The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या डॉक्टरांच्या प्राचीन वस्तू जमा करण्याच्या छंदातून केळकर म्युजियम उभं राहिलंय

by द पोस्टमन टीम
20 December 2025
in भटकंती, इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


माणसाला आपला छंद मनापासून जोपासला तर काय होऊ शकते याचे सर्वोत्तम उदाहरण आहे पुण्यातील गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावरचे राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय.

पुण्यात तसे अनेक वस्तू संग्रहालय आहेत पण या अनोख्या वस्तू संग्रहालयाची कथा निराळी आहे. एका मनुष्याच्या आयुष्यभराच्या साधनेतून या संग्रहालायची निर्मिती झाली आहे.

तब्बल १०० वर्षांचा इतिहास या वस्तू संग्रहालयाला लाभला असून आजही तो तितक्याच प्रभावीपणे जोपासला जातोय.

दिनकरराव केळकर हे व्यवसायाने नेत्ररोगतज्ज्ञ होते पण त्यांनी आयुष्यभर दोन छंद अगदी मनापासून जोपासले. त्यांचा पहिला छंद होता कवितांची रचना करणे आणि दुसरा छंद होता ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेत देशभ्रमण करून त्या वस्तूंचे संकलन करणे.



१९२० साली दिनकरराव केळकरांनी आपल्या ऐतिहासिक वस्तूंच्या संकलनाची प्रक्रिया सुरू केली आणि सलग ६० वर्षं भ्रमंती करून भारताच्या इतिहासातील काही प्राचीन वस्तूंचे संकलन करण्यात ते यशस्वी झाले.

त्यांनी फक्त संकलनच केले नाही तर त्यांच्या बाजीराव रस्त्यावरच्या जुन्या वाड्याला संग्रहालय बनवले. त्यांच्या याच संग्रहालयाला देश-विदेशातून लोक भेट देत असतात आणि त्यांनी संकलित केलेल्या ऐतिहासिक वस्तूंचे निरीक्षण तसेच अभ्यास करून भारताच्या ऐतिहासिक संपन्नतेविषयी जाणून घेतात, त्याचा अनुभव घेतात.

डॉ. केळकर हे इतिहासाचे अभ्यासक होते. त्यातूनच त्यांना इतिहासाच्या खाणाखुणा शोधण्याची आवड निर्माण झाली, त्यांनी भारतातील दुर्गम भागातून जाऊन इतिहासाच्या खुणा असलेल्या वस्तूंचे संकलन केले. त्यांनी मातीच्या ढिगात हिरा शोधावा अशाच प्रकारे ऐतिहासिक वस्तूंचे संकलन केले होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आपला हा छंद जोपासताना त्यांनी कसलाही विचार केला नाही. सगळं आयुष्य त्यासाठी खर्ची केलं. दूरवर भटकंती करून त्यांनी ऐतिहासिक वस्तू जमवल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहचाव्या यासाठी संग्रहालय उभे केले.

आज या संग्रहालयाचा कारभार त्यांचे नातू सुधन्वा हरी रानडे सांभाळत असून ते संग्रहालयात असलेल्या विविध वस्तूंची माहिती लोकांना देत असतात. त्यांनी द हिंदू या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संग्रहालयातील ऐतिहासिक मयूर वीणेची माहिती दिली आहे. मयूर वीणा ही मोराच्या आकाराची वीणा असून त्यावर चांदीचा मुलामा चढवण्यात आला आहे.

दिनकरराव केळकरांनी ६०वर्षांत पाचशे हून अधिक वाद्यांचे संकलन केले आहे.

मोराच्याच आकाराचा एक तंबोरा देखील संकलित करण्यात आला असून त्याला वाजवण्यासाठी धनुष्याकृती काडीचा वापर केला जातो. हे वाद्य २५० वर्षे जुने असून एकेकाळी पंजाबात वापरले जात होते. याला तौस किंवा ताऊस असे नाव असून फारसी भाषेत याचा अर्थ मोर असा होतो.

केळकर यांनी बालगंधर्व, उस्ताद अल्ला रखाँ, पंडित रामशंकरदास पागलदास आणि पु. ल. देशपांडे यांच्या संगीतवाद्यांचे देखील संकलन केले. केळकर हे संगीताचे चाहते होते, त्यामुळे ऐतिहासिक संगीत वाद्यांचे संकलन करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

सर्व संगीत वाद्ये ही अत्यंत थोर संगीतकारांनी वापरली असल्याने त्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. तब्बल २२ अशी संगीतवाद्ये आहेत जी काही महान व्यक्तींनी वाजवली होती.

