The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबरच सिंहगड अनेक पक्ष्यांचं घर देखील जपतोय

by शंतनू परांजपे
8 August 2025
in भटकंती
Reading Time: 3 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभयारण्ये आहेत. काही पक्ष्यांसाठी प्रसिद्ध तर काही इतर अन्य वन्यजीवांसाठी पण अशी अनेक ठिकाणे आहेत जी अभयारण्ये नसूनसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते. यातील एक ठिकाण म्हणजे सिंहगडाची दरी (सिंहगड व्हॅली). हिवाळ्यातील जवळपास प्रत्येक रविवारी इथे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांची वर्दळ असते.

सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत वसलेला सिंहगड, त्याचे ऐतिहासिक महत्व यामुळे सिंहगडावर जाण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात पण इथे आढळणाऱ्या पक्ष्यांची दखल घेण्यासाठी मात्र मोजकेच थोडे लोक फिरकतात. अर्थात यामागे सरकारी यंत्रणांमध्ये असणारी उदासीनता, इथे आढळणाऱ्या जैवविविधतेचे व्यवस्थित प्रकारे डॉक्यूमेंटेशन न करणे ही महत्वाची कारणे.

 

red throated flycatcher

सिंहगड व्हॅली ही किल्ल्याच्या दोन्ही बाजूला आहे पण गर्दी मात्र आतकरवाडीमध्येच होते. इथे जाणे अत्यंत सोपे आहे, सिंहगड किल्ला चढायची सुरुवात होण्यापूर्वीच डावीकडे जो रस्ता जातो तिथपासूनच व्हॅलीची सुरुवात होते.



पावसाळ्यात आढळणारी विविध फुले, हिवाळ्यातील स्थलांतरीत पक्षी आणि विविध फुलपाखरे ही येथील वैशिष्ट्ये.

पावसाळा सुरु झाला की इथले झरे वाहू लागतात आणि अशा काळात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसतील सुगरणीची घरटी.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला

ती घरटी बघताना हे गीत सतत कानात घुमत असते. खोप्यातून हळूच बाहेर डोकावणारी ती सुगरण, तिचा पिवळा टोपीवाला नर हे दृश्य बघण्यात वेळ कसा जातो तेच कळत नाही.

हिवाळा सुरु झाला की इथे स्थलांतरीत पक्ष्यांची गर्दी वाढू लागते. भारताच्या किंवा जगाच्या इतर भागातून येणाऱ्या पक्ष्यांना तिकडची कडक थंडी सहन होत नाही म्हणून इतक्या किलोमीटरचा प्रवास करून सिंहगडाच्या पायथ्याशी ४-५ महिन्यांसाठी आपला संसार थाटतात.

पक्षी आल्याची बातमी आली रे आली की सर्व पक्षी छायाचित्रकार त्या पक्ष्यांचे फोटो मिळवण्यासाठी धडपड करतात.

स्वर्गीय नर्तक (Indian Paradise Flycatcher) या लांब शेपटीवाल्या सुंदर पक्ष्याची छबी टिपण्यासाठी काय ती धडपड. पण तुम्हाला सांगतो, आयुष्यात एकदा तरी तो पक्षी बघाच! निसर्गाची सुंदरता काय असते ते तुम्हाला कळेल.

मोरकंठी (Verditer Flycatcher), नीलवर्णी (Ultramarine Flycatcher), राखी डोक्याचा पिवळा माशिमार (Grey headed canary flycatcher), लाल छातीचा तांबुला (Red throated Flycatcher) इत्यादी पक्ष्यांसाठी सिंहगड व्हॅली खूप प्रसिद्ध आहे.

crested lark

सह्याद्रीतील इतर सदाहरित जंगलांप्रमाणे सिंहगडचे जंगलसुद्धा सदाहरित वृक्षांचे आहे. साग, आंबा, चिंच, हिरडा, बेहडा, खैर इत्यादी झाडे इथे आढळतात. फुलांची आणि फुलपाखरांची तर गणतीच नाही.

व्हॅलीमध्ये आत शिरल्यावर एक ओढा लागतो. हिवाळ्यात केवळ याच ओढ्यात पाणी आढळते त्यामुळे, सकाळी पाणी पिण्यास हे सर्व पक्षी हमखास पणे येतातच. त्यामुळे विनासायास या पक्ष्यांचे फोटो काढता येतात. गरुड किंवा घुबडे पहायची असतील तर मात्र जंगलामध्ये आत शिरावे लागेल.

