The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरराष्ट्रीय पोलीस म्हणजे इंटरपोल नेमकं काम कसं करतं..? त्यांना काय टार्गेट असतं..?

by द पोस्टमन टीम
5 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इंटरपोल हा शब्द आपण बऱ्याच जागी ऐकला असेल. विशेषतः एखाद्या टीव्ही शो किंवा मूव्हीमध्ये तर हमखास ऐकला असेल. इंटरपोल ही नेमकी कशाची संघटना आहे आणि बऱ्याचदा तिचे नाव आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसोबत का जोडले जाते त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

इंटरपोल म्हणजेच International Criminal Police Organization. या संघटनेच्या नावातच तिचा हेतू स्पष्ट होतो. ही एक आंतरराष्ट्रीय पोलिसांची संघटना असून जगातील १९४ देश या संघटनेचे सभासद आहेत. गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी जगभरातील पोलिसांना लागेल ती मदत करणे हे इंटरपोलचे मुख्य काम आहे.

दोन देशांमध्ये राजकीय संबंध असतीलच असे नाही. अशावेळी इंटरपोल या देशांसाठी वरदान ठरते. वेगवेगळ्या देशांतील दुवा म्हणून हे संघटना काम करते. युनायटेड नेशन्स या संघटनेच्या खालोखाल इंटरपोलचा नंबर लागतो.

इंटरपोल प्रामुख्याने तीन प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध काम करते. ते म्हणजे द*हश*तवाद, संघटित गुन्हेगारी आणि सायबर क्राईम. या माध्यमाद्वारे घडणारी अं*मली पदार्थांची तस्करी, पर्यावरणीय गुन्हे, भ्रष्टाचार, सायबर क्राईम, इत्यादी गुन्ह्यांवर जरब बसवणे हे इंटरपोलचे मुख्य काम आहे. इंटरपोलकडे एजंट नाहीत, असले तरी ते गुन्ह्याच्या तपासासाठी कधीही दुसऱ्या देशांची बॉर्डर क्रॉस करीत नाहीत आणि त्यांच्याकडे आधुनिक ह*त्यारेसुद्धा नाहीत! वेगवेगळ्या कायदे पद्धतीत सुसंगतपणे त्यांची योग्य अंमलबजावणी करणे हे इंटरपोलचे काम आहे.

इंटरपोल हे एका नेटवर्क कम्युनिकेशनचा वापर करून कायम संपर्कात असते, यासाठीच I-24/7 म्हणून ओळखली जाते. वेगवेगळी राष्ट्र या माध्यमातून एकमेकांना थेट संपर्क करू शकतात आणि इंटरपोल हे त्यांच्यातील मध्यस्थी म्हणून काम करते.



इंटरपोल, रेड नोटीस म्हणून एक सूचना जारी करतात त्याद्वारे जगभरातील देशांना एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करता येते. या सूचनेद्वारे एखाद्या व्यक्तीला ओळखणे किंवा अटक करणे अशी कामे केली जातात. रेड नोटीस हे अरेस्ट वॉरंट नसते आणि त्याद्वारे कुठलेही कायदेशीर अधिकार मिळत नाहीत. याशिवाय इंटरपोलच्या घटनेनुसार त्यांना अशा कोणत्याही बाबीत हस्तक्षेप करता येत नाही ज्यांचा संबंध राजकीय, लष्करी किंवा धार्मिक गोष्टींशी येतो. इंटरपोल फक्त साध्या गुन्ह्यांची प्रकरणे हाताळते.

इंटरपोलच्या सभासद देशांना आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांशी लढण्यासाठी साधनेसुद्धा पुरविली जातात. इंटरपोल हे सगळ्या सभासद देशांना तर जोडतेच, पण आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा न थांबता कार्यरत असते. शिवाय त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि नवीन संशोधन यासाठीसुद्धा सुविधा पुरविते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंटरपोलने जगभरात गुन्हेगारीच्या संदर्भातील तब्बल १८ मोठे डेटाबेस सांभाळलेले आहेत.

इंटरपोल संवाद साधण्यासाठी त्यांच्या नावासोबतच त्यांचा एक खास लोगो देखील वापरतात. इंटरपोलचा हा लोगो १९५० पासून वापरत आहे. त्यात पृथ्वीगोल, ऑलीव्हच्या फांद्या, तलवार, मोजपट्टी तसेच IPCO व OIPC ही अक्षरे देखील लिहिलेली आहेत. त्या लोगोत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. त्यावरचा पृथ्वीगोल म्हणजेच इंटरपोलचे जगभरात असणारे सहकार्य, ऑलीव्हच्या फांद्या शांततेचे प्रतिक आहेत, उभी तलवार म्हणजेच पोलीस ऍक्शन आहे आणि त्या लोगोतील मोजपट्टी हे न्यायाचे प्रतीक आहे. हा लोगो १८८३ च्या ‘पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रोपर्टी’ या कायद्यानुसार मान्य करण्यात आला आहे.

पोलिसांची एक आंतरराष्ट्रीय संघटना असावी अशी कल्पना सर्वप्रथम १९०४ साली मोनॅको येथे मांडले गेली. ठरल्याप्रमाणे पहिल्या परिषदेला २४ देशांची उपस्थिती होती पण पुढे पहिल्या महायु*द्धाचे रणशिंग फुंकले गेले, यामुळे या संघटनेची बांधणी रखडली. पहिले महायु*द्ध संपल्यानंतर पंतप्रधान जोन्स स्क्रबर यांनी इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस कमिशनची स्थापना केली. 

भारत हा इंटरपोलचा संस्थापक सदस्य आहे. आजपर्यंत बर्‍याच महत्त्वपूर्ण ऑपरेशन्ससाठी भारताने इंटरपोलची मदत घेतली आहे. सध्या इंटरपोलचे मुख्यालय लायन सिटी फ्रान्स येथे आहे. इंटरपोल स्वतः कोणाला अटक करीत नाही; तर गुन्ह्याचा तपासाअंती आणि त्या-त्या देशातील प्रमुख यंत्रणा गुन्हेगाराला अटक करतात.

रेड नोटीससारख्या इंटरपोलच्या आणखी आठ नोटीस आहेत. त्या नोटीस चार ऑफिशियल भाषांमध्ये काढल्या जातात. त्या म्हणजे इंग्लिश, फ्रेंच, अरेबिक आणि स्पॅनिश. सभासद देशांमधील पोलिसांचे सहकार्य मिळवणे हा इंटरपोलच्या नोटीसांचा मुख्य हेतू असतो.

प्रत्येक देशातील कायदा हा त्या देशाच्या भौगोलिक किंवा राजकीय सीमे पुरता मर्यादित असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांच्या संदर्भातील तपासासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांची गरज पडते. इंटरपोलसारख्या संघटनांमुळे आज वेगवेगळ्या देशांत कायद्यांची अंमलबजावणी सुरळीत झाली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘एलोन मस्क’पेक्षा श्रीमंत असूनही मुकेश अंबानींनी सेकंड हॅन्ड टेस्ला कार का विकत घेतली..?

Next Post

कोहिनूर सोडा, ही आहे भारतातून चोरून जगभरातील संग्रहालयात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

कोहिनूर सोडा, ही आहे भारतातून चोरून जगभरातील संग्रहालयात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी

या देशांचे पासपोर्ट्स आहेत जगात सगळ्यात पावरफुल !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.