The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्लीत जन्मलेला निशांत बत्रा नासाला चंद्रावर सेल्युलर नेटवर्क उभारण्यात मदत करत आहे

by द पोस्टमन टीम
15 June 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज इंटरनेट आणि वायफाय मुळे आपण सगळे अक्षरशः कर लो दुनिया मुठ्ठी मे हा अनुभव घेत आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधायचे असुदेत, एखादी रेसिपी बघायची असुदेत, नवीन गोष्ट शिकायची असुदेत, सिनेमा बघायचा असुदेत, किंवा अगदी स्वतःचे खास कौशल्य जगासमोर आणायचे असुदे; इंटरनेट सेवेसी हजर आहेच. एकही गोष्ट अशी नाही, जी इंटरनेट वर शोधून मिळत नाही. संपूर्ण जगाचे दालन अशारीतीने आपल्यासमोर खुले झाले आहे. पण आता एवढे सगळे झाल्यानंतर पुढे काय?

तर अजून बरेच काही करायचे आहे. म्हणजे असे, की पृथ्वीवर तर इंटरनेट अस्तित्वात आहे. पण चंद्रावरचे काय? समजा माणसाला चंद्रावर गेल्यानंतर इंटरनेटचा वापर करावा लागला, तर तो कसा करणार? सध्या नासा याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहे. त्यासाठी नासा आता चंद्रावर नेटवर्क प्रस्थापित करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. त्याला भारतीय वंशाचे निशांत बत्रा साथ देत आहेत. निशांत बत्रा सध्या नोकियामध्ये चीफ स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.  फिनलंडमधील एस्पू येथे राहणाऱ्या बात्रा यांना टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात काम करण्याचा बारा वर्षांचा अनुभव आहे.

त्यादृष्टीने आवश्यक असलेले संशोधन सध्या युद्धपातळीवर नोकिया बेल लॅब्ज येथे सुरू आहे. यासाठी अतिशय आटोपशीर, कमी उर्जेवर चालणारे, एल टी ई (अतिजलद वेग असणारे) नेटवर्क वापरले जाणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये नासाने नोकियाला आपला भागीदार म्हणून निवडले. 

नोकिया चंद्रावर 4G नेटवर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भविष्यात मानवाला चंद्रावर इंटरनेटचा वापर तर करता येईलच, पण चंद्रावर शाश्वत मानवी उपस्थितीच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी नोकियाने इंट्युइटिव्ह मशीन्स या कंपनीशी भागीदारी केली आहे. नोकियाच्या चंद्रावर उतरणार्‍या लॅंडरमध्ये ग्राऊंडब्रेकिंग नेटवर्क इंटिग्रेट करण्यासाठी आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ते उतरवण्यासाठी ही कंपनी सहाय्य करणार आहे.

2024 मध्ये चंद्रावर पुन्हा एकदा मानवी पाऊल ठेवण्याच्या दृष्टीने अमेरिका प्रयत्नशील आहे. 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग यांच्या चंद्र मोहिमेनंतर फॉलोअप मिशन म्हणून ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यावेळी चंद्रावर मोबाईल चे 4G नेटवर्क असावे, या दृष्टीने अमेरिका आतापासून मोर्चेबांधणी करत आहे. हे साध्य झाल्यास कदाचित चंद्रावर पोचल्यावर माणसाला तेथून पृथ्वीवर फोन करता येईल किंवा रियल टाइम फोटोग्राफही पाठवता येईल.



अर्थात कायदेशीरदृष्ट्या हे कितपत शक्य आहे हेही तपासून पाहावे लागेल. या मोहिमेमध्ये सध्याच्या नियोजनानुसार एक महिला आणि एक कृष्णवर्णीय व्यक्ती असतील आणि त्यांचे चंद्रावर जास्त काळासाठी वास्तव्य असेल. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमेरिका पुढचे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. ते म्हणजे मंगळावर स्वारी.

हे नेटवर्क आवश्यक त्या सर्व डेटा ट्रान्समिशन ॲप्लिकेशन्ससाठी संचार सुविधा देऊ करणार आहे. चंद्रावर एकदा काही नेटवर्क स्थापित झाले की ते स्वतःच स्वतःला जलद संदेशवहनासाठी म्हणजेच एल टी इ साठी सज्ज करेल. या ॲप्लिकेशन्समध्ये महत्त्वाची कंट्रोल फंक्शन्स, लूनार रोवरचे रिमोट कंट्रोल, एचडी व्हिडीओचे स्ट्रीमिंग आणि नेव्हिगेशन यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

चंद्रावर माणसाला दीर्घकाळ राहता यावे यासाठी हे ॲप्लिकेशन्स गरजेचे आहेत. चंद्रावर तसेच एकंदर अवकाशात असलेल्या अतितीव्र आणि खडतर वातावरणातही ही लुनार नेटवर्क्स व्यवस्थित काम करू शकतील अशाप्रकारे विकसित केलेली आहेत.

नोकियाच्या बेल लॅब्ज ने हाती घेतलेली ही काही पहिलीच मोहीम नाही. याआधीही १९६२ मध्ये बेल लॅब आणि नासाने टेलस्टार वन हा उपग्रह अवकाशात सोडला होता. युरोप आणि उत्तर अमेरिकेत टीव्ही सिग्नल प्रसारित करणे सर्वप्रथम याच उपग्रहामुळे शक्य झाले होते.

परत एकदा अवकाशात चमत्कार घडवण्यासाठी जग सज्ज होत आहे. त्याला एका भारतीयाचा हातभार लागतोय ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आज अँड्रॉइडचा बादशहा असलेल्या सॅमसंगने आधी अँड्रॉइड सिस्टमचा मजाक उडवला होता

Next Post

आरोग्य टिकवायचं आहे? तर वाईन ‘प्या,’ पण प्रमाणातच…

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

आरोग्य टिकवायचं आहे? तर वाईन 'प्या,' पण प्रमाणातच...

या तरुणीने दुसऱ्या महायु*द्धादरम्यान ना*झींच्या पोटात गोळा आणला होता!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.