The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विजय अगदी काही पावलावर असताना या खेळाडूने जे केलं ते पाहून कोणालाही अभिमान वाटेल

by द पोस्टमन टीम
1 March 2025
in क्रीडा, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


“लाईफ इज अ रेस” असे सांगणारा ‘थ्री इडियट्स’मधील विरू सहस्त्रबुद्धे ही काही या जगातील एकमेव व्यक्तीरेखा नाही. आयुष्याला स्पर्धा समजणारे असे अनेक विरू सहस्त्रबुद्धे आपल्यात आहेत, जे जीवाच्या आकांतानी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावत असतात. कधीकधी चतुर रामलिंगमसारख्या व्यक्तीदेखील फक्त स्वतःला ‘लंबी रेस का घोडा’ सिद्ध करण्यासाठी नुसतीच घोकंपट्टी करत असतात, ज्यांना खऱ्याखुऱ्या, अस्सल ज्ञानाशी काहीही संबंध नसतो. या अशा प्रवृत्तींना कधी कधी आपणही बळी ठरतो आणि नाहक मानसिक ताणाला आमंत्रित करतो.

प्रत्येक क्षेत्र अशा दिखावू स्पर्धेने ग्रासलेले आहे. जिथे अस्सलतेपेक्षा जास्त भपकेबाजी आणि स्पर्धेतील खिलाडूवृत्तीऐवजी हिं*सक वादविवाद आणि पाय खेचून मागे ओढणाऱ्या वृत्ती जास्त दिसून येतात. सुशांत सिंग राजपूतच्या आत्मह*त्येनंतर चित्रपट क्षेत्रातील ही हिणकस स्पर्धा काही चांगल्या कलाकाराचा बळी घेते, हे आपण पाहत आहोत. चित्रपट क्षेत्रातील या गलिच्छ स्पर्धेबद्दल आणि नव्या कलाकारांना दिल्या जाणाऱ्या अपमानजनक वागणुकीबद्दल बऱ्याच चर्चा कानावर पडत आहेत.

अर्थात सगळ्याच क्षेत्राला या स्पर्धेच्या ग्रहणाने ग्रासले असले तरी, गुणवत्तेला शिरोधार्य मानून जगणारेही काही अपवादात्मक लोक आहेत. पण, दुर्दैवाने अशा लोकांच्या चांगुलपणाला झटपट प्रसिद्धी मिळत नाही. खेळ आणि त्यातही अ‍ॅथलेटीक्सच्या स्पर्धेत तर वादविवाद हे नेहमीच ठरलेले असतात. वेगवेगळ्या स्पर्धा जिंकणारे आणि स्वतःचेच रेकॉर्ड स्वतः मोडीत काढणारे अ‍ॅथलेट तर बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकेले आपण पहिले आहे. येनकेनप्रकारे स्पर्धा आणि बक्षीस जिंकण्यासाठी इथे उर फुटोस्तोवर स्पर्धक धावत असतात. प्रत्येकाचे एकच लक्ष असते आपण दुसऱ्याला मागे टाकून पुढे गेले पाहिजे.

पण, स्पेनमधील पॅम्पलोनाजवळील नॅवर्रा येथे पार पडलेल्या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धेत अस्सल खिलाडूवृत्तीची झलक पाहायला मिळाली. स्पेनचा इवान फर्नांडीस आणि केनियाचा अबेल मुताई दोघेही अगदी अंतिम रेषेच्या नजीक पोचले होते. अबेल मुताई इवान फर्नांडीसच्या पुढे होता. इवान आणि अबेलमध्ये बरेच अंतर होते.



अबेलला वाटले आपण अंतिम रेषा पार केले म्हणून तो धावायचा थांबला. पण, मागून येणाऱ्या इवानने त्याच्या लक्षात आणून दिले की, तो जिथे थांबला आहे तिथे अंतिम रेषा नसून त्याच्याही पुढे आहे. इवानने अबेलच्या हे लक्षात आणून दिले आणि अबेलला पुन्हा धावण्यास उद्युक्त केले.

