The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इस्लामी प्रचारक झाकीर नाईक या माणसाची हुबेहूब नक्कल करतो

by द पोस्टमन टीम
4 June 2025
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब  


एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरीत होऊन आपल्या जीवनशैलीत बदल करणे हे काही नविन नाही. परंतु अगदी आपले हावभावसुध्दा त्या व्यक्तीसारखेच असायला हवेत हा हट्ट म्हणजे अनुकरणाची परिसीमाच.

आपल्या गुरुच्या अनुकरणाची परिसीमा गाठणारी अशी एक व्यक्ती म्हणजे झाकिर नाईक. आणि त्यांचे गुरु आहेत अहमद दीदात.

१९८७ साली अहमद दीदात यांची पहिली भेट घेतल्यावर त्यांनी धर्मप्रचार गंभीरपणे घेतला. झाकिर नाईकच्या नावाची चर्चा सन २००० नंतर हळुहळु वर्तमानपत्रात होऊ लागली. २०१० पर्यंत भारतात इस्लामिक धर्मप्रचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या नावांमध्ये त्याचं नाव सगळ्यात वरती आले. स्वत:ला तुलनात्मक धर्मप्रचाराचा विद्यार्थी म्हणवून घेणारा झाकिर नाईकला इंग्रजी, उर्दू मिश्रित हिंदी, अरबी भाषा येतात. इस्लामिक धर्मप्रचारासाठी वेगवेगळ्या धर्मगुरुंना एकत्र बोलवून तो चर्चा भरवत असे. ‘आर्ट ऑफ लिविंग’ गुरु श्री श्री रविशंकर यांच्या बरोबर झालेल्या चर्चेने तर सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

परंतु, झाकिर नाईकचे सगळे तत्वज्ञान ‘अहमद दीदात’ या व्यक्तीसमोर पोकळ असल्याचे जाणवते.

अहमद दीदात या नावाचा शोध घेतल्यावर तुम्हाला झाकिर नाईकसारखीच बोलणारी एक व्यक्ती आणि वीडियो दिसतील. त्या व्यक्तीचं आणि झाकिरचं बोलणं तुम्हाला अगदी एकसारखंच वाटलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण झाकिर नाईक त्या व्यक्तीची नकल करतात. त्यांच्याच पध्दतीने इंग्रजी बोलणे, मधेच अरबी बोलणे. एखादी व्यक्ती दुसऱ्याची एवढी नक्कल करु शकतो हे बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.



आज आपण झाकिर नाईक नक्कल करत असलेल्या अहमद दीदात यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

शेख अहमद दीदात यांचा जन्म १ जुलै, १९१८ रोजी सुरत शहरात झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील दक्षिण आफ्रिकेला गेले होते. नंतर ९ वर्षाचे असताना अहमद दीदात वडीलांबरोबर दक्षिण आफ्रिकेला गेले. त्यानंतरचे त्यांचे आयुष्य दक्षिण आफ्रिकेतच गेले. ते दक्षिण आफ्रिकी नागरिक म्हणूनच ओळखले जाते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

दक्षिण आफ्रिकेतच अहमद यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. अभ्यासात ते अतिशय हुशार होते. भाषेचा अडथळा पार करण्यासाठी त्यांनी इंग्रजी भाषेचं शिक्षणही घेतलं. ६ व्या वर्गात असतानाच कौटुंबिक दबावामुळे त्यांना शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. तेव्हा त्यांचे वय होते १६ वर्ष.

एका फर्निचरच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. अंदाजे २ वर्षांनंतर म्हणजेच १९३६ मध्ये ख्रिश्चन धर्मात रुपांतरीत होण्यासाठी ख्रिश्चन धर्मगुरूंनी इस्लाम धर्माबद्दल काही चुकीची वक्तव्ये केली. इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी मोहम्मद पैगंबरांनी तलवारीचा आधार घेतला असे ते सांगत होते.

यानंतर त्यांनी धार्मिक पुस्तकांकडे आपला मोर्चा वळवला. अहमदांच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त परिणाम ‘इजहार-उल-हक’ नावाच्या एका धार्मिक पुस्तकाने झाला असे म्हटले जाते. त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी बहाल केले.

इस्लाम धर्माशी संबंधित असलेल्या धार्मिक पुस्तकांना तर त्यांनी वाचलीच पण बायबलवरही त्यांचा चांगलाच आभ्यास होता. पुस्तके वाचुन त्यांच्या ज्ञानात खुप भर पडली. कोणत्याही धार्मिक प्रश्नांची उत्तरे ते आता सहजतेने देऊ लागले.

