The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे खरे अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत

by द पोस्टमन टीम
2 October 2025
in इतिहास, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


मागे अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचा चित्रपट आला. हा चित्रपट संजय बारू, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या प्रवक्त्याने लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होता.

या चित्रपटात मनमोहनसिंह यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ उभा करण्यात आला होता. त्यांचा कार्यकाळात झालेली आर्थिक प्रगती, त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी त्यांच्यावर टाकलेला दबाव या सर्वच गोष्टींना विचारात घेण्यात आले होते.

जेव्हा मनमोहनसिंह यांचा कार्यकाळ समाप्त झाला त्यावेळी ते एक वाक्य म्हणाले होते, ‘History will be kinder to me than media’ अर्थात ‘इतिहास माझ्यावर अन्याय करणार नाही’. बहुदा मनमोहनसिंह यांनी हे वाक्य लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्याकडे दृष्टीक्षेप टाकून म्हटलं असावं.

कारण भारताच्या इतिहासातील खऱ्या अर्थाने ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ लाल बहादूर शास्त्री होते.



जेव्हा जेव्हा लाल बहादूर शास्त्री हे नाव इतिहासात समोर येतं त्यावेळी त्यांचा ‘जय जवान जय किसान’ हा नारा आठवल्याशिवाय राहत नाही.

भारताच्या राजकारणात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर करण्यात के. कामराज यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

१७ वर्षे बाल्यावस्थेत असलेल्या लोकशाहीचे पालन करणाऱ्या नेहरूंच्या निधनानंतर सर्वत्र अनिश्चिततेची भावना पसरली होती. देशभरात नेहरूंची जागा कोण घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

नेहरूंच्या मृत्यूपूर्वी अमेरिकन दैनिक न्यूयॉर्क टाईम्सने एक लेख छापला होता ज्यात त्यांनी नेहरूंचा वारसा पुढे चालवू शकणाऱ्या भारतीय नेत्यांमध्ये एका व्यक्तीचे वर्णन त्यांनी केले होते, त्या व्यक्तीकडे त्यावेळी भारतीय रेल्वे मंत्रालायची जबाबदारी होती. हा व्यक्ती असा होता, ज्याच्या कार्यकाळात घडलेल्या एका रेल्वे अपघाताची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली होती. त्या व्यक्तीचे नाव होते लाल बहादूर शास्त्री.

न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात लाल बहादूर शास्त्रींचा संपूर्ण जीवनपट समोर ठेवण्यात आला होता. त्यांच्या महात्मा गांधींवर असलेल्या श्रद्धेपासून त्यांच्या साध्या राहणीमानापर्यंत अनेक पैलूंचे कौतुक त्या लेखात करण्यात आले होते.

परंतु नेहरूंच्या मृत्यूवेळी त्यांनी कोणाला आपला वारसदार म्हणून नामांकित न केल्यामुळे काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेकांच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. त्यात प्रमुख नाव होते मोरारजी देसाई. नेहरू गेले त्यादिवशीच मोरारजी देसाईंनी पंतप्रधानपदासाठीची आपली इच्छा बोलून दाखवली होती.

हंगामी पंतप्रधान म्हणून गुलझारीलाल नंदा यांची निवड करण्यात आली होती. नंदा यांना देखील आपले पंतप्रधानपद टिकवून ठेवायचे होते. त्यावेळी मोरारजी देसाई आणि गुलझारीलाल नंदा यांच्यात चढाओढ सुरू असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते के. कामराज पुढे आले आणि त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन ‘लाल बहादूर शास्त्री’ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित केले.

खरंतर स्वतः शास्त्री यांना कधीच पंतप्रधानपदाची अभिलाषा नव्हती. पण के. कामराज यांनी मोरारजी देसाईंचा डाव हाणून पाडत त्यांना आणि नंदा यांना दावेदारी मागे घ्यायला भाग पाडून लाल बहादूर शास्त्रींच्या हाती पंतप्राधान पदाची सूत्रे सोपविली.

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यावर सर्वांना वाटलं की ते इतर कॉंग्रेस नेत्यांच्या हातचं भावलं बनतील, पण फक्त १८ महिन्यांच्या काळातच आपलं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं.

