The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्रजांना लुटून गरिबांना दान करणारा सुलताना डाकू रॉबिनहूडपेक्षा कमी नव्हता

by द पोस्टमन टीम
8 May 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


तुम्ही ‘गँग्स ऑफ वासेपूर’ बघितला आहे का? बघितला असेल तर तुम्हाला शाहीद खान नक्की आठवत असेल. तोच जो सुलताना डाकुच्या इंग्रजांची ट्रेन लुटायच्या गोष्टी ऐकून आपल्या गावातून जाणारी मालगाडी लुटू लागतो. पण सुलताना डाकूच्या गोष्टी फक्त गोष्टीच होत्या की खरंच अशी कोणी खुंखार व्यक्ती अस्तित्वात होती. जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल.

स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ होता साधारण १२० वर्षांपूर्वीचा. उत्तर प्रदेशात एका मुलाचा जन्म झाला आणि पुढे जाऊन यानेच इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. भारतातून लुटीचे धान्य आणि खजिना नेत असलेल्या इंग्रजांच्याच ट्रेन लुटून तो त्यातील माल गोरगरिबांच्यात वाटून देत असे. पण हे फक्त इंग्रजांपुरतेच मर्यादित नव्हते. जे जे श्रीमंत लोकं गरिबांकडून पैसा लुबाडत, इंग्रजांची चापलुसी करत त्यांना त्याने अशीच वागणूक दिली. याच कारणाने तो गावकऱ्यांमध्ये लोकप्रिय होता.

असं म्हणतात की, सगळीकडे आपला दबदबा निर्माण करणाऱ्या ह्या सुलताना डाकूचा जन्म एका मुस्लीम कबिल्यात झाला होता. त्याने महाराणा प्रताप यांच्या घोड्यावरून आपल्या घोड्याचे देखील नाव चेतक ठेवले होते.

वयाच्या सतराव्या वर्षीच त्याने डाकू बनून धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. गरिबांवर होणाऱ्या अन्यायांमुळेच तो इंग्रजांच्या विरोधात उभा ठाकला होता. शोषितांचे अन्याय दूर करणारा एक मसीहा म्हणून त्याच्याकडे लोक बघायचे. हळूहळू त्याच्यामागे गावकरी उभे राहू लागले, त्याला मदत करू लागले. आणि एका वर्षातच त्याच्या टोळी जवळजवळ १०० लोकांची झाली.

सुलतानासाठी गोरगरिबांकडून त्यांच्या मेहनतीचा लुटलेला इंग्रजांचा माल नेहमी निशाण्यावर असायचा. त्या काळात उत्तर प्रदेशच्या नजीबाबाद भागात सुलतानाच्या नावाने चांगलाच दबदबा निर्माण केला होता. गोर-गरिबांसाठी जरी सुरक्षित असला तरी इंग्रजांसाठी मात्र मृत्यूचा रस्ता बनला होता.



सुलतानाची माणसं या भागातील कोपऱ्या कोपऱ्यावर नजर ठेवून असायची. लाच खाणारे अधिकारी, गरिबांना त्रास देणारे श्रीमंत सावकार असे लोक त्यांच्या निशाण्यावर असायचे. त्यावेळी नैनिताल आणि देहरादूनला जाणारा एकमेव रस्ता नजीबाबादहून जात असे. तिथे हे डाकू सापळा रचून बसत आणि जाणाऱ्या इंग्रजांना लुबाडून लु*ट घेतल्याशिवाय सोडत नसत.

तो २२ वर्षाचा झाला तोवर त्याची दह*श*त उत्तर प्रदेश पासून पंजाब आणि मध्य प्रदेशात पसरली होती. लुटलेला माल तो आजूबाजूच्या गावांत वाटून द्यायचा. गावातील जनतेसाठी जाचापासून सोडवणारा मसीहा बनला तर इंग्रजांसाठी एक डाकू, अपराधी.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

त्यांनी सुलतानाला पकडण्याचे बरेच प्रयत्न केले. पण तो कधीच पकडला गेला नाही. ३०० जवानांची एक टीम सुलतानाला शोधण्याच्या कामात लागली होती. या कामासाठी पर्सी बिंडहम याची नियुक्ती करण्यात आली होती पण त्याला यश न मिळाल्याने त्याने फ्रेडी यंग याला कामाला लावले.

याच काळात हल्द्वानीच्या खडक सिंह नावाच्या एका जमीनदाराचे घर सुलतानाने लुटले होते आणि त्याला आपला शत्रू बनवून घेतला. हे जेव्हा यंग आणि जिम कॉर्बेटला कळले तेव्हा त्यांनी खडक सिंहला सोबत घेऊन सुलतानाला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याला मारण्यासाठी जिम कॉर्बेटची नेमणूक केली होती. पण त्यात त्याला यश मिळाले नाही.

Jim Corbett, Captin Freddy Young
Jim Corbett, Captin Freddy Young

सरतेशेवटी फ्रेडी यंग या अधिकाऱ्याने सुलतानाला जिवंत पकडण्यात यश मिळवले.

पकडल्या गेल्यावर फ्रेडीने त्याला माफी मागण्याचे अनेक मौके दिले पण सुलतानाने माफी मागितली नाही. सुलतानाला त्याच्या मुलाला डाकू बनू द्यायचे नव्हते आणि त्याने तशी शिफारस यंगकडे केली. असं म्हणतात की, फ्रेडी यंगनेच सुलतानाच्या मुलाला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले.

सुलतानाला पकडल्यानंतर त्याला साथ देणाऱ्या ४० कुटुंबाना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली.

आणि सरतेशेवटी ७ जुलै १९२४ रोजी १५ साथीदारांसोबत गरिबांच्या ह्या मसीहाला आग्रा जेलमध्ये फाशी झाली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कपडा लत्ता शकल सुरत सब सवासो करोड जैसी है मेरी.. नही ढुंढ पाओगे!

Next Post

बाजी राऊत – देशासाठी शहीद होणारा वयाने सर्वात लहान स्वातंत्र्यसैनिक

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

बाजी राऊत - देशासाठी शहीद होणारा वयाने सर्वात लहान स्वातंत्र्यसैनिक

एवढ्याश्या इस्त्राईलने आठ अरब राष्ट्रांना फक्त सहा दिवसांत धूळ चारली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.