच्या मध्यभागी एक मुख विहीर असे, त्याच विहिरीच्या बादलीमध्ये मोडेनाची काही लूट ठेवली होती. ती मोडेनाच्या सैन्यांनी पळवली आणि आपल्या विहिरीवर अभिमानानी आणून ठेवली.
या घटनेने क्रोधीत झालेल्या बॉलोग्नाने लुटीची बादली परत मागितली ज्याला मोडेनाने साफ इन्कार केला आणि यातूनच एका घमासान यु*द्धाची सुरुवात झाली.
आपल्या ३०,००० सैनिकांचे पायदळ आणि पाच हजाराचे घोडदळाची जमवाजमव करून बॉलोग्नाने यु*द्ध घोषित केले. याविरुद्ध मोडेनाकडे फक्त ५०००चे सैन्य आणि २०००चे घोडदळ होते. दोन्ही शहरांच्या मध्यभागी दक्षिणेकडे झाप्पोलिनो गावाजवळ दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले.
त्यावेळी मोडेनाला एवढ्या सैन्यबळापुढे आपला निभाव लागणार नाही याची जाणीव झाली. तरीही सुर्यास्त्यानंतर मोडेनाच्या सैन्याने ह*ल्ला करायला सुरुवात केली परिणामी बॉलोग्नीस सैन्य माघारी जाऊ लागले.
हळूहळू मोडेनीस सैन्य शहराच्या जवळ येऊन ठेपले आणि शहराच्या तटबंदीला घेराव घालण्याच्या ऐवजी त्यांनी क्रेस्पेलींनो, झोला, सम्मोगिया, अँझोलो आणि कॅस्टलफ्रँको या किल्लांच्या तटबंदीला नष्ट करण्यास सुरुवात केली.
ते एवढ्यावरंच थांबले नाही. त्यांनी चक्क बॉलोग्नाला पाणी पुरवणाऱ्या नदीचा बंधारा उ*द्ध्वस्त करून, आता तुम्हाला त्या बादलीची गरजच नाही असे सूचित केले. याचबरोबर त्यांनी बॉलोग्नाच्या तब्बल २६ उमरावांना मोडेनामध्ये ओलीस ठेवले.
बॉलोग्नाला पूर्णतः अपमानित करून मोडेनीस सैन्याचे मन भरले नाही. त्यांनी संपूर्ण शहरातून एक मिरवणूक काढली ज्यात त्यांनी बादलीच्या लुटीचे आणि त्यानंतर झालेल्या लढाईचे नाट्यरूपांतर सादर करत बॉलोग्नीसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
या यु*द्धामध्ये दोन्ही बाजूने दोन हजारावर जीवितहानी झाली.
यानंतर पण १५२९ पर्यंत घिबेलिन्स-गुएल्फ्स यांच्यातील छोट्यामोठ्या लढाया चालूच होत्या. त्या थेट स्पेनच्या चार्ल्स पहिला याच्या इटलीवरील आक्रमणापर्यंत, ज्याने या दोन्ही गटांना एक होण्यास भाग पाडले.
पण चार्ल्स हादेखील रोमन सम्राट असल्याने पोपच्या बाजूने असलेल्या घिबेलिन्स गटाची ताकद कमी झाली. या यु*द्धानंतर लढाईचे प्रतिक म्हणून ती “ओकची बादली” मोडेनामध्ये प्रदर्शित करण्यात आले. आज ६३४ वर्षानंतरही मोडेनामध्ये त्या बादलीची प्रतिकृती प्रदर्शनास ठेवली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









