The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हुकुमशहा स्टॅलिन जनतेपुढे स्वतः न येता कायम तोतयाला पाठवायचा

by द पोस्टमन टीम
27 July 2020
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


चित्रपटात जेंव्हा एखादा स्टंट करायचा असतो तेंव्हा अभिनेता किंवा अभिनेत्रीऐवजी हुबेहूब त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती घेतली जाते आणि तो सीन पूर्ण केला जातो. अनेकदा जेंव्हा न्यूड सिन्स द्यायचे असतील तेंव्हाही अभिनेत्रीसाठी असेच केले जाते. याला बॉलीवूडमध्ये बॉडी डबल म्हणतात.

बॉलीवूडच नाही तर राजकारणातही असे तोतये वापरले जातात. बड्या बड्या नेत्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेता, राजकारणी असे प्रयोग करत असतात.

अलीकडेच उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांच्या प्रकृती अस्वस्थ असल्याची बातमी व्हायरल झाली होती. काही दिवस अज्ञातवासात असलेले किम अचानक एका उद्घाटन समारंभात दिसले. तेव्हा पत्रकारांना शंका आली आणि थोडे निरखून बघितल्यावर लक्षात आले की हे खरे किम जोंग नसून त्यांचा तोतया आहे.

अर्थात, जागतिक स्तरावरील राजकारण्यांनी अशा प्रकारचे तोतये वापरण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही असे प्रकार घडले आहेत. जागतिक इतिहासात अनेक हुकुमशहा होऊन गेले. या क्रूर हुकुमशहांच्या क्रूरपणाचे किस्से आजही चर्चिले जातात. असाच एक हुकुमशहा ज्याचे नाव आजही काही ना काही कारणाने चर्चेत असते. ते म्हणजे, जोसेफ स्टॅलिन.



जोसेफ स्टॅलिनने सोव्हिएत युनियनमध्ये सत्तेत राहून संपूर्ण देशात आपली हुकुमत गाजवली होती. स्टॅलिनचा त्याच्या देशातील जनतेवर प्रचंड प्रभाव होता. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी त्याने अत्यंत क्रूर कारस्थान रचले होते. सरकार विरोधात लिहिणारे पत्रकार, अधिकारी, विरोधक यांची त्याने हत्या घडवून आणली होती.

आपली सकारात्मक प्रतिमा बनवण्यासाठी त्याने बरेच भाट आजूबाजूला ठवले होते. त्याला कायम स्वतःचा घातपात होण्याची खूप भीती वाटत असे. स्टॅॅलिनने देशावर वर्चस्व राखण्यासाठी देशातील प्रसार माध्यमांना ताब्यात ठेवले. हजारो लोकांच्या कत्तली घडवून आणल्या.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

त्याला सार्वजनिक कार्यक्रम किंवा जाहीर कार्यक्रमात जाताना नेहमी भीती असे की त्याचा काहीतरी घातपात होईल. म्हणून त्यानेही असे तोतये ठेवले होते. स्टॅॅलिनसारखेच दिसणारे हे तोतये त्याच्यावतीने सार्वजनिक कार्यक्रमात स्टालिन म्हणून हजर असत.

स्टॅॅलिनकडे असे एकदोन नव्हे तर चार तोतये होते.

यापैकी एक होता फेलिक्स दादेव.

फेलिक्स स्टॅॅलिनचा तोतया म्हणून काम करायचा ही माहिती त्याने आजपर्यंत जगापासून लपवून ठेवली होती. पण, २००८मध्ये रशियन सरकारच्या परवानगीने त्याने ही माहिती उघड केली. तेंव्हा हे सत्य संपूर्ण जगासमोर आले.

फेलिक्सला स्वतः स्टॅॅलिन बनून लोकांसमोर यावे लागत असे. फेलिक्स हा स्टॅॅलिनचा तोतया म्हणून काम करण्यापुर्वी एक जादुगार आणि डान्सर होता. फेलिक्स दादेवचे खरे नाव गाझावत होते. त्याने युद्धाच्या वेळी हे नाव बदलून फेलिक्स ठेवले होते.

फेलिक्स हा त्याचा कमांडर होता. जो युद्धात शहीद झाला होता. त्याची आठवण म्हणून गाझावत हे नाव टाकून त्याने स्वतःचे नाव फेलिक्स केले.