यादरम्यान त्यांची ओळख ख्रिश्चन धर्मातून मुस्लिम धर्मात रुपांतर केलेल्या फेयरबैंक्स यांच्याशी झाली. फेयरबैंक्सकडून अहमद यांनी ख्रिश्चन धर्माबद्दल जाणुन घेण्यास सुरुवात केली. फेयरबैंक्सने त्यांना बायबलबद्दल शिकवायलाही सुरुवात केली.

रंजक बाब ही की अहमदांनी कधीही कोणत्याच इस्लामिक धर्मग्रंथाची शिक्षा घेतली नाही.

१९४०च्या दशकात अहमद दीदात यांनी धर्मप्रचारास सुरुवात केली. १९४२ मध्ये डरबन येथील सिनेमागृहात त्यांनी पहिल्यांदा १५ लोकांसमोर पहिले भाषण दिले होते असे म्हटले जाते. डरबनच्या जुमा मस्जिदीला त्यांनी धर्मप्रचाराचे केंद्र बनवले. ही मस्जिद अशा ठिकाणी आहे जिथे जगभरातून पर्यटक येतात. या पर्यटकांशी अहमद संवाद साधत असत. त्यांना जाहीरातीसाठी काही पोस्टर्स दिले जात.

१९४९ पर्यंत अहमदांनी तिथे काम केले आणि नंतर ते आपल्या कुटुंबाबरोबर पाकिस्तानात आले. कराचीत ३ वर्ष राहुन ते पुन्हा आफ्रिकेला परत गेले.

आपले दोन मित्र ‘गुलाम हुसैन वांकेर’ आणि ‘ताहिर रसूल’ यांच्याबरोबर ‘इस्लामिक प्रपोगेशन सेंटर इंटरनॅशनल’ (IPCI) संस्थेची स्थापना केली. त्यानंतर ३ दशके आपल्या मित्रांबरोबर धर्मप्रचाराचे काम केले.

१९८६ मध्ये अहमद दीदात यांना सौदी अरेबियाचा ‘किंग फैसल’ हा पुरस्कार देण्यात आला. हा त्यांच्या धर्मप्रसाराच्या कामाचा गौरव होता. त्यानंतर त्यांची प्रसिद्धी वाढतच गेली. एकानंतर एका देशांत जाऊन त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य चालु ठेवले. यादरम्यान ते एकदा पाकिस्तानी नेते जिया-उल-हकला देखील भेटले.

अहमद दीदात यांचे आयुष्य विवादांनी भरलेले होते. इस्लाम धर्माला वरचढ ठरवण्यासाठी बाकीच्या धर्मांची ते आलोचना करत असत. याचा विरोध सगळ्यात आधी आफ्रिकेतील सुशिक्षित मुस्लिम समाजाने केला.

‘मुस्लिम डायजेस्ट’ नावाच्या एका मासिकात अहमद दीदात यांच्यावर खुप टीका झाली होती. तरीही अहमद यांना काहीही फरक पडला नाही. त्यानंतर बाकी धर्माच्या लोकांनीही त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

अहमद दीदात इस्लामिक राष्ट्र संकल्पनेचे समर्थक होते. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इस्लामिक राष्ट्र या संकल्पनेस उघडपणे समर्थन दिले होते. सलमान रश्दीने लिहिलेल्या ‘सतेनिक वर्सेज’ या पुस्तकासाठी इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्लाह खोमेनी याने दिलेल्या मृत्यूदंडालाही अहमदने समर्थन दिले होते.

अहमद दीदातचा द*हश*तवादी ओसामा बिन लादेन याच्याशी जवळचे संबंध होते. अहमदच्या धार्मिक संस्थेला सगळ्यात जास्त आर्थिक मदत लादेनच्या परिवाराकडून मिळत असे. लादेन कुटुंबाच्या पैशावरच अहमदांनी आपले धार्मिक प्रचाराचे साम्राज्य उभे केले असेही म्हटले जाते.

१९९६ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर ९ वर्ष जिवंत असुनही शरीराची हालचाल करणे त्यांना अवघड होऊन बसले. आजारी पडल्यानंतर त्यांना आफ्रिकेवरुन रियाधला नेण्यात आलं. तिथेच त्यांच्यावर किंग फैसल इस्पितळात उपचार केले गेले. पुढे ८ ऑगस्ट २००५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नव्वदच्या दशकात या सीरिअल कि*लरच्या द*हश*तीने चेन्नई हादरली होती

Next Post

गंगू मेहतर – १८५७च्या उठावातील एक विस्मृतीत गेलेला महान क्रांतिकारक

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

गंगू मेहतर - १८५७च्या उठावातील एक विस्मृतीत गेलेला महान क्रांतिकारक

दुर्मिळ आणि आपल्या पाकिटात जपून ठेवलेली एक रुपयाची नोट आता परत येतेय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.