The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोग्य टिकवायचं आहे? तर वाईन ‘प्या,’ पण प्रमाणातच…

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


पाश्चात्त्य देशांत थंड वातावरणामुळे वाईनच्या सेवनाचे प्रमाण लक्षणीय आहे. खरं तर चहा आणि कॉफी या लोकप्रिय पेयांनाही तिकडे वाईनने मागे टाकलं आहे. अर्थातच, त्यामुळे त्या देशात वाईन सेवनाच्या चांगल्या वाईट परिणामांवर सातत्याने संशोधन सुरु असतं आणि त्याचे निष्कर्ष उद्बोधक आहेत.

सध्याच्या काळात आपल्याकडेही वाईनची मागणी वाढत आहे. किंबहुना ती वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही केले जात आहेत. आता तर तुम्हा-आम्हाला मॉलमध्ये, मोठ्या शॉपीजमध्ये किराणा मालाच्या विभागातसुद्धा सहजपणे वाईन उपलब्ध होणार आहे.

दारू पिणं आरोग्यासाठी वाईट असलं तरी त्यापेक्षा कमी प्रमाणात अल्कोहोल असलेली वाईन ही तब्येतीसाठी चांगली असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेषतः मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका नियमित पण माफक प्रमाणात वाईन घेतल्याने कमी होतो, असा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर वाईनच्या बऱ्या- वाईट परिणामांचा लेख-जोखा मांडणं आवश्यकच…

केवळ पाश्चात्य किंवा कॅरेबियन देशातच नव्हे, तर भारतातही वाईन बनविण्याची कला शेकडो वर्षांपासून अवगत आहे. मधल्या काही काळात मद्यप्राशन वाईट समजलं गेलं असलं तरी आपल्याकडे पूर्वी धार्मिक कार्यांपासून कोणत्याही आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगीही मद्यप्राशनाची प्रथा प्रचलित होती. तर ही वाईन बनवण्याची प्रक्रिया आता अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे केली जात असली तिची पद्धत अजूनही तीच आहे. आणि बहुतेक सर्व ठिकाणी ती सारखीच आहे.



वाईन साधारणपणे द्राक्ष आंबवून त्याच्या रसापासून बनवली जाते. परंतु, इतर अनेक प्रकारच्या वाईन अस्तित्वात आहेत. विदेशात मीड (मधापासून बनविलेली वाईन), पीच वाईन, ब्लू बेरी वाईन आणि चेरी वाईन यासह इतर अनेक प्रकार आहेत. आता आपल्याकडेही जांभूळ, नारळ आणि अगदी आंब्याची वाईनही उपलब्ध आहे.

वाईनमध्ये फळांचा रस असतो, ज्यामुळे मुळात त्याची चव गोड असते. त्य मध्ये भरपूर कॅलरीज असतात. कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स) जास्त असतात आणि साखर देखील असते. पारंपारिक रेड वाईन, व्हाईट वाईन किंवा रोझ वाईनमध्ये मात्र साखरेचे प्रमाण खूप कमी असते कारण ती बनवताना द्राक्षातील साखर वेगळी होते आणि यीस्टद्वारे होणाऱ्या किण्वन (आंबण्याच्या) प्रक्रियेत तिचे रूपांतर अल्कोहोल (इथेनॉल) आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये होते. अशा, वरून साखर न घातलेल्या पारंपरिक साधारण ५ औंस वाईनमध्ये (सर्व्हिंग साइज) दीड ग्रॅमपेक्षा कमी साखर असते. मात्र, एका ५ औंस वाईनमध्ये सुमारे १२० कॅलरीज असतात.

आरोग्याच्या दृष्टीने वाईनचे फायदे

वाईन किंवा अल्कोहोल असलेली कोणतीही दारू प्यावी की न प्यावी हा वादग्रस्त विषयच आहे. वाईनचे योग्य प्रमाणात सेवन करणे (विशेषत: रेड वाईन!) सामान्यत: निरोगी असलेल्या लोकांसाठी आरोग्यदृष्ट्या फायदेशीरच आहे, असे अभ्यासात असे दिसून आले आहे.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

