The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभा करू शकेल अशा शब्दांवर तिथे बंदी आहे. वाचा संपूर्ण यादी.

by द पोस्टमन टीम
25 December 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


शी जिनपिंग सत्तेत आल्यापासून चीनमधील सरकार हुकुमशाहीकडे झुकत आहे. परंतु, देशातील ही दमनकरी स्थिती आंतरराष्ट्रीय पटलावर येऊ नये म्हणून नागरिकांच्या अभिव्यक्तीवर देखील निर्बंध लादले जात आहेत. कोरोनाच्या प्रसारानंतर चीनने जी काही पावले उचलली त्यातूनही हुकुमशाहीचे संकेत दिसत आहेत.

हॉंगकॉंगपासून तैवानपर्यंत प्रत्येक ठिकाणी चीनला आपलीच हुकुमशाही चालवायची आहे. इतकेच नाही तर फॉक्स (VOX) न्यूजवर प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार चीनच्या हुकुमशाहीचा फास इतका जाचक झाला आहे की चीनच्या नागरिकांनी कोणते शब्द वापरायचे आणि कोणते शब्द वापरायचे नाहीत यावरही सरकारी फतवा निघाला आहे. चीनी सरकारने आत्ता काही शब्दांच्या वापरावरही बंदी घातली आहे.

सोशल मिडिया वापरण्यात आणि इंटरनेटवर ॲक्टिव्ह राहण्यात चीनी सर्वात पुढे आहेत. म्हणूनच चीनच्या सरकारने नागरिकांनी सोशल मिडियावर व्यक्त होताना कोणते शब्द वापरायचे नाहीत याची एक भली मोठी यादीच जाहीर केली आहे.

चीन सरकारच्या अशा दमनकारी व्यवहारामुळे आणि इंटरनेटवरील सेन्सॉरशिपमुळे चीनी नागरिकांवर प्रचंड बंधने लादण्यात येत आहेत. नागरिकांच्या इंटरनेट वावरावर लक्ष ठेवण्यासाठी चीन सरकारने राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर हजारो लोकांची नेमणूक केली आहे.

फक्त इंटरनेटच नाही तर, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या माहितीवरही चीनमध्ये निगराणी ठेवली जाते. यामध्ये वैयक्तित पत्रे तपासणे, टेलीफोन कॉल चेक करणे, सोशल मिडियावरील पोस्टीची शहानिशा करणे आणि ऑनलाईन वेबसाईटवरून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि जाहिरातींची पडताळणी करणे अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे.



दोन वर्षापूर्वी शी जिंगपिंग सत्तेत आले तेव्हा दीर्घकाळ आणि एकहाती सत्ता राखण्यासाठी त्यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळच संपवून टाकला. यामागे ते आपल्या मनात येईल तोपर्यंत सत्तेवर राहू शकतील हाच हेतू होता. यानंतर त्यांनी मायक्रोब्लॉगिंगवर my emperor आणि lifelong control यासारख्या शब्दांच्या वापरावर बंदी घातली.

सुप्रसिद्ध लेखक जॉज ऑरवेल यांनी कम्युनिस्ट शासनावर टीका करण्यासाठी यासारखे शब्द त्यांचा कादंबरीत वापरले होते. म्हणून चीनने या शब्दांच्या वापरावर बंदी घातली आहे. जॉर्ज ऑरवेल यांच्या Animal Farm आणि 1984 या कादंबऱ्यांकडे कम्युनिस्ट शासकांवरील व्यंगाचे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहिले जाते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

To board a plane या वाक्यप्रचाराचा अर्थ सत्ता काबीज करणे अशा अर्थाच्या जवळ जाणारा असल्याने हा वाक्यप्रचार वापरण्यावरही बंदी घातली आहे. चायना डिजिटल टाईम्सने चीनने बंदी घातलेल्या संपूर्ण शब्दाची यादीच जाहीर केली आहे.

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर disagree म्हणजे असहमत या शब्दावरही बंदी आहे. चीनच्या सोशल मिडियावर सरकारी कारभाराबद्दल ज्या काही प्रतिक्रिया उमटत होत्या त्यावर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून चीन सरकारने असे पाऊल उचलले आहे.

