The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवृत्तीच्या वयात खेळायला सुरु करणारा भारताचा पहिला कसोटी कर्णधार हा मराठी होता

by द पोस्टमन टीम
28 October 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गेल्या कित्येक दशकांपासून क्रिकेट हा खेळ आपल्या देशात खेळला जातोय. भारतीयांचं या खेळावर असणारं प्रेम तर सर्वज्ञात आहेच. रसिक लोक अगदी बेभान होऊन क्रिकेटच्या सामान्यांचा आनंद घेत असतात. क्रिकेट म्हटलं की सर्वांच्याच अंगात एक वेगळाच जोश संचारतो. 

कधी कधी खेळाडूंना देखील खेळाची, प्रसिद्धीची इतकी नशा चढते की त्यांना कुठे थांबावं हेच कळत नाही. पण आपल्याकडे काही असेही खेळाडू होऊन गेलेत की ज्यांनी फिटनेसच्या बाबतीत अजिबात तडजोड केली नाही. इतकंच नाही तर यांपैकी एक खेळाडू असा होता की ज्याला फिटनेसच्या बाबतीत आजही आदर्श मानलं जातं.

ज्या वयात लोक निवृत्त होऊन निवांत आयुष्य जगायची स्वप्नं बघतात त्या वयात या अवलियाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हा खेळाडू म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून भारताचा पहिला कसोटी कर्णधार सी के नायडू.

३१ ऑक्टोबर १८९५ रोजी महाराष्ट्रातल्या नागपुरात सी. के. नायडू यांचा जन्म झाला. घरी असणारं राजकीय वातावरण आणि आजोबांची वकीली यामुळे त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी उत्तम होती. त्यांचं बालपण अगदी आनंदात एका सुखवस्तू घरात गेलं.



जसे जसे ते मोठे होत गेले कुठल्याही तरुणाप्रमाणेच त्यांनाही स्वप्न पडू लागले. आणि तेव्हाच त्यांनी आपले ध्येय निश्चित केले. क्रिकेटच्या दुनियेतला तेजस्वी सीतारा होण्याचे त्यांनी मनाशी ठरवलं होते.

या स्वप्नाच्या प्रवासाची सुरुवात झाली जेव्हा त्यांना हिस्लॉप कॉलेजच्या संघात संधी मिळाली तेव्हा या संधीचं सोनं करत त्यांनी या मालिकेत आपली चुणूक दाखवून दिली. या सामन्यातील दमदार प्रदर्शनानंतर त्यांना १९१६ साली एक तिरंगी मालिका खेळायला मिळाली. या मालिकेतसुद्धा त्यांनी आपल्या दमदार फलंदाजीने प्रतिस्पर्ध्याला हैराण केलं.

पण नंतरची काही वर्षे सी के नायडू हे काही कारणामुळे क्रिकेटपासून दूर राहिले, त्यांच्या पुढच्या प्रवासाची शक्यतासुद्धा आता धूसर झाली होती. पण वेळेसोबत त्यांचा खडतर काळ संपला आणि १९२६ साली त्यांची जीवनात एक आशेचा किरण चमकला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

हिंदू आणि एम.सी.सी या संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात १८७ चेंडूत १५३ धावा करत स्वतःवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या खेळीत तब्बल ११ षटकारांचा तर १३ चौकरांचा समावेश होता. त्यांच्या दमदार खेळीसाठी त्यांना चांदीची बॅटदेखील देण्यात आली होती.

त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे १९३२ साली ते भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार झाले. यापेक्षा महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी ही होती की ते पहिल्यांदाच कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणार होते. हा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला गेला होता.

असं म्हटलं जातं की त्या काळात इंग्लंडचा संघ हा अतिशय बलाढ्य संघ म्हणून ओळखला जायचा. अशा या बलाढ्य संघाच्या विरोधात भारतीय संघाने कडवी झुंज दिली. या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना सी के नायडू यांच्या हाताला जबरदस्त दुखापत झाली. यावेळी ते खेळण्याच्या परिस्थितीतही नव्हते. तरीसुद्धा त्यांनी फलंदाजी करताना ४० धावा केल्या, त्यांच्या या गोष्टीचं खूप कौतुक झालं. ही मलिका खेळताना इंग्लंड दौऱ्यात नायडू यांनी सर्वच्या सर्व २६ प्राथमिक सामन्यांत आपला सहभाग नोंदवला.

या मालिकेतील त्यांचे आकडे भरपूर काही सांगून जातात. या सामन्यांमध्ये त्यांनी ४०.४५ इतक्या स्ट्राईक रेटने १६१८ रन्स करत ६५ बळी मिळवले होते. या खेळीत त्यांनी तब्बल ३२ षटकार ठोकले होते.

याच कामगिरीच्या जोरावर त्यांना १९३३ साली विजडन यांच्यामार्फत क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी निवडलं गेलं.

साधारणपणे ३५ वर्षांच्या पुढे खेळाडू टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतात पण नायडू यांनी आपली सुरुवातच वयाच्या ३७ व्या वर्षी केली होती. पुढे ते वय वर्ष ६८ पर्यंत आपला फिटनेस सांभाळत क्रिकेट खेळत राहिले.

सी के नायडू हे आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये केवळ ७ कसोटी सामने खेळले. हे सामने खेळताना त्यांनी ७ सामन्यांत १४ डावांत २५ च्या सरासरीने ३५० रन्स केले आहेत. इतकंच नाही तर, त्यांनी ७ सामन्यांच्या १० डावात २.७ च्या सरासरीने ९ बळी आपल्या नावावर केले आहेत.

सी के नायडू यांनी आपला शेवटचा कसोटी सामना १५ ऑगस्ट १९३६ रोजी इंग्लंडच्या विरोधात खेळला होता. भलेही त्यांनी खूप कमी सामने खेळले असतील त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे आणि विक्रमांमुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्यांनी १९४१ साली ‘बाथगेट लिवर टोनिक’चे ब्रँड अँबेसिडर म्हणून काम केलं. त्यांनी क्रिकेटमध्ये केलेल्या अतुलनीय कामाची दखल घेत १९५६ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं.

भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारा हा तारा अखेर १४ नोव्हेंबर १९६७ रोजी निखळला. भलेही आज सी के नायडू आपल्यात नसतील पण एक आदर्श क्रिकेटर म्हणून ते आजही प्रत्येक खेळाडूला आदर्श आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आजचा भारत सर्व गुणदोषांसकट नरसिंहरावांचा भारत आहे, पण आपण त्यांना विसरलोय

Next Post

जे स्विस कंपन्यांना जमलं नाही ते टायटनने करून दाखवलंय

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

जे स्विस कंपन्यांना जमलं नाही ते टायटनने करून दाखवलंय

आजच्या लिव्ह इन रिलेशनची सुरुवात राजस्थानच्या नातं लग्न प्रथेमध्ये सापडते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.