शेवटी जेव्हा त्याने अंतिम रेषा पार केली तेव्हा इवानचे आभार मानण्यासाठी त्याने इवानशी हात मिळवले. या शर्यतीमध्ये इवानने जी खिलाडूवृत्ती दाखवले त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. खरोखर आजच्या गळेकापू स्पर्धेत असा सच्चा खिलाडूपणा जिवंत आहे, हे पाहून डोळे भरून येतात.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

एका स्पॅनीश पत्रकाला दिलेल्या मुलाखतीत इवान म्हणतो,

एका स्पॅनीश पत्रकाला दिलेल्या मुलाखतीत इवान म्हणतो, “मी खरंच ही स्पर्धा जिंकण्यास पत्र नव्हतो. अबेलने आमच्या बराच पुढे धावत होता. मी ते अंतर कापणं शक्यच नव्हतं. फक्त माझ्या सहखेळाडूच्या एका चुकीमुळेच मी त्याची बरोबरी करू शकलो. पण या स्पर्धेचा खरा विजेता तोच आहे.”

त्याचे प्रशिक्षक आणि माजी युरोपियन आणि वर्ल्ड मॅरेथॉन चॅम्पियन असलेले मार्टिन फीज यांनी मात्र इवानबद्दल नाराजी व्यक्त केली. “खरोखरच त्याचे भाव पाहण्यासारखे होते, असे ते म्हणतात. सहखेळाडूच्या चुकीचा फायदा घेऊन त्याला ही रेस जिंकणे सहज शक्य होते. पण, त्याने तसे केले नाही. अर्थात यामुळे तो एक चांगला माणूस असल्याचे सिद्ध झाले असले तरी तो चांगला अथलेट होऊ शकला नाही.” त्याच्या करिअरमधील एक महत्वाची संधी त्याने गमावली असल्याचे ते म्हणाले. एका प्रशिक्षकाच्या दृष्टीने पाहता त्यांना निराश वाटणे साहजिकच आहे. त्यांची ही नाराजी देखील समजून घेण्यासारखी आहे.

ही स्पर्धा त्याच्या करिअरच्या दृष्टीनेही महत्वाची होती. स्पॅनीश क्रॉस कंट्री टीममध्ये सामील होण्यासाठी ही स्पर्धा जिंकणे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. याचा त्याच्या करिअरवरही परिणाम होऊ शकतो. त्याच्या या न्यायपूर्ण वर्तणूकीची त्याला किंमतही चुकवावी लागू शकते. हे माहित असूनही तो याबद्दल बिलकुल चिंता करत नाही.

तो म्हणतो, “मी जिंकल्याने जितकी प्रसिद्धी मिळाली नसती तितकी प्रसिद्धी आणि तीही सुप्रसिद्धी माझ्या या कृत्याने मला मिळाली आहे. आज राजकारण असो समाज असो की समाजातील कोणतेही क्षेत्रज्यापद्धतीने सगळीकडे बजबजपुरी आणि गळेकापू स्पर्धा सुरु आहे ते पाहता प्रामाणिकपणे मी केलेली ही कृती जास्त महत्वाची आहे.”

अर्थात हे सर्वार्थाने सत्यच आहे.

दुर्मिळ होत चाललेला प्रामाणिकपणा आणि त्यातही दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याची धडपड या पार्श्वभूमीवर इवानची ही कृती मोठा संदेश देऊन जाते. ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मिडियामधून इवानवर कौतुकाचा वर्षाव झाला.

इवान आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक उत्तम धावपट्टू आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्याच्यातील उमदेपणा, खिलाडूवृत्ती आणि प्रसिद्धी, पैसा, यश मिळवण्यासाठी गुणवत्तेशी तडजोड न करण्याची वृत्ती ही त्याहून जास्त प्रेरणादायी आहे. इवान आजच्या जमान्यातला एक आयडियल हिरो आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वसंतरावांनी कृषीक्षेत्रात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आत्मनिर्भर केलंय

Next Post

नव्वदच्या दशकात या सीरिअल कि*लरच्या द*हश*तीने चेन्नई हादरली होती

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

नव्वदच्या दशकात या सीरिअल कि*लरच्या द*हश*तीने चेन्नई हादरली होती

इस्लामी प्रचारक झाकीर नाईक या माणसाची हुबेहूब नक्कल करतो

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.