अर्थात ही जागा ट्रीप काढण्यासाठी मुळीच नाही. त्यामुळे तिथे जाऊन धांगडधिंगा करायचा असेल तर मुळीच जाऊ नका.

पण पक्ष्यांची दुनिया पहायची असेल किंवा एखादा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचा असेल तर व्हॅलीसारखी जागा नाही. फक्त सोबत माहीतगार माणूस हवा जो या पक्ष्यांची नावे सांगू शकेल.

त्यामुळे सिंहगड किल्ला, व्हॅली आणि येता येता पुण्याचा समुद्र अशी ओळख असलेल्या खडकवासला धरणाच्या इथे मिळणारी गरमागरम भजी असा बेत आखल्यास एक रविवार नक्कीच सार्थकी लागेल.

सिंहगड व्हॅलीमध्ये आढळणाऱ्या काही प्रमुख पक्ष्यांची नावे:

क्रमांक इंग्रजी नाव मराठी नाव क्रमांक इंग्रजी नाव मराठी नाव
१. Indian Paradise Flycatcher स्वर्गीय नर्तक २१ Spotted Owlet ठिपकेदार पिंगळा
२. Black Naped monarch नीलमणी २२ Scoops Owl डुडुळा
३ Verditer flycatcher नीलांग २३ Grey-bellied Cuckoo कारुण्य कोकीळा
४ Grey headed canary flycatcher राखी डोक्याचा पिवळा माशिमार २४ Common wood shrike रानखाटीक
५ Red breasted flycatcher तांबुला २५ Rufous Treepie टकाचोर
६ Taiga Flycatcher लाल छातीचा तांबुला २६ Crested Treeswift शेंडी पाकोळी
७ Ultramarine Flycatcher नीलसागर २७ Yellow Wagtail पिवळा धोबी
८ Tickell’s Blue Flycatcher निलीमा २८ Forest Wagtail रान धोबी
९ Serpent eagle सर्पगरुड २९ Tree Pipit वृक्ष तिरचिमणी
१० Booted Eagle सुतुंग ३० Jungle bush quail लावरी
११ Bonelli’s Eagle नराच ३१ Wryneck मानमोडी
१२ Crested hawk eagle तुरेबाज व्याध ३२ Crested Bunting युवराज
१३ Plum Headed Parakeet तोईपोपट ३३ White-Bellied Drongo पांढरपोट्या कोतवाल
१४ Red Avadavat लाल मुनिया ३४ Greenish Warbler हिरवट पर्णी वटवट्या
१५ Blackbird कस्तुरी ३५ Puff-throated Babbler ठिपकेवाला पहाडी सातभाई
१६ Blue rock Thrush निळा कस्तूर ३६ Tawny-bellied Babbler लालटोपी सातभाई
१७ Malbar Whistling Thrush पर्वत कस्तुर ३७ scimitar babbler तलवारचोच सातभाई
१८ Orange Headed Thrush रानकस्तूर ३८ White-cheeked Barbet कुर्टुक
१९ Green Footed Pigeon हरियल ३९ White-rumped Munia पांढर्‍या पाठीची मनोली
२० Jungle Prinia रानवटवट्या ४० Oriental Honey Buzzard मोहोळ घार

(ही यादी पूर्ण नाही. इथे आणखी भरपूर पक्षी आढळतात मात्र विस्तारभयास्तव सर्व पक्ष्यांची नावे येथे देणे शक्य नाही)

जायचे कसे-

पुणे-खडकवासला-खानापूर-आतकरवाडी असे साधारण २०-२५ किमी अंतर.

जेवणाची सोय-

खानापूर येथे जेवणाची सोय होऊ शकेल तसेच सिंहगड किल्ल्यावर मिळणाऱ्या भजीची व पिठलं-भाकरीची चव काही निराळीच.

(विशेष टीप- डिसेंबर-जानेवारी हा येथे जाण्यासाठी उत्तम कालावधी.)


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : 
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अनेक अज्ञात वीरांच्या कहाण्या हे विरगळ आपल्याला सांगतायत

Next Post

आज इंदिराजींच्या ठाम निर्णयामुळेच बांग्लादेश पाकिस्तानाच्या तावडीतून सुटलाय

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

आज इंदिराजींच्या ठाम निर्णयामुळेच बांग्लादेश पाकिस्तानाच्या तावडीतून सुटलाय

भारताने जगाला आयुर्वेदिक शाम्पू दिला, त्यांनी त्यात केमिकल मिसळून आपल्यालाच विकला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.