  • मधुमेहाच्या विकारात गुंतागुंतीच्या समस्या उद्भवण्याचा धोका कमी होतो. वाईनमध्ये असलेल्या ‘रेझवेराट्रोल’ या ‘अँटीऑक्सिडंट’ घटकामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः मधुमेहामुळे होणारे मज्जातंतूचे नुकसान टाळण्यास त्याचा उपयोग होतो. अर्थात, ‘रेझवेराट्रोल’ हे शेंगदाणे, पिस्ता, द्राक्ष, ब्लू बेरी, क्रॅ नबेरी, डार्क चॉकलेट आणि कोकोमध्ये देखील आढळते.
  • फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्या महिलांपैकी ‘टाइप 2’ मधुमेह होण्याचा धोका रेड वाईनचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये कमी झाला आहे.
  • रेड वाईन हृदयरोगाची शक्यता कमी करते आणि हृदय व रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढवते.
  • रेड वाईन सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते, प्रोसायनिडिनमुळे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत होते.
  • रेड वाईनमुळे आतड्याचे आरोग्य सुधारते.
  • अतिरिक्त मद्यपानामुळे स्तन, यकृत, तोंड आणि घशाच्या कर्करोगाची शक्यता वाढत असली तरी प्रमाणात रेड वाईनचे प्राशन केल्याने त्यातील ‘रेझवेराट्रोल’ काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण करत असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे.

अर्थात, वाईन पिण्याचे आरोग्यविषयक फायदे मिळवायचे असतील तर तिचे प्रमाणात सेवन करणे महत्वाचे आहे. ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (CDC) शिफारसीनुसार महिलांसाठी दररोज ५ औंसचा १ ग्लास तर पुरुषांसाठी दररोज ५ औंसचे २ ग्लास वाईन १२ टक्के अल्कोहोल) घेणे हे योग्य प्रमाण आहे.

वाइन पिण्याचे धोके

  • व्यसनाधीनता: वाईन हे अल्कोहोलयुक्त पेय आहे, त्यामुळे ज्या लोकांना वाईन आवडते त्यांना व्यसनाधीनतेचा सामना करावा लागण्याची भीती असते. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक अशा व्यापक स्वरूपाचे आणि दीर्घकालीन असू शकतात.
  • वजन वाढणे: वाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. प्रति ५ औंस ग्लासमध्ये १०० पेक्षा जास्त कॅलरीज असलेली वाईन रोज किंवा आठवड्यातून काही दिवस प्राशन केल्याने कोणत्याही पौष्टिक घटकांचा लाभ न होता (वाईनमध्ये कोणतेही जीवनसत्त्व किंवा खनिज नसतात) वजन लवकर वाढू शकते.

वय वाढल्यावर होणारे विकार

दीर्घकाळ आणि अतिरिक्त प्रमाणात वाईन प्यायल्याने पचनाचे विकार आणि मधुमेहामुळे रेटिना खराब होऊन येणारे अंधत्व; असे अनेक प्रकारचे विकार उद्भवू शकतात.

  • रक्तामध्ये हानिकारक आम्ल तयार होऊ शकतात आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग, हृदयरोग आणि अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.
  • रक्तातील साखरेची कमतरता: अल्कोहोलच्या सेवनाने इन्सुलिनचा स्राव वाढतो, त्यामुळे रक्तातील साखर प्रमाणापेक्षा कमी होते.

इतर कोणतेही मद्य असो वा वाईन आपल्याकडे आता तो ‘टॅबू’चा विषय राहिलेला नाही. सध्याच्या काळात केवळ त्याच्या स्वादिष्ट चवीसाठीच नाही तर मद्याचा मन हलकं करणारा गुणधर्म, सर्जनशीलता वाढवण्याची क्षमता, सामाजिक बंधन मजबूत करण्याची क्षमता आणि त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे यासाठीही मद्य किंवा वाईनप्राशन करण्याचे प्रमाण वाढत आहे.

मात्र, कोणतीही गोष्ट प्रमाणात करण्यातच खरी मजा असते आणि तरच त्याचे अपेक्षित फायदे मिळू शकता. विशेषतः मद्यासारख्या चटक लावणाऱ्या, व्यसनाधीन बनवणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत तर ही बाब कटाक्षाने लक्षात घेणं आवश्यक आहे. नाही तर एकदा पायरी ओलांडली की परतीचा मार्ग खडतरच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दिल्लीत जन्मलेला निशांत बत्रा नासाला चंद्रावर सेल्युलर नेटवर्क उभारण्यात मदत करत आहे

Next Post

या तरुणीने दुसऱ्या महायु*द्धादरम्यान ना*झींच्या पोटात गोळा आणला होता!

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

19 August 2024
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

या तरुणीने दुसऱ्या महायु*द्धादरम्यान ना*झींच्या पोटात गोळा आणला होता!

ॲपलच्या एका निर्णयामुळे फेसबुकचा पार बाजार उठलाय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
ADVERTISEMENT