आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात वस्तू आणि प्राण्यांची त*स्करी, घुस*खोरी, दहश*तवादी हल्ले असे प्रकार अनेक वर्षांपासून विशेषतः सीमावर्ती भागात घडत आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे ५५ कोटी देऊन वर्षाला सुमारे ५ लाख कोटी इतका खर्च सैन्यावर करायला लागेल, असा शेजारी देश आपल्यातीलच काहींच्या कृपेने तयार करण्यात आला. वर्षाकाठी एवढा मोठा खर्च करूनही सैन्याच्या काही मर्यादांमुळे दह*शतवादी हल्ले आणि तस्करीचे प्रकार होत आहेत. तरीही सतत जागृत असलेल्या आणि आता अद्ययावत उपकरणं मिळालेल्या पराक्रमी सैन्यामुळे असे प्रकार आता कमी झाले आहेत.
हे प्रकार रोखण्यासाठी आणि प्रामुख्याने गायींच्या तस्क*रीला आळा घालण्यासाठी पश्चिम बंगालच्या सीमा सुरक्षा दलाने गायींना ओळखपत्र द्यायला सुरुवात केली होती. इतकं करूनही काही स्वार्थी लोकांच्या मदतीने का होईना पण गायीची तस्करी पश्चिम बंगालमधून सुरुच होती. मूळ भारतीय संस्कृतीत घरी गायी असण्याला गो-धन म्हणून संबोधलं आहे.
अगणित फायदे असल्याने ‘गाय’ अमूल्य आहे, आणि म्हणूनच जगातील अनेक भागात गायींची तस्करी होते. बहुतांश भागात गोमांसासाठी तर काही भागात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी. भारतातही मोठ्या प्रमाणावर गायीची तस्करी होते, विशेषतः सीमावर्ती भागांतून, गोमांसासाठी!
एका स्थानिक अहवालानुसार, भारतातून “दररोज” वीस ते तीस हजार गायींची तस्करी होते. यातील बहुतांश तस्करी पश्चिम बंगालच्या वाटेने होत असल्याचं समोर आलं. भारतातील कायद्यानुसार गायींच्या निर्यातीवर बंदी असून भारतातून मोठ्या प्रमाणावर गायींची तस्करी करण्यात येते. बहुतांशी गोमांसासाठी ही तस्करी बांग्लादेश आणि पाकिस्तानातून चालते. इस्लामी सणांच्या वेळेला तर या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. फक्त पश्चिम बंगाल मधूनच नाही तर पंजाब आणि हरियाणा सारख्या लांबच्या ठिकाणावरून सुद्धा गायीची तस्करी बांग्लादेशात ट्रकद्वारे केली जाते. स्थानिकांच्या मते काही लोकांना तस्करीमध्ये मदत करण्यासाठी पैसे मिळतात.
वर सांगितल्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या सीमा सुरक्षा बलाने गायींना ओळखपत्र देण्यास सुरुवात केली होती, त्याआधीही काही संस्थांनी पुढाकार घेऊन गायींची मोजणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचे ठरवले होते. पण काही वर्षांपूर्वी गोमांस खाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे भारतातून त्यावर्षापासून रोज हजारो गायींची तस्करी होत असे.
मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी होत असलेल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सीमा सुरक्षा बलाने याप्रकरणात जातीने लक्ष देऊन काम केले आणि वाढती गायींची तस्करी लक्षात घेऊन २०१७ साली गायींना ओळखपत्र देण्याची ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबवली. २०१७ मध्येच सीमा सुरक्षा बलाने गायीच्या तस्करीचे अनेक कट हाणून पाडले होते. त्यापैकीच एक घटना आश्चर्याचा धक्का देणारी होती. गुरांच्या तस्करांकडून चहाच्या बागेतून, भारत-बांग्लादेश सीमेवर एक भुयार बांधण्यात येत असल्याची माहिती सीमा सुरक्षा बलाला कळाली.
सीमा सुरक्षा दलाला चोप्रा-फतेहपूर सीमा-सुरक्षा चौकीजवळ, भारत-बांग्लादेशच्या सीमेनजीक, गुरांच्या तस्करांनी चहाच्या बागेतून तब्बल ८० मीटर लांबीचा भुयारी मार्ग खोदलेला आढळला. बिहारमधील किसनगंजला लागून उत्तर बंगालमध्ये हे भुयार सापडलं होतं. “तस्कर बांगलादेशात गुरांची तस्करी करण्यासाठी सीमेच्या कुंपणाखाली भुयार खोदत आहेत.” असे सीमा सुरक्षा बलाचे उपमहानिरीक्षक देवी शरण सिंग यांनीसीमा सुरक्षा बलाच्या किसनगंज येथील सेक्टरल मुख्यालयात पत्रकारांना सांगितले.
रात्रीच्या अंधारात बराच काळ गुरांचे तस्कर चहाच्या बागेतून हे भुयार तयार करीत होते. तसेच हे भुयार सापडल्यानंतर सीमा सुरक्षा बलाने सीमेवर गस्ती वाढवली. काही सीमा सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांच्या मते हे भुयार तस्करांबरोबरच दहशतवादीही वापरत असल्याची शक्यता होती.
याची गांभीर्याने दखल घेत उत्तर दिनाजपूरच्या तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी आयेशा राणी यांनी संभाव्य धोक्याबाबतची तक्रार उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवली, त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक अमित कुमार भरत राठोड यांनी दिले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि सर्व संभाव्य कारणं आणि परिणाम यांचा ते सखोल अभ्यास करत आहेत.
गेल्या २० वर्षांमध्ये, सीमा सुरक्षा बलाने दहशतवादी किंवा तस्करांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या सीमेवर भुयार खोदल्याच्या अनेक घटनांचा शोध घेतला आहे. २०१७ मध्येच मार्चच्या सुरुवातीला सीमा सुरक्षा बलाने मेघालय राज्यात २०-२५ फूट खोल भुयार शोधला होते. हे भुयार आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे २०० मीटर अंतरावर होते.
या घटनेच्या एका आठवड्यानंतर, मार्चमध्ये, त्रिपुरा राज्यातील सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी तस्करांना शोधून काढले. ते भारतातून बांग्लादेशात गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न करीत होते. सीमा सुरक्षा बलाच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तस्करांवर गोळीबार केला, त्यापैकी तीन ठार झाले.
बांग्लादेशाबरोबर असलेल्या सीमांच्या अनेक भागांमध्ये लोखंडी तार नसूनही आणि काही ठिकाणी सीमा उघडी असून सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी अवैध स्थलांतरण करणाऱ्या लोकांना आणि तस्करांना आळा घालायला मोठे यश आले आहे. त्यानंतर सीमा सुरक्षा बलाने पुढाकार घेत गायींना ओळखपत्र देण्याची मोहीम सुरु केली. आजमितीस गायींची तस्करी पूर्वीपेक्षा कमी झाली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.