The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेडूक, मासे, भाज्या – लोकांनी पाहिलेले सर्वांत विचित्र ‘पावसाळे’

by Heramb
17 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


धकाधकीच्या आयुष्यातून जरा वेळ मिळाला आणि शहराबाहेर कुठे फिरायला गेलो की निसर्गसौंदर्याबरोबरच आपल्याला आकर्षित करतं ते निळंशार आकाश. आपल्या डोक्यावरील या भव्य पोकळीत असंख्य रहस्ये साठवलेली आहेत. ती उलगडता उलगडता माणसाच्या कित्येक पिढ्या खर्ची पडल्या. पण या अनादी, अनंत आणि बहुरूपी आकाशाचे संपूर्ण रहस्य कळलेला एकही पठ्ठ्या अद्याप जगात नाही. आदिमानवाने याच आकाशातून पडलेल्या पावसाचा आदर केला होता हे आपण जाणतोच. काही ठिकाणी मानव वीज आणि पावसाची पूजा करीत होता असेही उल्लेख आपल्याला आढळतात. रोमन आणि वैदिक संस्कृतींमध्ये वरूणासारखी पावसाची दैवतेसुद्धा आहेत.

पण या निसर्गात आणि विशेषतः आकाशामध्ये अनेक विचित्र घटना घडतात. याची कारणमीमांसा करायला अनेक तज्ज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या बुद्धीचा कस लागतो. या विचित्र घटनांपैकी एक म्हणजे ‘अनेक गोष्टींचे विचित्र पाऊस’. केरळमध्ये झालेल्या लाल पावसाबद्दल तुम्ही वाचलं असेलच. पण ही अशा अनेक घटनांपैकी एक घटना आहे.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जगात विविध ठिकाणी विविध प्रकारचा पाऊस पडण्याची अनेक वर्णने आपल्याला मानवी इतिहासात मिळतात. आपल्या डोक्यावरचं निरभ्र आकाश मोकळं आणि वरवर शांत वाटत असलं तरी ते फार अस्थिर आहे. जगभरात नोंद असलेल्या अशा विचित्र पावसांचा आढावा आपण आज या लेखातून घेणार आहोत..

एकोणिसाव्या शतकात एका ब्रिटीश नागरिकाने काढलेल्या व्यंगचित्रात आपल्याला कुत्री, मांजर आणि बेडकांचा वर्षाव होताना दिसतो. मानवी इतिहासात अनेकदा बेडूक, मासे अशा प्राण्यांचा वर्षाव झाल्याची वर्णने आहेत. अनेकदा भाजीपाला आणि सुका मेवा अर्थात हेझलनट,मका, बीन्स आणि वटाणे यांचा वर्षाव झाल्याचीही वर्णने आढळतात. यांच्यापैकी बहुतेक वर्णनांना कोणताही ऐतिहासिक संदर्भ अथवा सबळ पुरावा नसल्याने त्या फक्त लोककथा असल्याचेही सांगितले जाते. तरीही या विचित्र कथांना अनेक  विचित्र तर्क आहेत.

बेडूक आणि माशांचा वर्षाव:

दुसऱ्या महायु*द्धादरम्यान, इंग्लंडमधील यॉर्कशायर येथील मूळ निवासी जो अल्पिनने बेडकांच्या वर्षावाचे वर्णन केले आहे. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात, जो अल्पिन स्टॅफोर्डशाईन येथील अल्टोन टॉवर्सवर उभा असताना अचानक आकाशात अनेक ढग दाटून आले आणि काहीच क्षणांत आकाशातून बेडकांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. आकाशातून सुमारे ३ सेंटीमीटर आकाराचे लाखो बेडूक पडत होते. हा विचित्र पाऊस सुमारे एक तास पंधरा मिनिटे सुरूच होता. पावसानंतर सगळीकडे बेडूकच बेडूक झाले होते.



१९४७ सालच्या ऑक्टोबरमधील एका उबदार सकाळी, अमेरिकेतील मार्क्सवाईल याठिकाणी चक्क जिवंत माशांचा पाऊस पडला. ऍंथोनी रॉय हा स्थानिक आपल्या गॅरेजकडून घराच्या मागच्या अंगणात जात असताना त्याला गॅरेजवरील पत्र्यावर काहीतरी आदळल्याचा आवाज ऐकू आला, त्याच क्षणी त्याला काही कळायच्या आतच त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर काहीतरी आदळले. ते मासे होते. माशांचा पावसाचा आवाज ऐकून ऍंथोनीची पत्नी आणि त्यांची मोलकरीण देखील बाहेर आल्या. त्यादेखील या घटनेच्या साक्षीदार आहेत.