बंदी घातलेल्या शब्दांची यादी जाहीर करून त्यांनी चीनच्या सोशल मिडियावर ज्या काही पोस्ट केल्या जातात त्यावरही कडक निगणारी ठेवली आहे. म्हणजे सरकारच्या कुठल्याही मनमानी धोरणाविरोधात सभ्यतेने निषेध नोंदवणे देखील आता बेकायदेशीर आहे, असाच याचा अर्थ होतो.

चीनच्या हुकुमशाही राजवटीचे हे टोकाचे पाऊल आहे. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच चीन सरकारने थेट घाव घातला आहे. नागरिकांचे बोलण्याचेही स्वातंत्र्य या सरकारने हिरावून घेतले आहे.

बंदी घालण्यात आलेला शब्द जर सोशल मिडिया किंवा इंटरनेटवर दिसलाच तर, ताबडतोब ती माहिती किंवा पोस्ट सोशल मीडियातून डिलीट करण्यात येते.

जेव्हा हे बंदी घातलेले शब्द वापरून एखादी व्यक्ती काही पोस्ट करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेथील साईटवर एक मेसेज येतो, ज्यात लिहिलेले असते की, “ही पोस्ट आमच्या नियमांचे उल्लंघन करणारी असून कायदा आणि नियमांंशी सुसंगत नाही.”

कंडोम निर्मितीत जगात सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या ड्युरेक्स कंपनीच्या ऍडवरूनही चीनमध्ये खळबळ माजली आहे. या कंडोमच्या ऍडमध्ये ‘doing it twice is not enough’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली. आता यातील टू टाइम्सचा अर्थ शी जिंगपिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळाशी जोडण्यात आला. या जाहिरातीवरून कंपनी चांगलीच अडचणीत सापडली आहे.

या व्यतिरिक्त आणखीही बरेच शब्द आहेत. जसे, दलाई लामा – दलाई लामा हे तिबेटी नेते आहेत, ज्यांना हद्दपार करण्यात आले आहेत. दलाई लामा हे तिबेटीयन स्वातंत्र्याचे प्रतिक मानले जातात. म्हणून त्यांचा उल्लेख करण्यावर बंदी आहे.

तियानमेन चौकात १९८९ मध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी जमलेल्या लोकांवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवून आणण्यात आला होता. या रक्तपाताची आणि सरकारी दडपशाहीची आठवण करण्यास बंदी आहे. तियानमेन चौकातील हे हत्याकांड घडले त्यादिवशी ४ जून तारीख होती. ४ जून ही तारीख लिहिण्यावर किंवा लिखाणात तिचा वापर करण्यावरही बंदी आहे.

Dictatorship म्हणजे हुकुमशाही, हा शब्द वापरण्यावरही बंदी आहे.

मायक्रोब्लॉगिंग साईट्स आणि सोशल मिडियावर Immortality, incapable ruler आणि I oppose यासारख्या शब्दांचा वापर केला जात नाही. आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांत यावर चर्चा होऊ नये म्हणून चीनमध्ये परकीय सोशल मिडिया वापरण्यावरही बंदी आहे.

इंटरनेट आणि समाजमाध्यमातून या गोष्टी जगभरात पसरू शकतात आणि यावरून आंतरराष्ट्रीय पटलावर टीकेचे धनी व्हावे लागेल या भीतीने चीनमध्ये फेसबुक, ट्विटरसारखी समाजमाध्यमे वापरली जात नाहीत. तिथे फक्त चीनमध्ये बनवले गेलेले ऍपच वापरले जातात.

शी जिंगपिंग यांची ही कठोर पावले म्हणजे हुकुमशाहीचा अजब नमुना आहे. स्वतः दीर्घकाळ सत्तेत राहण्यासाठी ते त्यांच्या विरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. शी यांचा अध्यक्षीय कार्यकाळ वाढवण्यासाठी चीनमधील अध्यक्षपदासाठी निर्धारित कालावधीच खारीज करण्यात आला आहे. यामुळे शी जिनपिंग अमर्यादित काळासाठी चीनवर हुकुमत गाजवण्यास मोकळे झाले आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चीन त्यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर रोबोट्सची भरती करतोय, हे आपल्यासाठी धोकादायक आहे.

Next Post

कोरोना व्हायरस चीनने पसरवला या आरोपावर चीन काय म्हणतोय वाचा

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

कोरोना व्हायरस चीनने पसरवला या आरोपावर चीन काय म्हणतोय वाचा

संपूर्ण स्त्रीजातीने मातृत्वाचा आदर्श घ्यावा, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे माँसाहेब जिजाऊ..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.