पंतप्रधान म्हणून त्यांचा १८ महिन्यांचा कार्यकाळात त्यांनी अशा गोष्टी करून दाखवल्या ज्यामुळे भारताच्या लोकशाहीचे रक्षण तर झालेच पण तीच लोकशाही आणखी समृद्ध देखील झालो. जगाला भारत शांततेचा व मैत्रीचा संदेश देऊ शकला.

आपल्या १८ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी खरा धोरणी नेता कसा असावा याचे एक उदाहरण जगासमोर ठेवले. त्यांनी भारताला एका मोठ्या संकटाच्या काळातून बाहेर काढले. दक्षिणेकडे सुरू असलेल्या हिं*सक हिंदीविरोधी आंदोलनाला शांत करण्यापासून, अन्न-धान्य टंचाई असताना देशभरातील जनतेचे पोट भरण्याची व्यवस्था करण्यासाठी हरित क्रांतीचा आणि श्वेत क्रांतीचा मार्ग प्रशस्त केला.

त्यांनी नेहरूंच्या केंद्रीय नियोजनाच्या समाजवादी संकल्पनेत अमुलाग्र बदल केला. त्यांच्या कार्यकाळातील सर्वात सुवर्ण क्षण होता तो म्हणजे १९६५ च्या यु*द्धात केलेला पाकिस्तानचा पराभव व त्यानंतर भारताला दिलेला ‘जय जवान जय किसान’चा नारा!

आपल्या कमीतकमी संसाधनांचा वापर करत त्यांनी पाकिस्तानशी लढा दिला होता. आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे, त्याच्या मोबदल्यात आम्हाला गरीब रहावं लागलं तरी चालेल अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानचा धिक्कार ऑगस्ट १९६५ च्या संसदीय भाषणात केला होता.

२३ सप्टेंबर १९६५ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या दबावापोटी हे यु*द्ध थांबवले गेले. पुढे सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने आपल्या शत्रू राष्ट्र पाकिस्तानशी करार करण्यासाठी शास्त्री रशियाला ताश्कंद येथे गेले. १० जानेवारी १९६६ ला त्यांनी करारावर स्वाक्षरी केली आणि पुढे तिथेच त्यांचा मृत्यू झाला. शास्त्रींच्या जाण्याने सगळ्यांना धक्का बसला.

ताश्कंद करारामुळे भारतात मात्र शास्त्रींवर पाकिस्तानच्या कश्मिरमधील उपद्रवाला मान्यता दिली म्हणून टीका केली जात होती.

लाल बहादूर शास्त्री यांचा १८ महिन्याचा कार्यकाळ नेहरूंच्या १७ वर्षीय राजवटीपेक्षा अधिक चांगला होता. त्यांच्या मनात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा विचार होता. पण दुर्दैवाने त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही.

जर शास्त्रींना दहा वर्षे अजून आयुष्य लाभलं असतं तर इंदिरा गांधी राजकारणात आल्या नसत्या, राजीव आणि संजीव या त्यांच्या मुलाने नोकरी केली असती, राहुल हा त्यांचा नातू देखील परदेशात नोकरी करत असता आणि देशात गांधी घराणं अस्तित्वात नसतं. पण या सर्व जर तरच्या गोष्टी झाल्या.

मनमोहनसिंह असो की लाल बहादूर शास्त्री दोन्ही काँग्रेसचे मातब्बर नेते आणि त्यांनी सुधारणावादी राजकारण केलं. कदाचित इतिहास मनमोहन सिंह यांचं चांगलं चित्रण करेल पण लाल बहादूर शास्त्रींना स्वतःला सिद्ध करण्याचा कालावधी मिळाला नाही. अचानक पडलेल्या जबाबदारीला त्यांनी कमी कार्यकाळात ज्या प्रकारे निभावलं ते अद्भुत होतं. त्यासाठी ते इतिहासात अमर झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दुर्मिळ आणि आपल्या पाकिटात जपून ठेवलेली एक रुपयाची नोट आता परत येतेय

Next Post

जेआरडी टाटांनी या माणसाला “भारतीय हवाई वाहतुकीचे संस्थापक” म्हणून गौरवलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जेआरडी टाटांनी या माणसाला "भारतीय हवाई वाहतुकीचे संस्थापक" म्हणून गौरवलं होतं

एका जॉइंट स्टॉक कंपनीने भारतावर जवळपास शंभर वर्ष राज्य केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.