१९४८ सालच्या जून महिन्यातील एका संध्याकाळी, एक माजी गोल्फपटू, इयान पाटे आपल्या पत्नीसह बोर्नेमाऊथ शहरातील बार्टन-सी गोल्फ क्लब येथे खेळाचा आस्वाद घेत होते. त्याठिकाणीही मार्क्सवाईलसारखाच प्रकार घडला. बार्टन-सी गोल्फ क्लब समुद्रकिनारी असल्याने खेळ आणखीनच रंगतदार झाला होता. इयान एका हिट साठी तयार होतच होते तेवढ्यात त्यांच्यासमोर एक जिवंत मासा येऊन पडला. त्यानंतर असे शेकडो मध्यम आकाराचे मासे आकाशातून पडू लागले. माशांचा हा पाऊस ९० स्क्वेअर मीटरमध्ये झाला. माशांचा हा पाऊस सुरु झाल्यानंतर काहीच क्षणांत एकाएकी बंदही झाला.

१२ जून १९५४ रोजी मिस सिल्व्यालासुद्धा असाच विचित्र अनुभव आला. सिल्व्या तिच्या मुलांसह ‘सुलटन कोल्डफिल्ड’मध्ये टेहळायला  गेली होती. ‘बेडकांच्या’ पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी सिल्व्याने आपल्या मुलांसाठी छत्री खरेदी केली होती. फक्त ४५ स्क्वेअर मीटरच्या अंतरावर काही काळासाठी शेकडो बेडकांचा पाऊस पडला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

बेडूक आणि मासे हे प्रामुख्याने पाण्यात राहणारे प्राणी असल्याने या घटनांचं एक तार्किक स्पष्टीकरण देता येईल. जमिनीवरील किंवा समुद्रावरील एखाद्या मोठ्या वादळात हे बेडूक आणि मासे अडकले असावेत आणि या वादळामुळे हे बेडूक आणि मासे अतिशय दूर फेकले गेले असावे. आकाशातून पडणारा मासा नेहमीच एकाच प्रकारचा का असतो?, वादळात अडकलेल्या इतर वस्तूंचा पाऊस का पडत नाही? आणि खोल समुद्रामध्ये राहणाऱ्या माशांचाच पाऊस कसा पडतो? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

भाज्यांचा वर्षाव

१३ मार्च १९७७ रोजी ‘ब्रिस्टल इव्हनिंग पोस्ट’चे वार्ताहर ‘आल्फ्रेड विल्सन-ओस-बोर्न’ आपल्या पत्नीसह घरी जात होते. घरी जाताना ते एका कार शॉपमध्ये थांबले होते. त्याचठिकाणी आल्फ्रेडला एक वस्तू पडल्याचा आवाज आला. आपल्या गाडीचे एखादे बटण किंवा पार्ट पडला असेल म्हणून तो बघायला गेला तर ते एक ‘हॅझेलनट’ होते.

अचानक एकामागून एक हॅझेलनट्स पडण्यास सुरुवात झाली. सगळीकडे हॅझेलनट्सचा वर्षाव सुरु झाला होता. आल्फ्रेडच्या मते त्याठिकाणी शेकडो हॅझेलनट्स होते. त्याने त्यातील काही हॅझेलनट्स उचलले. ते अतिशय फ्रेश आणि गोड होते. घरी आल्यानंतर आल्फ्रेडने आपल्या शेजारी राहणाऱ्या मित्राला घडलेल्या घटनेबद्दल सांगितले असता त्यालाही असाच अनुभव आल्याचे त्याने सांगितले. आल्फ्रेडचे घर त्या कार-शॉप पासून काहीच मिनिटाच्या अंतरावर होते.

साउथॅम्प्टनमधील साऊथ मिल रोडवर, रोलँड मूडी आणि त्याच्या शेजाऱ्यांनी थंडीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बीन्स, वटाणे आणि मोहरीचा पाऊस पाहिला. अर्ध्या किंवा एका तासाच्या अंतराने हा पाऊस येताच होता. पुढच्या दिवशी मका, बीन्स आणि वाटाण्यांचा पाऊस झाला. एखाद्या चक्रीवादळामध्ये अडकून बीन्स, वटाणे आणि मका अडकला असेल असे लोकांना वाटले. पण या भाज्यांची शेते सहसा एकत्र नसतात. त्यामुळे यामागील रहस्य अजूनही उलगडलेले नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या घटनेमुळे दुसऱ्या महायु*द्धातील ब्रिटनच्या विजयावर धब्बा लागला होता..!

Next Post

अंटार्क्टिका नाही तर पृथ्वीवरच्या या ठिकाणी जीवन अशक्य आहे..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

अंटार्क्टिका नाही तर पृथ्वीवरच्या या ठिकाणी जीवन अशक्य आहे..!

'माल्टीज संस्कृती' कमी काळ टिकली पण येणाऱ्या पिढ्यांसाठी फार काही सोडून गेली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.