दिनकरराव केळकरांना संगीताची इतकी आवड होती की त्यांनी अख्खं संग्रहालय संगीताने व्यापून टाकत सामान्य भारतीयांच्या राग वैभवाच्या इतिहासाचे जतन केले. पण हे संगीतवाद्य म्हणजे संपूर्ण संग्रहालय नाही. संग्रहालयाच्या तीन मजली इमारतीत बरेच काही आहे. त्यांच्या संगीत संग्रहालयाच्या पुढे मस्तानी महालाची प्रतिकृती ठेवली आहे.

थोरल्या बाजीराव पेशव्यांंनी मस्तानी बाईंसाठी या वाड्याची निर्मिती केली होती. अनेक मुघलकालीन व शिवकालीन नाणी, थोरल्या बाजीरावांची शाहू छत्रपतींना लिहलेली मोडी लिपीतील पत्रे यांचे देखील संकलन करण्यात आले आहे.

त्यांनी रघुनाथराव पेशव्यांच्या पत्नी आनंदीबाई यांचा रुखवतावरच्या सामानाचे आणि नक्षीदार आरशाचे देखील संकलन केले आहे. पेशवाईशी संबंधित एक दोन नव्हे तर तब्बल २२ हजार वस्तूंचे संकलन दिनकरराव केळकरांनी केले आहे. यावरून त्यांच्या साधनेची व्याप्ती लक्षात येते.

फक्त संगीत आणि पेशवाई नाही, प्राचीन मडकी, ह*त्यारं अशा तब्बल २१ हजार वस्तू त्यांनी संकलित करून शुक्रवार पेठेतील आपल्या या तीन मजली वाड्यात प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु आज त्यांच्या संग्रहालयात फक्त २५०० वस्तू आहेत. त्यांची देखील उत्तम प्रकारे काळजी त्यांचे नातू सुधन्वा रानडे घेत आहेत.

आधी या संग्रहालयाचे नाव राजा संग्रहालय असे होते पण कालांतराने दिनकररावांचे नाव प्रसिद्ध झाल्यावर संग्रहालयाचे नामकरण राजा दिनकरराव केळकर संग्रहालय करण्यात आले. आज हे राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणून ओळखले जाते.

आताच्या एकविसाव्या शतकानुरूप सुधन्वा रानडे यांनी अनेक बदल या संग्रहालयात घडवले असून अनेक अत्याधुनिक संसाधनं वापरून संग्रहालयाला सुशोभित केलं आहे. संग्रहालयातील वस्तूंची माहिती देण्यासाठी त्यांनी ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्यांच्या मनात संग्रहालयाला पुण्यातील बावधन या ठिकाणी स्थलांतरीत करण्याची योजना आहे. स्थलांतर करून एका मोठ्या जागेत अधिक वस्तूंचे प्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे.

आपल्या आजोबांनी आणि परिवाराने जोपासलेल्या या अमूल्य अशा साठ्याचे व्यवस्थापन अगदी चोखपणे सुधन्वा रानडे पाहत असून त्यांना असे करण्याची संधी प्राप्त झाली हेच त्यांचे सौभाग्य आहे. ते यासाठीच संपूर्ण श्रेय ते त्यांचे रसिक आणि जिद्दी आजोबा दिनकरराव केळकर यांना देतात कारण त्यांच्याच परिश्रमाने हे उभं राहिलं आहे.

दिनकरराव केळकर यांनी ज्याप्रमाणे आपलं आयुष्य अर्वाचीन वस्तू संग्रही करण्यात घालवलं, तसंच त्यांनी काव्यलेखनात देखील आपल्या प्रतिभेची छाप सोडली. ‘अज्ञात वासी’ या कवी नावाने त्यांनी काव्य लेखन केले असून ते देखील प्रसिद्ध आहे.

राजा केळकर संग्रहालय पुण्यातील इतिहासप्रेमी लोकांच्या आवडीचे ठिकाण असून मोठ्या संख्येने लोक संग्रहालयाला भेट देत असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Indian History
ShareTweet
Previous Post

भारतात हरवलेल्या ‘या’ आफ्रिकन जमातीला भारतासाठी ऑलम्पिक मेडल जिंकायचंय

Next Post

म्हणून या हंगेरियन शास्त्रज्ञांना ‘द मार्शियन्स ऑफ सायन्स’ म्हणतात

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

म्हणून या हंगेरियन शास्त्रज्ञांना 'द मार्शियन्स ऑफ सायन्स' म्हणतात

खाण कामगारांसाठी बनवलेल्या जीन्सला हॉलिवूडने जगभर फेमस केलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.