The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे ब्रिटीशांनी काढलेले हे पेंटिंग्ज तुम्ही पाहिलेत का…?

by शंतनू परांजपे
4 February 2025
in इतिहास, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


इंग्रज आणि डॉक्युमेंटेशन यांचे एक वेगळेच नाते आहे. जिथे जिथे इंग्रजांनी वसाहती तयार केल्या तिथल्या सर्व प्रदेशांच्या नोंदी त्यांनी उत्तम प्रकारे केल्या. महाराष्ट्रातसुद्धा इंग्रज होतेच. त्याकाळात अनेक इंग्रज प्रवाशांनी, इंग्रज अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र फिरला. या फिरस्तीमध्ये त्यांनी अनेक स्थळांची चित्रे काढली. यात लेणी, किल्ले यांचा समावेश होता.

आजच्या या लेखांमध्ये आपण पाहूया इंग्रजांनी काढलेली काही निवडक चित्रे.

1. गाळणा किल्ला

नाशिक जिल्ह्यातील मालेगावपासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. नाशिक व धुळे यांच्या सीमारेषेवर असलेला हा किल्ला धुळेपासून अधिक जवळ आहे.

८ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे.



किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे याठिकाणी भरपूर वर्दळ असते.

Gaulnah fort drawn from the Northward D. 1/4′ [quarter]’ of a mile.’ 1795 (Artist – John Johnson)

2. वसई किल्ला

वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे.

किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वार असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती. चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव येथे करून त्यांची सत्ता उत्तर कोकणातून उखडून टाकली.

 

‘View in Basseen Fort’. Captain James Barton’s 12 Views of Hill Forts in the Western Ghats near Bombay, London, c.1820. Pl. 7.


3. पुरंदर किल्ला

पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे़. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ सह्याद्रीतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वरजवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत.

कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे.

गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.

Hill Fort, Poorandhur – Nash, Alexander (fl. 1834-1846)

4. सातारा किल्ला 

अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातीलच एक किल्ला आहे. गावातून गडावर जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. मराठा साम्राज्याची राजधानी सातारा किल्ल्यावर शाहू राजांच्या काळात होती. हा किल्ला छत्रपतींची खासगी मालकी आहे.

Satara. Bare landscape with fort on hilltop; bungalow at foot of hill – Bellasis, George Hutchins (1807-1862)

५. माहुली किल्ला

माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आसनगाव जवळ वसलेला आहे. माहुली, भंडारदुर्ग आणि पळसगड अशा तीन दुर्गांनी मिळून हा एक किल्ला झाला आहे.

किल्ल्याची चढाई तशी अवघड असून गडाच्या खाली घनदाट जंगल आहे. गडावर चढाईसाठी अनेक सुळके आहेत.

Hill Fort of Bhow Mullen’. Captain James Barton, 12 Views of Hill Forts in the Western Ghats near Bombay, London, c.1820. Pl.1.

६. कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ला हा पनवेलपासून साधारण १० किमी अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावर आहे. त्याच्यावर असणाऱ्या अंगठ्यासारख्या सुळक्यामुळे कर्नाळा दुरून देखील ओळखता येतो. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य देखील असल्याने पावसाळ्यात व थंडीत येथे पर्यटकांची बरीच गर्दी असते. किल्ला चढायला अतिशय सोपा आहे.
Hill Fort of Kurnallah – Ackermann, Rudolph (1764-1834)

७. विशाळगड किल्ला

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.
पुण्याहुन कराडला गेल्यालर पुढे पाचवड फाटा, तेथुन उजवीकडे वळल्यावर २० किमी वर शेडगेवाडी गाव लागते. डावीकडे वळल्यावर ४ किमीवर केकरुड गाव लागते. नंतर नदीवरील पुल ओलांडल्यावर लगेच उजवीकडे वळा.
केकरुड घाट, मलकापुरला कोल्हापुर रत्नागिरी हायवेवर आंबा गावातुन डावीकडे विशाळगडाकडे वाट जाते.
Hill Fort of Veshallgheen’. Plate 1 from Eight Most Splendid Views of India, sketched by an officer in the Indian Army, drawn and printed by Baron A. Friedel, London, 1833

८. प्रतापगड

जावळीच्या निबिड खोऱ्यात वसलेला हा किल्ला अफजलखान वधाच्या घटनेमुळे प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरपासून जवळ असलेला हा किल्लासुद्धा छत्रपतींची खासगी मालकी आहे. गडावर गाडी जात असल्याने पर्यटकांची इथे सतत वर्दळ असते.

View from the fort of Pratapgarh – Carpenter, William (1818-1899)

या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

औरंगजेबाचे इस्लामी धर्मवेड आणि तथाकथित इतिहासकारांचा अप्रमाणिकपणा

Next Post

भटकंती: छ. संभाजीनगरची नहर-ए-पाणचक्की

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

भटकंती: छ. संभाजीनगरची नहर-ए-पाणचक्की

या चीनी सम्राटाने मरणोत्तर सुरक्षिततेसाठी ८००० पुतळ्यांची फौज बनवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.