गाझी मुळचा दाघेस्तानच्या डोंगराळ भागातील. त्याचा जन्म १९२६मध्ये एका मेंढपाळ कुटुंबात झाला. त्याच्या कुटुंबाने काही काळाने ग्रोन्झी गावात स्थलांतर केले. तेथे गाझी नृत्याचे धडे घेऊ लागला. पुढे तो उक्रेनमध्ये गेला तिथे त्याने एका डान्स कॉकेसीनमध्ये नृत्य सादर करू लागला. युद्धाच्या काळात गाझीची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. सगळे त्याला डान्सर जादुगार म्हणून ओळखू लागले होते.

याच काळात तो युद्धात सहभागी होणाऱ्या सैनिकांचे मनोरंजन करण्यासाठी त्याची नेमणूक झाली. पुढे तो प्रत्यक्ष युद्धातही सहभागी होऊ लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी म्हणजेच १९४२ साली जर्मनीने रशियावर हल्ला केला. या हल्ल्यात गाझावतला गंभीर दुखापत झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले आणि त्याला स्टॅलिनचा तोतया म्हणून काम करण्यासाठी त्याला घेऊन गेले.

स्टॅलिन आणि त्याच्या वयामध्ये जवळपास ४५ वर्षाचे अंतर होते.

स्टॅलिनचा तोतयाची भूमिका उत्तम वठवावी यासाठी त्याला जवळपास दोन वर्षे तालीम देण्यात आली. स्टॅलिनने स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे स्तोम माजवण्यासाठी स्वतःवरच आधारित काही चित्रपट प्रसारित केले होते. या चित्रपटांत स्टॅलिनची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने फेलिक्सला स्टॅलिनप्रमाणे वागण्याचे, त्याची लकब, त्याची देहबोली याचे प्रशिक्षण दिले.

जेंव्हा स्टॅलिनला काही दुसरे अधिक महत्वाचे काम असे तेंव्हा फेलिक्स प्रसारमाध्यमांसमोरही जात असे.

स्टॅलिन आणि त्याच्यात काहीच फरक नव्हता. दोघेही जवळपास दिसायला सारखेच. फक्त स्टालिनचे कान दादेवच्या कानापेक्षा थोडे मोठे होते. परंतु, दोघांतही कमालीचे साम्य होते. कधीकधी स्टॅलिनच्या जवळचे लोकदेखील त्याला ओळखू शकत नसत.

स्टॅलिन आणि त्याचा तोतया

दोघांच्या आवाजात मात्र फरक होता. परंतु, आजच्या सारखे त्याकाळी प्रगत तंत्रज्ञान नसल्याने हा फरक ओळखणे शक्य झाले नाही.

दादेवने आपल्या आयुष्यातील हे गुपित वयाच्या ८८व्या वर्षापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवले. कारण स्टॅलिनच्या गँगकडून किंवा केजीबीकडून काही घातपात होईल अशी त्याला भीती वाटत असे.

परंतु, त्याने जेव्हा पहिल्यांदा याचा उच्चार केला तेंव्हा केजीबीने याची पडताळणी केली. त्याने आजवर दिलेल्या अनेक मुलाखतीतून त्याच्या संबधीचे बरेच तपशील उघड झाले आहेत. आपल्या आत्मचरित्रातही त्याने या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे.

त्याच्या मते अशाप्रकारे तोतया म्हणून काम करण्यासाठी स्टॅलिनने चार लोकांना हाताशी ठेवले होते. तरीही गुप्त पोलिसांनी त्याला पकडले होते. दादेवला मात्र स्टॅलिन आणि त्याच्यात असणाऱ्या या एकसारखेपणाचा अभिमान वाटतो. त्याला हुकुमशहाची भूमिका काही काळ तरी अनुभवायला मिळाली याचाही अभिमान आहे.

दादेवच्या या मुलाखतीमुळे हुकुमशहा आपल्यासारख्याच तंतोतंत दिसणाऱ्या लोकांचा वापर करतात ही शंका सार्थ ठरते. अशाच प्रकारे हिटलरने देखील स्वतःचे तोतये वापरले होते.

जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या आजची काळातील व्यक्तीही हा प्रयोग अनुसरत असतात. अर्थात, ही जुनीच पद्धत असल्याने याबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अब्दुल कलामांनी देशाच्या तरुण पिढीला नव्या भारताचं स्वप्न दाखवलंय

Next Post

जाणून घ्या अ‍ॅमेझॉन प्राईमच्या ब्रिद इंटू द शॅडोज या वेबसिरीजचा दुसरा सिझन कसा आहे..

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

जाणून घ्या अ‍ॅमेझॉन प्राईमच्या ब्रिद इंटू द शॅडोज या वेबसिरीजचा दुसरा सिझन कसा आहे..

एका भाभाने आण्विक संशोधनाचा पाया रचला तर दुसऱ्याने एनसीपीएची वास्तू उभी केली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.